February 19, 2013

देवघर - देवदर्शन

  देवघर - देवदर्शन

आपल्या घरातील देवघर, त्यातील देव, देवदर्शन  यासंबंधी  हे माहित  असावे

१)  देवघरामधे पुजनातील मुर्तीची उंची उजव्या हाताच्या अंगठ्याच्या तिस-या  पेरापर्यंत किंवा एक वित पर्यंत असावी. वीत पेक्षा जास्त असू नये.

२)  देवाचे आसन पुजकाच्या आसनापेक्षा उंचावर असावे

३) देवांच्या मुर्तींची तोंडे एकमेकांसमोर असू नयेत.

४) देवपुजनापुर्वी प्रथम पुजकाने कपाळास कुंकुम तिलक लावावा.

५) देवघरामधे लक्ष्मीशंख व घंटा असणे आवश्यक

६)  पूजनानंतर शंख पाण्याने भरुन ठेवावा, शंखाचा निमूळता भाग उत्तरेकडे किंवा पुर्वेकडे असावा

७)  देवघरात एकाच देवताच्या दोन मूर्त्या नसाव्यात

८) देवपुजेतील उपकरणे शकय्तो तांब्याची किंवा चांदीची असावीत. स्टिलची असू नयेत

९) करंगळी जवळील बोटाने ( अनामिका ) देवाला गंध लावावे. स्वतः ला मधल्या बोटाने गंध लावावे

१०)  देवळात दर्शनाला जाताना, देवळाच्या पाय-या चढताना पाय-यांना  उजव्या हाताने स्पर्श करावा

११) आपल्या इष्ट देवतेला पाच प्रदक्षिणा तरी घालाव्यात




No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या