पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून माणसाला होणा-या रोगा संबंधी भाष्य कराता येते. त्या स्थानात जी रास असते , तसेच तिथे जे ग्रह असतात त्यावरुन भविष्यातील रोगा संबंधी अनुमान काढता
येते
रास आणि ती रास दर्शवत असलेला रोग
मेषराशी - डोक्याशी संबंधीत रोग उदा. डोके दुखणे, झोप न येणे, , मेंदुचे विकार, इ
वृषभ राशी - घशाचे विकार , टॉन्सिल इ, माने संबंधी विकार
मिथुन राशी - फुप्फुस , श्वास नलिका, रक्ता संबंधी विकार,
कर्क रास - पचनसंस्था, छाती, स्तन यास्म्बंधीत आजार
सिंह रास - पाठ , पाठीचा कणा, हृदय विकार यास्म्बंधीचे आजार
कन्या रास - पोट , अपचन , लहान आतडे, मोठे आतडे यावर या राशीचा अवलंब आहे
तूळ रास - मधुमेह , किडनीचे रोग
वृश्चिक रास - मुळव्याध , गळवे, गुप्त रोग, प्रजननसंस्था, गुदद्वार
धनु राशी - क्षय रोग, यकृताचे रोग , रक्त संबंधीत रोग, नितंब , मांड्या
मकर रास - गुढगे, सांधे दुखी , त्वचा रोग
कुंभ रास - पाय घोटे, रक्ताभिसरण संबंधीत, पायाचीए हाडे
मीन रास : शरीरातील पाण्यासंबंधीत रोग, पावलांचे रोग, अस्वच्छतेने होणारे रोग इ
( महाराष्टाचे लाडके नेते श्री विलासराव देशमुख यांच्या पत्रिकेत षष्ठ स्थानात तूळ रास असून ती त्यांची जन्म रास आहे. नवमांश कुंडलीत षष्ठ स्थानात कन्या रास येते . नवमांश षष्ठेश ' बुध ' मुळ पत्रिकेत ( लग्न कुंडलीत ) व्ययस्थानात शत्रू राशीत आहे. तसेच त्यांना शुक्र महादशा ( षष्ठ स्थानाची ) चालू आहे . गोचरीने शनी नुकताच तुळ राशीत आला आहे , राशी स्वामी शुक्र जो स्वतः षष्ठेश आहे तो मंगळा बरोबर मीन राशीत ( उच्चीचा ) आहे तसेच द्वितीयातील शनीची दहावी दृष्टी शुक्रा वर आहे . नवमांश कुंडलीत शुक्र, चंद्र , बुध व्ययात आहेत
श्री विलास रावांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो ही सदिच्छा )
No comments:
Post a Comment