२७ डिसेंबर, २०११

१०० - वर्ष राष्ट्रगीताची



   २७  डिसेंबरला  भारताचे राष्ट्रगीत   लिहिले गेले

आज त्या गोष्टीला १००  वर्षे पुर्ण होत आहेत



प्रतेक भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट  !!!!

२२ डिसेंबर, २०११

श्री नवग्रह स्‍तोत्र - मराठी अर्थ




आमच्या स्नेही  वसुधा गोखले यांनी नवग्रह स्तोत्राचा  मराठी अनुवाद  पाठवला आहे. तो सर्वांसाठी इथे देत आहे.


त्यांचे मनःपुर्वक आभार
                        
सूर्य :  जास्‍वंदी फुलाप्रमाणे तांबडी वर्णकान्‍ती असलेल्‍या , कश्‍यकुलोत्‍पन्‍न , प्रखर तेजस्‍वी, अंधकाराचा शत्रू, सर्व पाप नाहीशी करणा-या दिवस नाथ सूर्याला मी वन्‍दन करतो. 

चंद्र :  दही व शंख यांच्‍या तुषाराप्रमाणे शोभणा-या, क्षीरसागरातून निर्माण झालेल्‍या भगवान  शंकराच्‍या मस्‍तकावर अलंकाराप्रमाणे शोभणा-या सशाचे चिन्‍ह धारण करणा-या चंद्राला मी नमस्‍कार करतो .

मंगळ :  पृथ्‍वीच्‍या उदरातून जन्‍म पावलेल्‍या, विजेप्रमाणे अंगकांती असलेल्‍या, हातात शक्‍ति धारण करणा-या, कुमार अवस्‍थेत असणा-या त्‍या मंगळाला मी प्रणाम करतो .

बुध :  अशोकपुष्‍पाप्रमाणे रक्‍त – श्‍यामलवर्ण असलेला अत्‍यंत रूपवान, बुद्धिमान , सोज्‍वळ, सरळ सुस्‍वभावी  बुधाला माझा नमस्‍कार असो.

गुरू : देव व ऋषींचा गुरू, सुवर्णाप्रमाणे कांती असलेल्‍या, बुद्धिमान, त्रैलोक्‍यश्रेष्‍ठ शा त्‍या बृहस्‍पतीला वन्‍दन असो.

शुक्र :  हिमकमळाच्‍या देठाप्रमाणे प्रभा असलेल्‍या, दैत्‍यांचा श्रेष्‍ठ गुरू, सर्वशास्‍त्रज्ञ भृगुकुलोत्‍पन्‍न शुक्राला मी नमस्‍कार करतो.

शनि :  नीलवर्णप्रभा असलेल्‍या , रिवपुत्र, यमाचा मोठा बंधु, सूर्याच्‍या छायेपासून निर्माण झालेल्‍या , त्‍या शनैश्‍वराला माझे वन्‍दन असो .

राहु :  अर्धे शरीर असलेल, वीर्यवान, चंद्रसूर्याला त्रास देणा-या , सिंहिकेपासून जन्‍म पावलेल्‍या  त्‍या राहूला मी वन्‍दन करतो .

केतु :  पळसफुलाप्रमाणे लाल, तारका व ग्रहांमध्‍ये श्रेष्‍ठ , भीतिदायक रूद्राप्रमाणे तापदायक अशा केतूला मी नमस्‍कार करतो .

याप्रमाणे व्‍यासमहर्षींच्‍या मुखातून आलेल्‍या नवग्रहस्‍तोत्राचे रोज दिवसा किंवा रात्री जो एकाग्रतेने पठन करील त्‍याच्‍या विघ्‍नांची शांती होईल.
नर, नारी आणि राजा यांचे दु:ख नाश पावेल आणि त्‍यांचे सर्वश्रेष्‍ठ ऐश्‍वर्य, आरोग्‍य यांची वृद्धी होईल .
ग्रह, नक्षत्र , चोर आणि अग्‍नी यांपासून होणारी पीडा संपूर्ण शांत होईल यात संशय नाही असे महर्षी व्‍यास म्‍हणतात .

२० डिसेंबर, २०११

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी ( मार्ग. कृ . १० )



जयाच्या जनी जन्म नामार्थ  झाला ! जयाने सदा  वास नामात केला !
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ति ! नमस्कार त्या ब्रम्हचैतन्यमुर्ती  !!


१४ डिसेंबर, २०११

संकष्टी चतुर्थी - १४ डिसेंबर २०११



बुधवार दिनांक १४ डिसेंबर २०११ , संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९ वा.३० मिनीटे

दर्शन घेऊयात  स्वामी स्वरुपानंद आश्रम पावस येथील आवळी गणेशाचे





( चित्र सौजन्य : योगेश जगताप )

१३ डिसेंबर, २०११

श्रीषष्ठीदेवीस्तोत्रम


संतान प्राप्तीसाठी प्रभावी स्तोत्र






जे लोक संतती प्राप्तीबाबत निराश झालेले असतात, ज्यांचा वारंवार गर्भपात होतो
अशांसाठी हे स्तोत्र फलदायी आहे

श्रीषष्ठीदेवीस्तोत्रम 







नमो दैव्यै महादेव्यै सिध्दयै शान्त्यै नमो नम: !
सुभायै देवसेनायै षष्ठीदेव्यै नमो नम: !!
वरदायै पुत्रदायै नमोनम: !

सुखदायै मोक्षदायै षष्ठीदेव्यै नमो नम: !
शक्तिषष्ठांशरुपायै सिध्दायै च नमो नम:
मायायै सिध्दयोगिन्यै षष्ठीदेव्यै नमो नम: !!
सारायै शारदायै च पारायै सर्वकारिण्ये !
बालाधिष्ठाव्यै देव्यै च  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
कल्याणादायै कल्याण्यै फलदायै च कर्मणाम !
प्रत्यक्षायैच भक्तांनाम  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
पूज्यायै  स्कन्दकान्तायै सर्वेषां सर्वकर्म्सु
देवरक्षणकारिण्यं  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
शुध्द्सत्वस्वरुपायै  वन्दितायै तृणा सदा
हिंसाक्रोधवर्जितायै  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
धनं देहि प्रिया देहि पुत्रं देहि सुरेश्वरी  
धर्न देहि यशो देहि  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
बभूमि देही प्रजा देहि  विद्यां देहि सुपूजिते 
क्ल्याण च जयं देहि  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
इति देवी च संतुत्य  लेभे पुत्र प्रियव्रत:
यशस्विनं च राजेंद्र  षष्ठीदेवी प्रसीदत: !!
षष्ठीस्तोत्रमिदं ब्रह्मन य: श्रूणेति च वत्सरम 
अपुत्रो लभते पुत्रं वरं सुचिरंजीविनम !!
वर्षमेकं च या भक्त्या संस्तुत्येदं श्रुणोति च
सर्वपापविनिर्मुक्ता महावंन्ध्या प्रसूयते !!
वीरपुत्रं च गुणिनं विद्यावंत यशस्विनम 
सुचिरायुष्यन्तसेव षष्ठीदेवीप्रसादत:!!

काकवंध्या च या नारी मृतापत्या च या भवेत !
वर्ष श्रूत्वा लभेत पुत्रं  षष्ठीदेवीप्रसादत:!!
रोगमुक्ते च बाले च पिता माता श्रूणोति चेत 
मासेन मुच्यते बाल:  षष्ठीदेवीप्रसादत:!!





जय देवि जगत्मार्जगदानन्द्कारिणि

प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठिदेवते !!





९ डिसेंबर, २०११

श्री गुरुदेव दत्त !!


दिनाक १० डिसेंबर  -२०११   मार्गशीष  पोर्णीमा - दत्तजयंती 




दिगंबरा दिगंबरा  श्रीपाद वल्लभ  दिगंबरा  !!!

६ डिसेंबर, २०११

गीताजयंती

श्रीकृष्णाचे वदनीं कन्या जन्मली !

भगवद्गीता म्हणोनि नाम पावली !! - समर्थ रामदास स्वामी


कुरुक्षेत्री श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला ती भगवद्गीता

तो दिवस मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा होता

ह्या एकादशीला ’गीताजयंती’ असे म्हणतात

मोक्षदा एकादशी म्हणूनही या तिथीला गौरविले जाते

-- संदर्भ कालनिर्णय पंचांग

४ डिसेंबर, २०११

मन का मानव !

कुछ भी नही असंभव जगमे,
सब संभव हो सकता है
कार्य हेतु यदि कमर बांधलो
तो सब कुछ हो सकता है !
बंधन - बंधन क्या करते हो ,
बंधन मन के बंधन है
साहस करो उठो झटका दो,
बंधन क्षण के बंधन है
मन के हारे हार हुई है
मन के जीते जीत सदा
सावधान मन हार न जाये
मन से मानव बना सदा
यह भी अच्छा वह भी अच्छा,
अच्छा-अच्छा सब मिल जायें
हर मानव की यही तमन्ना
कींतु प्राप्ति का मर्म न पाये
अच्छा पाना है तो पहेले,
खुदको अच्छा क्यो न बनालें
जो जैसा हैं उसको वैसा,
मिलता यह निज मंत्र बना ले

३ डिसेंबर, २०११

!! प.पू वासुदेवानंद सरस्वती रचित मंत्रात्मक श्लोक !! - भाग २



अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनि: !
तस्य स्मरणमात्रेण सर्वपापै: प्रमुच्चते !!

नमस्ते भगवन्देव दत्तात्रेयो महामुनि: !
सर्वबाधाप्रशमनं कुरु शांति प्रयच्छ मे  !!

अनुसूयासुत श्रीश जनपातकनाशन !
दिगंबर नमो नित्यं  तुभ्यं मे  वरदो भव !!

श्री विष्णोरतारो यं दत्तात्रेयो दिगंबर : !
मालाकमण्डलूच्छूलडमरू शडखचक्रधृक  !!

नमस्ते शारदे देवि सरस्वती मतिप्रदे !
वसत्वं मम जिव्हाग्रे सर्वविद्याप्रदा भव !!

Motivational Quote of the Day


"The difference in winning and losing is most often... not quitting."
Walt Disney

Motivational Quote of the Day -



"Live today-There are two eternities that can break you down. Yesterday and tomorrow. One is gone and the other doesn’t exist.
So live today   .. . . ."

२ डिसेंबर, २०११

!! प.पू. वासुदेवानंद सरस्वती रचित मंत्रात्मक श्लोक !! - भाग १



अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा !
स्मृर्तगामी स्तंभक्तानामुध्दर्ताभव् संकटात !!  १ !!

दरिद्र विप्रगेहे यः शाकं भुक्त्वोत्तमश्रियं !
ददौ श्रीदत्तदेवः स दारिद्रयाच्छ्री प्रदोSवतु !!  २ !!

दूरिकृत्यपिशाचार्ति जीवयित्वामृत सुतम् !
यो S भूदभीष्टदः पातु स नः संतानवृध्दिकृत !!  ३ !!

जीवयामास भर्तारं मृत्वं सत्या ही मृत्युहा !
मृत्युंजयः स योगींद्रः सौभाग्य मे प्रयच्छतु !!  ४ !!

अत्रेरात्म प्रदानेन यो मुक्तो भगवानृणात् !
दत्तात्रेयं तमीशानं नमामि ऋणमुक्तये !! ५ !!

जपेच्छलोकमिमं देवपिञार्षि पुनृणामहं !
सो S नृणो दत्तकृपया परंब्रह्मधिगच्छति !! ६  !!

-------------------------------------------------------------------------------------------------
नोकरी लागण्यासाठी - श्लोक १
 दरिद्र नाश, पिशाच्च पीडा जाण्यासाठी  - श्लोक २-३
सर्व ऋणातून मुक्त होण्यासाठी - श्लोक ५ -६

३० नोव्हेंबर, २०११

व्याख्यानमाला -



ब्राह्मण संस्कृती मंडळ, स्वामी विवेकानंदनगर  ( बेलापूर ,  नवी मुंबई )  यांच्या तर्फॅ २ ते ४ डिसेंबर या कालावधीत  श्री विवेक घळसासी यांची  व्याख्यानमाला आयोजीत केली आहे.

हा कार्यक्रम  संध्याकाळी ७ ते ९  या कालावधीत आहे.

स्थळ :  अंबीका योग कुटीर
 सेक्टर ९, बेलापूर, कोकन भवन ( नवी मुंबई)

व्याख्यानमालेतील विषय

१) आर्य चाणाक्यची राजनिती
२) आर्य चाणाक्यची अर्थनिती
३) स्वामी विवेकानंद -  युवा मनाची प्रेरणा

इच्छुकांनी  अवश्य या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा

अमोल केळकर

२५ नोव्हेंबर, २०११

स्थिर चित्त स्तोत्र :-


सध्या आजूबाजूला अनेक विचित्र घटना घडत आहेत. स्पर्धेच्या युगात अनेक अपेक्षा ठेवल्या जात आहेत . दरवेळी  अपेक्षापुर्ती होत नाही . अशावेळी  मन स्थिर रहाणे ही अवघड गोष्ट झाली आहे.  त्यासाठी खालील स्तोत्र उपयोगी पडू शकेल .
-----------------------------------------------------------------------------
मन स्थिर करण्यासाठी जपावयाचे स्तोत्र -

अनसूया अत्रिपासून संजात ! दत्तात्रेया तू महाबुध्दिमंत !
सर्व देवांचा अधिदेव प्रख्यात ! माझे चित्त करी स्थिर !! १ !!

शरण आलेल्यांचा जगात ! दीनांचा तारक अखिल कर्ता ज्ञात !
सर्वचालक देवा तू त्वरित ! माझे चित्त करी स्थिर !! २ !!

सर्व मंगलाचे मंगल पावन ! सर्व आधिव्याधींचे औषध महान !
सर्व संकटांचा हर्ता तू शोभन ! माझे चित्त करी स्थिर !! ३ !!

स्मरताक्षणी स्वभक्तांना ! भेटसी आरोग्यप्रदा रिपुनाशना !
भुक्तिमुक्ति दाता तू सर्वांना ! माझे चित्त करी स्थिर !! ४ !!

सर्व पापांचा क्षय करी !  ताप दैन्य सारे निवारी !
अभिष्टदात्या प्रब्जो तू सावरी ! माझे चित्त करी स्थिर !! ५ !!

जो हे श्लोक पंचक वातील ! नित्यनेमें नियम चित्त निर्मळ !
स्थिर चित्त तो होईल ! भगवतकृपापात्र जगती !! ६ !!

इति श्री - परमहंस - परिवाज्रकाचार्य - वासुदेवानंदसरस्वती - विरचितं  मनः स्थिरीकरण स्तोत्रं संपूर्णम् !!


२४ नोव्हेंबर, २०११

राहू अशुभ काळ



रविवार   : सायं ४. ३० पासून ६.०० पर्यंत
सोमवार  : सकाळी ७.३० पासून  ९.०० पर्यंत
मंगळवार : दुपारी ३.०० पासून ४.३० पर्यंत
बुधवार    : दुपारी १२.०० पासून १.३० पर्यंत
गुरुवार    : दुपारी १.३० पासून ३.०० पर्यंत
शुक्रवार    : सकाळी १०.३० पासून १२.०० पर्यंत
शनिवार    :  सकाळी ९.०० पासून १०.३० पर्यंत

राहू अशूभ काळामधे शक्यतो  सही, प्रवास, महत्वाची कामे, भेटीगाठी टाळावे

२३ नोव्हेंबर, २०११

संत ज्ञानेश्वर समाधी दिन -



माझा मराठाचि बोलू कौतुके।
 परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।



कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८ रोजी संत ज्ञानेश्वर यांनी आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली. उद्या २३ नोव्हेंबर २०११ ज्ञानेश्वरांच्या समाधी दिन आहे.  'पसायदान ' ही अवघ्या विश्वाला संत ज्ञानेश्वरांनी दिलेली अमोल देणगी आहे
------------------------------------------------------------------------------------------------------

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज् द्यावे । पसायदान् हे ।।

जेखळांचि व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतो परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।

दुरितांचे तिमिर् जावो । विश्र्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो लाहो । प्राणिजात् ।।

वर्षत् सकळ भूमंगळी । ईश्र्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत् भूमंडळी । भेटतु भुता ।।

चला कल्पतरूंचे अरव् । चेतना चिंतामणीचे गाव् ।
बोलते जे अर्णव् । पीयूषाचे ।।

चंद्रमे जे अलांछन् । मार्तंड् जे तापहीन् ।
ते सर्वाही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी ।
ते सर्वाही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी ।
भजीजो आदिपुरूखी । अखंडित् ।।

येथे म्हणे श्रीविश्र्वेश्र्वरावो । हा होईल् दान पसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।

१९ नोव्हेंबर, २०११

नियती


त्याचा व्यवसाय असा होता की त्याला दररोज प्रवास करावा लागे. विशेषतः बसचा प्रवास.जेंव्हा जेंव्हा तो असे वाचत असे किंवा ऐकत असे , की अमुक एक बस अमुक एका नदीत पडली, काही लोक बुडाले, काही पोहून काठाशी आले. तेंव्हा तो मनातल्या मनात विचार करी की आता त्याने पोहणं शिकायला हवं . कोणती दुर्घटना कधी घडेल हे सांगता थोडचं येतय ? त्याला तर रात्रंदिवस बसने प्रवास करावा लागतो. पण त्याचा हा विचार दोन तीन दिवसापेक्षा जास्त दिवस टिकत नसे.पोहण शिकण्यास तो टाळाटाळ करत नाही.

त्या दिवशी तो बसने जात होता.बस नदीवरच्या पुलाशी अचानक थांबली. असं कळलं की काही वेळापुर्वीच एक बस नदीत कोसळली. गर्दी जमली होती. बचावकार्य सुरु होतं. पोलीस आले होते. अन्य प्रवाशांप्रमाणे तो ही खाली उतरुन ही भिषण दुर्घटना पाहू लागला. नदीत बुडणा-या, वाहून जाणा-या लोकांकडे पाहून भीतीने त्याचा थरकाप झाला. मनातल्या मनात पोहायला शिकायची त्याने प्रतिज्ञा केली.

दुसर्यादिवशी तो पोहायला शिकायला म्हणून गेला आणि नदीत बुडून मेला.
------------------------------------------------------------------------------------------------------------
’ आवाज आतला बाहेरचाही ’ मधून साभार ( ’अपने अपने सपने’ या घनश्याम अग्रवाल लिखित हिंदी लघुतम कथा संग्रहाचा अनुवाद )

अनुवाद : उज्ज्वला केळकर, सांगली

१८ नोव्हेंबर, २०११

कालभैरवाष्टकम


देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्

व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्


नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं

नीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम


कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणं

श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम


भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहं

भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं


विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


धर्मसेतू_पालकं त्वधर्ममार्ग्_नाशकम्

कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्


स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्

नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्


मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिं

दृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनं

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं

काशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्


नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं

ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्


शोक_मोह्_दैन्य_लोभ_कोपताप्_नाशनम्

प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम्

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे


१४ नोव्हेंबर, २०११

संकष्ट चतुर्थी -सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर २०११

सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर २०१कार्तीक कृष्ण चतुर्थी , संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रात्री वाजून ४९ मिनिटे

१९९७ साली याच संकष्टी चतुर्थी दिवशी ( त्यादिवशीची तारिख होती १७ नोव्हेंबर १९९७) दिवे आगार इथे सुवर्ण णेश प्रतिमा मिळाली होती.

यावेळी दर्शन घेऊयात दिवे आगार येथील सुवर्ण गणेशाचे


१३ नोव्हेंबर, २०११

आवाज आतला बाहेरचाही ’

आवाज आतला  बाहेरचाही
आवाज आतला असतो तसाच बाहेरचाही .....
अर्थपुर्ण आवाजातून शब्द निर्माण होतात आणि
अर्थपूर्ण शब्दातून संवाद, निवेदन.
संवाद, निवेदनातून भाव-भावनांचे कल्लोळ निर्माण होतात
आणि त्यातून कथा प्रकटते.
आतले आवाज स्वत:शीच बोलतात. बाहेरचे
इतरांशी
वेदना - करुणा, दु:ख-आनंद, राग-संताप, चीड-त्वेष असे अनेक भाव व्यक्त करणा-या
जनसामान्यांच्या जिवनाची विविध रंग रुपे चित्रित करणा-या,
मानवी मनाचे विविध पैलू प्रकट करणा-या कथांचा संग्रह






’  आवाज आतला  बाहेरचाही ’
( ’अपने अपने सपने’ या घनश्याम अग्रवाल लिखित हिंदी लघुतम कथा संग्रहाचा अनुवाद )
अनुवाद : उज्ज्वला केळकर, सांगली
प्रकाशक : अक्षता प्रकाशन, पुणे

११ नोव्हेंबर, २०११

११/११/११/ - - ११ वाजून ११ मिनीटे ११ सेकंद


खुप दिवसापासून अनेक जण या दिवसाची वाट पहात आहेत. ११ नोव्हेंबर ११ . अनेकांनी अनेक प्लॅन्स केलेले आहेत. मात्र चर्चा आहे ती आज जन्मणारी मुले. अनेक जणांनी सिझरींग करुन आपल्या बाळास या दिवशी जन्म द्यायची अनैसर्गीक योजना केली आहे. निसर्ग नियमानुसार ही अनेक जण आज जन्म घेतीलच




एक उत्सुकता म्हणून या तारखेची ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंदाची , मुंबई अक्षांश, रेखांशाची पत्रिका काढली आहे. आणि सहजच त्या पत्रिकेतील ठळक गोष्टी पाहिल्या. अभ्यासकही आपले विवेचन करु शकतील

१) आज ११ वा ११ मिनिटानी वाजता ज्यांचा जन्म झाला असेल त्यांची मेष रास असुन नक्षत्र कृतिका असेल . धनु लग्न असेल . (( दुपारे १ वाजून ४३ मि जन्मणार्‍या बालकाची वृषभ रास असेल )

२) लग्नेश गुरु ( वक्री ) पंचमात , गुरु पासून पंचमात मंगळ पापग्रह ( राशी कुंडलीत पंचमात मंगळ )३) पत्रिकेतील काही योग : - गुरु - मंगळ नवपंचम , चंद्र - शनी षडाष्टक, मंगळ - हर्षल षडाष्टक , बुध -शुक्र युती व्ययात
४) सप्तमेश बुध व्ययात , शनी - मंगळाची बुधावर दृष्टी ( राशी कुंडलीतील सप्तमेश शुक्र जो नवमांश सप्तमेश आहे त्यावर ही शनी -मंगळाची दृष्टी)

८) अष्टमेश चंद्र - कृतीका नक्षात्रात

९) दशमात शनी - दशमेश व्ययात
१०) उमेदीच्या काळात राहू महादशा

जाणकार अधीक मार्गदर्शन करु शकतील -

असो आज जन्म घेणार्‍या बालकाना ( ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद ) अनेक शुभेच्छा.

८ नोव्हेंबर, २०११

साडेसाती - काही उपाय


वायफळ बडबड करु नये. गरजेपुरते बोलणे

खोटे बोलणे पुर्णपणे टाळणे

अभिमान, गर्व पुर्णपणे मिटवायचा प्रयत्न करावयाचा

लालसा बाळगायची नाही, कर्म करत रहायचं

शनिवारी आणि अमावस्येला गोडतेलांत तळलेले खाद्यपदार्थ, काळवस्त्र गरिबांना दान करावं.

बुधवारी मारुतीचे दर्शन घ्यावे.

हनुमान वडवानल स्तोत्र किंवा पंचमुखी हनुमान कवच म्हणावे


खालील मंत्र जपावा
ॐ शंशनैश्वराय नमः !

ॐ प्रां प्रीं प्रौ : ॐ शनैश्वराय नमः !



२४ ऑक्टोबर, २०११

धनत्रयोदशी

आपणा सर्वास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा



-------------------------------------------------------------------------------


धनत्रयोदशी बद्दलची काही माहिती इथे वाचा







-----------------------------------------------------------------------------------------------------
ढकलपत्रातून आलेली ही माहिती




वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.


--------------------------------------------------------------------------------------------------

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)

धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकयांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात.ह्या सुमारास झडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झडूची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.




---------------------------------------------------------------------


नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)

आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.
-----------------------------------------------------------------------------------------

लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)

या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------

पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------

भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.
----------------------------------------------------------------------------------------------------

अमोल केळकर





१५ ऑक्टोबर, २०११

संकष्ट चतुर्थी - १५ ऑक्टोंबर २०११

संकष्ट चतुर्थी - १५ ऑक्टोंबर २०११

चंद्रोदय - ८. २२ मिनीटे

दर्शन घेऊयात जयपूरच्या प्रसिध्द गणपतीचे








२७ सप्टेंबर, २०११

सर्वपित्री अमावस्या

स्मरण पितरांचं.........
भाद्रपद वद्य प्रतिपदा ते सर्वपित्री अमावस्या हा कालावधी पितृपक्ष म्हणून मानला जातो. या अवधीत पितृलोकातील पितर पंधरवडय़ासाठी भूतलावर अज्ञातपणे वास करतात, अशी संकल्पना आहे.प्राचीन काळात यज्ञाद्वारे पितरांना अन्न देण्याची प्रथा होती. बदलत्या काळाबरोबर मानवी जीवनही बदलत गेलं. धावत्या जीवनशैलीत ‘यज्ञ’ संकल्पना सहज साकारणं कठीण झालं. म्हणून आजच्या काळात घरीच अन्नाचा नैवेद्य करून कावग्राम घातलेला दिसतो.ज्योतिषशास्त्रातही एखाद्याच्या जन्मपत्रिकेत ‘पितृदोष’ असल्यास निवारणार्थ शांत करावी, असा नियम आहे.पितरांविषयी श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध. या काळात पितरविषयक आपली श्रद्धा त्यांना अर्पण केली जाते. पितरकार्य करण्यास उचित मानला गेलेला हा पितृपक्ष शास्त्रसंमत असून तो वर्षातून एकदाच प्राप्त होतो.
‘अपत्यांचं पोषण-रक्षण करणारा तो पिता’ असं म्हटलं जातं. हे पितृपण पिढय़ान्पिढय़ा जपलं जातं. आपल्याला सर्वसाधारणपणे ‘खापरपणजोबांपर्यंत’चे पूर्वज माहीत असतात. त्या आधीच्या पूर्वजांनी अव्याहत कष्ट करून धर्म, संस्कार, भरण, पोषण या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून संस्कारवर्तनांची योग्य वहिवाट घालून दिलेली असते. यास्तव आपण त्यांचे ऋणी असतो. या ऋणातूनच त्यांच्याविषयी असलेला आदरभाव व भक्तीपायी आपलीही काही कर्तव्य असतात. ती पार पाडण्यासाठी हा ‘पितृपक्ष’ व ‘सर्वपित्री अमावस्या’ पाळली जाते.

२२ सप्टेंबर, २०११

श्रीमंती

सरकारच्या  बुध्दीने
मती  आमची गुंग झाली !
बत्तीस रुपयाची श्रीमंती
घरा घरात  दिसू लागली
!!

१६ सप्टेंबर, २०११

संकष्टी चतुर्थी

आज १६ सप्टेंबर २०११  संकष्टी चतुर्थी  चंद्रोदय रात्री ८. ५६ मिनीटे. दर्शन घेऊयात  माहिमच्या सिध्दिविनायकाचे

१२ सप्टेंबर, २०११

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला !!




काल अनंत चतुर्दशी दिवशी पहिल्यांदाच मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक पहाण्याचा योग आला तो ही मराठी माणसाचे काही टक्का वास्तव्य राहिलेल्या गिरगावातून . आमचे स्नेही श्री. सच्चिदानंद वाकणकर यांच्यामुळे हे शक्य झाले. फडके मंदिरा शेजारी त्यांची सासुरवाडी. त्यांनी तर मुक्कामालाच बोलावले होते. मात्र ते शक्य नसल्याने निदान काही तास तरी जाऊ असे ठरवले आणि संध्याकाळी ४ च्या सुमारास पोचलो. सर्वत्र उत्साह होता. भर पावसात ही बाप्पचा जयघोष सर्वत्र दुमदुमत होता. अनेक राजे महाराजांचे या वेळी दशेन घेण्याचे भाग्य लाभले. गिरगावचा महाराजा, सुतार गल्ली , खेतवाडी गल्ली १ ते १२ , खंबाटा लेन, भुलेश्वरचा गणपती असे अनेक गणपती एकामागून एक येत होते. अनेकांनी आपल्या बाल्कनीच्या जागेत स्वता:ची व्यवस्था करुन घेतली होती आणि पहाटे लालबागचा राजा येऊन गेल्यानंतरच त्यांचा मुक्काम हलणार होता. मिरवणूकीतील सामील भक्तांना गोळ्या, पाणी, प्रसाद देण्यात अनेक जण मग्न होते. काही गणपती मुर्तींची अत्यंत देखणी सजावट केली होती, विश्वकपावर आरुढ गणपती, नागावर आरुढ गणेश, बाल गणेशाचे दर्शन घेतले जात होते. या सगळ्या सजावटीत रामदेव बाबांचे देखावे , अण्णा हजारे आणि बाजूल उध्दव आणि राज साहेब या प्रसंगाचे कटआउट्स लक्षणीय होते.
एकंदरीत ते ३-४ तास एक वेगळाच अनुभव घेतला आणि पुढील वर्षी आणखी जास्त कालावधी थांबायचा विचार करुन ' बाप्पा मोरया'च्या गजरात गिरगाव सोडले.

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या