८ मार्च, २०१९

संग्रहित - जोतिष खजिना

जोतिष शास्त्रावर असंख्य पुस्तके  अनेकांकडे असतील .  काही पुस्तके एका विशिष्ठ  विषयावर असतात. ती पुस्तके आपण त्या विषया बद्दलचा अभ्यास म्हणून तर वाचतोच  पण होतं काय की पुस्तक हातात पडले की आपण सरळ विषयाशी निगडीत माहिती  वाचायला सुरु करतो. ब-याचदा या पुस्तकात  लेखकाचे  जे मनोगत / पुस्तकाचा उद्देश दिलेला असतो, लेखाने पुस्तक ज्यांना समर्पित केलेले असते  किंवा इतर मान्यवरांनी त्या पुस्तकावर जे लिहिलेले असते त्यातूनही एखादा जोतिष शास्त्रावरचा एखादा सिध्दांत / एका वेगळ्या  द्रुष्टीकोनातून जोतिष शास्त्राची माहिती, या शास्त्रावर विश्वास बसेल अशी उपयुक्त माहिती नकळत  कळून जाते .  हीच गोष्ट अनेक जोतिष मासिकात असणा-या ' संपादकीय'  सदरातूनही मिळत जाते.

तर अशा चुकून दुर्लक्षीत झालेल्या गोष्टी ,  त्या पुस्तकात/ मासिकात/ दिवाळी अंकात  समाविष्ट असलेली  काही विशेष उल्लेखनीय वाटणारी माहिती  संग्रहित करून ती देण्याचा प्रयत्न करेन म्हणतो.  ही माहिती देताना  पुस्तकाचे चित्र, लेखक याचीही माहिती देण्यात येईल.

या क्रमश लेखनमालिकेसाठी  एखादं  छान शिर्षक  कुणाला सुचले तर अवश्य सांगा  🤗

धन्यवाद
अमोल


1 टिप्पणी:

निनावी म्हणाले...

khup chaan..Jyotish vishva

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या