१४ मार्च, २०१९

श्रीमद्भगवद्गीता पठण


* ब्रह्मसंस्कृती संस्था व आम्ही मैत्रीणी *
* च्या संयुक्त विद्युत् *

* फल्गुन शुक्ल एकादशी शके 1 9 40 *
* दिनांक 17 मार्च 201 9 *

एकदशी चे औचित्य साधुन दुपारी 3 ते 5.30 (मधे 10 मी विश्रांती) या वेळेत संपूर्ण * श्रीमद्भगवद्गीता * पठणाचा कार्यक्रम योजली आहे.
गीता पठना नंतर * विष्णु सहस्त्रनाम * पठण

* राष्ट्र सेवा समिती ठाणे येथे भगिनी संपूर्ण गीता लयबद्ध सादर * 

आपण सगळ्यांना त्यांच्या बरोबर सांगू शकतो. पठना नंतर 5.45 वाजता * सौ धनश्री लेले * यांचे * गीतेतील विश्वूप दर्शन * या विषयावर भाषण. 

सदर कार्यक्रम सर्व वयोगटातील महिला - पुरुषांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.

* आपण गीता पठणासाठी येत असाल तर कृपया 14 मार्च 201 9 पर्यंत नाव नोंदणी करा *

* स्थळ - श्री अंबिका योग कुटीर वनौषधी प्रकल्प सेक्टर 9 एन सिबिडी बेलापूर नवी मुंबई *

* वेळ - गीता व विष्णु सहस्त्रनाम पठण 3 ते 5.30 *
           * 5.45 सौ धनश्री लेले यांचे प्रवचन *


संपर्क - मेघा गोखले 9 86 9 7 9 757
           मंगल कुलकर्णी 99 6 9 525223
           सुचेता चलगेरी. 9 833354265

९ मार्च, २०१९

आपले ग्रहयोग

आपले ग्रहयोग
लेखक : आचार्य डाँ मधुसुदन घाणेकर
अक्षय्य प्रकाशन, पुणे

अनुक्रम :-
ग्रहयोग म्हणजे काय?
संकीर्ण: काही प्राथमिक माहिती
सारांश
काही अभ्यासनीय कुंडल्या

केवळ ७० पृष्ठे असलेले हे पुस्तक अत्यंत सुटसुटीत.  सर्व ग्रहांमधील काही प्रमुख योग कुंडली दाखवून दिले आहेत. त्याचे परिणाम त्या त्या कुंडली खाली लिहिले आहेत. युती योगाची उदाहरणे जास्त आढळतात.  अर्थात कुंडलीवरून नुसते चित्र दाखवले आहे. तारीख,वेळ,ठिकाण,ग्रहांचे अंश ही माहिती नसल्याने अभ्यासास मर्यादा येतात.
प्रस्तावनेत लेखक म्हणतात 'ग्रहयोगांचा अभ्यास म्हणजे अप्रत्यक्षरित्या, डोळ्यांसमोर येणाऱ्या कुंडलीचा दर्जा कसा अजमावयाचा याविषयीची एक खुली चालनाच मिळते.
मुळात प्रत्येक लग्नाला शुभ-अशुभ ग्रह तसेच प्रत्येक ग्रहाचे शत्रुमित्र ग्रह ह्या गोष्टी समजल्या की त्या आधारे ग्रहयोगांचा विचार कसा करायचा या संदर्भातील दिशाही निश्चित होऊ शकते.

या पुस्तकाचे मूल्य केवळ ३० इतके नाममात्र आहे. जोतिष अभ्यासकांसाठी नक्कीच संग्रहित ठेवावे असे हे पुस्तक

📝kelkaramol.blogspot.in

८ मार्च, २०१९

संग्रहित - जोतिष खजिना

जोतिष शास्त्रावर असंख्य पुस्तके  अनेकांकडे असतील .  काही पुस्तके एका विशिष्ठ  विषयावर असतात. ती पुस्तके आपण त्या विषया बद्दलचा अभ्यास म्हणून तर वाचतोच  पण होतं काय की पुस्तक हातात पडले की आपण सरळ विषयाशी निगडीत माहिती  वाचायला सुरु करतो. ब-याचदा या पुस्तकात  लेखकाचे  जे मनोगत / पुस्तकाचा उद्देश दिलेला असतो, लेखाने पुस्तक ज्यांना समर्पित केलेले असते  किंवा इतर मान्यवरांनी त्या पुस्तकावर जे लिहिलेले असते त्यातूनही एखादा जोतिष शास्त्रावरचा एखादा सिध्दांत / एका वेगळ्या  द्रुष्टीकोनातून जोतिष शास्त्राची माहिती, या शास्त्रावर विश्वास बसेल अशी उपयुक्त माहिती नकळत  कळून जाते .  हीच गोष्ट अनेक जोतिष मासिकात असणा-या ' संपादकीय'  सदरातूनही मिळत जाते.

तर अशा चुकून दुर्लक्षीत झालेल्या गोष्टी ,  त्या पुस्तकात/ मासिकात/ दिवाळी अंकात  समाविष्ट असलेली  काही विशेष उल्लेखनीय वाटणारी माहिती  संग्रहित करून ती देण्याचा प्रयत्न करेन म्हणतो.  ही माहिती देताना  पुस्तकाचे चित्र, लेखक याचीही माहिती देण्यात येईल.

या क्रमश लेखनमालिकेसाठी  एखादं  छान शिर्षक  कुणाला सुचले तर अवश्य सांगा  🤗

धन्यवाद
अमोल


पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या