February 4, 2013

श्री स्वामी समर्थ १०८ नामावली - अनुभव



  श्री स्वामी समर्थ १०८ नामावली

ही नामावली स्वतः च्या हाताने एका को-या कागदावर लिहिण्यास सुरवात करावी . लिहित असतानाच काही चांगल्या बातम्या मिळतात. अवश्य अनुभव घेऊन बघा

 ॐ   दिगंबराय नमः, ॐ  वैराग्यांबराय नम : , ॐ  ज्ञानांबराय नमः ,ॐ  स्वानदांबराय नमः, ॐ  अतिदिव्यतेजांबराय नमः,ॐ   काव्यशक्तिप्रदायिने  नमः,ॐ अमृतमंत्रदायिने नमः,ॐ  दिव्यज्ञानादत्ताय नमः,ॐ  दिव्यचक्षुदायिने नमः,ॐ   चित्ताकर्षणाय नमः,ॐ  चित्तशांताय नमः,ॐ   दिव्यानुसंधानप्रदायिने नमः,ॐ  सद्गुणविवर्धनाय नम : ,ॐ  अष्टसिध्दिदायकम नमः,ॐ भक्तिवैराग्यदत्ताय नमः ,ॐ मुक्तिभुक्तिशक्तिप्रदायने नमः,ॐ  गर्वदहनाय नम :,ॐ  षङरिपुहरिताय नमः,ॐ  आत्मविज्ञानप्रेरकाय नमः,ॐ  अमृतानंददत्ताय नमः,ॐ चैतन्यतेजसे नमः,ॐ   श्रीसमर्थयतये नमः,ॐ भक्तसंरक्षकाय नम :,ॐ अनंतकोटिब्रम्हांडप्रमुखाय नमः,ॐ अवधूतदत्तात्रैय नम :,ॐ   चंचलेश्वराय नमः,ॐ  आजानुबाहवे नमः,ॐ  आदिगुरवे नम :,ॐ  श्रीपादवल्ल्भाय नमः,ॐ  नृसिंहभानुसरस्वत्ये नमः,ॐ  कुरवपुरवासिने  नमः ,ॐ  गंधर्वपुरवासिने  नमः,ॐ  गिरनारवासिने नमः,ॐ  श्रीकौशल्यनिवासिने नम:,ॐ  ओंकारवासिने नमः,ॐ  आत्मसूर्याय नमः,ॐ  प्रखरतेजा प्रचतिने नमः,ॐ  अमोघतेजानंदाय नमः,ॐ  तेजोधराय नमः,ॐ   परमसिध्दयोगेश्वराय नमः,ॐ स्वनंदकंदस्वामिने नमः ,ॐ  स्मर्तृगामिने नमः,ॐ कृष्णानंद अतिप्रियाय नमः,ॐ  योगिराजेश्वरया नम :,ॐ भक्तचिंतामणिश्वराय नमः,ॐ  नित्यचिदानंदाय नमः,ॐ अकारणकारुण्यमूर्तये नमः,ॐ  चिरंजीवचैत्यन्याय नमः,ॐ अचिंत्यनिरंजनाय नमः,ॐ   दयानिधये नमः,ॐ  भक्तचिंतामणीश्वराय नमः,ॐ   शरणागतकवचाय नमः,ॐ वेदस्फूर्तिदायिने नमः,ॐ  महामंत्रराजाय नमः,ॐ  अनाहतनादप्रदानाय नमः,ॐ  सुकोमलपादांबुजाय नमः,ॐ  चित्शक्यात्मने नमः,ॐ  अतिस्थिराय नमः,ॐ  माध्यन्हभिक्षाप्रियाय नमः,ॐ  प्रेमभिक्षांकिताय नमः,ॐ  योगक्षेमवाहिने नमः,ॐ  भक्तकल्पवृ़क्षाय नमः,ॐ  अनंतशक्तीसूत्रधराय नमः,ॐ  परब्रह्माय नमः,ॐ अनितृप्तपरमतृप्ताय नमः,ॐस्वावलंबनसूत्रदाये नमः,ॐ असमर्थसामर्थ्यदायिने नमः,ॐ योगसिध्ददायकम नमः,ॐ  बाल्यभावप्रियांय नमः,ॐ भक्तिनिधनाय नमः,ॐ औदुंबरप्रियाय नमः,ॐ  यजसुंकोमतलनुधारकाय नम:,ॐ त्रिमूर्तिध्वजधारकाय नमः,ॐ चिदाकाशव्याप्ताय नमः,ॐ  केशरचंदनकस्तूरीसुगंधप्रियाय नमः,ॐ साधक संजीवन्यै नमः , ॐ  कुंडलिनीस्फूर्तिदात्रे नमः, ॐ  अक्षरवालाय नमः, ॐ   आनंदवर्धनाय नमः, ॐ  सुखनिधानाय नमः, ॐ  उपमातिते नमः,ॐ   भक्तिसंगीतप्रियाय नमः,ॐ अकारणसिध्दिकृपाकारकाय नमः,ॐ  भवभयभंजनाय नमः ,ॐ  स्मितहास्यानंदाय नमः,ॐ संकल्पसिध्दाय नमः,ॐ संकल्पसिध्दिदात्रे नमः,ॐ  सर्वबंधमोक्षदायकाय नमः,ॐ  ज्ञानातीतज्ञानभास्कराय नमः,ॐ श्रीकिर्तीनाममंत्राभ्यों नमः,ॐ अभयवरददायिने नमः,ॐ गुरुलीलामृत धाराय नमः, ॐगुरुलीलामृतधारकाय नमः,ॐ वज्रसुकोमलहृदयधारिणे नमः,ॐ सुविकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः,ॐ निर्विकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः,ॐ  त्रिकालातीतत्रिकालज्ञानिने नमः,ॐ  भावातीतभावसमाधिभ्यों नमः,ॐ  ब्रंह्मातीत - अणुरेणुव्यापकाय नमः,ॐ त्रिगुणातीतसगुणसाकारसुलक्षणाय नमः,ॐ बंधनातीतभक्तिकिरणबंधाय नमः,ॐ  देहातीतसदेहदर्शनदायकाय नमः,ॐ चिंतनातीतसदेहदर्शनदायकाय नमः,ॐ  मौनातीत - उन्मनीभावप्रियाय नमः,ॐ बुध्दयतीतसद् बुध्दिप्रेरकाय नमः,ॐ मत् प्रिय - पितामहसद् गुरुभ्यों नमः,ॐ  पवित्रमात्यसाहेबचरणाविदभ्यो नमः

ॐ अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः!!


 

श्री स्वामी समर्थ १०८ नामावली - अनुभव

मध्यंतरी  या इथे आणि इतरत्र श्री स्वामी समर्थांची  नामावली  दिली होती. त्यासंबंधी  आलेला अनुभव श्री निशांत पोतदार यांनी लिहिलेला आहे. तो  त्यांच्या परवानगीने इथे देत आहे. 

 
Inbox
x

Nishant Potdar
Jan 28 (7 days ago)

to me
प्रती,
श्री अमोल केळकर,

नमस्कार, मी निशांत पोतदार, आपले फेसबुक पेज प्रारब्ध/कुंडली बघितले, बरीच माहिती मिळाली. त्याबद्धल धन्यवाद.
आपण दिलेली पोस्ट "श्री स्वामी समर्थ १०८ नामावली ही नामावली स्वतः च्या हाताने एका को-या कागदावर लिहिण्यास सुरवात करावी . लिहित असतानाच काही चांगल्या बातम्या मिळतात. अवश्य अनुभव घेऊन बघा" संपूर्ण वाचली आणि तसे करून सुद्धा बघितले.
लिहीत असताना काही चांगल्या बातम्या मिळतील असे सांगितल्याप्रमाणे मी लिहीत होतो आणि चांगल्या बातमीची वाट पाहत होतो पण असे काहीच झाले नाही. चला मला वाटले मला काही गोष्टी ऑफिसात असल्यामुळे समजल्या नसतील म्हणून मी पत्नीला विचारले, तर तिला सुद्धा काही बातमी मिळाली नाही. संपूर्ण नामावली लिहून बराच वेळ झाला तरी काहीच नाही म्हणून शेवटी पोस्टला कमेंट न करता आपल्याला संपर्क करण्याचे ठरवले.

नामावली लिहिताना मला अनुभव आला नाही यावर आपले मत काय आहे ते सांगावे.

धन्यवाद,
निशांत पोतदार
अमोल केळकर
Jan 28 (7 days ago)

to Nishant
श्री निशांत पोतदार

नमस्कार, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मला जो अनुभव आला तो मी लिहिला आहे. कदाचीत आपणास तसा अनुभव आला नसेल, नामावली लिहिलेल्या दिवसापासून काही १-२ दिवसात/ आठवड्यात काही चांगल्या घटना घडल्या आहेत का?

असो.

आपला अमोल
Nishant Potdar
Jan 28 (7 days ago)

to me

श्री अमोल केळकर,
माझा मेल वाचल्याबद्दल धन्यवाद. नामावली मी आताच काही वेळापूर्वी लिहिली आहे आणि तसेच स्वामी समर्थांवर आम्हा सर्वांची श्रद्धा आहे. असो आपण सांगितल्या प्रमाणे आणखी काही दिवस वाट पाहून आपणास अनुभव नक्की सांगीन.
धन्यवाद.

निशांत पोतदार
Nishant Potdar
2:05 PM (31 minutes ago)

to me
श्री अमोल केळकर,

नमस्कार,
आपण दिलेल्या नामावालीचा मला सुद्धा अनुभव आला. लगेच नाही पण नामावली लिहिल्यापासून ४ दिवसांनी मला चांगली बातमी समजली. माझ्या पत्नीच्या ऑफिस मध्ये कामगारांना भरपूर सुट्ट्या या वर्षी पासून लागू झाल्याची आनंदी बातमी कळाली.

धन्यवाद...


आपला नम्र,
निशांत पोतदार

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या