कठीण शब्द वाईट वाटते ! हेतो प्रत्ययास येते !
तरी मग वाईट बोलावे ! काये निमित्य !!
पेरिले ते उगवते ! बोलल्यासारीखे उत्तर येते !
तरी मग कर्कश बोलावे ! ते काये निमित्य !!
दुस-यास दु:ख करी ! ते अपवित्र वैखरी !
आपणास घात करी ! कोणी येके प्रसंगी !!
------------ समर्थ राम दास स्वामी !
जय जय रघुवीर समर्थ !
सर्वात महत्त्वाचे कर्मेंद्रिय आहे तोंड . याचा वापर खूप विचार करुनच माणसाने किंवा ह्या देहरुपी शरीरार राहणा-या मी ने केला पाहिजे पण तो तसे करत नाही
म्हणुन नाना त-हेच्या संकट, समस्या, दु:खाना सामोरे जावे लागते . माणूस नको ते नको तेंव्हा बोलतो आणि मग अनेक अनर्थ होतात
No comments:
Post a Comment