१६ जुलै, २०२६

गुरु -शनी गोचर

.साधारण 15 सप्टेंबर 1975 ते 25 फेब्रुवारी 1976 या दरम्यान जन्म झालेल्यांच्या पत्रिकेत गुरु मीन राशीत रेवती नक्षत्रात आहे, तर शनी कर्क राशीत पुष्य नक्षत्रात आहे ( यात आम्ही स्वतः आहोत )

तर आजची ग्रह स्थिती अशी आहे की या कालावधीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या पत्रिकेत गोचरीने शनी महाराज गुरु वरून भ्रमण करत आहेत ( सध्या शनी मीन राशीत रेवती नक्षत्रात आहे )
तर गोचरीने गुरु शनी वरून भ्रमण करत आहे ( सध्या गुरु कर्केत पुष्य नक्षत्रात आहे )

*गुरु -शनी युती अध्यात्मिक प्रगतीसाठी चांगली असते* त्यात हे डबल इंजिन लागले आहे 

याबाबत मला स्वतःला चांगला अनुभव आलाय आणि कुणाला आला असल्यास अवश्य सांगा 

( अर्थात याला अपवाद असूच शकतात ☺️ )

( अभ्यासू ) अमोल 📝
14/07/26 

सिध्दमंंगल स्तोत्र



१९ जून, २०२६

दत्त भक्त ( संग्रहित )

दत्त भक्त -- याची व्याख्या म्हणजे ज्याला उद्धरून नेण्याचे महाराजांनी ठरवले तो दत्त भक्त . ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारुपी प्रेरणा दिली तो दत्त भक्त . या लीला माहीत असोत व नसोत त्या

ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,ज्याला आपल्या पायांचा उपयोग नृसिहवाडी सारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटते  तो दत्त भक्त . महाराजांच्या समोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा  मिळते तो दत्त भक्त . थोडक्यात आपल्या शरीर ,मन ( बुद्धी ) आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीकरता करतो तो दत्त भक्त . 

पण मग या दत्त भक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि कसे ? तर हि दत्त भक्ती फार दुर्लभ आहे . सर्वाना महाराजांनी ती संधी दिलेली नाही . दत्त माहात्म्यातील सात गाथा सांगताना स्वतः दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाला म्हणतात ,माझी भक्ती दुर्लभ जाण l ती तुला मिळाली दैवेंकरून ll (द मा ९/१०५) हि दुर्लभ अशी दत्त भक्ती आपल्या वाट्याला आली असताना सहजसाध्य  मात्र अजिबात नाही . या मार्गात पापरूपी सर्प फुत्कार सोडत आहेत ,प्रलोभनांचे भोवरे गिळू पाहत आहेत ,निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायम सोबत करत आहेत ,नाना संकटे मध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत . 

या सर्वाना चुकवत दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही . पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही आणि म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण हि मनाला दिलासा देणारी आहे . हि आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही याचे सूचक आहे . अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटू न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका . आधीच मनुष्य जन्म दुर्लभ त्यातही तो भारत वर्षात त्यातही इथे या राज्यात त्यातही महाराजांच्या सेवेत आपण आहोत . अल्प स्वल्प का होईना होत राहणे महत्वाचे आहे . किती होत आहे पेक्षा काहीतरी होत राहणे आणि ते हि नित्य हे मोलाचे आहे . तेव्हा या दत्त भक्त असल्याचा अभिमान बाळगत नित्य म्हणत रहा ---
*!!!श्रीगुरुदेव दत्त !!!*
 
---अभय आचार्य

*!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*