३१ ऑगस्ट, २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :

आज  शुक्रवार ३१ ऑगष्ट २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :
 वेळ लग्न स्वामी
 नक्षत्र स्वामी
 राशी स्वामी
 दिन स्वामी
५.२७ ते ६.२५
रवी
राहू
शनी
गुरु
६.२५ ते ७.३५
रवी
राहू
शनी
शुक्र, केतू
७.३५ ते ९.४२
बुध
राहू
शनी
शुक्र, केतू
९.४२ ते ११.५३
शुक्र, केतू
राहू
शनी
शुक्र, केतू
११.५३ ते १४.०८
मंगळ, राहू
राहू
शनी
शुक्र, केतू
१४.०८ ते १६.१४
गुरु
राहू
शनी
शुक्र, केतू




१६.१४ ते १८.०३
 शनी
राहू
शनी
शुक्र, केतू
१८.०३ ते १९.४०
शनी
राहू
शनी
शुक्र, केतू
१९.४४ ते २१.१८
गुरु
राहू
शनी
शुक्र, केतू
२१.१४ ते २२.५८
मंगळ, राहू
राहू
शनी
शुक्र, केतू
२२.५८ ते ते १.०२
शुक्र, केतू
राहू
शनी
शुक्र, केतू
१.०२ ते ३.१४
बुध
राहू
शनी
शुक्र, केतू
३.१४ ते ५.२३
चंद्र
राहू
शनी
शुक्र, केतू

३० ऑगस्ट, २०१२

अंगारकी चतुर्थी व्रतकथा




  येणा-या ४ सप्टेंबरला  अंगारकी चतुर्थी आहे . यानिमित्याने करायची पूजा / व्रतकथा  इथे वाचा


( वरील चित्रावर टिचकी मारा )



 https://docs.google.com
open?id=0B5QD3AkyOSlITGo5Mm5QeTVnNG8

अंगारकी  चतुर्थीकथा

अंगारकी चतुर्थी  म्हणजे मंगळवारी येणारी  वद्य चतुर्थी.  ही फार महत्त्वाची मानली जाते.  मुदगल  पुराणात व गणेश पुराणात  यासंबंधीचे कथानक असे आहे
अवंती नगरीत  वेदवेत्ते  व सद्गुरु  अग्निहोत्री ऋषी  भरद्वाज रहात होते. ते गणेश भक्त होते. क्षिप्रा नदीवर  ते एकदा स्नानाला गेले असता  एक अप्सरा जलक्रीडा करीत होती. तिला पाहून  भरद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले.  ते पृथ्वीने धारण केले .  तिला न्ण्तर जो पुत्र झाला  तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता  पृथ्वीने तो  सात वर्षाचा झाल्यावर  त्या ऋषींच्या स्वाधीन केला. त्यांनी त्याचे  उपनयन केले, त्याला वेद शिकविले व गणेशमंत्र देऊन  उपासना करायला सांगितले.  मग तो मुलगा अरण्यात गेला. त्याने एक सहस्त्र वर्षे तप केले  गनेश प्रसन्न झाला व त्याने मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले.  तो मुलगा म्हणाला , "  मला स्वर्गात राहून अमृतप्राशन करावयाचे आहे. माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे , ती सर्वांना कल्याणकारी होवो ". गणेशाने त्याला वरदान दिले
" मुला, तुझे नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंकारकासारखा तू लाल आहेस म्हणून अंकारक व शुभ करण्याची तुला शक्ती असेल म्हणून ' मंगल '  असेही प्रसिध्द  होईल.  या चतुर्थीला अंकारकी म्हणतील  व ती व्रती माणसांना ऋणमुक्त  करणारी आणि  पुण्यप्रद होईल.  तुला आकाशात ग्रहांमधे स्थान मिळेल  व तू अमृतपान करशील " 
तो वार मंगळवार व ती  चतुर्थी माघातील वद्य चतुर्थी होती
गणेशाच्या वरदानामुळेच अंकारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व आहे.

आजचे रुलींग प्लॅनेट :

आज  गुरुवार  ३० ऑगष्ट २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :
 वेळ लग्न स्वामी
 नक्षत्र स्वामी
 राशी स्वामी
 दिन स्वामी
५.३१ ते ५.३३
रवी
चंद्र
शनी
बुध
५.३३ ते ६.२५
रवी
मंगळ, राहूशनी
बुध
६.२५ ते ७.३९
रवी
मंगळ, राहूशनी
गुरु
९.३९ ते ९. ४६
बुध
मंगळ, राहूशनीगुरु
९.४६ ते ११.५७
शुक्र, केतू
मंगळ, राहूशनीगुरु
११.५७ ते १४.११
मंगळ राहू
मंगळ, राहूशनीगुरु
१४.११ ते १६.१८
गुरु
मंगळ, राहूशनीगुरु
१६.१८ ते १८.०७
शनी
मंगळ, राहूशनीगुरु
१८.०७ ते १९.४४
शनी
मंगळ, राहूशनीगुरु
१९.४४ ते २१.१८
गुरु
मंगळ, राहूशनीगुरु
२१.१८ ते २३.०२
मंगळ, राहू
मंगळ, राहूशनीगुरु
२३.०२ ते १.०६
शुक्र, केतू
मंगळ, राहूशनीगुरु
१.०६ ते ३.१८
बुध
मंगळ, राहूशनीगुरु
३.१८ ते ५.१७
चंद्र
मंगळ, राहूशनीगुरु
५.१७ ते ५.२७
चंद्रराहू
शनी
गुरु

२९ ऑगस्ट, २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :


नवग्रहपीडाहरस्तोत्र  - ( बुध )

उत्पातरुपो जगतां चन्द्रपुत्रो महाद्युति: !

सूर्यप्रियकरो विद्वान्पीडां हरतु मे बुध :  !!


( अर्थ :  जगात उत्पातरुप असलेला, सूर्याचे सदाप्रिय करणारा, विद्वान असलेला जो चंद्राचा पुत्र महातेजस्वी बुध तो आमची पीडा नाहिशी करो )


जातकशास्त्रीय तत्त्वे  -
( विविध  जोतिष  पुस्तकातून संग्रहीत )

१) ६ - ८ - १२ या स्थानातला नेपच्यून चुकीचे औषध  मिळाल्यामुळे, औषधाचा चुकीचा डोस घेतल्यामुळे  तसेच व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारपण देतो.
२) तृतीय स्थानात  अधिक्याने असलेले पापग्रह आयुर्दायावर परिणाम करतात.  कारण तृतीय स्थान हे  अष्टमस्थानाचे मृत्युस्थान आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------

आज  बुधवार  २९ ऑगष्ट २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :
 वेळ लग्न स्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
५.३५ ते ६.१०रवीरवीशनीमंगळ, राहू
६.१० ते ६.२५रवीचंद्रशनीमंगळ, राहू
६.२५  ते ७.४३रवीचंद्रशनीबुध
७.४३ ते ९.५०बुधचंद्रशनीबुध
९.५० ते १२.०१ शुक्र, केतूचंद्रशनीबुध
१२.०१ ते १४.१५मंगळ , राहूचंद्रशनीबुध
१४.१५ ते १६.२१गुरुचंद्रशनीबुध
१६.२१५ ते १८.११शनी चंद्रशनीबुध
१८.११ ते १९.४८शनीचंद्रशनीबुध
१९.४८  ते २१.२२गुरुचंद्रशनीबुध
२१.२२ ते २३.०६मंगळ, राहूचंद्रशनीबुध
२३.०६  ते १ .१०शुक्र, केतूचंद्रशनीबुध
१.१० ते ३.२२बुधचंद्रशनीबुध
३.२२ ते ५.३१चंद्रचंद्र शनीबुध

२८ ऑगस्ट, २०१२

रुलींग प्लॅनेट :


आज  मंगळवार  २८ ऑगष्ट २०१२

नवग्रहपीडाहारस्तोत्र : -  ( मंगळ )

भूमीपुत्रो महातेजा  जगतां भयकृत्सदा !
वृष्टिकृद् वृष्टिहर्ताच पीडां हरतु मे कुज : !!

( जगामधे  संकटे उत्पन्न करणारा, भूमीचापुत्र असलेला , वृष्टी करणारा व वृष्टीला आवरुन धरणारा असा जो महातेजस्वी
' मंगळ '  तो आमची पीडा हरण करो. )
 

आजचे रुलींग प्लॅनेट :

 वेळ लग्न स्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
०५.३९ ते ७.०३रवीशुक्र, केतूगुरुमंगळ , राहू
०७.०३ ते ७.४७रवीरवीगुरुमंगळ , राहू
७ ४७.  ते ९.५४बुधरवीगुरुमंगळ , राहू
९. ५४ ते १२.०५शुक्र, केतूरवीगुरुमंगळ , राहू
१२.०५ ते १२.४९मंगळ , राहू रवी गुरुमंगळ , राहू
१२.४९ ते १४.१९मंगळ , राहू रवीशनीमंगळ , राहू
१४.१९ ते १६.२५गुरुरवीशनी मंगळ , राहू
१६.२५ ते १८.१५शनी रवीशनीमंगळ , राहू
१८.१५ ते १९.५२शनीरवीशनीमंगळ , राहू
१९.५२  ते २१.२६गुरुरवीशनीमंगळ , राहू
२१.२६ ते २३.१०मंगळ, राहूरवीशनीमंगळ , राहू
२३.१० ते १ .१३शुक्र, केतूरवीशनीमंगळ , राहू
१.१३ ते ३.२६बुधरवीशनीमंगळ , राहू
३.२६ ते ५.३५चंद्र रवी शनी मंगळ, राहू


२७ ऑगस्ट, २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :

आज  सोमवार  २७ ऑगष्ट २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :

 वेळ लग्न स्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
५.४३ ते ७.५१रवीकेतूगुरुचंद्र
७.५१ ते ८.०७बुधकेतूगुरुचंद्र
८.०७ ते ०९.५८बुधशुक्र, केतूगुरुचंद्र
९.५८ ते १२.०९शुक्र, केतूशुक्र, केतूगुरुचंद्र
१२.०९ ते १४.२३मंगळ , राहू शुक्र , केतू गुरुचंद्र
१४.२३ ते १६.२९ गुरुशुक्र, केतू गुरुचंद्र
१६.२९ ते १८.१९शनीशुक्र, केतू गुरु चंद्र
१८.१९ ते १९.५६शनीशुक्र, केतू गुरुचंद्र
१९.५६ ते २१.३०गुरुशुक्र, केतू गुरुचंद्र
२१.३० ते २३.१४मंगळ , राहूशुक्र, केतू गुरुचंद्र
२३.१४ ते ०१.१७शुक्र, केतूशुक्र, केतूगुरुचंद्र
०१.१७ ते ३.३०बुध शुक्र, केतूगुरुचंद्र
३.३० ते ५.३९चंद्रशुक्र, केतूगुरुचंद्र

२६ ऑगस्ट, २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :

आज रवीवार -  २६ ऑगष्ट २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :
 वेळ लग्न स्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
 ५.४७ ते ७.५५ रवी बुध मंगळ, राहू  रवी
 ७ .५५ ते  ०९.१७ बुध  बुध मंगळ,राहू रवी
 ०९.१७ ते १०.०२ बुध केतू गुरु रवी
 १०.०२ ते १२.१३ शुक्र , केतू केतू गुरु रवी
 १२.१३ ते १४.२७ मंगळ , राहू केतू गुरु रवी
 १४.२७ ते १६.३३ गुरु केतू गुरूरवी 
 १६.३३ ते १८.२३ शनी केतू गुरु रवी
 १८.२३ ते २०.०० शनी केतू गुरु रवी
 २०.०० ते २१.३४ गुरु केतू गुरु रवी
 २१.३४ ते २३.१८ मंगळ , राहू केतू गुरु रवी
 २३.१८ ते ०१.२१ शुक्र, केतू केतू गुरु रवी
 ०१.२१ ते ३.३४ बुध केतू गुरु रवी
  ३.३४ ते ०५.४३ चंद्र केतू गुरु रवी

२५ ऑगस्ट, २०१२

आजचे रुलिंग प्लॅनेट

प्रत्येक दिवशी  प्रतेक क्षणावर  काही ठरावीक ग्रहांचा अंमल असतो. ते त्यावेळचे  अंमल करणारे  ग्रह
 ( म्हणजेच रुलिंग प्लॅनेट )
प्रो. कृष्णमुर्ती यांनी यासंबंधी  अनेक अनुभव  दिलेले आहेत. केवळ रुलिंग प्लॅनेटच्या मदतीने , जातकाच्या प्रश्नांची  उचूक उत्तर  कसे द्यायचे यासंबंधी अनेक उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत.

आज शनीवार २५ ऑगष्ट २०१२

आजचे रुलींग प्लॅनेट :


 वेळलग्न स्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी  दिन स्वामी
 सकाळी ५.५१ ते ०८.०० रवी शनी मंगळ , राहू शनी
 सकाळी  ०८.०० ते १०.०६ बुध  शनी मंगळ , राहू शनी
 सकाळी १०.०६ ते १०.३३ शुक्र, केतूशनी   मंगळ , राहू   शनी
 सकाळी १०.३३ ते १२.१७ शुक्र, केतू बुध  मंगळ , राहू   शनी
 दुपारी १२.१७  ते १४.३१ मंगळ , राहू बुध मंगळ ,राहू शनी
 दुपारी १३.३१ ते १६.३७गुरू   बुध  मंगळ ,राहू शनी
संध्याकाळी १६.३७ ते १८.२७ शनी बुध मंगळ ,राहू   शनी
संध्याकाळी १८.२७ ते २०.०४   शनी बुध मंगळ ,राहू  शनी
 रात्री २०.०४ ते २१.३८गुरु बुध  मंगळ ,राहू  शनी
 रात्री २१.३८ ते  २३.२१मंगळ  , राहूबुध    मंगळ ,राहू शनी
 रात्री २३.२१ ते १.२५शुक्र,  केतू बुध मंगळ ,राहू  शनी
 रात्री १.२५ ते ३.३८ बुध बुध   मंगळ ,राहू  शनी
 पहाटे  ३.३८ ते ५.५१                          चंद्र                बुध      मंगळ ,राहू  शनी

२४ ऑगस्ट, २०१२

॥ श्री मनाचे श्लोक ॥२॥

  जय जय रघूवीर  समर्थ  !!

॥ श्री मनाचे श्लोक ॥२॥
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥

 अर्थ : - हरि हे नाव कृष्णाला वापरतात, विष्णु वापरतात. मग श्रीरामदास पहिल्या श्लोकाचा अखेरचा राघवाचा पंथ दुसऱ्या श्लोकात श्रीहरिपर्यंत कसा मिळवतात? रामाचा पंथ, घेता घेता हा हरि अचानक कोठून आला? राम आणि हरि एकच स्वरूपाचे आहेत, असे स्वामी रामदासांन
ा म्हणावयाचे असेल, तर मग रामाचेच नाव त्यांना कायम ठेवले नाही? उत्तर एवढेच आहे की, तसे ते पुढे ठेवले आहे. पण आरंभाला अनेकतत्वातील एकता मनावर ठसवणे आवश्यक होते, ते येथे केले आहे. दुसऱ्या श्लोकात सुरूवातीलाच भक्तीमार्गाचा उपदेश कशासाठी केला आहे? आपण गीता,गाथा, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक भक्तिमार्गाचे म्हणतो. तितकेच ते ज्ञानमार्गाचेही आहेत. भक्ती तर एका श्लोकात, एका ओळीत, एक शब्दात संपते. समजावून सांगणे आणि त्यातून अनुभव निर्माम करणे, हे ज्ञानाचे काम आहे. मग त्याच्या सुरूवातीला भक्तीचा डंका कशासाठी? तर अखेर कोणत्याही ज्ञानासाठी, भक्तीची काही आवश्यकता असते. एखादा विद्यार्थी सुरूवातीला ‘अ’ हा ‘अ’ सारखाच का काढायचा, आणि ‘ड’ सारखा का काढायचा नाही, हे विचारु लागला तर शिक्षकांना शिकवता येणार नाही. म्हणून काही गृहीतकृत्ये, काही भक्ती, सुरूवातीलाच आवश्यक आहे. इतके सांगितल्यावर श्रीरामदास मनाला आळवण्यासाठी मनाच्या अभ्यासाठी, मनाला वळवण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी सर्व प्रथम अट सांगतात ती सत्कृत्याची, जनसेवेची, जनरंजनाची. रामाने जन्मभर असे जनरंजन केले. लहानपणी राजविलास सोडून विश्वामित्राच्या यज्ञ रक्षणासाठी तो रानात गेला आणि आयुष्याच्या अखेरीला जनापवादासाठी सीता सहवासाच्या सुखाचा त्याने यज्ञ पेटवला. उत्तरकांड, सर्ग सत्याण्णव, श्लोक चार. त्या आधी सीतेच्या पातिव्रत्याची ग्वाही अग्निदेवाने दिली. युद्धकांड, सर्ग एकशे अठरा, श्लोक पाच ते अकरा. तेथेच श्लोक सतरामध्ये राम लोकांच्या खात्रीसाठी दिव्य अवश्य होते, असे म्हणतो. सीता पवित्र आहे हे अग्नीचे म्हणणे राम नाकारीत नाही. दुसऱ्या सीतात्यागानंतर लोकापवादासाठी राम सीतास्वीकार दूर ठेवतो, सीतेबद्दलच्या मूलभूत संशयामुळे नव्हे, (उत्तरकांड, सर्ग एकशेसत्त्याण्णव, श्लोक चार). राम असो किंवा कृष्ण. त्याचे जीवन लोककल्याणप्रधान होते. म्हणून या दुसऱ्या श्लोकाताली हरिशी एकरूप होऊन तिसऱ्या श्लोकाचा आदर्श म्हणून राम प्रकट झाला आहे.

२३ ऑगस्ट, २०१२

॥ श्री मनाचे श्लोक ॥ १॥

 जय जय रघूवीर  समर्थ  !!

' श्री समर्थ रामदास स्वामी '  या नावाने फेसबूक वर   एक अत्यंत सुंदर पेज  आहे. समर्थांबद्दलच्या  माहितीचा खजीनाच या ठिकाणी मिळतो.  या पेजवर   ' मनाचे श्लोक ' च्या प्रतेक  ओवीचा / अध्यायाचा  सोपा अर्थ विषद केला आहे.

या पेजवरील उपयुकत माहिती  इथे ब्लॉगवर देऊ का ?  अशी विंनंती त्यांना केल्यावर त्यानी  ताबडतोब ही विनंती मान्य केली  ( त्यांनी अजूनही आपले नाव सांगीतले नसल्याने  त्यांचे नाव इथे लिहू शकत नाही )   त्यांचा मी शतशः आभारी आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------
॥ श्री मनाचे श्लोक ॥ १॥

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥





अर्थ : - मनाचा मूलभत विचार भारतीय संस्कृतीने वेदापासून केला आहे. मनाचे श्लोक हे मनाबद्दल सूक्ष्म विचार करणारे एक अभिमानाचे स्थळ आहे. सूक्ष्म आणि भव्य. इंद्रियाचा मनावर परिणाम सांगणारे आणि मनाचा इंद्रियांवर परिणाम सांगणारे. भव्यता अशी की, मनाचे श्लोक दोनशे पाच आहेत. पण सूक्ष्मता अशी की, मनाचे सूक्ष्म रूप पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे. ओमकाराने उपनिषद सुरू झाले, असे म्हणतात. जाणत्याच्या लेखी ते तेथे संपलेही आहे. विनोबाजी ‘स्थितप्रज्ञ दर्शन’, पान पाचवर म्हणतात, ‘पातंजलाच्या एकशेपंच्याण्णव सूत्रांपैकी पहिल्या तीन सूत्रांतच सर्व शास्त्र सांगून संपले आहे.’ त्याच सूक्ष्मतेने मनाचे श्लोक पहिल्या श्लोकात संपले. त्यात त्यांनी काय सांगितले ते पहा. गुण हे निर्गुण झाले. मन हे आत्मरुप शुद्ध झाले. म्हणजे आरंभाचा शेवट झाला. ज्ञानाची, शारदेची उपासना हेच सांगेल. राममार्ग हीच गोष्ट सिद्ध करील. मनाच्या श्लोकाचा विस्ताराने अभ्यास ही एक आनंददायक आणि संस्कारमय गोष्ट आहे. त्याच्या पहिल्या श्लोकाचा हा साक्षात्कार सूक्ष्म आणि गोड आहे. मनाचे विकल्प बाजूला ठेऊन आनंद मिळवा. म्हणजे शांती मिळेल आणि रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. राम हरिचे रहस्यसुद्धा पाहण्याजोगे आहे
गण = इंद्रियें. अधीश = स्वामी. गुण = त्रिगुण व त्यांचीं सारीं लक्षणें. ईश = स्वामी. मुळारंभ = मूळ पुरुष = ईश्वर. चत्वार – चार. गमणें = दर्शवणें, समजावून देणें. राघवाचा = ईश्वराचा.

इंद्रियांचा स्वामी व सर्व गुणांचें अधिष्ठान तसेंच निर्गुणाचा आरंभ असणारा मूळपुरुष असा जो गणेश त्यास आ
णि चारहि वाणींचें मूळ असणारी शारदा, या दोघांना मी नमस्कार करतो. अनंत ईश्वराच्या दर्शनाचा मार्ग मी समजावून देतों.

श्रीसमर्थांनी केलेले हे मंगलाचरण आहे. त्यांत ज्ञानस्वरुप ईश्वरास आणि शक्तिस्वरुप शारदेस वंदन केलें. ईश्वरस्वरुपाचा अनुभव तीन पातळींवर येतो. मन व इंद्रियें यांचा प्रेरक हृदयस्थ आत्मा हा पहिला अनुभव. विश्वभर पसरलेल्या त्रिगुणांच्या विस्ताराला जिवंत ठेवणारा विश्वात्मा हा दुसरा अनुभव. अनंत विश्वें निर्माण करण्याचें सामर्थ्य व स्वातंत्र्य असून हेंच विश्व निर्माण करण्याचा मूळ संकल्प करणारा मूळ पुरुष अथवा सच्चिदानंदस्वरुप ईश्वर हा तिसरा अनुभव. त्याच्यापुढें निर्गुणांचे क्षेत्र आरंभतें. येथे अनुभवाची भाषा संपते.

ईश्वराची अंगें दोन – ज्ञान आणि सामर्थ्य. सामर्थ्य शक्तिमय असते. परा, पश्वन्ती, मध्यमा, वैखरी या चार वाणींच्या रुपाने माणसांत ते प्रगटते. ग्रंथकाराला ग्रथंरचनेसाठी दोन्ही अंगाचीं आवश्यकता असते. ओंकाररुपाने सर्वां घटीं व्यापून राहणारी शारदा सर्व मानवी कतृत्वाचे मूळ आहे, तिचा हात धरुन माणूस अर्थमय जगतांत प्रवेश करतो आणि तिच्याच प्रेरणेने तेथून निर्गुणाची ओळखण करण्याइतका अनुभवसंपन्न होऊं शकतो,

श्री समर्थांचा अनंत राघव म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सगुणनिर्गुणपरमात्मा.

मानवीजीवनातील प्रवास व त्यांचे पंथ पुष्कळ आहेत. परंतु इंद्रियांपासून सुरु होणारा आणि हृदयस्थ आत्म्यापाशीं संपणारा आंतील प्रवास सर्वात अधिक लांबचा आहे. स्वसंवेद्य व आनंदमय अंतरात्म्यापर्यंत हमाखास पोचवणारा मार्ग श्रीसमर्थ येथें स्वानुभवाच्या आधारानें सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ !

२० ऑगस्ट, २०१२

अधिक मास


गोवर्धनधरं वन्दे  गोपालं गोपरुपिणं !
गोकुलोत्सवमीशानं  गोविंदं  गोपिका प्रेयम् !!

( गोवर्धन पर्वत धारण करणारा, गोपरुपी, गोपाळ, गोकुळाला आनंद देणारा, गोपिकांना प्रिय  अशा श्रेष्ठ  गोविंदाला मी नमस्कार करतो. )
------------------------------------------------------------------------------------

आपले चैत्र, वैशाख , जेष्ठ , आषाढ  इ.  बारा महिने  हे चांद्रमास होत.  चांद्रमासाचे  दिवस सुमारे २९  II  भरतात
याप्रमाणे बाराचांद्रमासाचे  ३५४ दिवस  ( एका चांद्र वर्षाचे )  असतात

एका  सौर वर्षाचे  ३६५  दिवस असतात  (  सुर्याचे भ्रमण )

चांद्र मास आणि सौरमास यांचा मेळ असावा म्हणून  दर तीन वर्षानी  एक अधिक मास येतो

( चांद्र व सौरमासाचे वर्ष या दोहोत ११ दिवसाचे अंतर असते, हे अंतर भरुन यावे म्हणून सुमारे ३२ II महिन्यांनी  एक अधिम महिना धरतात )

-------------------------------------------------------------------------------------------
चैत्रापासून  अश्विनपर्यंत जे सात महिने, त्यापैकीच बहुत करुन  एखादा अधिक मास असतो.  क्वचित फाल्गुन देखील येतो. पौष व माघ  हे मात्र कधीच अधिक नसतात. स्थूल मानाने  बत्तीस महिने , १६ दिवस इतका काळ गेल्यानंतर अधिक मास येतो.
एकदा आलेला अधिक मास प्रायः पुनः  १९ वर्षांनी येतो. 

सध्या अधिक भाद्रपद चालू आहे.

---------------------------------------------------------------------------
अधिक मासाची  जन्म कथा ( पौराणीक )

एकदा महातपस्वी  भगवान नारायण  लोककल्याणासाठी तपश्चर्या  करीत बसले असताना नारदमुनी तेथे आले  व म्हणाले , ' हे तपस्वी श्रेष्ठा , दरवर्शी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना का ?  कृपया  या महिन्याची उत्पती कशी झाली  ते सांगावे

तेंव्हा नारायण  म्हणाले,  हे मुनीवर्या, विश्वाचे कल्याण अगर  अकल्याण हे  सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या  प्रमाणावर अवलंबून असते. आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे  ते पाप आपल्याला सहन होत नाही अशी बाराही महिन्यांची केंव्हा पासूनची तक्रार होती.  या पापाचे जड ओझे  बारा महिन्यांच्या पोटात  मावेनासे झाले. त्यामुळे बाराही महिन्यांनी  आपापल्या पोटातील  पापाचा फक्त तिसराच हिस्सा बाहेर काढून टाकला आणि आपला पापभार कमी केला.

 परंतु बाराही महिन्यांनी काढून  टाकलेल्या  त्या पापभागांपासून  तेरावा महिना , म्हणजेच अधिक मास उत्पन्न झाला.  तो पापमय असल्याने त्याला मलिन मास किंवा मलमास असे नाव पडले.  पुढे श्री विष्णुंच्या आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने  तो पवित्र ' पुरषोत्तम मास'  बनला.

या अधिक मासात तीर्थयात्रा, तीर्थ स्नान , दान धर्म , पूजा - अर्चा , जप वगैरे धर्माचरण केल्याने  जीवनाचे सार्थक होते.

श्री सत्यविनायक पूजा



आमचे मित्र  श्री  उदयन यांनी  त्यांच्या मित्रासाठी ' सत्यविनायक पूजेचे ' पुस्तक मिळते का बघायला सांगितले होते. योगायोगाने  मिळाले.

सध्या चालू असलेल्या अधिक भाद्रपद  महिन्यात   ' विनायक चतुर्थी  ( अधिक भाद्रपद शु. ४ ) आणि संकष्टी चतुर्थी ( अधिक भाद्रपद कृ. ४ )  दोन्ही मंगळवारी येत आहे.

  मंगळवार दिनांक  २१ ऑगष्ट  २०१२ (  अधिक भाद्रपद ) -  विनायक चतुर्थी  - अंकारक योग
  मंगळवार दिनांक  ४ सप्टेंबर  २०१२ (  अधिक भाद्रपद ) -  संकष्टी चतुर्थी  - अंकारक योग

यानिमित्याने  ब्लॉगच्या वाचकांना उपयोगी होऊ शकेल म्हणून  हे ' सत्य विनायक ' पूजा पुस्तक देत आहे

पोथी मोठी असल्याने  दोन भागात  ठेवली आहे

भाग १
 https://docs.google.com/open?id=0B5QD3AkyOSlIXy1UT3I0WHcyTEk
भाग २
https://docs.google.com/open?id=0B5QD3AkyOSlIcjhUcUFRZ2sxQ1U

( ज्यांना   सेव्ह फाईल वाचण्यास अडचड येत असल्यास त्यांनी इमेल द्वारे संपर्क करावा, पीडीफ फाईल पाठवली जाईल )


१३ ऑगस्ट, २०१२

१५ ऑगष्ट - शनी - मंगळ युती



शनी   आणि  मंगळाची ( या दोन पापग्रहांची ) युती येत्या १५ ऑगस्टला  ' तुळ ' या राशीत  होत आहे .   ज्यांच्या पत्रिकेत  तुळ रास  ६, ८, १२ व्या स्थानात असेल त्यांनी काळजी घ्यावी
१५ ऑगस्टला दुपारी १२.२४ पर्यंत मिथून रास असून  त्यानंतर  कर्क रास लागेल.
 
 


ज्यांच्या पत्रिकेत ' कन्या' रास  लग्नी  आहे , त्यांच्या कुण्डलीत अष्टमेश  मंगळाची शनी बरोबर युती असून  या  दोघांची अष्टम स्थानावर  वाईट दृष्टी पडते.  त्याच वेळी शनीची  लग्नेश बुधावर  ( कर्क रास ) दहावी दृष्टी पडत आहे  . बुध २८ ऑगस्ट पर्यंत कर्क राशीत आहे. अशावेळी  मुळ रास सुध्दा   मिथून किंवा  कन्या असेल  तर राशी स्वामी म्हणून बुध स्वतः शनीच्या दृष्टीत असेल, अशा लोकांनी काळजी घेणे आवश्यक

तुळ लग्नाच्या कुंडलीत  सप्तमेश  मंगळाची   सप्तमावर, अष्टमावर  दृष्टी  राहील

वृश्चीक लग्न असलेल्या कंडलीत  ' लग्नेश ' , षष्ठेश व्ययात शनी बरोबर  तसेच शनी मंगळाची  षष्ठ स्थानावर दृष्टी हा वाईत  योग घडुन येईल

काळजी घ्या

१२ ऑगस्ट, २०१२

Motivational Quote of the Day

"Until you commit your goals to paper, you have intentions that are seeds without soil."
Author Unknown


पिठोरी व्रतकथा व पूजाविधी



श्रावणातल्या अमावस्येला  'पिठोरी अमावस्या 'म्हणतात.  
दिनांक १७ ऑगस्ट ला अमावस्या आहे.

दिर्घायुषी संतानप्राप्ती साठी या दिवशी विधी केला जातो.( ६४ योगिनींसह श्री लक्ष्मीची पूजा या व्रतात आहे. स्त्रीयांनी करावयाचे हे व्रत आहे )


९ ऑगस्ट, २०१२

श्री स्वामी समर्थ १०८ नामावली

  श्री स्वामी समर्थ १०८  नामावली

   ही नामावली  स्वतः च्या हाताने एका को-या कागदावर लिहिण्यास सुरवात करावी .  लिहित असतानाच काही चांगल्या बातम्या मिळतात. अवश्य अनुभव घेऊन बघा


ॐ   दिगंबराय नमः                   ॐ  वैराग्यांबराय नम :
ॐ  ज्ञानांबराय नमः                  ॐ  स्वानदांबराय नमः
ॐ  अतिदिव्यतेजांबराय नमः    ॐ   काव्यशक्तिप्रदायिने  नमः
ॐ अमृतमंत्रदायिने नमः           ॐ  दिव्यज्ञानादत्ताय नमः
ॐ  दिव्यचक्षुदायिने नमः          ॐ   चित्ताकर्षणाय नमः
ॐ  चित्तशांताय नमः                 ॐ   दिव्यानुसंधानप्रदायिने नमः
ॐ  सद्गुणविवर्धनाय नम :          ॐ  अष्टसिध्दिदायकम नमः
ॐ  भक्तिवैराग्यदत्ताय नमः        ॐ  मुक्तिभुक्तिशक्तिप्रदायने नमः
ॐ  आत्मविज्ञानप्रेरकाय नमः   ॐ  अमृतानंददत्ताय नमः
ॐ  गर्वदहनाय नम :                 ॐ  षङरिपुहरिताय नमः
ॐ  भक्तसंरक्षकाय नम :            ॐ  अनंतकोटिब्रम्हांडप्रमुखाय नमः
ॐ चैतन्यतेजसे नमः                ॐ   श्रीसमर्थयतये नमः
ॐ  आजानुबाहवे नमः               ॐ  आदिगुरवे नम :
ॐ  श्रीपादवल्ल्भाय नमः          ॐ  नृसिंहभानुसरस्वत्ये नमः
ॐ अवधूतदत्तात्रैय नम :            ॐ   चंचलेश्वराय नमः
ॐ  कुरवपुरवासिने  नमः          ॐ  गंधर्वपुरवासिने  नमः
ॐ  गिरनारवासिने नमः           ॐ  श्रीकौशल्यनिवासिने नम:
ॐ  ओंकारवासिने नमः            ॐ  आत्मसूर्याय नमः
ॐ  प्रखरतेजा प्रचतिने नमः      ॐ  अमोघतेजानंदाय नमः
ॐ  तेजोधराय नमः                  ॐ   परमसिध्दयोगेश्वराय नमः
ॐ कृष्णानंद अतिप्रियाय नमः  ॐ  योगिराजेश्वरया नम :
ॐ अकारणकारुण्यमूर्तये नमः  ॐ  चिरंजीवचैत्यन्याय नमः
ॐ स्वनंदकंदस्वामिने नमः      ॐ  स्मर्तृगामिने नमः
ॐ भक्तचिंतामणिश्वराय नमः   ॐ  नित्यचिदानंदाय नमः
ॐ अचिंत्यनिरंजनाय नमः      ॐ   दयानिधये नमः
ॐ  भक्तचिंतामणीश्वराय नमः  ॐ   शरणागतकवचाय नमः
ॐ वेदस्फूर्तिदायिने नमः          ॐ  महामंत्रराजाय नमः
ॐ  अनाहतनादप्रदानाय नमः   ॐ  सुकोमलपादांबुजाय नमः
ॐ  चित्शक्यात्मने नमः         ॐ  अतिस्थिराय नमः
ॐ  माध्यन्हभिक्षाप्रियाय नमः ॐ  प्रेमभिक्षांकिताय नमः
ॐ  योगक्षेमवाहिने नमः           ॐ  भक्तकल्पवृ़क्षाय नमः
ॐ  अनंतशक्तीसूत्रधराय नमः   ॐ  परब्रह्माय नमः
ॐ  अनितृप्तपरमतृप्ताय नमः     ॐ    स्वावलंबनसूत्रदाये नमः
ॐ  बाल्यभावप्रियांय नमः         ॐ भक्तिनिधनाय नमः
ॐ असमर्थसामर्थ्यदायिने नमः  ॐ  योगसिध्ददायकम नमः
ॐ औदुंबरप्रियाय नमः              ॐ  यजसुंकोमतलनुधारकाय नम:
ॐ  त्रिमूर्तिध्वजधारकाय नमः    ॐ चिदाकाशव्याप्ताय नमः
ॐ  केशरचंदनकस्तूरीसुगंधप्रियाय नमः
ॐ साधक संजीवन्यै नमः     ॐ  कुंडलिनीस्फूर्तिदात्रे नमः
ॐ  अक्षरवालाय नमः            ॐ   आनंदवर्धनाय नमः
ॐ  सुखनिधानाय नमः         ॐ  उपमातिते नमः
ॐ   भक्तिसंगीतप्रियाय नमः   ॐ अकारणसिध्दिकृपाकारकाय नमः
ॐ  भवभयभंजनाय नमः       ॐ  स्मितहास्यानंदाय नमः
ॐ संकल्पसिध्दाय नमः         ॐ संकल्पसिध्दिदात्रे नमः

ॐ  सर्वबंधमोक्षदायकाय नमः  ॐ  ज्ञानातीतज्ञानभास्कराय नमः

ॐ श्रीकिर्तीनाममंत्राभ्यों नमः    ॐ अभयवरददायिने नमः

ॐ गुरुलीलामृत धाराय नमः     ॐ गुरुलीलामृतधारकाय नमः

ॐ वज्रसुकोमलहृदयधारिणे नमः ॐ सुविकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः

ॐ निर्विकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः
ॐ  त्रिकालातीतत्रिकालज्ञानिने नमः

ॐ  भावातीतभावसमाधिभ्यों नमः

ॐ  ब्रंह्मातीत - अणुरेणुव्यापकाय नमः

ॐ त्रिगुणातीतसगुणसाकारसुलक्षणाय नमः

ॐ बंधनातीतभक्तिकिरणबंधाय नमः

ॐ  देहातीतसदेहदर्शनदायकाय नमः
ॐ चिंतनातीतसदेहदर्शनदायकाय नमः

ॐ  मौनातीत - उन्मनीभावप्रियाय नमः
ॐ बुध्दयतीतसद् बुध्दिप्रेरकाय नमः
ॐ मत् प्रिय - पितामहसद् गुरुभ्यों नमः

ॐ  पवित्रमात्यसाहेबचरणाविदभ्यो नमः

ॐ अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः

८ ऑगस्ट, २०१२

षष्ठ स्थान - आरोग्य



 पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून  माणसाला होणा-या रोगा संबंधी भाष्य कराता येते. त्या स्थानात जी रास असते , तसेच तिथे जे ग्रह असतात  त्यावरुन  भविष्यातील रोगा संबंधी अनुमान काढता
 येते

रास आणि ती रास दर्शवत असलेला रोग

मेषराशी   -  डोक्याशी संबंधीत रोग  उदा.  डोके दुखणे, झोप न येणे, , मेंदुचे विकार,  इ

वृषभ राशी   - घशाचे विकार , टॉन्सिल  इ, माने संबंधी विकार

मिथुन राशी -   फुप्फुस , श्वास नलिका,  रक्ता संबंधी  विकार,

कर्क रास  -  पचनसंस्था, छाती, स्तन यास्म्बंधीत आजार

सिंह रास -  पाठ , पाठीचा कणा, हृदय विकार यास्म्बंधीचे आजार

कन्या रास -  पोट ,  अपचन , लहान आतडे, मोठे आतडे  यावर या राशीचा अवलंब आहे

तूळ रास - मधुमेह , किडनीचे रोग

वृश्चिक रास - मुळव्याध , गळवे, गुप्त रोग, प्रजननसंस्था, गुदद्वार

धनु राशी  - क्षय रोग,  यकृताचे रोग , रक्त संबंधीत रोग, नितंब , मांड्या

मकर रास -  गुढगे, सांधे दुखी , त्वचा रोग

कुंभ रास - पाय घोटे,  रक्ताभिसरण संबंधीत, पायाचीए हाडे

मीन रास :  शरीरातील पाण्यासंबंधीत रोग, पावलांचे रोग, अस्वच्छतेने होणारे रोग इ


(  महाराष्टाचे लाडके नेते  श्री  विलासराव देशमुख  यांच्या पत्रिकेत  षष्ठ स्थानात तूळ रास असून  ती त्यांची जन्म रास आहे.  नवमांश कुंडलीत  षष्ठ स्थानात  कन्या रास येते . नवमांश षष्ठेश  ' बुध '   मुळ पत्रिकेत ( लग्न कुंडलीत )  व्ययस्थानात  शत्रू राशीत आहे.   तसेच त्यांना  शुक्र महादशा (  षष्ठ स्थानाची )  चालू आहे . गोचरीने शनी  नुकताच तुळ राशीत  आला आहे , राशी स्वामी  शुक्र  जो स्वतः षष्ठेश आहे तो मंगळा बरोबर  मीन राशीत ( उच्चीचा ) आहे  तसेच द्वितीयातील शनीची दहावी दृष्टी  शुक्रा वर आहे . नवमांश कुंडलीत  शुक्र, चंद्र , बुध व्ययात आहेत
श्री विलास रावांच्या  प्रकृतीस लवकर आराम पडो ही सदिच्छा  )

७ ऑगस्ट, २०१२

अपघाताचे योग


अपघाताचे योग

खालील नक्षत्रातून होणारे पापग्रहांचे प्रतियोग  अपघात घडवू शकतात

आर्द्रा  नक्षत्र  ( चरण १ , २ )  -  प्रतियोग  - मुळ नक्षत्र ( चरण ३, ४ )
कृतीका ( चरण २  )  - प्रतियोग  - विशाखा  (  चरण ४ )
कृतीका ( चरण १ )    प्रतियोग  - विशाखा  (  चरण ३ )
मघा ( चरण १,२ )  - पतियोग - धनिष्ठा ( चरण ३, ४ )

खालील  स्थानामधून होणारे पाप ग्रहांचे केंद्र योग  अपघातास कारण होऊ शकतात
लग्न - चतुर्थ       लग्न - दशम    , व्यय - तृतीय


लग्नेश - अष्टमेश  बलहीन

  लग्नेश , अष्टमेश शत्रू राशीत

पाप ग्रहांचे  प्रतियोग, केंद्र योग , युती योग प्रभावी असतात

षडाष्टक योग हे सुध्दा जास्त अपघातदर्शक असतात

रवि  हर्षल, शनी मंगळ , मंगळ नेप. युत्या मुळातच अपघात दर्शक आहेत
 

Motivational Quote of the Day


"Treasure the love you receive above all. It will survive long after your gold and good health have vanished."
Og Mandino


५ ऑगस्ट, २०१२

४ ऑगस्ट, २०१२

नक्षत्र गोचर


जन्मसंपत् विपत् क्षेमः प्रत्यरः साधको वधः
मैत्रं परममैत्रंच जन्म चेति पुनः पुनः


जन्म नक्षत्रापासून  नऊ नक्षत्रांपर्यंत  प्रतेक नक्षत्राला विशेष संज्ञा आहेत .

पहिले  जन्म - उत्पत्तिकारक
दुसरे संपत्  - संपत्तिकारक, धनदायक
तिसरे विपत् -  संकटदायक
चवथे  क्षेम  - शुभकारक
पाचवे प्रत्यर - अत्यंत अशुभ
सहावे साधक - साधकता दर्शक
सातवे वध - मृत्यू अगर वधकारक
आठवे  मैत्र - मित्रता दर्शक
नववे  परममैत्र - परम मित्रतादर्शक

ह्याप्रमाणे दहावे नक्षत्र  परत जन्म , अकरावे संपत्  याप्रमाणे मोजावीत

सत्तावीस नक्षत्रांची  तीन जन्म , तीन संपत्   तीन विपत् याप्रमाणे विभागणी होईल

समजा  एखाद्याचा  जन्म ' शततारका ' नक्षत्रावर झाला असेल तर  याच्यासाठी कोष्टक खालील प्रमाणे असेल

जन्म -  शततारका  , आद्रा , स्वाती     ( राहूची ऩक्षत्रे )
संपत्  - पुर्वा.भाद्रपदा , पुनर्वसु , विशाखा (  गुरुची नक्षत्रे )
विपत् -   उत्तरा. भाद्र. ,  पुष्य , अनुराधा   ( शनीची नक्षत्रे )
 क्षेम  -  रेवती , आश्लेषा  , जेष्ठा    ( बुधाची नक्षत्रे )
प्रत्यर -  अश्विनी, मघा , मूळ  ( केतूची नक्षत्रे  )
साधक -  भरणी , पुर्वा , पुर्वाषाढा  ( शुक्राची नक्षत्रे )
वध -      कृतीका , उत्तरा , उत्तराषाढा ( रवीची नक्षत्रे )
मैत्र -   रोहीणी , हस्त ,  श्रवण  ( चंद्राची नक्षत्रे )
परममैत्र - धनिष्ठा ,  मृग  , चित्रा  (   मंगळाची नक्षत्रे )

गोचरीने शुभ  ग्रह  वरील  नक्षत्रातून जात असताना त्या प्रमाणात फळ मिळते.

विपत, प्रत्यर , वध  -  या नक्षत्रातऊन सर्व साधारण पणे अशुभ ग्रह गोचरीने भ्रमण करताना वाईट फळ मिळू शकते.

२ ऑगस्ट, २०१२

नित्य पाठ - स्वामी अष्टक !


नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ ||
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||
नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||
कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी|
यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यति ||४||
कधी जाई हिमाचली| कधी गिरी अरवली|
कधी नर्मदेच्या काठी| कधी वसे भीमा तटी ||५||
काली माता बोले संगे| बोले कान्याकुमारीही|
अन्नपूर्णा ज्याच्या हाती| दत्तगुरू एक मुखी ||६||
भारताच्या कानोकानी| गेला स्वये चिंतामणी|
सुखी व्हावे सारे जन| तेथे धावे जनार्दन ||७|| 

प्रज्ञापुरी स्थिर झाला| मध्यान्हीच्या रविप्रत |
रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत ||८||


१ ऑगस्ट, २०१२

विनम्र अभिवादन !!!

' सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल '

  ' सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल '

 परदेशी लेखक स्टीफन कावे  यांनी लिहीलेले  हे पुस्तक  अनेकांच्या अयुष्याला कलाटणी देणारं ठरलं असे म्हणतात.  ' बेस्ट सेलर '  बुक असा लौकीक या पुस्तकाने  मिळवला होता.   या स्टीफन कावे  यांचे १८ जुलै ला  निधन झाले.  सकाळ वृत्तपत्रातील ' सप्तरंग' पुरवणीत २८ जुलैला श्री  शंकर बागडे यांनी एक  छान लेख यावर लिहिला होता .  त्यानी या सात सवयींबद्दल लिहिले आहे



१)  पुढाकार घ्या , कृतीशीलतेचे महत्व मोठे आहे

२)  कोणतही कार्य हाती घेण्यापुर्वी  अंतीम साध्या काय हवं , याचा पुर्ण व सखोल अभ्यास करुन तशी खूणगाठ
      मनाशी बांधा

३)  कामांचा अग्रक्रम ठरवा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा

४)  आपला विजय होणारच  असा सकारात्मक विचार मनावर वारंवार बिंबवत रहा

५) आपले विचार, संकल्पना , कल्पनाविष्कार, यांचा तुमच्या ध्यानी - मनी असलेला भाव, त्यांचा अर्थ
इतर लोकांना  त्याच स्वरुपात  आकलन झाला आहे ना  याची खात्री करुन घ्या.

६)  परस्परांमधे योग्य ताळमेळ ठेवा. दुस-याच्या बलस्थानाच उपयोग करा

७) शारीरिक, भावनिक, मानसिक , अध्यात्मिक  पातळीवर तावून - सुलाखून योग्य मार्गाचा अवलंब करा.

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या