३० जानेवारी, २०१२

एसटी कडून मिळाले पैसे परत !!!!



मध्यंतरी   पुण्याहून मुंबईला येताना एस टीची एशीयाड  बस ' वनाज ' च्या थांब्याला आरक्षण असुनही  न थांबता तशीच गेली होती आणि प्रचंड मनस्ताप झाला होता.  एक प्रयत्न म्हणून पैसे परत मिळावेत यासाठी  एक इमेल  एसटीच्या संकेतस्थळावरील संपर्काच्या पत्त्यावर पाठवला होता. ( त्या इमेल मधे  श्री. सुधाकर परिचारक - अध्यक्ष  एस्.टी महामंडळ यांनी हा इमेल तुम्हाला लिहिण्यास सांगितले आहे आणि ताबडतोब आपल्या तक्रारिची दखल घेऊन  कार्यवाही केली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे  असे ( खोटेच ) लिहिले)
यानंतर सुत्रे हलली. अनेल इमेल्स मुंबई - पुणे डेपोतून एकमेकांना पाठवले गेले. प्रतेक वेळी मला cc  करण्यास कुणीही विसरले नाही . एकदा मला तिकिटाची प्रत आणि अर्ज कुर्ला डेपोत नेऊन देण्यास सांगितले , जे मला शक्य नाही असे मी कळवले.  मात्र  खालील इमेल आल्यानंतर तिकिटाची स्कॅन कॉपी पाठवून दिली आणि शेवटी  तिकिटाचे पैसे परत मिळाले.  यानिमित्याने कोण ते श्री श्रीकांत साहेब असतील त्यांचे धन्यवाद. 


shrikant gabhane shrikant.gabhane@gmail.com
Jan 19 (11 days ago)


to me
Dear sir

i received your complaint.
i am investigating the matter.
you will receive money in a week.
so kindly send your e ticket on my email address

thanking you

shrikant gabhane

depot manager
mumbai central

१२ जानेवारी, २०१२

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी -  गुरुवार दिनांक  १२ जानेवारी २०१२

चंद्रोदय रात्री ९.१६ वा

दर्शन घेऊयात सांगलीतील विश्रामबाग येतील  गणपतीचे




२७ डिसेंबर, २०११

१०० - वर्ष राष्ट्रगीताची



   २७  डिसेंबरला  भारताचे राष्ट्रगीत   लिहिले गेले

आज त्या गोष्टीला १००  वर्षे पुर्ण होत आहेत



प्रतेक भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट  !!!!

२२ डिसेंबर, २०११

श्री नवग्रह स्‍तोत्र - मराठी अर्थ




आमच्या स्नेही  वसुधा गोखले यांनी नवग्रह स्तोत्राचा  मराठी अनुवाद  पाठवला आहे. तो सर्वांसाठी इथे देत आहे.


त्यांचे मनःपुर्वक आभार
                        
सूर्य :  जास्‍वंदी फुलाप्रमाणे तांबडी वर्णकान्‍ती असलेल्‍या , कश्‍यकुलोत्‍पन्‍न , प्रखर तेजस्‍वी, अंधकाराचा शत्रू, सर्व पाप नाहीशी करणा-या दिवस नाथ सूर्याला मी वन्‍दन करतो. 

चंद्र :  दही व शंख यांच्‍या तुषाराप्रमाणे शोभणा-या, क्षीरसागरातून निर्माण झालेल्‍या भगवान  शंकराच्‍या मस्‍तकावर अलंकाराप्रमाणे शोभणा-या सशाचे चिन्‍ह धारण करणा-या चंद्राला मी नमस्‍कार करतो .

मंगळ :  पृथ्‍वीच्‍या उदरातून जन्‍म पावलेल्‍या, विजेप्रमाणे अंगकांती असलेल्‍या, हातात शक्‍ति धारण करणा-या, कुमार अवस्‍थेत असणा-या त्‍या मंगळाला मी प्रणाम करतो .

बुध :  अशोकपुष्‍पाप्रमाणे रक्‍त – श्‍यामलवर्ण असलेला अत्‍यंत रूपवान, बुद्धिमान , सोज्‍वळ, सरळ सुस्‍वभावी  बुधाला माझा नमस्‍कार असो.

गुरू : देव व ऋषींचा गुरू, सुवर्णाप्रमाणे कांती असलेल्‍या, बुद्धिमान, त्रैलोक्‍यश्रेष्‍ठ शा त्‍या बृहस्‍पतीला वन्‍दन असो.

शुक्र :  हिमकमळाच्‍या देठाप्रमाणे प्रभा असलेल्‍या, दैत्‍यांचा श्रेष्‍ठ गुरू, सर्वशास्‍त्रज्ञ भृगुकुलोत्‍पन्‍न शुक्राला मी नमस्‍कार करतो.

शनि :  नीलवर्णप्रभा असलेल्‍या , रिवपुत्र, यमाचा मोठा बंधु, सूर्याच्‍या छायेपासून निर्माण झालेल्‍या , त्‍या शनैश्‍वराला माझे वन्‍दन असो .

राहु :  अर्धे शरीर असलेल, वीर्यवान, चंद्रसूर्याला त्रास देणा-या , सिंहिकेपासून जन्‍म पावलेल्‍या  त्‍या राहूला मी वन्‍दन करतो .

केतु :  पळसफुलाप्रमाणे लाल, तारका व ग्रहांमध्‍ये श्रेष्‍ठ , भीतिदायक रूद्राप्रमाणे तापदायक अशा केतूला मी नमस्‍कार करतो .

याप्रमाणे व्‍यासमहर्षींच्‍या मुखातून आलेल्‍या नवग्रहस्‍तोत्राचे रोज दिवसा किंवा रात्री जो एकाग्रतेने पठन करील त्‍याच्‍या विघ्‍नांची शांती होईल.
नर, नारी आणि राजा यांचे दु:ख नाश पावेल आणि त्‍यांचे सर्वश्रेष्‍ठ ऐश्‍वर्य, आरोग्‍य यांची वृद्धी होईल .
ग्रह, नक्षत्र , चोर आणि अग्‍नी यांपासून होणारी पीडा संपूर्ण शांत होईल यात संशय नाही असे महर्षी व्‍यास म्‍हणतात .

२० डिसेंबर, २०११

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी ( मार्ग. कृ . १० )



जयाच्या जनी जन्म नामार्थ  झाला ! जयाने सदा  वास नामात केला !
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ति ! नमस्कार त्या ब्रम्हचैतन्यमुर्ती  !!


१४ डिसेंबर, २०११

संकष्टी चतुर्थी - १४ डिसेंबर २०११



बुधवार दिनांक १४ डिसेंबर २०११ , संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९ वा.३० मिनीटे

दर्शन घेऊयात  स्वामी स्वरुपानंद आश्रम पावस येथील आवळी गणेशाचे





( चित्र सौजन्य : योगेश जगताप )

१३ डिसेंबर, २०११

श्रीषष्ठीदेवीस्तोत्रम


संतान प्राप्तीसाठी प्रभावी स्तोत्र






जे लोक संतती प्राप्तीबाबत निराश झालेले असतात, ज्यांचा वारंवार गर्भपात होतो
अशांसाठी हे स्तोत्र फलदायी आहे

श्रीषष्ठीदेवीस्तोत्रम 







नमो दैव्यै महादेव्यै सिध्दयै शान्त्यै नमो नम: !
सुभायै देवसेनायै षष्ठीदेव्यै नमो नम: !!
वरदायै पुत्रदायै नमोनम: !

सुखदायै मोक्षदायै षष्ठीदेव्यै नमो नम: !
शक्तिषष्ठांशरुपायै सिध्दायै च नमो नम:
मायायै सिध्दयोगिन्यै षष्ठीदेव्यै नमो नम: !!
सारायै शारदायै च पारायै सर्वकारिण्ये !
बालाधिष्ठाव्यै देव्यै च  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
कल्याणादायै कल्याण्यै फलदायै च कर्मणाम !
प्रत्यक्षायैच भक्तांनाम  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
पूज्यायै  स्कन्दकान्तायै सर्वेषां सर्वकर्म्सु
देवरक्षणकारिण्यं  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
शुध्द्सत्वस्वरुपायै  वन्दितायै तृणा सदा
हिंसाक्रोधवर्जितायै  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
धनं देहि प्रिया देहि पुत्रं देहि सुरेश्वरी  
धर्न देहि यशो देहि  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
बभूमि देही प्रजा देहि  विद्यां देहि सुपूजिते 
क्ल्याण च जयं देहि  षष्ठीदेव्यै नमो नम: !!
इति देवी च संतुत्य  लेभे पुत्र प्रियव्रत:
यशस्विनं च राजेंद्र  षष्ठीदेवी प्रसीदत: !!
षष्ठीस्तोत्रमिदं ब्रह्मन य: श्रूणेति च वत्सरम 
अपुत्रो लभते पुत्रं वरं सुचिरंजीविनम !!
वर्षमेकं च या भक्त्या संस्तुत्येदं श्रुणोति च
सर्वपापविनिर्मुक्ता महावंन्ध्या प्रसूयते !!
वीरपुत्रं च गुणिनं विद्यावंत यशस्विनम 
सुचिरायुष्यन्तसेव षष्ठीदेवीप्रसादत:!!

काकवंध्या च या नारी मृतापत्या च या भवेत !
वर्ष श्रूत्वा लभेत पुत्रं  षष्ठीदेवीप्रसादत:!!
रोगमुक्ते च बाले च पिता माता श्रूणोति चेत 
मासेन मुच्यते बाल:  षष्ठीदेवीप्रसादत:!!





जय देवि जगत्मार्जगदानन्द्कारिणि

प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठिदेवते !!





९ डिसेंबर, २०११

श्री गुरुदेव दत्त !!


दिनाक १० डिसेंबर  -२०११   मार्गशीष  पोर्णीमा - दत्तजयंती 




दिगंबरा दिगंबरा  श्रीपाद वल्लभ  दिगंबरा  !!!

६ डिसेंबर, २०११

गीताजयंती

श्रीकृष्णाचे वदनीं कन्या जन्मली !

भगवद्गीता म्हणोनि नाम पावली !! - समर्थ रामदास स्वामी


कुरुक्षेत्री श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला ती भगवद्गीता

तो दिवस मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा होता

ह्या एकादशीला ’गीताजयंती’ असे म्हणतात

मोक्षदा एकादशी म्हणूनही या तिथीला गौरविले जाते

-- संदर्भ कालनिर्णय पंचांग

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या