१० ऑगस्ट, २०२६
९ ऑगस्ट, २०२६
८ ऑगस्ट, २०२६
३० जुलै, २०२६
नरसोबावाडी - अनुभव
.( व्हाट्सअँप समूह - वाडी दत्ताची राजधानी सुखाची वरून साभार )
आयुष्यात वाडीत जे काही पहिल्यांदा अनुभवायला मिळाल. जे काही वाटल ते शब्दात मांडण कधीच जमणार नाही..... सर्व दत्त महाराजांची कृपा...
हे वाचून कदाचित अगदीच सामान्य प्रश्न काहींना पडला ही असेल ..तो हाच की....मग असा अनुभव सगळ्यांनाच का येत नाही? एकाच पादुकेसमोर नतमस्तक होऊन उभं राहणारे शेकडो भक्त असतात, पण प्रत्येकाला सारखंच काही जाणवत नाही. अस का?...आणि प्रश्न हे स्वाभाविक असतात...कधी ते सहज येतात कधी... प्रसंगानुसार.. बरोबर ना??..
आता याच...कारण म्हणजे अनुभव जागेवर अवलंबून नसतो. तो आपल्या मनाच्या तयारीवर अवलंबून असतो. ज्या मनात अपेक्षांच ओझ कमी असत, जे मन फक्त उपस्थित राहायला शिकलेल असत, तिथेच चैतन्य उतरायला जागा मिळते. गच्च भरलेल्या भांड्यात नवीन पाणी मावेल का? तुम्हीच सांगा...नाही ना. अगदी तसच.मन रिकाम असेल तरच गुरुकृपा त्यात साठते.
हे ऐकल्यावर मन थोड नाराज होईल.. नाराज या साठी..आपल भांड रिकाम आहे की भरलेल, हे आपल्यालाच कळत नाही ना? आपले रोजचे व्यवहार, कामाची चिंता, नात्यांतले ताणतणाव, हे सगळं मनात इतक साचलेल असत की आपण देव्हाऱ्यासमोर उभे असतो तेव्हाही डोक्यात उद्याच्या कामाची यादी सुरूच असते. मग अशा गच्च मनाने वाडीला जाऊन काय उपयोग, असा विचार मनात येऊन जातो..
#दत्तरूप
पण थोड थांबून विचार करायला हवा. भांड रिकाम करण म्हणजे मन पूर्णपणे शून्य करण मुळीच नाही बर.. आणि. तेवढ कुणालाच जमत नाही, आणि तेवढी अपेक्षाही गुरुकडून नसते. रिकामेपण म्हणजे इतकच, त्या क्षणापुरत मागण बाजूला ठेवण. हातातली यादी खिशात ठेवून फक्त तिथे उभं राहण. हे कठीण वाटत, पण अशक्य नाही.
लहान मुलाकडे बघितल की हे सहज कळत. लहान मूल आईजवळ जाताना काही मागायलाच जात अस मुळीच नसत. कधी ते नुसत जवळ बसायला जात, कुशीत डोक टेकवायला जात. तिथे मागण मुळीच नसत, फक्त असण असत... पटतंय ?? तेच नात गुरुशी जुळवता आल तर भांड आपोआप रिकाम होत जात..
म्हणूनच वाडीत जाऊनही काही भक्तांना काहीच जाणवत नाही अस काहीस बहुतांशी भक्ता सोबत होत... पण वाटत तेव्हा त्यांनी स्वतःला दोष द्यायची गरज नाही. मन रिकाम होण ही एका दिवसाची गोष्ट नाही. ती एक सवय आहे, एक सराव आहे. आज नाही जाणवल तर उद्या जाणवेल, या जन्मी नाही तर पुढच्या भेटीत जाणवेल. गुरु कधीच घाई करत नाहीत, आणि भक्ताने तरी का करावी?
खरी गोष्ट अशी आहे की मन रिकाम करण्याचा प्रयत्न करण हीच अर्धी वाट चालून झाल्यासारख आहे. बाकीची वाट गुरुकृपाच चालवते. आपण फक्त दार उघड ठेवायच, आत कोण कधी येईल हे आपण ठरवायच नसत.
म्हणून पुढच्या वेळी दत्त महाराजांच्या पादुकांनसमोर उभ राहताना एवढंच लक्षात ठेवाव. काही जाणवल नाही तरी हरकत नाही. उभं राहण हेच पुरेस आहे. बाकीच गुरुंवर सोडून द्याव...बरोबर ना???
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
ll © दत्तरूप ll
#shridattarup #dattaguru #narsobachiwadi #sprituality #faith #blessings #dattamaharaj #dattatreya
२९ जुलै, २०२६
गुरु पौर्णिमा / The Hermit
मग हा गुरु कुणासाठी 'साईबाबा' असतील कुणासाठी स्वामी समर्थ, रामदास स्वामी,गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद तर कुणासाठी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती, टेंभे स्वामी महाराज...
१८ जुलै, २०२६
नियतीचा मार्ग
.मागच्याच शनिवारची गोष्ट. पिठापूरला जाताना सकाळी 10 च्या सुमारास विजया
वाडा जंक्शन आले. इथे इंजिन बदलते हे कळल्यावर म्हणलं चला बघू प्रोसेस. आमचा डबा ही इंजिना पासून 4- 5 वाच होता.
( अध्यात्मिक ) अमोल
वाडा जंक्शन आले. इथे इंजिन बदलते हे कळल्यावर म्हणलं चला बघू प्रोसेस. आमचा डबा ही इंजिना पासून 4- 5 वाच होता.
पूर्वी पुणे स्टेशनवर महालक्ष्मीचे डिझेल इंजिन बदलून इलेक्ट्रिक इंजिन लागायचे आणि मग गाडी मुंबई कडे जायची हे पाहिले होते.
हातात चहाचा कप घेऊन तिथे पोचेपर्यत पहिले इंजिन निघाले होते. समोर दिसणा-या अनेक इंजिना पैकी एखादे येईल म्हणून बघत बसलो. थोड्यावेळाने लक्षात आले जोडणी करणारे रेल्वे कर्मचारी ही नाहीत. कदाचित ते नवीन येणा-या इंजिनातून येतील असे वाटले. दहा - पंधरा मिनिटे झाली काहीच हालचाल नाही, तेवढ्यात घोषणा झाली की कोणार्क एक्सप्रेस सुटत आहे. शिट्टी मारून गार्डने झेंडा दाखवायला सुरवात केली आणि धावत पळत जाऊन गाडी सुटत असताना आमचा डबा पकडला.
इंजिन दुसऱ्या बाजूला लागले होते. पूर्वीच्या अनुभवावरून मनाने खात्री केलेली की इंजिन आम्ही जिथे आहोत तिथेच लागेल.
*आयुष्याचं पण असंच नाही का? आपण एक विचार करत असतो पण एका योग्य स्टेशन वर थोडी प्रतीक्षा करायला लावून नियती एका वेगळ्याच मार्गाने, जो आपल्यासाठी कदाचित अधिक चांगला आहे तिकडे नेणार असते*
श्री गुरुदेव दत्त 🙏
जय शनिदेव 🙏
१६ जुलै, २०२६
गुरु -शनी गोचर
.साधारण 15 सप्टेंबर 1975 ते 25 फेब्रुवारी 1976 या दरम्यान जन्म झालेल्यांच्या पत्रिकेत गुरु मीन राशीत रेवती नक्षत्रात आहे, तर शनी कर्क राशीत पुष्य नक्षत्रात आहे ( यात आम्ही स्वतः आहोत )
तर आजची ग्रह स्थिती अशी आहे की या कालावधीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या पत्रिकेत गोचरीने शनी महाराज गुरु वरून भ्रमण करत आहेत ( सध्या शनी मीन राशीत रेवती नक्षत्रात आहे )
तर गोचरीने गुरु शनी वरून भ्रमण करत आहे ( सध्या गुरु कर्केत पुष्य नक्षत्रात आहे )
*गुरु -शनी युती अध्यात्मिक प्रगतीसाठी चांगली असते* त्यात हे डबल इंजिन लागले आहे
याबाबत मला स्वतःला चांगला अनुभव आलाय आणि कुणाला आला असल्यास अवश्य सांगा
( अर्थात याला अपवाद असूच शकतात ☺️ )
( अभ्यासू ) अमोल 📝
14/07/26
१९ जून, २०२६
दत्त भक्त ( संग्रहित )
दत्त भक्त -- याची व्याख्या म्हणजे ज्याला उद्धरून नेण्याचे महाराजांनी ठरवले तो दत्त भक्त . ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारुपी प्रेरणा दिली तो दत्त भक्त . या लीला माहीत असोत व नसोत त्या
ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,ज्याला आपल्या पायांचा उपयोग नृसिहवाडी सारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटते तो दत्त भक्त . महाराजांच्या समोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा मिळते तो दत्त भक्त . थोडक्यात आपल्या शरीर ,मन ( बुद्धी ) आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीकरता करतो तो दत्त भक्त .
ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,ज्याला आपल्या पायांचा उपयोग नृसिहवाडी सारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटते तो दत्त भक्त . महाराजांच्या समोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा मिळते तो दत्त भक्त . थोडक्यात आपल्या शरीर ,मन ( बुद्धी ) आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीकरता करतो तो दत्त भक्त .
पण मग या दत्त भक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि कसे ? तर हि दत्त भक्ती फार दुर्लभ आहे . सर्वाना महाराजांनी ती संधी दिलेली नाही . दत्त माहात्म्यातील सात गाथा सांगताना स्वतः दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाला म्हणतात ,माझी भक्ती दुर्लभ जाण l ती तुला मिळाली दैवेंकरून ll (द मा ९/१०५) हि दुर्लभ अशी दत्त भक्ती आपल्या वाट्याला आली असताना सहजसाध्य मात्र अजिबात नाही . या मार्गात पापरूपी सर्प फुत्कार सोडत आहेत ,प्रलोभनांचे भोवरे गिळू पाहत आहेत ,निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायम सोबत करत आहेत ,नाना संकटे मध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत .
या सर्वाना चुकवत दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही . पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही आणि म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण हि मनाला दिलासा देणारी आहे . हि आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही याचे सूचक आहे . अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटू न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका . आधीच मनुष्य जन्म दुर्लभ त्यातही तो भारत वर्षात त्यातही इथे या राज्यात त्यातही महाराजांच्या सेवेत आपण आहोत . अल्प स्वल्प का होईना होत राहणे महत्वाचे आहे . किती होत आहे पेक्षा काहीतरी होत राहणे आणि ते हि नित्य हे मोलाचे आहे . तेव्हा या दत्त भक्त असल्याचा अभिमान बाळगत नित्य म्हणत रहा ---
*!!!श्रीगुरुदेव दत्त !!!*
---अभय आचार्य
*!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*
४ जून, २०२६
१७ मे, २०२६
१६ मे, २०२६
१९ एप्रिल, २०२६
१५ एप्रिल, २०२६
१२ एप्रिल, २०२६
८ एप्रिल, २०२६
२२ मार्च, २०२६
५ मार्च, २०२६
२५ फेब्रुवारी, २०२६
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा
तनू झाकली शुभ्र वस्त्रांत त्याची ||
सदा घेई औदुंबराशी विसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||१||
जयाच्या मुखे ज्ञान अमृत लाभे |
जरी थोर देवाधिदेवांत शोभे ||
जरी भाविकांच्या प्रेमे बसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||२ ||
जयाच्या करी दिव्य दंड तो साजे |
कधी व्याघ्रचर्मावरी जो विराजे ||
जिथे पाहू तेव्हा तिथे तो दिसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मो असावा || ३ ||
कुठेही कधी होय ज्याची भ्रमंती |
पदी पादुका सिध्द रूद्राक्ष कंठी ||
कधी भक्ताहूनी तो दूरी नसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा || ४ ||
अमरजा भीमेच्या राही तीराशी |
असे भक्तवत्सल प्रेमाभिलाषी ||
सदा सर्वदाअंतरी या वसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||५ ||
गुरू मित्र बंधू सखा सर्व काही |
सदा सोबती भाविकाचा तो राही ||
कुठे ना कधी भक्त त्याचा फसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा || ६ ||
प्रपंचातही भक्तिमार्गास लावी |
जणू आप्त इष्टातला भाव दावी
कधी प्रेमे भक्तासवे तो रूसावा
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||७ ||
किनार्यास ती नाव भक्ताची लावी |
मधुभजनी ज्ञानगंगाच दावी ||
करो बोध ऐसा मनाला ठसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मो असावा ||८ ||
( साभार - व्हाट्सअँप समूह )
१४ फेब्रुवारी, २०२६
साडेसाती आणि शनी महात्म्य
साडेसाती आणि शनी महात्म्य
साडेसातीचा त्रास कमी होण्याच्या अनेक उपायात नित्य किंवा दर शनिवारी 'शनी महात्म्य' पोथीचे वाचन हा एक प्रमुख उपाय म्हणून सांगितला जातो /केला जातो.
साडेसाती लागल्या लागल्या हा उपाय सुरु करणारे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे असतील पण बरेसचे जातक हे,त्रास सुरु झाला की जागे होतात.
अर्थात हे नैसर्गिक आहे कारण आपण सगळे सामान्य आहोत
अशांसाठी मी एक वेगळा विचार मांडतोय. शनी महातम्यात राजा विक्रमादित्य याला साडेसातीत काय त्रास झाला यांचे वर्णन आणि त्याला अनुसूरून इतर उपकथा आहेत. आपण जेव्हा वाचन करू तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा त्या कथेच्या मुळ भागाशी कशाप्रकारे co-relate होतोय हे पाहायचे. मग तुमचा त्रास आर्थिक, मानसिक, शारीरिक, प्रपंचिक, व्यवसायिक कसाही असो. ( राजा विक्रमदित्य सारखे तुमचे हात -पाय तोडले गेले पाहिजेत असे नाही )
कुठे तरी लिंक लागतेच
आणि मग यातून निस्तरून जाण्याची विनंती शनी महाराजांना करायची.
याने त्रास लवकर कमी होईल / संपेल वगैरे सांगणे हा या लेखाचा हेतू नाही तर राजा विक्रमादित्य ज्याप्रकारे शरण गेला होता / चुक कळली होती / सरेंडर झाला होता किमान त्याच्या किती प्रमाणात आपण समर्पित व्हायला पाहिजे हे आपापले ठरवायचे
शनी महाराजांची कृपा आपल्या सर्वावर राहो या सदिच्छा
देवा तुझ्या द्वारी आलो📝
14/2/2026
शनिवार
शनी प्रदोष
२० जानेवारी, २०२६
प्रार्थना
*🍁 प्रार्थना 🍁*
( what's App साभार ( माघ शु. द्वितीया, २० जाने २६)
एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले , "गुरुजी ,प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून
कोणी गाऊन ,ओरडून
कोणी करूणा भाकून
कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात ,चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का ?"
*रामदास स्वामी हसले,म्हणाले, "एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता.अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते.थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले.विचारले, "बोल, काय पाहिजे तुला?"*
"माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे !माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू?"
*समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू ? 'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार?*
म्हणून
*अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही.तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं*
*।।।जय जय रघुवीर समर्थ।।।*
...🙏....
१० जानेवारी, २०२६
५ जानेवारी, २०२६
सद्गुरू प्रार्थना
🙏🙏 "सद्गुरू प्रार्थना" 🙏🙏
सद्गुरु नाथा, हात जोडीतो अंत नको पाहू |
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
||धृ||
निशीदिनी श्रमसी,मम हितार्थ तू,किती तुज शीण देऊ |
ह्रदयी वससी,परी नच दिससी,कैसे तुज पाहू ||१||
उत्तीर्ण नव्हे,तव उपकारा, जरी तनु तुज वाहू |
बोधूनि दाविसी,इहपर नश्वर, मनी उठला बाऊ ||२||
कोण,कुठील मी,कवण कार्य मम,जनी कैसा राहू |
करी मज ऐसा,निर्भय निश्र्चल,सम सकला पाहू ||३||
अजाण हतबल,भ्रमित मनिची,तळमळ कशी साहू |
निरसूनी माया,दावी अनुभव,प्रचिती नको पाहू ||४||
सद्गुरु नाथा,हात जोडीतो, अंत नको पाहू |
उकलुनी मनीचे,हितगुज सारे, वद कवणा दावू
||धृ||
🙏 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏
३ जानेवारी, २०२६
श्री शंकर महाराज स्तवन
श्री शंकर महाराज स्तवन:
संतवर्य श्री योगिराज प्रभु शंकरमहाराज
वंदन करुनी चरणि अर्पितो भक्तीचा साज।।१।।
अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी
सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी।।२।।
इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही
सर्व देवता आमच्या अगदी आहेत हो तुम्ही।। ३।।
सकलहि देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत
अधिकार हा प्रचंड तुमचा कळूनिया येत।।४।।
अशक्य जे जे जगी, सहज ते तुम्हालाच शक्य
तुम्ही कोण? हे ओळखणे ही मानवा न शक्य।।५।।
जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता
जे जे तुमच्या मनात येईल, करून दाखविता।।६।।
भूत भविष्य नि वर्तमान हे तुमच्या हातात
महाकाळ हा तुम्हापुढे हो होई भयभीत।।७।।
तुम्हा पाहणे, तुम्हांस स्मरणे, घेणे दर्शन
भाग्यविण या गोष्टी साऱ्या, येती ना घडुन।।८।।
तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा
अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा।।९।।
धरले आम्ही भावे तुमचे, जगी घट्ट चरण
सोडणार कधि नाही आम्ही, आले जरी मरण।।१०।।
नित्य घडावे स्मरण नि पूजन, देहच रंगावा
शंकर महाराजांचा जयजयकार मुखी व्हावा।।११।।
अकरा कवनांचे हे स्तोत्र पठण करता दिनरात
विजयी होईल सर्वत्र कामना पूर्ण होतील।।१२।।
।। संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज शंकर महाराज की जय !!
( From whatsapp group forward )
हम गया नही जिंदा है.
Whatsaap Forward
श्रीस्वामी समर्थांसारखी असामान्य विभूती या ग्रहगोलांच्या कधीच अधीन नसतात उलट ग्रहगोलच त्यांच्या अधीन असतात. स्वामींच्या हातातली गोटी हे अखिल ब्रह्माण्डस्वरूप आहे. ज्यांना अखिल ब्रह्माण्ड एका गोटीसमान आहे त्यांच्यावरती ग्रहगोल काय परिणाम करणार ? अशा सिद्ध कोटीला पोचलेल्या महापुरुषांवरती ग्रहगोलांचे परिणाम होत नसतात.
जातक रहस्य या पुस्तकात जोतिषी कै. राजे असं लिहितात " की, तिसरा वर्ग सिद्ध लोकांचा असतो. हे लोक ग्रह परिणामातीत असतात. ज्यांना सुख ,दुःख ,लाभ ,हानी ,जन्म मृत्यू सारखेच असतात. त्यांना त्रिविध तापाची बाधा होऊच शकत नाही. अशा लोकांनी आपल्या साधनेद्वारे मन जिंकलेले असते. अशा सिद्धांना गुरुचंद्राच्या शुभ युतीचे फायदे होत नसतात कि शनी रवी युतीचे अशुभ परिणाम होत नसतात किंवा राहू गुरु चांडाळ योग त्यांचे वाकडे करू शकत नाही, रवी मंगळ अंगारक योग त्यांना कुठली पीडा देऊ शकत नाही. रवी चंद्र यांचा अमावस्या योग त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही. राहू केतू यांचा रवी चंद्राशी होणारा ग्रहण योग त्यांची होणारी दिगंत कीर्ती रोखू शकत नाही. अशा सिद्धांवरती फक्त नेपच्यून,हर्षल, गुरु आणि शनी या ग्रहांचेच थोडेफार परिणाम होत असतात. ते सुद्धा फक्त अध्यात्मिक बाबतीत. हे परिणाम सुद्धा हे सिद्ध आपल्या साधनेद्वारे त्यांना जर वाटले तर ते सुद्धा बदलवू सुद्धा शकतात अथवा त्यांचे होणारे परिणाम पुढे मागे करू शकतात. "आपण सुद्धा सामान्य आहोत असेच बरेचदा दाखवण्याचा सिद्धांचा प्रयत्न असतो आणि त्यातून त्यांच्या जन्मकुंडल्यांचा उगम होतो.
एकदा चिंतोपंत टोळांच्या घरी स्वामी समर्थांचा मुक्काम असताना "श्रीं'ची स्वारी घराबाहेरील अंगणात बिछान्यावर पहुडली होती. मंडळींशी गप्पा सुरू होत्या. त्या नादात मध्यरात्र केव्हा झाली हे कुणालाच समजले नाही. तेवढ्यात श्रीसमर्थांनी खड्या आवाजात एक जुनी लावणी चालीवर म्हणावयास सुरुवात केली.
गोरे ग रूप तुझे |
तुला पाहिले |
सात ताल माडीवरी ||
श्रीं'च्या तोंडी ही शृंगारिक लावणी पाहून सर्वांनाच मोठे आश्र्चर्य वाटले. तेवढ्यात चिंतोपंतांनी थोडे धाडसकरून विचारले, " महाराज, आपण पूर्वाश्रमी गृहस्थ होता असे वाटते. आपण आपली जात कोणती हे कृपा करून सांगाल का?' त्यावर श्रीसमर्थ चटकन म्हणाले, "आमची जात चांभार, आई महारीण आणि बाप महार.' एवढे सांगून ते पोट धरधरून खो-खो हसत सुटले. पुढे मात्र एकदा कर्वे नावाच्या एका गृहस्थांनी या संदर्भात खुलासेवार सांगण्याची विनंती केल्यावर दत्तावधूत यतिराज त्यांना म्हणाले - "आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंह, काश्यप गोत्र, आमची मीन राशी, पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस.' स्वामी समर्थांची जी पत्रिका नाना रेखी यांनी तयार केली तिला स्वामी समर्थांनी मान्यता दिली होती, त्या पत्रिकेवरही"नृसिंहभान' असेच टोपण नाव आढळते; मात्र श्रीसमर्थांनी आपली राशी मीन असे का सांगितले याचे कोडे उलगडत नाही. वास्तविक त्यांचे जन्म लग्न मीन आहे. त्यामुळे त्यांना आपली लग्नराशी अभिप्रेत असावी असे वाटते. कारण सदर पत्रिकेत त्यांची चंद्रराशी मेष दाखविली आहे. तसेच, सदर पत्रिकेत यजुर्वेदी ब्राह्मण, कश्यप गोत्र असेच लिहिले आहे. (ही पत्रिका पाहिल्यावर " नौबत बजाव " असे शब्द श्रीमुखातून बाहेर पडले व दक्षिणा म्हणून श्रीसमर्थांनीनानाजींच्या उजव्या हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. त्याच वेळी त्यांच्या हातावर नीलवर्णाचे लहानसे विष्णुपाद उमटले. ते मरेपर्यंत त्यांच्या हातावर होते असे म्हणतात.) श्री स्वामी समर्थ यांची स्वामी आदेशा वरून श्री .नाना रेखी यांनी तयार केलेली पत्रिका (मुळ प्रत) अशी आहे . अहमदनगरच्या मठात त्याचे दर्शन होते
संवत्सर शके १०७१, चैत्र शुद्ध द्वितीया ,अश्विनी नक्षत्र,द्वितीय चरण ,प्रितियोग ,टोपण नाव नृसिंहभान ,आद्य नाडी,देव गण ,मेष राशी ,राशी स्वामी मंगळ,जन्म काळ सूर्योदयापूर्वी दोन घटिका, जन्म नाव-चैतन्यस्वामी,यजुर्वेदी ब्राह्मण,काश्यप गोत्र.
🌹प्रस्तुती : श्री वामन रूपरावजी वानरे.
मो.9826685695.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
















