न्यायदेवता शनि महाराज म्हणजे कर्माचा न्याय. शनि देवांचा जन्मोत्सव सोहळ्यातील शनी महाराजांचे दर्शन. आपण जे करतो, जसं जगतो, ज्या भावना मनात ठेवतो त्याचं फळ शनि देतात. त्यामुळे शनि भीतीचा विषय वाटतो. त्रास, विलंब, अडथळे हे शनीशी जोडले जातात. पण खरं पाहिलं तर शनि शिक्षा देत नाहीत. ते शिकवतात
. माणसाला आतून मजबूत करतात, अहंकार झडवतात आणि संयम शिकवतात.
दत्त महाराज मात्र करुणेचा महासागर आहेत. ते फक्त कर्म पाहत नाहीत, तर त्या कर्मामागचा आपला भाव पाहतात. चुकांमध्ये अडकलेला भक्त असो वा संकटात सापडलेला मनुष्य दत्तगुरु त्याला एकटे सोडत नाहीत.जिथे शनि नियम आहेत, तिथे दत्त महाराज मार्गदर्शन आहेत. जिथे शनि थांबवतात, तिथे दत्त महाराज हात धरून पुढे नेतात.
म्हणून असं म्हणतात की शनीची साडेसाती किंवा अडचणीचा काळ सुरू झाला, की दत्त महाराजांची उपासना करावी. कारण दत्तगुरु शनीचा कोप टाळत नाहीत, पण त्या काळात माणसाला तग धरायला शक्ती देतात. त्रास कमी होतो असं नाही, पण त्रास सहन करण्याची ताकद येते. आणि तीच खरी कृपा असते.
शनि माणसाला बाहेरून शिस्त लावतात, तर दत्त महाराज आतून बदल घडवतात. शनीकडे गेलं की आपण कर्म सुधारायला शिकतो. दत्त महाराजांकडे गेलं की मन शुद्ध करायला शिकतो. दोघांचा मार्ग वेगळा असला तरी उद्देश एकच आहे माणसाला योग्य दिशेने नेण.
म्हणून दत्त भक्तांसाठी शनि भीतीचा नाही तर परीक्षेचा देव ठरतो. आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठी दत्त महाराज हेच खरे गुरू ठरतात.
🍀 मार्गशीर्ष मास आर्द्रा नक्षत्र विशेष 🍀 ( Whatsapp साभार)
येणारी तारीख 06/12/2025 शनिवार हा मार्गशीर्ष महिन्यातील महा आर्द्रा नक्षत्र आहे. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकर ब्रह्मा आणि विष्णू यांच्या समक्ष लिंगस्वरूपात प्रकट झाले होते आणि त्या दिवशीच भगवान ब्रह्मा व भगवान विष्णूंनी प्रथमच शिवलिंगाची पूजा केली होती. त्या दिवसापासून भगवान शंकराच्या लिंगस्वरूप पूजेची परंपरा सुरू झाली.
यावेळी हे नक्षत्र शनिवार, 06/12/2025 रोजी येत असल्याने सर्वांनी शिवपूजा करणे, शिवदर्शन घेणे, मंदिरात जाणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. या दिवशी शिवलिंगाच्या दर्शनाचे महत्त्व शब्दात वर्णन करता येणार नाही.
शक्य असल्यास संपूर्ण शिवपूजा, अर्चना, आरती करावी, महादेवांना प्रसाद अर्पण करावा आणि मंदिरात 11, 21, 51 किंवा 108 दिवे लावावेत. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही दिवे प्रज्वलित करावेत. या दिवशी दिवे लावण्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्यास शंभर महाशिवरात्रीच्या पूजेइतके पुण्य प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी निश्चित शिवदर्शन व पूजन करावे आणि या महा आर्द्रा नक्षत्राविषयी सर्वांना माहिती द्यावी. तुम्ही जितक्या लोकांना ही माहिती पोहोचवाल, तितकी भगवान शिवांची कृपा तुमच्यावर अधिकाधिक होईल.
शंभर महाशिवरात्रीची पूजा केल्याएवढे पुण्य, फक्त या एका दिवसाच्या पूजेमुळे लाभते, आणि तो दिवस म्हणजे—
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कृष्णा पंचगंगा संगमावर तपश्चर्येसाठी बारा वर्षे राहिले. त्यानंतर ते गाणगापूरला गेले. जाण्यापूर्वी त्यांनी एका पाषाणावर मनोहर पादुका प्रकटवल्या त्या योगिनींच्या स्वाधीन गेल्या आणि भैरंभट नामक वृद्ध ब्राह्मणास तेथे पूजक म्हणून नेमले. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या उक्ती नुसार प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय पादुकांच्या रूपाने तेथे अखंड वास्तव्य करीत आहेत.
पादुका 'चंद्रकांत' नावाच्या पाषाणावर प्रकटविलेल्या आहेत. अशा पाषाणावर जेव्हा चंद्रकिरण पडतात तेव्हा त्यापासून अमृताचे क्षरण होत असते. भगवान श्री दत्तात्रेय हे सूर्य चंद्राचेच नव्हेत तर सकळ विश्वाचे अधिपती आहेत. त्यामुळे पादुका धारण करणाऱ्या या पाषाणातून नित्य अमृतबिंदूंचे क्षरण होत असते.
श्रींच्या मनोहर पादुकांवर वीस शुभचिन्हे आहेत. वाडी मध्येच होऊन गेलेले श्रेष्ठ पुजारी 'श्रीगुरुभक्त'; म्हणजेच विठ्ठल अपानभट ढोबळे पुजारी यांनी या शुभ चिन्हांची नावे एका आरतीमध्ये दिलेली आहेत.
उभयपादुकांवरील प्रत्येक अंगुलीवर एक एक चक्र आहे. प्रत्येक चक्राखाली तीन उभ्यासमांतर रेषा आहेत. याशिवाय दोन्ही पावलांवर टाचे पासून अंगुलीपर्यंत वक्ररेषा आहेत. उजव्या पावलावर ध्वज, वज्र, अंकुश, स्वस्तिक, छत्र, जम्बुफळ, यव ,अष्टकोन, पद्म आणि गात्र (चाबूक) अशी चिन्हे आहेत. डाव्या पावलावर त्रिकोण, गोष्पद अर्धचंद्र, धनु, कमंडलू, मत्स्य, शंख, अमृतपात्र आणि चक्र अशी चिन्हे आहेत. या पादुका संनिध श्रीलक्ष्मीचे अखंड वास्तव्य आहे.
विश्वातील यच्चयावत शुभचिन्हे व अनंतकोटी तीर्थे या चरणांवर अधिष्ठित आहेत. या मनोहर पादुकांच्या रूपाने श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत राहणारे भगवान श्री दत्तात्रेय हे साक्षात परब्रम्ह आहे.
अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।। धृ ।। मीतूपण गेले वाया।
पाहता पंढरीच्या राया।। 1 ।। नाही भेदाचे ते काम। पळोनी गेले क्रोध काम।। 2 ।। देही असोनी विदेही। सदा समाधिस्थ पाही।। 3 ।। पाहते पाहणे गेले दूरी। म्हणे चोखिया ची महारी।। 4 ।।
आजकाल मन फार हळवं झालय. येणारा प्रत्येक दिवस काही ना काही संकट दाखवित आहे. पहलगाम हल्ला, ऑपेरेशन सिंदूर, युद्धविराम, हगवणे प्रकरण, अहमदाबाद दुर्घटना, केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅश, पेरू भूकंप, इंडोनेशिया वोलकॅनिक एरपशन, अतिवृष्टीने होणारी हानी, इस्राएल-इराण युद्ध आणि सर्वात कहर म्हणजे भविष्यवेत्यांच्या भविष्यवाण्या,1941 चे आणि 2025 चे कॅलेंडर सारखेच. नक्कीच ह्या वर्षी युद्ध, नैसर्गिक आपत्ती असे संकट येणार, परत अमूक दिवशी होणाऱ्या ग्रहांच्या युतीमुळे येणारे संकट तारीख-वार वेळेसहित सांगितले जाते. या सर्व प्रकारांनी मनःशांती ढळली जात आहे. येणारा दिवस काय घेऊन येणार ह्या चिंतेने सर्वच पोखरले जात आहेत.
प्रत्येक प्रश्नाला, समस्येला उत्तर असतेच. फक्त त्याचा शोध,जाणीव आपल्याला व्हायला हवी. मला तर ह्या प्रश्नाचे उत्तर देवकृपेनें प्राप्त झालेले आहे. माझ्या मते ह्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी दत्त भक्तांना फार परिश्रम करण्याची गरज नाही. 'श्री.दत्त करुणा त्रिपदी' आपले मन शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ह्यात दत्त महाराजांकडे आपण केलेल्या चुकांची माफी मागितली जाते आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना केली जाते. दत्त महाराजांच्या चरणी ही प्रार्थना केल्याने आपल्या जीवनातील अडचणी, संकटे आणि दु:ख दूर होतात. करुणा त्रिपदी पठण केल्याने मन शांत होते आणि मानसिक ताण कमी होतो, असे मानले जाते. तसेच याच्या पठणाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वादाचा लाभ मिळतो. ही करुणा त्रिपदी दत्त संप्रदायात खूप महत्वाची मानली जाते आणि दत्तभक्त नेहमी याचे पठण करतात. ह्या करुणा त्रिपदीची रचना श्री टेंबे स्वामी महाराज यांनी केली आहे. टेंबे स्वामी 'वासुदेवानंद सरस्वती' म्हणूनही ओळखले जाते. ते दत्तात्रेयांचे अवतार म्हणून ही ओळखले जातात.
करुणा त्रिपदी च्या निर्मिती बाबत एक कथा वाचनात आली ती अशी. नरसोबाची वाडी येथे पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, तेथील पुजाऱ्याच्या हातून चुकून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली पडली. झाल्या प्रकरणाने सर्व लोक अपशकुन झाला म्हणून अत्यंत घाबरले व तेथील पुजारी मार्गदर्शनासाठी वासुदेवानंद सरस्वती स्वामी ह्यांना भेटण्यास गेले आणि घडलेली घटना त्यांना सांगितली. पुजाऱ्यां कडून ही घटना ऐकल्यावर स्वामी अत्यंत व्यथित होऊन ध्यानास बसले. ध्यानात त्यांनी दत्त महाराजांना या घटनेबाबत सांगितले, तेंव्हा दत्त महाराजांनी सांगितले, "हे लोक नियमांनुसार वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तिथे राहायचा कंटाळा आला आहे. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी!" ध्यानातून बाहेर आल्यावर स्वामींनी पुजाऱ्यांना खडे बोल सुनावले. नियमाप्रमाणे वागण्यासाठी नियमावली करून दिली. आणि परत असा अनुचित प्रकार घडला तर ते हस्तक्षेप करणार नाही अशी ताकीदही त्यांना दिली.
झाल्या प्रकाराने स्वामी अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांची मनःशांती ढळली, मनाच्या या करुण अवस्थेत त्यांनी क्षमा याचनेसाठी 3 पद्याची रचना केली तीच करुणा त्रिपदी होय. ती तीन पदे पुढीलप्रमाणे-
1. शांत हो श्री गुरुदत्ता
2. श्री गुरुदत्ता जय भगवंता
3. जय करुणाघन निजजनजीवन.
ह्या तिन्ही पदांमध्ये स्वामींनी दत्तगुरुंची करुणा भाकली व झालेल्या अपराधाची क्षमा मागितली आहे. ही त्रिपदी अत्यंत भावपूर्ण, रसाळ व मंत्रमुग्ध करणारी रचना आहे. मनापासून प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घेतल्यास त्रिपदी म्हणताना डोळ्यातून अश्रू ओघळतात. यातून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभू देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून निरंतर सेवा करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन त्यांनी भगवंतांची प्रार्थना केली.
आजच्या घडीला श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच आहे. साक्षात् दत्तावतार श्री. स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की प्राप्त होतेच. मंत्ररुप प्रसादीक व दत्त भक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणार्या ह्या श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्र ग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३, अध्याय ९२ ह्यात करुणा त्रिपदीचे महत्व विशद केले आहे.
ह्याचा संक्षिप्त भावार्थ असा आहे:-
'काही आपत्ति आल्यास जो नित्य एकविस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणती ही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्तिचे पुर्ण निरसन होइल. तसेच पुर्ण श्रध्दावंत अंत:करणाने जो ह्या त्रिपदीचे एकवीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दुर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्याधीतून मुक्ती लाभेल. भक्तांसाठी करुणा त्रिपदीचे हे तत्कलिक फळ होय.'
आपण कुठेही असो, प्रवासात, घरी-दारी न चुकता आपल्या पठणात आपण करुणा त्रिपदी ठेवली पाहिजे. आर्तभावनेने त्रिपदी पठण केल्यास दत्त महाराज आपल्या हाकेला नक्कीच धावून येतील आणि आपल्याला मनःशांतीचा लाभ होईल. करुणा त्रिपदी म्हंटल्यानंतर कळपात चुकलेल्या वासराला अचानक त्याची आई दिसाल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद आपल्या भरकटलेल्या मनाला योग्य रस्ता सापडल्याचा होतो. दत्त प्रभूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत करूणा त्रिपदीचा प्रचार प्रसार आपण करु आणि तणावमुक्त, शांत जीवन जगण्याचा मार्ग आपण मनापासून अंगीकारू.
आज संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ होत आहे. संत गजानन महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ यांच्या पालख्या मार्गस्थ आधीच झाल्यात. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही एक दोन दिवसात निघेल. असंख्य वारकरी 'तन-मन- धनाने' या सोहळ्यात वेगवेगळ्या प्रकारे सामील होतील. गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी निर्माण झालेली ' Nigativity',विचित्र मानसिक अवस्था, भिती, ग्रह योग, या सगळ्या परिस्थितीला सामोरे जायची शक्ती मिळणार आहे ती भक्ती मार्गातूनच
म्हणूनच
तुका म्हणे हरिच्या दासां
शुभकाळ अवघ्या दिशा !
हा आलेला विचार मनाला उभारी देतो. भले शरीराने आपण देहू, आळंदी ते पंढरपूर नसू ही जात
तुका म्हणे सोपी केली पायवाट !
उतरावया भवसागर रे !
सोशल मिडीया, न्यूज चँनेल्स, वृत्तपत्रे यातून हा अनुपम्य सोहळा आपण अनुभवणार आहोत
काय या संतांचे मानू उपकार !
मज निरंतर जागविती !!
पांडुरंग ध्यानी,पांडुरंग मनी !
जागृतीं स्वप्नीं पांडुरंग !!
मनाची एवढी एकरूपता २४x ७ सर्वांना जमेलच असं नाही पण वृत्ती तशी ठेवण्याचा प्रयत्न करावयाचा
तुका म्हणे जैसें दास केले देवा
तैसें हे अनुभवा आणि मज !!
आषाढी एकादशीपर्यंतचे अनेक खेळ या वाळवंटी रचत, या सोहळ्याची सांगता चंद्रभागेच्या तिरी , पंढरपूर या भक्तांच्या माहेरी होईल
.७८ टॅरो कार्ड्स मधे अशी काही कार्ड आहेत जी मला आपल्या हिंदू देव- देवतां प्रमाणेच Application, Affirmative wise सारखी वाटतात. म्हणजे ज्या उद्देशाने आपण त्या देवतेची उपासना करतो , अगदी तोच उद्देश हे कार्ड दाखवते.
उदाहरणादाखल दिलेले हे चित्र पहा.मेजर अर्केना मधील ८ वे कार्ड 'स्ट्रेन्थ ' आणि आपली देवी.