८ जून, २००९

परिस्थितीचा गुलाम - ८ ऑफ स्वॉर्ड. कार्ड

आपण बर्‍याचदा जेंव्हा वाईट परिस्थितीत सापडतो आणि त्यावेळेला आपल्या हातात फार कमी पर्याय असतात ( त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ) त्यावेळी ८ ऑफ स्वॉर्ड. हे कार्ड हमखास रिडिंग मधे येते।

' परिस्थितीचा गुलाम होणे ' , स्वातंत्र्य नसणे असा अर्थ ही हे कार्ड सुचवते। चित्रात दाखवल्याप्रमाणे अशी व्यक्ती सर्वबाजूनी बंधनात, हात पाय बांधलेले अशी असते की ती मुक्तपणे स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. अशा परिस्थितीत अगदी लहान सहान गोष्टीत ही मनस्ताप होतो।



solutions are not always easy, but they exist. इच्छाशक्ती असेल तर यातूनही आपण बाहेर येऊ शकतो यासाठी आवश्यक्ता आहे ती अंतीम ध्येय स्पष्ट करण्याची आणि त्यासाठी पहिले पाऊल उचलण्याची.
जाता जाता - कृष्णमुर्ती ज्योतीष पध्दतीत ८ वे स्थान हे मनस्तापाचे स्थान मानले आहे. टॅरो कार्ड मधील ८ नंबरची चारही कार्डे ( ८ ऑफ वॉन्ड, ८ ऑफ कप, ८ ऑफ स्वॉर्ड, ८ ऑफ पेन्टॅकल ) या ना त्या प्रकारे मनस्तापच दर्शवतात.

५ जून, २००९

शिवराज्याभिषेक दिन -

आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्याने
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !!


यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.

शिवराज्याभिषेक दिनाचे डेरवण येथील हे एक सुंदर शिल्प

१ जून, २००९

राणीला ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

आज आपल्या सर्वांची लाडकी '' दख्खनची राणी ' ' ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे।आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या एका समारंभात नेहमी प्रवास करणार्‍या प्रवाशांनी इंजीनाची पुजा करुन आणि केक कापून 'राणीला' शुभेच्छा दिल्या.

आमचे मित्र श्री. अमेय पासलकर यांनी आजच्या समारंभाची काढलेली ही काही चित्रे।

------------------------------------------------------------------------------------


-----------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------- या गाडीची काही वैशिष्ठे

१) भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक प्रतिष्ठीत गाडी
२) पहिले आय। एस. ओ. नामांकन मिळवणारी गाडी
३) खान पान सेवा आणि महिलांसाठी वेगळा डबा देणारी पहिली गाडी
४) पुणे - मुंबई मार्गावरील सर्वात जलद गाडी ( अंतर कापण्यास लागणारा वेळ ३।१५ मिनिटे )


या गाडीचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे मध्य रेल्वेचा एखादा इंजीन ड्रायवर जेंव्हा निवृत्त होणार असतो त्यावेळी त्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्याला ही गाडी चालवण्याचा बहुमान दिला जातो।

अशा या आमच्या लाडक्या राणीला ' वाढदिवसाच्या शुभेच्छा '






२८ मे, २००९

खा. प्रतीक पाटील यांचे अभिनंदन

सांगलीचे नवनिर्वाचित खासदार श्री। प्रतीक पाटील यांना नवीन मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदाचा. बहूमान मिळणार आहे.

त्यांचे हार्दीक अभिनंदन

वसंतदादांचे नातू असलेले श्री. प्रतीक पाटील यांनी दादांनी घालून दिलेल्या विकासाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करावी या त्यांना शुभेच्छा।
एक सांगलीकर म्हणून या घटनेचा विशेष आनंद झाला आहे. मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना २००० साली 'प्रकाश अ‍ॅग्रो ' या कंपनीत प्रोजेक्ट करत असताना श्री प्रतिक पाटलांचा जवळून संबंध आला. त्यावेळी श्री. प्रकाशबाबू पाटील हे त्यांचे वडील खासदार होते. परंतू प्रतीक पाटील यांची साधी रहाणी विशेष लक्षात येत होती. सांगलवाडी सारख्या ठिकाणी उभारलेले या प्रकाश अ‍ॅग्रो प्रकल्पात मँगो पल्प, आणि इअतर फळांचे पल्प तयार करत असत. अत्याधुनीक मशीनरींनी , नवीन टेक्नॉलॉजी उभी करण्यात संचालक म्हणुन प्रतीक पाटील यांची दुरद्रुष्टी दिसून येत होती. या निमित्याने या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. परत एकदा प्रतीक पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.


शुभेच्छुक
अमोल केळकर
साखर कारखाना, सांगली
९८१९८३०७७०

२५ मे, २००९

जागतीक टॅरो दिवस



२५ मे हा दिवस जगभर जागतीक टॅरो दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील असंख्य टॅरो संस्था हा दिवस उत्साहात साजरा करतात. यानिमित्याने चर्चासत्रे आयोजीत केली जातात.
हा दिवस साजरा करण्याची काही प्रमुख उद्दिष्टे -

1) To promote Tarot's use beyond any public conception of it as 'evil' or Satanic.
2) To promote Tarot uses in honest manner with integrity.
3) To promote the use of Tarot in responsible manner beyond both use as an unsavory monetary "fortune-telling" scheme, as well as use as a crutch by those unwilling to take responsibility for their own future and/or behavior.
4) To promote Tarot use as a tool for self-examination, spirituality, and other self-aide methods of guidance.
5) To have at least one day to celebrate, share, and stimulate our love of the Tarot tool with each other, and to think about what we can 'give' to instead of what we can 'take' from the Tarot Community.

आपल्या कडे मात्र अजून या पध्दतीचा फारसा वापर केला जात नाही. या विषयी काम करणार्‍या संस्था ही फार थोड्या आहेत. तसेच त्या फारशा संघटीत नाहीत. मात्र भारतात टॅरो कार्ड रिडिंग घेणारे खुप जण आहेत. या निमित्याने या सर्वांनी एकत्र येऊन , एकमेकांचे अनुभव शेअर करुन , टॅरो कार्ड पध्दत अधिक लोकप्रिय, अधिक अचुक कशी करता येईल हे पहाणे आवश्यक आके.
मी स्वतः टॅरो कार्ड संबंधीत काम करणार्‍या कुठल्याही संस्थेचा सदस्य नाही. टॅरो कार्ड रिडिंग नियमीत घेणारे किती मराठी लोकं आहेत याची ही कल्पना नाही.
टेरो कार्ड रिडिंग घेणारे / टेरो कार्ड संबंधी संस्थेत काम करणारे कोणी हा ब्लॉग वाचत असतील तर मला जरुर संपर्क करावा. या विषयात काही भरीव काम करायला मला नक्कीच आवडेल. .


जागतीक टॅरो दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा।!!

१ मे, २००९

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !!




गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरीठसो।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

१ एप्रिल, २००९

टॅरो कार्ड - धाडसीपणा

टॅऱो कार्ड मध्ये फूल नावाचे एक कार्ड आहे. फूल याचा अर्थ आपणा सर्वांस माहित आहे.
१ एप्रिल ह्या दिवशी आपण एकमेकांना फसवतो. आजच्या या एप्रिल फूल निमित्याने टॅरो कार्ड मधील फूल या एका महत्त्वाच्या कार्डा विषयी माहिती।


फूल म्हणजे मुर्खपणा असा जरी अर्थ आपणास अपेक्षित असला तरी टॅरो कार्ड मधे याचा अर्थ धाडसीपणा ( अविचाराने , कमी माहिती असताना केलेला धाडसीपणा ) असा घेतला जातो.
हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा प्रश्नकर्ता एकादी कृती अविचाराने करण्याची शक्यता असते.
असे म्हणले जाते की हा तरुण जीवनाच्या प्रवासास निघालेला आहे (न्युमरिक वॅल्यू म्हणूनच या कार्डाची शुन्य आहे ) त्यामुळे हे कार्ड रिडिंग मधे आल्यास नवीन गोष्टींची सुरवात होणे असे ही हे कार्ड दर्शवते। अतीधाडसी वृती ( एक पाउल जरी पुढे पडले तरी कडेलोट होणे ) , स्वच्छंदीपणा असे इतर काही गुण हे कार्ड दर्शवते.

२७ मार्च, २००९

८ मार्च, २००९

जागतिक महिला दिन.

८ मार्च जागतिक महिला दिन.
यानिमित्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या सावित्रीबाई फुले , मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेधा पाटकर, किरण बेदी यांना प्रणाम



५ मार्च, २००९

प्रतिसादा बद्दल धन्यवाद

'भविष्याच्या अंतरंगात ' या माझ्या ब्लॉगवर प्रकाशीत केलेल्या
भविष्य शास्त्रावर तुमचा विश्वास आहे का? या कौलाला २०० पेक्षा अधीक जणांनी आपले मत नोंदवून आपला सहभाग दर्शवला.


या सर्वांचे तसेच प्रतिसाद / मत न देणार्‍यांचे ही मनापासून आभार

आपला
अमोल केळकर

२२ फेब्रुवारी, २००९

७ ऑफ पेन्टॅकल कार्ड-संयमाची जोपासना

ह.अ भावे यांच्या व्यक्तिमत्त्व आणि विकास या लेखमालेतून साभार-
संयमाची जोपासना -



काळ जरी कठीण असला तरी ईश्वरनिर्मीत या जगात प्रतीक प्रश्नाला उत्तर असतेच.
या कठिण काळावरही इलाज आहे. आणि तो इलाज खात्रीचा आहे. मानवाच्या इतिहासात असे कठीण काळ अनेक वेळा आले.
यावर उपाययोयना फार पुर्वीच सुचवली गेली आहे.ही उपाययोयना अनेक पुस्तकांत सापशेल. ती उपाययोजना बायबल मधे आहे,
ग्रंथसाहेबात आहे, वेद -उपनिषदात आहे, भगवद्दगितेत आहे. हे उपाय कालातीत व सार्वत्रिक आहेत. हे उपाय शेकडो वर्षे साठवले गेलेल्या
शहाणपणातून लिहिले गेले आहेत. परिस्थिती प्रत्तेक काळात वेगवेगळी असली तरीही हे उपाय चिरस्थायी आहेत.श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म्योगाचा
उपदेश केला, त्या उपदेशाचा उपयोग अर्जुनाला झाला, त्याप्रमाणे आजपर्यंतच्या पिढीलाही झाला. लोकमान्य टिळकांना गीतेत कर्मयोग सापडला.
शेकडो पिढ्या बदलल्या तरीही भगवदगीतेचे दीपगृह लोकांना प्रकाश दाखवतच आहे.
अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता त्या वेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला दुस-य़ा अध्यायात विचारले,’बुध्दी स्थिर झालेला स्थितप्रण्य कसा असतो? कसा राहतो?
कसा बोलतो? यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दुस-या अध्यायात पंचान्नव्या श्लोकापासून बहात्तराव्या श्लोकापर्यंत उत्तर दिले आहे.
या सर्व उत्तरात संयम कसा पाळावा, आपल्या आत्म्यावर विजय कसा मिळवावा, हेच सांगितले आहे. माणसामध्ये जो आत्मा असतो, ते परमात्म्याचेच प्रतिबिंब असते
माणसाचे शरीर नष्ट पावते पण कपडे बदलावे त्याप्रमाणे आत्मा दुसरे शरीर धारण करतो.
स्थितप्रद्न्य आणि संयमी माणूसच आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य प्रस्थापित करु शकतो. म्हंणूनच मानवी जीवनामध्ये स्थितप्रद्न्येला आणि संयमाला फार महत्व आहे.
संयम धोरण म्हणून स्विकारा




संयम या एका शब्दात शांतता, सहनशीलता, आध्यात्मिकता , श्रध्दा इत्यादी अनेक शब्द भरलेले आहेत. संयम हा शब्द रत्नासारखा आहे. संयम पाळल्याने तुम्हाला
अनेक गुण बाळगता येतील. तुमचं स्वत:चं जगण्याचं तत्वद्न्यान त्यातून तयार होईल. सध्याचा काळ गोंगाटाचा व गोंधळाचा आहे. त्यातून ज्याला प्रगती करुन घ्यायची
आहे त्याला संयमाशिवाय तरणोपाय नाही.
संयम हा शब्द तुमच्या जीवनात मुरला पाहिजे, संयम हे तुम्ही धोरण म्हणून स्वीकारले पाहिजे. तरच सध्याच्या कठीण काळात तुम्हाला सुखाने जगता येईल.
तुम्ही आजचा दिवस उत्तम घालवा म्हणजे तुमचे आयुष्य सुखात जाईल. ’आजचा दिवस चांगल्या प्रकारे घालवा’ हा संदेश गौतम बुध्दाने दिला होता
बुध्दाने सांगितले होते, की ’या जगात आज दिसणारे निसर्गसौंदर्य, मैत्री भावन्न, उदात्त विचार, स्फूर्ती या जीवनातील अमोल गोष्टी आहेत.’उद्याची काळजी न करता
आजचा दिवस सुंदर जगा हीच शिकवण सर्व धर्मांनी दिली आहे. उद्याची चिंता परमेश्वरावर सोडा
.

१४ फेब्रुवारी, २००९

टॅरोट कार्ड नं ६ - लव कार्ड

दाटून आलेल्या संध्याकाळी

अवचित ऊन पडतं

तसंच काहीसं पाऊल न वाजवता

आपल्या आयुष्यात प्रेम येतं - सुधीर मोघे



१४ फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन दिवस . - प्रेमाचा उत्सव

आपल्याकडे ही अजाकाल हा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. बर्‍याच कॉलेजात रोझ डे, चॉकलेट डे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम केले जातात. याच वेळी काही विद्यार्थी संघटना विरोध करतात. प्रेमाच्या संदेशाने बाजार सजतो, नटतो, गुलाबी रंगाने वातावरण भरुन जाते।



असो
टॅरो कार्डात एक मेजर कार्ड ( नंबर ६ ) लव कार्ड म्हणून आहे.
हे कार्ड अर्थात रिलेशनशीप बद्दल आहे.
प्रेम प्रकरण, लग्न , नवीन मैत्री यासंबंधी प्रश्नाबाबत हे कार्ड रिडिंग मधे हमखास सापडतेच.


जाता जाता या जागतीक प्रेम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

९ फेब्रुवारी, २००९

कार्तिकीचे अभिनंदन !!!

माहेराहुनि गलबत आले
मला सखीचे स्वप्न जडे;
हृदयामधल्या गुपितामध्ये
निशिगंधाचे फूल पडे!
अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे
शब्द परतले घरोघरी;
जडबंधाच्या मिठीत रुसली
चैतन्याची खुळी परी...
या वाटेवर रघुपति आहे
त्या वाटेवर शिळा;
सांग साजणी कुठे ठेवु मी
तुझा उमलता गळा?

सारेगम लेटीलचॅम्प स्पर्धेत अंतीम फेरीत विजयी ठरलेल्या कार्तिकी गायकवाड हिचे अभिनंदन.
भविष्यातील तिच्या संगीत कारकिर्दीस अनेक शुभेच्छा !!!!
ही तिच्या आयुष्यातील एक नवी सुरवात आहे ( एस ऑफ वॉन्ड ) . या स्पर्धेने तिला एक चांगली सुरवात मिळवून दिली आहे.
अजुन बराच मोठा पल्ला गाठायचा आहे। माउलीचे आशीर्वाद तिच्या पाठी सतत राहोत.




३ फेब्रुवारी, २००९

१० ऑफ कप टॅरो कार्ड -

या टॅरो कार्डाचा अर्थ आहे कौटूंबीक आनंदाचे वातावरण, उत्साह असा आहे.
यासंबंधी वपुर्झातील हा उतारा वाचण्यासारखा आहे.

जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.
आयुष्य एक सतारीसारखं वाद्य आहे.
ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करुन घेणं, हाच धर्म.
तो धर्म समजला तर छोट्या बीजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो.
त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात.पैशाशिवाय. पक्ष्यांचं धन वेगळंच असतं.
गाणं हेच त्यांचं आयुष्यभरचं कार्य.
पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात.
स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा,
एक तरी पक्ष्याची हाऊसिंग सोसायटी आहे का ?
तसं असतं तर झाडाझाडांवर राजीव, संजय, इंदिरा नावाच्या
अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या.
बघा, असं होतं. 'पक्ष्यांचा' हा शब्द वापरल्याबरोबर मी भरकटले.'पाखरु' म्हणायला हवं होतं
पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी,
पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की
घर आपण होऊन काटक्या टाकतं.
म्हणून झाडंही नोटिसा पाठवत नाहीत.
मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षा करुन
आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं
सृष्टीतलं हे नातं ओळखता आलं, की सतार
योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.
- व.पु. काळे

२२ जानेवारी, २००९

मॅट्रीक्स सिनेमा आणि टॅरो कार्ड

कालच एक व्हिडिओ पहाण्यात आला. तो इथे देत आहे. आपल्या पैकी बर्‍याच जणांनी हा सिनेमा पाहिला असेल. यातील काही प्रसंग, व्यक्तीरेखा घेऊन टॅरो कार्डातील २२ महत्त्वाची/ मेजर कार्डस समजावून सांगितली आहेत.
अगदी चफखल पणे प्रतेक कार्ड आणि प्रसंग गुंफला आहे. आपल्याला ही हा व्हिडिओ नक्की आवडेल.




पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या