September 12, 2008

स्प्रेड

टॅरो रिडिंग घ्यायच्या ( रिडिंग घेण्यासाठी कार्डे मांडण्याच्या )वेगवेगळ्या पध्दती आहेत. त्याला स्प्रेड असे म्हणतात.
सुरवातीला आपण सगळ्यात सोपा स्प्रेड पाहू.
आपल्याला बर्‍याच वेळा एखाद्या प्रश्नाचे ' हो ' किंवा ' नाही' असे उत्तर हवे असते.
यासाठी एक स्प्रेड वापरला जातो. यात आपणाला १३ पानांचा एक हीप ( गठ्ठा ) असे ३ हीप करवयाचे आहेत.
७८ कार्डे हातात घेऊन , एकमेकांवर ओळीने १३ कार्डे रचत जावीत. ज्याक्षणी कुठलेही एस ( एक्का ) किंवा मॅजिशिअन, हे कार्ड येईल त्यावेळी थांबावे. जर या पैकी कुठलेही कार्ड आले नाही तर १३ कार्ड झाल्यावर थांबावे.
असेच आणखी २ वेळा करावे.
आता ३ गठ्ठ्यात ३ एक्के किंवा २ एक्का व मॅजिशिअन किंवा २ एक्के असल्यास तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय
एक एक्का आणि मॅजीशिअन, फक्त मॅजिशिअन - होय असण्याची जास्त शक्यता
फक्त एक एक्का - नाही उत्तर असण्याची जास्त शक्यता
एकही एक्का, मॅजेशिअन नसल्यास - नाही उत्तर

3 comments:

imsaurabh said...

pratyek veli 13 cards zalyavar parat cards shuffle karave ki he continues karat jave?

अमोल केळकर said...

आपण दाखवलेल्या उत्सूकतेबद्दल धन्यवाद.

एकदा १३ कार्डॅ काङल्यावर परत शफल करायचे नाही. परत त्याच क्रमाने पुढील १३ पाने काढावीत

धन्यवाद

imsaurabh said...

ok thanks a lot amol.....

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या