२७ फेब्रुवारी - 'मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ' जेवढे शक्य असेल तेवढे आपण एकमेकांशी ( मराठी माणसाशी ) मराठीतून बोलू , मराठीतून पत्रव्यवहार करु आणि मराठी भाषा समृध्द करण्याचा प्रयत्न करु !!
आपला
अमोल केळकर
नवी मुंबई, बेलापूर
२७ फेब्रुवारी, २०१०
२३ फेब्रुवारी, २०१०
आजचे कार्ड - ७ ऑफ पेन्टॅकल
पेन्टॅकल सूट हा पृथ्वी तत्त्वाचा आहे. ७ ऑफ पेन्टॅकल हे कार्ड आपल्याला सध्याच्या परिस्थितीचा परत अंदाज घ्यावा असे सुचवते. काही वेळा एकादी गोष्ट घडवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले असतात . मात्र त्याचे रिझल्ट्स , फळे अजूनही मिळाली नसतात. अशावेळी जेंव्हा हे कार्ड रिडिंग मधे येते त्यावेळेला संयम राखा योग्य वेळ आल्यावर काम घडेल . ती घटना घडण्याची अजून वेळ आलेली नाही असे सुचवते .थोडक्यात 'इंतजार का फल मिठा होता है ' असेच काही से.
चित्रात दाखवलेला शेतकर्याने पिक येण्यासाठी आवश्यक ते सर्व काम केले आहे. आता फक्त वाट बघणे एवढेच त्याच्या हातात आहे आणि तो तेच करत आहे.
काही वेळा अशा वेळी फारच निराश वाटते. प्राप्तपरिस्थितीत सारासार विचार करुन दुसर्या मार्गाचा अवलंब करणे शक्य आहे का ? हे बघावे असे ही हे कार्ड सुचवते.नेहमीच्या जीवन पध्दतीत आपणाला आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. हे कार्ड रिडिंग मधे आल्यास आपण थोडा आपणासाठी वेळ काढावा. चालू रुटीनमधे काही बदल करता येईल का हे पहावे. नोकरीत बदल, नवीन व्यवसाय, बदली, नवीन गाव या सारखे चाकोरीबाहेरचे निर्णय घेता येतील का ? असा विचार करायला लावणारे हे कार्ड आहे.

२० फेब्रुवारी, २०१०
आजचे कार्ड - ९ ऑफ कप
टॅऱो कार्ड मधे कप सूट हा भाव -भावना, मन , रिलेशन याचे प्रतीक आहे. अर्थातच कप सूट हा जलतत्वाचा सूट मानला जातो. अॅस्ट्रोलोजिकली मीन राशीतील गुरुचा या कार्डावर अधिक प्रभाव आहे.
या कार्डाला विश कार्ड ( इच्छा पुर्ण करणारे कार्ड ) असे म्हणतात. टॅरो कार्ड डेकमधील हे सुध्दा एक चांगले कार्ड आहे. जातकाच्या इच्छापुर्तीचे कार्ड आहे असे म्हणल्यास वावगे ठरु नये. साधारणपणे विवाह, संतती आणि रिलेशन, भावनिकतेसंबंधीचा प्रश्न असता हे कार्ड रिडिंग मधे येते आणि अशावेळी जातकाच्या प्रश्नाच्या दृष्टीने होकारार्थी उत्तर येते. समाधानी, तृप्त, आनंदी व्यक्तीमत्वाचा माणूस या कार्डावर दाखवून एक प्रकारे मिळणार्या उत्तराचा परिणामच दर्शवला आहे.

१९ फेब्रुवारी, २०१०
आजचे कार्ड - व्हील ऑफ फॉरच्यून
टॅरो कार्ड मधील २२ मेजर कार्ड पैकी हे एक महत्त्वाचे कार्ड . हे गुरुचे कार्ड आहे. आपल्याकडे असे म्हणले जाते की सुखी सोनाराकडे आणि दु:खी जोतिषाकडे.
जातक जेंव्हा असंख्य प्रश्नांनी त्रासलेला असतो तेंव्हाच तो जोतिषाकडे जातो. यात सर्व प्रकारचे जोतिष मग ते हात पाहून जोतिष सांगणारे असोत, चेहरा पाहून जोतिष सांगणारे असोत, पोपटा मार्फत जोतिष सांगणारे असोत, किंवा सध्याच्या काळात ए.सी मॉलमधे बसून पॅसेज मधे एक छोटासा स्टॉल टाकून टॅरो कार्ड काढणार्या सुंदर ललना असोत. थोडक्यात काय समस्येने ग्रासलेल्यालाच जोतिष आणि देव आठवतो.
तर अशा वेळी जातकाच्या प्रश्नासंबंधीत उत्तर देताना व्हील ऑफ फॉरच्यून हे कार्ड रिडिंग मधे आल्यास बदल तोही चांगला बदल घडणार आहे असे समजावे . परिस्थितीत नक्कीच सुधारणा होते. जातकाला सध्या भेसावणार्या समस्या पुढील काळात कमी होणे/ सुट्णे यासाठी संबंधीत बदलाची सुरवात होणे असे ही हे कार्ड सुचवते. नवीन संधी , नोकरीतील बदल आणि अपेक्षीत चांगल्या गोष्टी घडवून आणण्यास हे कार्ड समर्थ आहे असे समजण्यास हरकत नाही. ( आमच्या पंतांच्या भाषेत सांगायचे झाल्यास अष्टमाची महादशा संपून जातकाला दशमाची दशा सुरु होण्याची शक्यता / बदल हे कार्ड दर्शवते. )
त्यामुळे की काय टॅरो डेक मधील हे एक महत्त्वाचे आणि रिडिंग मधे हवेहवेसे वाटणारे हे कार्ड आहे.

१७ फेब्रुवारी, २०१०
आजचे कार्ड - ३ ऑफ स्वॉर्ड
आज सकाळी उठल्यापासून निराश वाटत होते. आवरायला अशीर झाला. नेहमीची ऑफीसला यायची बस चुकली. दुसर्या बसमधे जास्तच गर्दी होती. ऑफीसला पोचायला उशीर झाला. इमेल बॉक्स मधे नको असलेल्या कस्टमरचे नको असणारे इमेल्स . साहेबाच्या फालतू मिटिंग्स . भरपुर मनस्ताप. अपेक्षाभंग
वरील सर्व वर्णने ही ३ ऑफ स्वॉर्ड या कार्डासाठी लागू होतात. टॅरो कार्ड मधील हे एक मायनर कार्ड. प्रश्नकर्त्याने रिडिंग घेताना हे कार्ड काढले असता इच्छित प्रश्नाचे नकारअर्थीच उत्तर द्यावे. प्रेमभंग, जवळच्या व्यक्तीकडून दुखावले जाणे, या सर्व बाबतीत हे कार्ड हमखास रिडिंग मधे येते.
थोडक्यात काय सकाळी घरातून निघताना आजचा दिवस कसा जाईल असा प्रश्न विचारुन जर टॅरो कार्ड मधील ३ ऑफ स्वॉर्ड हे कार्ड निघाले तर समजावे की आज काही खरं नाही. आजचा दिवस मनस्ताप देणारा असणार आहे. प्रत्तेक गोष्ट जपून करायला हवी.

१६ फेब्रुवारी, २०१०
आजचे कार्ड - किंग ऑफ स्वॉर्ड
आजपासून या ब्लॉगवर ( अनुदिनीवर ) परत एकदा नियमीत लिहायचे आहे. सुरवातील टॅरो कार्ड बद्दल माहिती देत असताना नंतरच्या काळात अवांतर विषयावरच जास्त लिहिले गेले. आता परत याविषयाकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. टॅरो कार्ड मधील ७८ कार्डपैकी एक एक कार्डाची माहिती आपण करुन घेऊ. टॅरो कार्ड बद्दलचे पुर्वीचे लेख पाहण्यासाठी काही लिंक इथे देत आहे.
टेरो कार्डस म्हणजे काय ?
मेजर कार्डेस
मायनर कार्ड्स माहिती १
मायनर कार्डस माहिती २
मायनर कार्डस माहिती ३
मायनर कार्डस माहिती ४
---------------------------------------------------------------------------
आजचे कार्ड आहे. -किंग ऑफ स्वॉर्ड
वायू तत्वाचे हे कार्ड आहे ज्याला टॅरो कार्डच्या भाषेत कोर्ट कार्ड असे म्हणतात. आपल्या बारा राशींपैकी कुंभ राशी ( कुंभ राशीचे व्यक्तीमत्व ) या कार्डाद्वारे व्यक्त केली जाते.
लॉजीकली थिंकिंग, अॅनेलिटिकल स्कील, हे या कार्डाचे मुख्य वैशिष्ठ. एकाद्या गंभिर परिस्थितीत शांतपणे अडचण सोडवून पुढे जाणे, कुठल्याही परिस्थितीत योग्य मार्ग काढणे, आणि योग्य कृती करण्यास प्रवृत्त करणे , नियम पाळणे, खरे बोलणे या गोष्टी ही सुचीत होतात
रिडिंग मधे हे कार्ड आल्यास तुम्हाला अशाच व्यक्तीमत्वाची व्यक्ती भेटेल की जी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या प्रंगातून सुखरुप सुटका करेल/ मार्गदर्शन करेल. जातकाच्या प्रश्नानुसार क्वचितप्रसंगी तुम्हाला स्वतः अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वरील गुणधर्म ( कार्डाची वैशिष्ठे ) अंगीकारावे लागतील आणि मगच अडचणीतून सुटका होईल.

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)