.
२१ ऑक्टोबर, २०२३
८ ऑक्टोबर, २०२३
२३ सप्टेंबर, २०२३
दर्शनमात्रे नाम ...
प्रचंड संख्येने येणारे भक्त, अरुंद गल्ली, थोडीशी गडबड होणारच की.
नवरात्रीत अंबाबाईच्या देवळात, दत्तजयंतीला नरसोबाची वाडी ला ही गर्दी होते. होणारी गर्दी हा मुळात विषयच नाही तर गर्दीचे व्यवस्थापन. त्यात मधे मधे कडमडणारे सेलिब्रेटी हे सगळं मॅनेज करणं हे महत्वाचं आहे
ढकलाढकली, कार्यकर्त्यांची अरेरावी, मारहाण हे दरवर्षी चे प्रकार होत असल्याने अनेकांनी सोशल मिडियावर यावर परखड मत व्यक्त केले आहे. ते बरोबर ही आहे
(असे जेंव्हा प्रकार घडतात तेंव्हा मला गजानन विजय पोथीतील काही अध्याय आठवतात. गजानन महाराजांनी ही आपल्या काही भक्तांना मुद्दाम असे प्रसाद देऊन त्यांच्याबाबत काही चमत्कार केले आहेत. अर्थात इथे पोलिस / कार्यकर्ते देतात हा भाग वेगळा. पण असा प्रसाद मिळणाऱ्यांच्या बाबतीत काही विशेष घडत असणार हे आपलं आमचं वय्यक्तिक मत )
हे सगळं 'कळत' असून ही, आज ही आमच्यासारख्या लाखो भक्तांची पावले मुख- दर्शनासाठी 'वळतात'.
रांगेत लागणारा दोन एक तासाचा कालावधी 'राजाचा विजय असो' या घोषणेत कसा निघून जातो ते कळतच नाही.
मोठ्या मैदानातील रांगेतून जेंव्हा लहानशा गल्लीत रांग येते . प्रचंड गर्दीतून पुढे पुढे जात असताना सभोवतालचे लाईटींग, डेकोरेशन बघत बघत जाताना एका क्षणी वळणावर दरबार दिसू लागतो
राजाचा डावा हाताचे प्रथम दर्शन मग डावीकडे वळणा-या गल्लीतून जसे जसे पुढे जाऊ तसं तसं राजाचे दर्शन व्हायला सुरुवात होते.
गेली अनेकवर्ष हेच दृश्य अनुभवले आहे.
तिथून पुढचा प्रवास काही मिनिटाचा.
पण त्या शाही दरबारातील राजाचे तेज अनुभवणे ही एक वेगळीच अनुभूती. अर्थात आधी लिहिल्याप्रमाणे हे तेज तुम्हाला जास्त अनुभवता येणार नाही किंवा त्याचा त्रास तुम्हाला जास्त होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मंडळाचे सदस्य, पोलिस तत्पर असतात. पुढील काही मिनिटात तुम्ही बाहेर कसे आलात हे तुम्हाला ही कळत नाही.
लालबागचा दरबार
भव्य दिव्य मुर्ती
दर्शनमात्रे मान
कामनापुर्ती...
ही शान कुणाची, लालबागच्या राजाची 🙏🌺
देवा तुझ्या द्वारी आलो 📝
poetrymazi.blogspot.com
२३/०९/२३
१७ सप्टेंबर, २०२३
१० सप्टेंबर, २०२३
गरुडाला गुळाची चव काय
.छोट्या छोट्या गोष्टीत शास्त्राची प्रचीती येते.
२ तारखेला बुधाच्या रेवती नक्षत्रावर
भारत x पाकिस्तान सामना सुरु झाला
त्यादिवशी पावसाने सामना वाया गेला.
बुध रिपिटेशनचा कारक आहे . बुधाच्या नक्षत्रावर एखादी घटना घडली/ केली की पुनरावृत्ती होते
हेच आज परत भारत - पाकिस्तान सामन्यात दिसले. आजही पाऊस आला.
ज्यांच्याकडून आम्ही हे शास्त्र शिकलो ते गुरुजी म्हणायचे, एखादी आवडणारी गोष्ट बुधाच्या नक्षत्रावर सुरु करा
उदा. मैत्रिणीला भेटणे, डेटिंग करणे वगैरे म्हणजे पुनरावृत्ती होईल 😌
टॅरोट कार्ड बद्दल ही असे छान अनुभव आहेत ते परत कधीतरी
आमच्या एका ज्ञानी मित्राने या प्रकाराला ' तुझे तरोट का फिरोट भाकड पत्ते ' असं नाव दिले आहे. अर्थात तो ज्ञानी आणि आमच्यासाठी गुरूवर्य असल्याने एक म्हण त्याच्यासाठी बदलून
#गरुडाला_गुळाची_चव_काय
देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.com
१३ ऑगस्ट, २०२३
आचार्य अत्रे
.कुंडलीत मंगळ - बुध योग असता मग तो केंद्रयोग असो,प्रतियोग असो, युतीयोग असो
टीकात्मक स्वभाव, दुस-याचे मर्म बाहेर काढणे, विनोद करणे, चेष्टा करणे, टर उडविणे हे स्वाभाविक गुणधर्म पहावयास मिळतात
कै. आचार्य अत्रांच्या कुंडलीत लग्नातील बुध दशमातील मंगळाच्या अंशात्मक केंद्रयोगात आहे
(माहिती साभार : महाराष्ट्राचा कुंडली संग्रह )
आज १३ आँगस्ट २०२३, आचार्य अत्रे यांना "शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्य"
विनम्र अभिवादन१८ जून, २०२३
३१ मे, २०२३
वस्त्र- संहिता
वस्त्र - संहिता 📝
यापुढे नवस करायचे/ फेडण्याचे उपाय सांगताना पंडीत/ ज्योतिषांनी विशेष ध्यान दिले पाहिजे.
' नवरा_माझा_नवसाचा ' मधील उपाय हा इतिहासजमा होणार आहे.
मेष राशीत ,अश्विनी या केतूच्या नक्षत्रातील 'गुरु' ने वस्त्र-संहितेचे नियम बनविण्यासाठी चालना दिली आहे हे नक्की
मोठमोठी देवस्थाने, मोठमोठे नियम लावून अंमलबजावणी करतीलच, प्रश्ण आहे तो तुलनेने लहान, छोट्या गावातील मंदिरांचा. महत्वाच्या कामाला निघताना किंवा गुरुवार,शनिवार,सोम-मंगळवारी, किंवा विशिष्ठ दिवशी आँफीसला जायच्या आधी देवळात जाताना वेळ वाचावा म्हणून केवळ शूज काढून 'मोजे' न काढताच आपण अनेकजण देवळात जातोय. हे ही थांबवले पाहिजे.
ठाण्याला स्टेशनजवळ असणाऱ्या
' स्वामी समर्थांच्या मठात ' मोजे न घालून येण्याबाबत उल्लेख आहे. असा उल्लेख इतर ही काही ठिकाणी आढळला
थोडक्यात
"मौज आणि मोजे " बाहेर ठेऊनच मंदिरात यावे
असा एखादा फलक/ नियम सर्व मंदिरात लावायला हरकत नाही.
देवाचिया द्वारी
पूर्ण वस्त्रधारी
तेणे दर्शन भारी
साधकाला !!
गोविंदाय नमो नम :🙏🙏🌷
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो
जेष्ठ शु. एकादशी
३१/५/२३
२९ मे, २०२३
२३ मे, २०२३
१९ मे, २०२३
श्री शनैश्चर जयंती
श्री शनैश्चर जयंती
नमो शनीदेवा, तुझा मीच दास
अशी बुध्दी देई, मला तुची खास
घडो दिन- दुबळ्यांची, अखंडीत सेवा
मनाला अहंकार कधीना शिवावा
वैशाख अमावस्या
१९/०५/२३
६ एप्रिल, २०२३
बजरंग बाण आणि ८ आँफ वाॅन्डस्
बजरंग बाण आणि ८ आँफ वाॅन्डस्
अपेक्षित काम होण्यास विलंब लागत असेल, एखादी घटना व्हावी अशी इच्छा असताना ती घडत नसेल तर 'बजरंग बाण ' या अत्यंत उपयुक्त श्लोकाचे नित्य पठण सुरु करा. इच्छित गोष्टी संबंधित काहीतरी बातमी येण्यास सुरुवात होते.
अमेरिकेत शिक्षण घेऊन व्हिसा संपण्याच्या आधी नोकरी मिळणे आवश्यक असणाऱ्या दोन मुलींसाठी काही महिन्यापुर्वी मी हा उपाय सांगितला. एकीला गुढीपाडव्याला नोकरी लागली तर दुसरीचा इंटरव्यूचा फायनल राऊंड आज अपेक्षित आहे.
पाश्चिमात्य टॅरो कार्ड रिंडींग मधे ८ आँफ वाॅन्डस् हे कार्ड
'लवकरच अपेक्षित बातमी येईल' हे सुचवते
या कार्डच्या +ve स्पंदनाने ( Affirmation साठी कार्डचा वापर करून) आणि बजरंग बाणच्या नित्यपठणाने आपले अपेक्षित काम लवकरात लवकर आणि यशस्वी होवो या आज श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्याने शुभेच्छा 🙏🙏
( अभ्यासक) अमोल
चैत्र पोर्णीमा
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो
kelkaramol.blogspot.com
२३ मार्च, २०२३
अशक्य ही शक्य
Impossible मधेच I am possible दडलेले आहे हे मॅनेजमेंट फंडा किंवा मोटीवेशनल वाक्य म्हणून ठिक आहे
पण 'अशक्य ' हा शब्द ऐकण्यात आला की पहिले आठवतात ' स्वामी'.
"अशक्य ही शक्य करतील स्वामी"
हे वचन, ही प्रार्थना, ही श्रध्दाच I am possible होण्यास प्रेरणादायक ठरते हे नक्की
स्वामी समर्थांना 🙏🌺
चैत्र.शु द्वितीया 📝
२३/०३/२३
देवा तुझ्या द्वारी आलो
हे वचन, ही प्रार्थना, ही श्रध्दाच I am possible होण्यास प्रेरणादायक ठरते हे नक्की
स्वामी समर्थांना 🙏🌺
चैत्र.शु द्वितीया 📝
२३/०३/२३
देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.com
२२ मार्च, २०२३
१९ मार्च, २०२३
International Astrology day
."International Astrology day
"
अवांतर: ज्योतिष विषयक धागा आल्या आल्या डराँव,डराँव करणाऱ्यांना त्याच दिवशी ( २० मार्च) असणा-या आंतराष्ट्रीय बेडूक दिनाच्या अगावू शुभेच्छा 💐
"
- 20th March
(तर यासंबंधीची इंग्रजी माहिती इथे चित्रात दिलीआहे.)
जागतीक स्तरावर अगदी होनोलूलू पासून होचिमीन पर्यत असंख्य लोकांना वाटणारा हा उत्सूकतेचा विषय आहे यात मला तीळमात्र शंका नाही.
हे शास्त्र आहे किंवा नाही असल्या कुठल्याही वादात न पडता बरेचजण प्रसंगानुसार / आलेल्या परिस्थितीनुसार विविध प्रकारे
'भविष्याच्या अंतरंगात ' डोकवण्याचा प्रयत्न करतच असतात
सांगितलेला अंदाज चुकल्याचा अनुभव जरी आला तरी पुढल्यावेळेला कदाचित मार्गदर्शक बदलला जातो पण 'भविष्याच्या अंतरंगात ' काय दडंलय याची वेळोवेळी उत्सूकता जनमनावर कायम राहते
आणि हा शोध घेण्याची परंपरा पुढेही कायम राहणारच. या उत्सूकतेला धर्म, जात,लिंग, प्रदेश यांचेही बंधन लागू पडत नाही हे ही एक वैशिष्ठ म्हणता येईल
*"याच जिज्ञासेतून या शास्त्राला जिवंत ठेवणा-या सृष्टीतील तमाम घटकांना*
*या दिवसाच्या निमित्याने एक दिवस आधीच शुभेच्छा"*
💐💐
भारतीय ज्योतिष शास्त्र सर्वदृष्टीने अत्यंत संपन्न आहे. भृगुसंहिता ( महर्षी भृगू यांची) , प्रश्णशास्त्र ( यातील आचार्य वराहमिहिरांचा 'दैवज्ञवल्लभ', आचार्य पृथुयश यांचा षट्पंचशिका, श्री सिध्दनारायण दास यांचा 'प्रष्णवैष्णव', भटोत्कलाचा 'प्रश्णज्ञानम' ), सारावली ते कृष्णमूर्ती ,भावनवमांश पध्दती पर्यंत योगदान अनेक आचार्यांनी दिले आहे.
साहित्य क्षेत्रात या विषयावर लिखीत पुस्तके, मासिके जेवढी उपलब्ध असतील तेवढी खचीतच एखाद्या क्षेत्रात असतील. आधुनिक सोशल मिडीया जसे यूट्यूब, ब्लाँग क्षेत्र ही या शास्त्राने व्यापले आहे.
'ग्रहांकीत' मासिकाच्या ( आँक्टो २०१०).अंकात आलेली ज्योतिषी डाँ.वासुदेव राव जोशी यांची मुलाखत मध्यंतरी वाचनात आली होती
यात त्यांना एक प्रश्ण विचारला होता की
"ज्योतिषाची मर्यादा काय आहे? "
यावर एक संस्कृत श्लोक त्यांनी सांगितला
//
*फलानि ग्रहचारेण सूचयान्ति मनुष्यणा !*
*को वर्ता तारतम्यस तमेकं वेध संविना !!*
म्हणजे ज्योतिषी कुंडली बघून फलादेश फक्त सांगतो; परंतु एखादी घटना घडणारच ( किंवा घडणारच नाही) हे ईश्वराविना कोणी सांगू शकत नाही. त्याचे श्रेष्ठत्व मानायलाच पाहिजे
//
थोडक्यात मर्यादा आहेत हे सत्य दोन्ही बाजूनी स्वीकारले तर अनेक वादविवाद टाळता येण्यसारखे आहेत.
भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञान आणि भारतीय जोतिष शास्त्र यांच्यात एक जवळीक आहे असे मला कायम वाटते.
अथांग समुद्रा एवढी व्याप्ती असलेल्या अशा या दैवी शास्त्रात , काठावर तरी डुंबायला मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळात या शास्त्रासंबंधीत सेवा द्यायची संधी मला वेळोवेळी मिळो हीच सदिच्छा 🙏
(ज्योतिष अभ्यासक) अमोल केळकर 📝
१९/०३/२३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




.jpeg)



.jpeg)
.jpeg)



