२७ डिसेंबर, २०१२

श्री दत्त जयंती


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा  !!!

तीन शिरें सहा हात !  तया माझा दंडवत
काखें झोळी  पुढे श्वान ! नित्य जान्हवीचे स्नान
माथा शोभे  जटाभार ! अंगी विभूति सुंदर
शंख चक्र गदा हातीं ! पायीं पादुका शोभती
तुका म्हणे विश्वंभर ! तया माझा नमस्कार 

श्री साईसच्चरित्र ! अध्याय बेचाळीस

श्री साईसच्चरित्र ! अध्याय बेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)



२६ डिसेंबर, २०१२

मिळून सा-याजणीं

लहानपणापासून ज्यांचा  छान छान गोष्टी वाचत मोठे  झालो अशा सगळ्यांची (   माझी आई आणि तिच्या मैत्रिणी)  दैनीक लोकमतने आपल्या १४ व्या वर्धापनानिमित्य विशेष पुरवणीत दखल घेतली.  यानिमित्य
 ' मिळून सा-याजणींचे '  अभिनंदन .
 


श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकेचाळीस

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

१८ डिसेंबर, २०१२

कथिका -



दै तरुण भारत, बेळगाव  च्या '  खजाना '  पुरवणीत  गेली काही वर्ष माझी  आई  उज्ज्वला केळकर हिचे  अनुवादीत  लघु कथांचे सदर ' कथिका ' या नावाने प्रकाशीत होत आहे.  यातील काही निवडक कथिका 



२०१३ वर्षातील मुहुर्त -


२०१३  सालातील -  साखरपुडा , विवाह , वास्तू शांती, व्रतबंध, जावळ  इत्यादी मुहुर्त 






संदर्भ -  सोमण नॅनो पंचांग

श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेहेत्तीस


श्री साईसच्चरित्र ! अध्याय तेहेत्तीस

(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)


१७ डिसेंबर, २०१२

शेगांव दर्शन




श्री गजानान महाराजांच्या कृपेने काल  शेगावला जाण्याचा योग आला. ऑफीसमधील सहका-यांसमवेत शनिवारी रात्री रेल्वेने मुंबईहून निघून  रविवारी  पहाटे शेगावला पोहोचलो. सकाळच्या प्रहरी  महाराजांचे दर्शन घेऊन  त्यानंतर  ' आनंद सागर' येथे जाणे झाले. परत शेगावला आल्या नंतर  श्री गजानन महाराज जिथे प्रकट झाले ते स्थान आणि बंकटलाल यांचे सदन इथे ही जाण्याचे भाग्य लाभले

एकंदर यासंबंधीत माहिती आणि फोटो इथे देत आहे .  जे जाणार असतील त्यांना माहिती उपयुक्त ठरेल 




श्री साईसच्चरित्र ! अध्याय बत्तीस

श्री साईसच्चरित्र ! अध्याय बत्तीस

(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

६ डिसेंबर, २०१२

स्वामी स्वरुपानंद - भावांजली

!!  ॐ नमो भगवते स्वामी स्वरुपानंदाय !!
 
 एकदा तरी पावसग्रामी जाउनिया यावे
 दर्शन कळसाचे घ्यावे !! धृ !!

समाधिमंदिर स्वरुपसुंदर
शांतिरसाचे रुप मनोहर
सो S हं  भजनी तल्लिन परिसर
आळंदीचे भाग्य जणू हे प्रतिबिंबित व्हावे !! १ !!

प्रवेशद्वारी पाय ठेविता
क्षणात जाई विरुनी चिंता
समाधान ते होई चित्ता
सर्व उपाधी गळून पडती स्थान असे बरवे !! २ !!

एक पायरी वरती चढता
स्वाभिमान गळतो न कळता
दिव्यरूप ते प्रतीत होता
सभामंडपी उभे राहता भानचि हरपावे !! ३ !!

परमहंस श्रीसद्गगुरु मूर्ति
काय वर्णू मी त्यांची महती
आकांक्षांची जेथे पूर्ती
एकदा तरी आनंदाच्या सागरात न्हावे !! ४ !!

चिरंजीव होऊनि या इथे
समाधी घेऊन स्वरुपनाथे
उध्दाराया जडजीवाते
'रामकृष्ण हरि' नाम मुखाने गातचि परतावे !! ५ !!

-  सौ पार्वती गं आपटे
    सांगली 
 
 

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकविसावा

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकविसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

५ डिसेंबर, २०१२

श्री साईसच्चरित्र ! अध्याय विसावा

अध्याय ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
श्री साईसच्चरित्र ! अध्याय विसावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

२ डिसेंबर, २०१२

श्री साईसच्चरित्र ! अध्याय सतरावा

अध्याय ऐकण्यासाठी खालील बटनावर टिचकी मारावी
श्री साईसच्चरित्र ! अध्याय सतरावा
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या