अभंगवारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभंगवारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२५ जून, २०२५

अभंगवारी - अधिक देखणे तरी


अधीक देखणें तरी निरंजन पाहाणें ।
योगराज विनवणें मना आलें वो माये ॥१॥
देहबळी देउनि साधिलें म्यां साधनीं ।
यानें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥
अनंगपण फ़िटलें मायाछंदा सांठवलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरुप वो माये ॥३॥
चंदन जे जेविं भरला अश्वत्थ फ़ुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां प्रपंचा पाहाणें ।
निजानंदीं राहणें स्वरुपीं वो माये ॥५॥
ऐसा सागरु ।
रखुमादेविवरु विठ्ठलु निर्धारु ।
म्यां देखिला वो माये ॥६॥

२३ जून, २०२५

अभंगवारी - अवघा रंग एक झाला





अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।। धृ ।।
मीतूपण गेले वाया।


पाहता पंढरीच्या राया।। 1 ।।

नाही भेदाचे ते काम। पळोनी गेले क्रोध काम।। 2 ।।
देही असोनी विदेही। सदा समाधिस्थ पाही।। 3 ।।
पाहते पाहणे गेले दूरी। म्हणे चोखिया ची महारी।। 4 ।।

२२ जून, २०२५

अभंगवारी- अगा वैकुंठीच्या राया

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥

अभंगवारी- देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार |
तुझे नामाचा व्यवहार || धृ ||

मन बुध्दीची चाकरी |
रामनाम सोने चोरी || १ ||

नरहरि सोनार हरीचा दास |
भजन करी रात्रंदिवस || २ ||

अभंगवारी- माझा भाव तुझे चरणी

माझा भाव तुझे चरणी |
तुझे रूप माझे नयनीं || धृ ||

सापडलो एकामेकां |
जन्मोजन्मी नोहे सुटका || १ ||

त्वां मोडिली माझी माया |
मी तो जडलो तुझिया पायां || २ ||

त्वां मज मोकविले विदेही |
मी तुज घातले हृदयीं || ३ ||

नामा म्हणे गा सुजाना |
सांग कोणे ठकविलें कोणा ? || ४ ||

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या