३० ऑगस्ट, २०११

गणपती बाप्पा मोरया !!!



या ब्लॉगचे सर्व वाचक, मित्रमंडळी, स्नेही सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा !!!

आपल्या सर्वांचे इच्छित ध्येय प्राप्त होऊन, सर्वांचे कल्याण होवो हीच 'लालबागच्या राजा चरणी ' प्रार्थना

लालबागच्या राजाचा विजय असो !!!




चित्र - महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ

१८ ऑगस्ट, २०११

अंतीम सामना


टिम इंडीयाने खरे म्हणजे
टिम अण्णांपासून शिकावे
प्रबळ इच्छाशक्तीने
साहेबांशी नडावे
सचिननेही सहजतेने
शंभरावे शतक करावे
पण काहीही असो सर्वांनी
पाचही दिवस खेळावे


ओवल वरील आजपासून सुरु होणार्‍या भारत इंग्लन्ड यांच्यातील अंतीम कसोटी सामन्यास भारतीय संघास शुभेच्छा



अमोल केळकर
१८ ऑगस्ट २०११






१७ ऑगस्ट, २०११

संकष्ट चतुर्थी - १७ ऑगस्ट २०११

आज संकष्ट चतुर्थी , चंद्रोदय रात्री ९.वा ४ मिनिटे.



दर्शन घेऊयात अंजर्ल्याच्या प्रसिध्द गणपतीचे



मोरया !!!


६ ऑगस्ट, २०११

श्रीसमर्थ रामदासकृतं मारुतीस्तोत्र

श्रीगणेशाय नमः।


कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।

बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥

ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।

पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥

त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।

त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥

मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।

कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥

आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।

फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥

आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।

धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥

॥ श्रीसमर्थ रामदासकृतं मारुतीस्तोत्रं संपूर्णम्॥

४ ऑगस्ट, २०११

बत्तीस शिराळा - नागपंचमी उत्सव


सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील हे खेडे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिध्द होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पध्द्ती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील एक वैशिष्ठपुर्ण उत्सवाची पार रया गेली आहे.

पुणे - बेंगलोर महामार्गावर कोल्हापुर कडे जाताना, पेठ नाका ( इस्लामपुर ) पासुन उजव्या बाजुला एक फाटा फुटतो. इथुन साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गाने समृध्द आहे. बत्तीस शिराळ्या पासुन जवळच चांदोली अभयआरण्य, चांदोली धरण आहे. अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेले हे बत्तीस शिराळा गाव.

जेंव्हा पुर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेंव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत असत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेउन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहिम फत्ते करत असे.. पकडलेल्या नाग, साप, धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई
नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पुजा करुन साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणुक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजीत केले जात. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळाना बक्षिसे देत असत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरीक येत असत. यातील आणखी एक वैशिष्ठ म्हणजे २ वर्षाच्या बालाकापासुन ते म्हातार्‍या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालुन फोटो काठत असत
शिराळ्याची नागपंचमी पुर्वी देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पुर्वी लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली. त्यामुळे काही वर्षांपासुन इथे आता प्रतिकात्मक मिरवणुक काढली जाते.

१ ऑगस्ट, २०११

श्रीक्षेत्र हरिपूर - सांगली

ॐ नमः शिवाय मंत्र ऐकण्यासाठी इथे टिचकी मारावी


आज श्रावणातला पहिला सोमवार . श्रावणी सोमवार म्हणले की आवर्जून लक्षात रहाते ती हरिपूरची जत्रा. सांगली पासून हाकेच्या ( ३ - ४ किमी दूर ) अंतरावर असणारे , कृष्णा - वारणा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले हे समृद्ध गाव ' हरिपूर ' जरी शहरापासून अगदी जवळ असलेले तरी शहरीपणाचा मागमूस ही कुठे दिसत नाही.
भारताच्या नकाशावर ' हळदी ची पेवे ' असणारे ठिकाण म्हणून ही हे प्रसिध्द आहे. याच हरिपूर मध्ये संगमेश्वराचे एक पुरातन मंदीर आहे. आणि दर श्रावणी सोमवारी इथे मोठी यात्रा भरते. सांगली शहरातील बस स्थानका पासून हरीपुरला जायला रस्ता आहे. कृष्णा नदीला समांतर असणारा हा रस्ता. निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. रस्ताच्या दुतर्फा वड, पिंपळ , चिंचेची मोठी झाडी आहेत.

लहानपणी शेवटच्या श्रावणी सोमवारी शाळेला सुट्टी असायची. मित्रांचा घोळका करून रमत - गमत हरीपुरला जाण्यात जी मजा असायची ती अवर्णनीय. हरिपूर यायच्या आधी ' बागेतला गणपती ' हे ठिकाण आहे. गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघायचे हा रितीरिवाज सांगलीकर अजूनही पाळतात . संगमेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले की मग जत्रेचा आनंद  लुटायचा . संगमावर जाऊन नावेत बसायचे. जत्रेतील खेळली विकत घ्यायची यात चक्र, पीटपिते , चष्मा , धनुष्यबाण , टोप्या आणि इतर गोष्टींचा अंतर्भाव असायचा. सरतेशेवटी ' भेळ ' खायची आणि परत निघायचे.

असा हा सोहळा अनुभवायचा असेल तर एखाद्या श्रावण सोमवारी सांगलीला भेट नक्की द्या

' हर हर महादेव '

३१ जुलै, २०११

पत्रिका बनवून पाहिजे असल्यास










ज्यांना कुणाला स्वत:साठी,मुलांसाठी किंवा इतर नातेवाईक ,मित्रमंडळींसाठी 
पत्रिका बनवून पाहिजे आहे त्यांनी  इथे  दिलेली माहिती भरुन द्यावी.  
ही मोफत सेवा नाही याची नोंद घ्यावी.
ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांनी इथे दिलेली माहिती भरुन  द्यावी.
प्रतेकाला स्वतंत्र इमेल पाठवला जाईल



















धन्यवाद
अमोल केळकर


























































२८ जुलै, २०११

सर्वरोगशमनार्थ स्तोत्रम् !


भूतप्रेतपिशाच्चाद्या यस्य स्मरणमात्रतः ! दूरादेव पलायंते दत्तात्रेयं नमामि तम् ! १ !
यन्नामस्मरण दैन्यं पापं तापश्च नश्यति ! भितिग्रहार्तिदु :स्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम् ! २ ! दद्रुकस्फोटककुष्ठादि महामारी विशुचिका ! नश्यंत्यंन्येsपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम् ! ३ !
 संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदा: ! शाम्यंति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम् ! ४ ! सर्पवृश्चिकदष्टानां विशार्तानां शरीरिणाम् ! यन्नाम शांतिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि तम् ! ५ ! त्रिविधोत्पातशमनं विधिधरारिष्टनाशनम् ! यन्नाम क्रूरमिनिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम् ! ६ ! वैर्यादिकृतमंत्रादिप्रयोगा यस्य किर्तनात् ! नश्यंति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तम् ! ७ ! यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ! य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तम् ! ८ !
जयलाभयशः कामदातुर्दत्तस्य यः स्तवं ! भोगमोक्षप्रदस्येमं पठेत् दत्तप्रियो भवेत् ! ९ !

                                                      श्री गुरुदेव दत्त : !!

२५ जुलै, २०११

वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना



चिरंजीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुने !
रुपवान्वित्तवांश्चैव श्रिया युक्तश्च सर्वदा ! १ !

मार्कण्डेय नमस्तेस्तु सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं प्रसीद भगवन्मुने ! २ !

चिरंजीवी यथा त्वं तु मुनिनां प्रवरो द्विज !
कुरुष्व मुनीशार्दुल तथा मां चिरजीविनम ! ३ !

मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं अस्माकं वरदो भव ! ४ !

जय देवि जगन्मातर्जगदानन्दकारिणि !
प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठीदेवते !५!

त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च !
ब्रह्माविष्णुशिवै:सार्थं रक्षां कुर्वन्तु तानि मे ! ६ !


प्रार्थनेचा अर्थ : हे मुनिश्रेष्ठा , तू ज्याप्रमाणे दीर्घायुषी रुपधनबुध्दीने युक्त आहेस तसा मी सुध्दा होवो. हे आदरणीय मुनिश्वरा, दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी माझ्यावर प्रसन्न हो. सात कल्पांपर्यंत जीवन असणार्‍या महाभाग्यवान मार्कंण्डेय ऋषीश्वरा, आयुष्य, आरोग्य आणि यशासाठी आम्हाला वर देणारा हो. विश्वाची माता असणार्‍या, विश्वाला आनंदित करणा-या , माझे कल्याण करणा-या हे षष्ठीदेवी तुला नमस्कार असो. तू माझ्यावर प्रसन्न हो. त्रैलोक्यात ब्रह्माविष्णूमहेशासह स्थावर सचेतन आणि जे जे सजीव प्राणी आहेत ते माझे रक्षण करोत.



२३ जुलै, २०११

श्री सरस्वती - द्वादश - नामावली

श्री सरस्वती - द्वादश - नामावली

विद्या अभ्यासांत यश मिळण्यासाठी तसेच केलेला अभ्यास लक्षांत रहाण्यासाठी , परीक्षेत चांगले यश मिळण्यासाठी खाली दिलेला पाठ फलदायी आहे


प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती !
तृतीयं शारदा देवी , चतुर्थं हंसवाहिनी !
पंचमं जगती ख्याता, षष्ठं वाग्वीश्वरी तथा !
सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी !
नवमं बुधमाना च दशमं वरदायिनी !
एकादशं चन्दकांन्तिं द्वादशं भुवनेश्वरी !
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः !
जिव्हाग्रे वसते नित्यं ब्रह्मरुपा सरस्वती !
सरस्वती महाभागे , विद्ये कमललोचने !
विश्वरूपे विशालाक्षि, विद्यां देहि नमोस्तु ते !

१८ जुलै, २०११

संकष्टी चतुर्थी - १८ जुलै २०११

आज संकष्टी चतुर्थी , चंद्रोदय तात्री ९. वा २१ मिनीटे. दर्शन घेऊयात इंदोरच्या बडागणपतीचे


ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :


१६ जुलै, २०११

स्वप्नपूर्ती वधू-वर केंद्र

सांगलीतील आमचे स्नेही श्री गिरिश देशपांडे गेली अनेक वर्षे 'स्वप्नपूर्ती ' नावाचे वधू-वर केंद्र चालवत आहेत. त्यांच्याकडे अनेक उत्तम स्थळे आहेत. अनेक वाचकांच्या माहिती साठी मुद्दाम इथे लिहिले आहे. जे इच्छूक आहेत त्यांनी अवश्य त्यांच्याशी संपर्क करावा.

श्री गिरीश देशपांडे
स्वप्नपूर्ती वधू-वर केंद्र
सांगली
इमेल : kgkdeshpande@gmail.com
संकेतस्थळ: http://www.swapnapurtilagna.com/
फोन नंबर : ९६३७०६६१९१

१५ जुलै, २०११

गुरुविण कोण दाखविल वाट ---

आज गुरुपोर्णिमा - आतापर्यंतच्या आयुष्यात जे काही इथपर्यंत पोचलो आहे ते आयुष्यात वेगवेगळ्या वेळी भेटलेल्या 'गुरुंच्या ' मार्गदर्शनामुळेच. या सर्वांचे मी आभार मानतो. आपले आई - वडील, शाळेतील शिक्षक, याच बरोबर निसर्ग / नियती हाही मोठा गुरु म्हणून माझ्या आयुष्यात आला आहे. अनेक गोष्टी शिकायला मिळत राहतील

आज गुरु पोर्णीमेनिमित्य या सर्वांना वंदन !!!

१४ जुलै, २०११

देवा वाचलो तुझ्या कृपेने --

' देवा वाचलो तुझ्या कृपेने ' काही शेकडा अभागी मुंबईकर सोडून लाखो मुंबईकरांचा मनात येणारे हे विचार. प्रतेक वेळेला ती १००-२०० माणसे बदलणार बाकी सर्व परिस्थीती आहे ती. काल दादर, झवेरी बाजार, ओपेरा हाउस . ऊद्या काय ??????? हा प्रश्न मनात घेऊनच तमाम मुंबईकर सकाळी ऑफीसला निघणार. मनात हाच विचार अरे कबुतरखान्याच्या त्या बस स्टॉप वर आतापर्यंत हजारो वेळा आपण गेलो आलो आहोत. काल आपण नव्हतो ही देवाची कृपा. परमेश्वरा सांभाळ रे असेच.

आजच्या धो धो पडणा-या पावसाने सगळे पुरावे नष्ट होतील मात्र तमाम मुंबईकरांच्या मनातील भीती अधिकच गडद होईल. आता अतिरेक्यांचे वाढदिवस, शुक्रवार, १३ तारिख या सर्वांचे मिडिया पुरेपुर विश्लेष्ण करुन विट आणेल. प्रश्ण तसेच राहतील, उद्या काय या प्रश्णाचे उत्तर अनुत्तरितच राहिल. चौकशी समिती, रिपोर्ट, मुख्यमंत्र्याचे जनतेल आव्हान, हे अगदी नेहमी प्रमाणे जसे अगदी मागल्या वर्षीचा पेपर आहे तसा परत.

ज्या क्षणी सरकार ताब्यात असलेल्या अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकत नाही तोपर्यंत वचक रहाणार नाही. आणि ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला तमाम मुंबईकर हा सोहळा शिवजयंती तसेच गणपती उत्सव सारखाच साजरा करेल.

खालचे वाक्य अजून कितीदा लिहावे लागणार देव जाणे !
 या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तिंच्या आत्म्याला शांती लाभो. माझी विनम्र आदरांजली !!

१५ जून, २०११

शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा








!! श्री देवी सूक्तम् !!

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम : !
नमः प्रकृत्यै भद्रायै नियता : प्रणता: स्मताम् !!

रुद्रायै नमो नित्यायै गौर्यॅ ध्यात्र्यै नमो नम : !
जोत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नम : !!

कल्याण्यै प्रणतां वृध्द्यै सिध्द्यै कूर्मो नमो नमः !
नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः !!

दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै !
ख्यात्यै तथेव कृष्णायै धूम्रायै सततं नमः !!

अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः !
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु बुध्दिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु छायारुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु तृष्णारुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु जातिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु लज्जारुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु श्रध्दारुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु कान्तिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु वृत्तिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु स्मृतिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु दयारुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु तुष्टिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरुपेण संस्थिता !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!

इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानाम् चाखिलेषु या !
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नम : !!

चितिरुपेण या कृत्स्नमेतद्व्याप्य स्थिता जगत् !
नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमो नमः !!


पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या