८ जुलै, २०१०

' ऑक्टोपसच्या अंतरंगात'

सध्या मी माझ्या ब्लॉगचे नाव 'भविष्याच्या अंतरंगात ' बदलण्याचा विचार करत आहे. ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' किंवा असेच काहीसे . आपणास आणखी काही सुचत असल्यास कृपया कळवावे।


सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे। स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत. यात पॉल ज्या टॅक मधे अस्तो तेथे त्याच्या खाद्याचे दोन बॉक्स सोडण्यात येतात . एका बॉक्सवर जर्मनीचा झेंडा तर दुसर्‍या बॉक्स वर जर्मनी विरुध्द संघाचा झेंडा लावण्यात येतो. ऑक्टपस ज्या बॉक्स मधला खाऊ खाईल तो संघ सामना जिंकेल असे अनुमान काढण्यात आले. आणि त्याचप्रमाणे घडले।




चला आता ऑक्टोपस बाजारात कुठे मिळतो ते पाहतो. माझ्या ब्लॅगचे नाव ' भविष्याच्या अंतरंगात ' बदलून ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' ठेवतो. ऑक्टोपसचा एक नवा वॉलपेपर घरातील भिंतीवर लावुन ठेवावा लागेल आता. तसेच जहिरातीची ' ऑक्टोपस कन्सल्टन्सी ' या नवीन नावने ५०० पत्रक छापतो. भविष्य पाहून घेणार्‍या पहिल्या १० जणांना ऑक्टोपसची छोटी मुर्ती किंवा गळ्यातला ताईत सप्रेम भेट मिळेल. ऑफर वल्ड कप संपेपर्यंत मर्यादित.

२४ जून, २०१०

म्हैस आणि टाईम्स

महाराष्ट्र टाईम्स मधे ( रविवार १३ जून २००९ ) रोजी माझे चुलत अजोबा श्री दामुअण्णा केळकर यांच्याबद्दलच्या आठवणी श्री। सुभाष भेंडे यांनी लिहिल्या होत्या. तो लेख इथे देत आहे. आम्ही लहान असतानाच अजोबांचे निधन झाले. त्यांच्याशी निगडीत आठवणी तशा नाहीतच. मात्र त्यांची मुर्ती अजुनही डोळ्यासमोर आहे. या लेखाच्या निमित्याने त्यांच्या संबंधीत हा लेख माझ्या ब्लॉगवर चढवून त्यांना आदरांजली !

अमोल

-----------------------------------------------------------------------------------------

केळकर सरांचं घर त्या व्यायामशाळेजवळ होतं. तास संपवून ते घरी जायचे आणि डोकीवरला रूमाल काढून कोट घरी ठेवून व्यायामशाळेजवळ घोटाळायचे. उघडेबोडके, धोतराचा काचा मारलेला. उजव्या हातात एक काठी आणि डाव्या हातात 'टाइम्स ऑफ इंडिया'! कुरणावर दोन म्हशी शांतपणे चरत असलेल्या... ... वयाची नऊ ते सोळा वर्ष सांगलीच्या 'सिटी हायस्कूल'मध्ये होतो. माणसाच्या आयुष्यातली ही महत्त्वाची वर्षं! या वयात मिळणाऱ्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरते. ओल्या मातीला या काळात आकार दिला जातो. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण याच कोवळ्या वयात होते. अनेक शिक्षक वेगवेगळे विषय शिकवत असतात. प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी, वेशभूषा वेगळी, बोलण्या-चालण्याची लकब वेगळी! पण या सगळ्यांत मला प्रकर्षानं आठवतात, ते दामुअण्णा केळकर सर! वेष अगदी साधा! पांढरा सुती सदरा, त्यावर निळा कोट, दुरांगी धोतर आणि डोईला गुंडाळलेला रूमाल. पायात कोल्हापुरी वहाणा।
आम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे आवाजाचा प्रतिध्वनी कसा उमटतो हे शिकवताना त्यांनी प्रश्न केला, 'गोलघुमट कुणी पाहिलाय का?' मी उभा राहिलो. 'मी पाहिलाय सर।' '
शाबास! विजापूरला जाऊन पाहिलास की, चित्रात?' 'चित्रात नव्हे. मी विजापूरला गेलो होतो एकदा आईबाबांच्या बरोबर,' मी छाती फुगवून सांगितलं. सर्व मुलं थक्क! जणू विजापूर म्हणजे पॅरिस, रोम! '
तिथं भिंतीला तोंड लावून कुजबुजलास की नाही?' 'हो तर! घुमटाच्या एका बाजूला भिंतीला तोंड लावून कुजबुजलो. खूपच दूर दुसऱ्या बाजूला बहिणीनं भिंतीला कान लावला होता. तिला सगळं स्पष्ट ऐकूआलं. मग ती कुजबुजली आणि मी स्पष्ट ऐकलं.' 'शाबास! ध्वनी-प्रतिध्वनीचे हे उत्तम उदाहरण आहे,' त्यांनी विषय पुढं शिकवला।
दोन दिवसांनी आमचा इंग्रजीचा वर्ग चालू होता. शिपायानं येऊन सांगितलं, 'पलिकडच्या वर्गात केळकर सर तुला बोलवताहेत.' मी भीत भीत त्या वर्गात शिरलो. केळकर सर त्या तुकडीत ध्वनी-प्रतिध्वनीचा विषय शिकवत होते. आमच्या वर्गात गोलघुमटाविषयी जी प्रश्नोत्तरं झाली तीच पुन्हा त्या वर्गात झाली! आणि पुढल्या आठवड्यात तिसऱ्या तुकडीत तीच प्रश्नोत्तरं! गोलघुमटावरची अधिकारी व्यक्ती म्हणून माझी शाळेत ख्याती झाली. केळकर सरांना केवळ भौतिकशास्त्र येत होतं, असं नव्हे. कोणताही विषय त्यांना र्वज्य नव्हता. कधी एखाद्या विषयाचे शिक्षक गैरहजर असत. कॉलेजमधले प्राध्यापक गैरहजर असले की, मुलं बाहेर उंडारायला मोकळी! शाळेत ते नाही चालत. ऑफ पिरियडला दुसरे शिक्षक येत. मुलांना कथा सांगत, गाण्याच्या भेंड्या घेत. कधी येताना साठ-सत्तर पुस्तकंं आणत. मुलांना चाळीस-पंचेचाळीस मिनिटं ती वाचायला मिळत. मात्र केळकर सर आले की मुलांना प्रश्न करीत, 'कसला तास आहे?' 'जॉमेट्रीचा,' कुणीतरी सांगे. 'कोणते प्रमेय शिकता आहात?' 'पायथॅगोरसचं.' 'असं? मग वह्या उघडा. ते प्रमेय आपण नीट समजावून घेऊ. तर त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज...' आणि मग घंटा होईपर्यंत पायथॅगोरसचा सिद्धांत! कधी मराठीचा तास ऑफ असायचा. केळकर सर आले की, मनात यायचं, 'हे सायन्सचे सर. एकवेळ त्यांना अल्जेब्रा-जॉमेट्री येईल. भाषा विषय कसा येणार?' पण त्यांनी मराठीच्या तासाला केशवसुतांची 'झपुर्झा' उत्तम शिकवली. 'कंटकशल्ये बेथटरी! मखमालीचा लव उठवली! काय म्हणावे या स्थितीला।. झपुर्झा, गडे झपुर्झा।' ते इतके रंगून गेले होते की, आमच्या अंगावर काटा आला. केशवसुतांच्या बाकीच्या कविता सहज म्हटल्या त्यांनी. संपूर्ण केशवसुत मुखोद्गत होता त्यांना. संस्कृतच्या पिरियडला त्यांनी कालिदासाचं 'शांकुतल' शिकवलं, इतकं तन्मय होऊन की, 'हरिणशावकानं शकुंतलेच्या पदराचं टोक तोंडात धरलं, तेव्हा शकंुतला हळुवारपणे तक्रार करू लागली. कशाला माझ्या पदराला बिलगतंय?' हे वाक्य उच्चारताना सरांनी कोटाचं टोक ओढून धरीत मागं नजर टाकली! प्रत्यक्ष शकुंतलेला तरी इतका हळुवार आविर्भाव जमला असता की, नाही कोण जाणे!
आम्हाला आठवड्यातून दोनदा शारीरिक शिक्षणाचा तास असायचा. शाळेपासून पाचसहा मिनिटांच्या अंतरावर व्यायामशाळा होती. तिथं नातू सर सिंगलबार, डबलबार, मल्लखांब, कुस्ती शिकवायचे. कवायती घ्यायचे. केळकर सरांचं घर त्या व्यायामशाळेजवळ होतं. तास संपवून ते घरी जायचे आणि डोकीवरला रूमाल काढून कोट घरी ठेवून व्यायामशाळेजवळ घोटाळायचे. उघडेबोडके, धोतराचा काचा मारलेला. उजव्या हातात एक काठी आणि डाव्या हातात 'टाइम्स ऑफ इंडिया'! कुरणावर दोन म्हशी शांतपणे चरत असलेल्या. टाइम्स वाचता वाचता केळकर सर म्हशींवर लक्ष ठेवून असायचे! त्या बिचाऱ्या त्यांच्या शिस्तीत वाढलेल्या. इकडे तिकडे न भरकटता संथपणे कोवळं गवत फस्त करायच्या. सरांचा टाइम्स वाचून झाला की, म्हशी घराकडे कूच करायच्या. सर चहा-कॉफी घेत नसत. पहाटे उठून स्वत: म्हशीच्या धारा काढत. जोर-बैठका झाल्यावर धारोष्ण दूध पीत. शरीर गोटीबंद. सिंगलबार, मल्लखांब सहज येता जाता करायचे. पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर यायचा. उसळणाऱ्या पाण्यात पुलावरून उड्या मारणं, हा सांगलीकरांचा आवडता छंद. मुलांची, तरुणांची अमाप गदीर्! गदीर्च्या अग्रभागी केळकर सर धोतराला काचा मारून उघड्या अंगानं तासन्तास पोहत राहायचे. माझ्यासारखी भित्री मुलं काठावरून मजा पाहत उभी राहिली की, ते ओरडायचे, 'नुसते बघत काय राहिलात! काढा कपडे आणि मारा उड्या!' आम्हाला तेवढं धैर्य कुठं? आम्ही हळूच तिथून काढता पाय घ्यायचो!
सांगली सोडूनमी पुण्याला आलो. सात-आठ वर्षांनी अचानक केळकर सर भेटले. मुंबईला गेलो होतो. पुण्याचा रेल्वेचा पूल ओलांडताना समोरून सर येताना दिसले. हातात भली मोठी पत्र्याची ट्रंक, पण ती सहज पेलत चालले होते. 'कुठं निघालात सर?' 'सांगलीला, तुझं कसं चाललंय?'
'उत्तम. मुंबईला गेलो होतो।' '
सामान दिसत नाही।' '
कुलीकडे दिलंय' छोटी सुटकेस घेऊन येणाऱ्या हमालाकडे अंगुलीनिदेर्श करत मी म्हटलं। '
कुलीकडे का? वा छान!' हातातली अवजड ट्रंक सावरीत ते निघून गेले।
मी मुकाट्याने कुलीमागून धावू लागलो. बराचसा शरमिंदा होऊन!
बऱ्याच वर्षांनंतर सांगलीला गेलो होतो. केळकर सर आजारी असल्याचं कळलं, म्हणून मुद्दाम त्यांना भेटायला गेलो. पडल्या पडल्या ते जी. एं. च्या कथा वाचत होते. पाचदहा मिनिटं गप्पा झाल्यावर त्यांनी विचारलं, अजून हमालाकडे बॅग देतोस की स्वत: उचलतोस?'
'त्या दिवसापासून स्वत:च।'
'ठीक ठीक! स्वत:चं काम स्वत: करावं।
अरे, अब्राहम लिंकन अमेरिकेचा अध्यक्ष झाला, तरी स्वत:चे बूट स्वत: पॉलिश करायचा'
तीच त्यांची अखेरची भेट...

------------------------------------------------------------------------------------------

१२ जून, २०१०

४ जून, २०१०

२७ ऑगस्ट २०१०

एका पुढे ढकललेल्या इ पत्रातून ही माहिती मिळाली आहे। २७ ऑगस्ट २०१० ला मंगळ हा पृथ्वीच्या अतीशय जवळ येणार आहे. त्यादिवशी पहाटे १२.३० वा ( म्हणजे बहुतेक २६ ऑगस्ट ला रात्री) चंद्र आणि मंगळ आकाशात खूप जवळ दिसतील. मंगळाचा आकार एवढा मोठा असेल की जणू दोन चंद्र आकाशात आहेत असा भास होईल।


खगोल शास्त्रज्ञ ( जाणकार ) यावर अधिक भाष्य करु शकतील.
पावसाळ्याच्या या दिवसात आकाश निरभ्र रहाण्याची शक्यता कमी असताना बघु या हा निसर्गाचा अनोखा अविष्कार आपल्याला पहायला मिळतो का ते?


अमोल केळकर

२९ एप्रिल, २०१०

ज्योतिष हे शास्त्रच, बंदी अशक्य!

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी ( दुवा पाहण्यासाठी इथे टिचकी मारा )
------------------------------------------------------------------------------------------------

ज्योतिष हे प्राचीन 'शास्त्र' असून त्यावर बंदी घालता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने मुंबई हायकोर्टात एका प्रतिज्ञापत्राद्वारे घेतली आहे. जनहित मंचचे भगवानजी रैय्यानी यांनी जनहित याचिका केली असून त्यांनी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व काही अंधश्रद्धांविरोधात दाद मागून 'ड्रग व मॅजिक अॅक्ट, १९५४' या अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर केंदीय ड्रग कंट्रोलर डॉ. पी. रामकृष्ण यांनी प्रतिज्ञापत्र करून त्यात ज्योतिषशास्त्र हे चार हजार वषेर् जुने शास्त्र असून त्यावर बंदी घालणे गैर व अनुचित असल्याचा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टानेही घटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेत हतक्षेप करता येत नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय 'ड्रग आणि मॅजिक रेमेडिज अॅक्ट'मध्ये ज्योतिषशास्त्र येत नाही, असे म्हटले आहे. हा कायदा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना लागू आह, असे स्पष्ट केले आहे. 'हे स्युडो सायन्स' याबाबत रैयानी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालात ज्योतिषशास्त्र हे 'स्युडो सायन्स' (फसवे शास्त्र) असल्याचे म्हटले असल्याचा दावा केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील काही विद्यापीठांमध्ये ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम सुरु करण्याचा विचार व्यक्त केला होता, त्याला डॉ. भार्गव यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाकडे आव्हान दिले. ती याचिका फेटाळली होती. त्याविरोधात ते सुप्रीम कोर्टात गेलेे. तेथे कोर्टाने आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्याचे व अद्याप निर्णय झालेला नसल्याने याचिका अपरिपक्व असल्याचे नमूद करीत याचिका निकाली काढली होती.

२४ एप्रिल, २०१०

सचिनला शुभेच्छा !!

आपल्या लाडक्या सचिनला ३७ व्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!

आयपीलचा अंतीम सामन्यात त्याला खेळता यावे हीच सदिच्छा !!


अमोल

२४ मार्च, २०१०

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !!



”दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा
पुरतो मारूतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्।

२७ फेब्रुवारी, २०१०

माझ्याही शुभेच्छा -

२७ फेब्रुवारी - 'मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ' जेवढे शक्य असेल तेवढे आपण एकमेकांशी ( मराठी माणसाशी ) मराठीतून बोलू , मराठीतून पत्रव्यवहार करु आणि मराठी भाषा समृध्द करण्याचा प्रयत्न करु !!

आपला
अमोल केळकर
नवी मुंबई, बेलापूर

२३ फेब्रुवारी, २०१०

आजचे कार्ड - ७ ऑफ पेन्टॅकल

पेन्टॅकल सूट हा पृथ्वी तत्त्वाचा आहे. ७ ऑफ पेन्टॅकल हे कार्ड आपल्याला सध्याच्या परिस्थितीचा परत अंदाज घ्यावा असे सुचवते. काही वेळा एकादी गोष्ट घडवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले असतात . मात्र त्याचे रिझल्ट्स , फळे अजूनही मिळाली नसतात. अशावेळी जेंव्हा हे कार्ड रिडिंग मधे येते त्यावेळेला संयम राखा योग्य वेळ आल्यावर काम घडेल . ती घटना घडण्याची अजून वेळ आलेली नाही असे सुचवते .थोडक्यात 'इंतजार का फल मिठा होता है ' असेच काही से.
चित्रात दाखवलेला शेतकर्‍याने पिक येण्यासाठी आवश्यक ते सर्व काम केले आहे. आता फक्त वाट बघणे एवढेच त्याच्या हातात आहे आणि तो तेच करत आहे.
काही वेळा अशा वेळी फारच निराश वाटते. प्राप्तपरिस्थितीत सारासार विचार करुन दुसर्‍या मार्गाचा अवलंब करणे शक्य आहे का ? हे बघावे असे ही हे कार्ड सुचवते.नेहमीच्या जीवन पध्दतीत आपणाला आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. हे कार्ड रिडिंग मधे आल्यास आपण थोडा आपणासाठी वेळ काढावा. चालू रुटीनमधे काही बदल करता येईल का हे पहावे. नोकरीत बदल, नवीन व्यवसाय, बदली, नवीन गाव या सारखे चाकोरीबाहेरचे निर्णय घेता येतील का ? असा विचार करायला लावणारे हे कार्ड आहे.

२० फेब्रुवारी, २०१०

आजचे कार्ड - ९ ऑफ कप

टॅऱो कार्ड मधे कप सूट हा भाव -भावना, मन , रिलेशन याचे प्रतीक आहे. अर्थातच कप सूट हा जलतत्वाचा सूट मानला जातो. अ‍ॅस्ट्रोलोजिकली मीन राशीतील गुरुचा या कार्डावर अधिक प्रभाव आहे.
या कार्डाला विश कार्ड ( इच्छा पुर्ण करणारे कार्ड ) असे म्हणतात. टॅरो कार्ड डेकमधील हे सुध्दा एक चांगले कार्ड आहे. जातकाच्या इच्छापुर्तीचे कार्ड आहे असे म्हणल्यास वावगे ठरु नये. साधारणपणे विवाह, संतती आणि रिलेशन, भावनिकतेसंबंधीचा प्रश्न असता हे कार्ड रिडिंग मधे येते आणि अशावेळी जातकाच्या प्रश्नाच्या दृष्टीने होकारार्थी उत्तर येते. समाधानी, तृप्त, आनंदी व्यक्तीमत्वाचा माणूस या कार्डावर दाखवून एक प्रकारे मिळणार्‍या उत्तराचा परिणामच दर्शवला आहे.

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या