२४ एप्रिल, २०२०
२० एप्रिल, २०२०
१९ एप्रिल, २०२०
१४ एप्रिल, २०२०
ज्योतिष - एक दैवी शास्त्र
.
नमस्कार,
मी स्वतः एक जोतिष अभ्यासक आहे. 'करोना' संकटा बाबत पूर्व कल्पना देता आली नाही म्हणून नुकताच 'अं नि स ' ने जोतिषांचा निषेध केला आहे. याबाबत माझे थोडे विचार
सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की कुठल्याच जोतिषीचे १००% भविष्य ,प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगात बरोबर/ खरे होते असे नाही. कारण एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही ती म्हणजे हे एक "दैवी" शास्त्र आहे.
जोतिषी सगळं १००% अचूक सांगायला लागले तर परमेश्वर ही संकल्पनाच निघून जाईल. लोक जोतिषीलाच देव बनवतील .पण प्रत्यक्षात तसे होत का? याचा अर्थ काही गोष्टी देव/ दैव यांच्या हातात आहेत.
कितीही मोठे प्राविण्य मिळवलेले, MD डाॅक्टर पण 'आता सगळं देवाच्या हाती' असं म्हणत नाहीत का? म्हणतात ना? याचा अर्थ ते स्वतः कुठे प्रयत्नात कमी पडले का? तर अजिबात नाही. त्यांनी त्यांचे पूर्ण प्रयत्न केले पण शेवटी 'त्याची' मर्जी
मग हे जोतिषां बाबतीत का स्विकारायचे नाही?
दुसरा एक महत्वाचा मुद्दा विसरला जातोय की माणूस आजारी पडल्यावर डाॅक्टर कडे जातो. मग डाॅक्टर त्याला पाहून तपासून निदान, औषधोपचार करतात.
तसेच जोपर्यंत एखादा जातक स्वत: एखादी अडचण घेऊन जोतिषा कडे जात नाही तोपर्यंत जोतिष्याने काहीही सांगू नये हा शास्त्र संकेत आहे. कारण तो ज्या वेळेला जोतिषाकडे जातो त्यावेळची ग्रहस्थितीत त्याच्या अनेक प्रश्णांची उत्तरे दडलेली असतात. म्हणून जातकाची कळकळ/ उत्तर जाणून घ्यायची वेळ हे सगळ महत्वाचे असते
उगाच दिसला डाॅक्टर विचार तब्येतीबद्दल किंवा दिसला जोतिषी दाखव हात/ पत्रिका हे चुकीचेच
राहिली गोष्ट पुढे घडणाऱ्या जागतिक आपत्ती बाबत भविष्य वर्तवणे.
तर 'मेदनीय जोतिष' हा एक प्रकार यात आहे. अनिस ला विनंती आहे की त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करुन जसे 'हवामान खात्याचा ' स्वतंत्र विभाग आहे तसा या शास्त्राचा अभ्यास करणा-यांची एक समिती नेमून हा विभाग चालू करावा, अधिक अभ्यासाठी निधी द्यावा, आणि मग उत्तरे चुकली तर जरुर निषेध करावा जसा वेळोवेळी तुम्ही हवामान खात्याच्या चुकीच्या भकिताचा, शास्त्रज्ञ, मेडीकल सायन्सच्या अपयशाचा करता
माझे हे विचार संपवता संपवता एक गोष्ट, नुकताच एका जोतिषांनी 'भूकंपाबद्दल भकित वर्तवले होते ' जे खरे ठरले. जमलं तर या किंवा अशा अनेक असंघटीत छोट्या मोठ्या जोतिषांचे जे अंदाज बरोबर येतात त्यांचा एखादा तरी अभिनंदनाचा ठराव मांडाल ना, भाऊ 💐
📝( जोतिष अभ्यासक) अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com

१३ मार्च, २०२०
हर्षल
प्रिय हर्षल,
सर्वप्रथम तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा 📝
खरं म्हणजे कालच १२ मार्चला 'आजचे दिनविशेष ' या रेडिओ वरच्या कार्यक्रमात तूझा वाढदिवस ( तेही १९७२ वगैरे साल) म्हणून सांगितले गेले. पण तूझा वाढदिवस आजच. १३ मार्च १७८१ ला "विल्यम हर्षल" ने तूला शोधले. 'बुध' ग्रहाची विस्तारित आवृत्ती म्हणजे तू. म्हणूनच वाढदिवसाच्या तारखेत ही 'संभ्रमावस्था' ही खरंच तूलाच शोभून दिसली. असो.
पाश्चिमात्य खगोलशास्त्रज्ञाने तूला शोधून त्याचेच नाव तूला दिले गेले. 'यूरेनस' असेही तुझे इंग्रजी नाव आहे. पण इकडच्यांनी पण तूला खास नावं दिली आहेत
प्रजापती- कै. जनार्दन मोडक यांनी केलेले नामकरण
अरुण -कै. व्यंकटेश केतकर यांनी दिलेले नाव
खरं म्हणजे ९ ग्रहांच्या कारकत्वा पलीकडे पहायची अजूनही
ब-याच जणांना सवय नाही म्हणूनच की काय तू, वरुण ( नेपच्यून) आणि यम ( प्लूटो) या ग्रहांचा जातकाच्या एकंदर जीवनात होणा-या घडामोडींबद्दल फारसे लिहिलेले नाही ( काही अपवाद वगळता) . मुख्य म्हणजे महा-दशेत ही तुम्हाला स्थान नाही. पण जीवनातील अनेक महत्वाच्या मुख्यत: विचित्र घडामोडीं घडण्यात तुमचा वाटा आहे.
पत्रिकेतील १२ राशीत/ १२ स्थानातून नक्की कुठे, कसा , कुणाबरोबर तू उपस्थित असता जातकाला 'हर्ष ' होईल हे कळणे थोडे अवघडच. कारण मुळातच तुझी गणना पापग्रहात झाली आहे . तरीही एका राशीत ७ वर्षे काढणारा तू, विविध ग्रहांशी योगात काय विविध चमत्कार करतोस हे अभ्यासणे ही एक मोठी गोष्ट वाटते.
काही उदाहरणे
अल्बर्ट आईनस्टाईनच्या कुंडलीतील बुध ग्रहाच्या त्रिकोणयोगातील 'हर्षल ' सापेक्ष सिध्दांत मांडतो.
न्यूटनच्या कुंडलीतील गुरुच्या त्रिकोण योगातील हर्षल ' गुरूत्वाकर्षणाचा ' शोध लावतो
तर एडीसनच्या कुंडलीत गुरुच्या लाभयोगातील हर्षल जगाला तारायंत्राच्या विश्वात नेऊन सोडतो.
महर्षी धोंडो केशव कर्वे - शनी सारखा परंपरा सांभाळणारा पुराणमतवादी ग्रह हर्षल बरोबर लाभयोगात. त्याकाळात जुन्या परंपरांचे आव्हान स्विकारुन विधवा- विवाह केला
पंडीता रमाबाई - शनी हर्षल लाभयोग. बिपिन मेधावी यांच्याशी रजिस्टर पद्धतीने विवाह, नंतर विलायतेत मुलीसह ख्रिस्ती धर्माची शिक्षा
गो.ग.आगरकर - रवि हर्षल लाभयोग. सर्व अंधश्रध्दा, ओंगळ रुढि व अविवेकी परंपरा यावर सुधारक पत्रातून टिका
थोडक्यात श्राध्द व श्रावणी न करणारे, देव न मानणारे, सोयर सुतक न पाळणारे, आंतरजातीय विवाह करणारे छोटे मोठे सुधारक तूझ्या अंमलाखाली येतात.
म.दा भट यांनी तुझ्याबद्दल एका पुस्तकात लिहिले आहे.
हा हर्षल मोठा स्फोटक ग्रह आहे. हायड्रोजन सारख्या स्फोटक वायूची हर्षल देवता आहे. मोठा चौकस व बुध्दिमान ग्रह आहे.
ब-याच वेळा हा चौकसपणा विघ्नसंतोषी असतो. काही तरी विचित्र करावयाचे, उडी मारायची, नाश झाला तरी चालेल, आगे कूच करावयाची.
सर्व नवीन संहारक अस्त्रे तूझ्याच अंमलाखाली येतात. याचा उपयोग शेवटी जगाच्या कल्याणासाठी करायचा की संहारासाठी हे सर्व तुझ्या लहरीपणावर अवलंबून.
अतिरेकी स्वार्थामुळे, अविवेकामुळे वा सत्तास्पर्धेमुळे हा हर्षल रुद्र रुप धारण करुन भविष्यकाळात कोणा राष्ट्रप्रमुखाच्या शरिरात प्रवेश करता झालाच तर पुराणामध्ये वर्णिलेला प्रलय वा विश्वलय अशक्य नाही अशी निश्चिती शास्त्रीय प्रगतीमुळे येत आहे.
तेंव्हा थोडंस ' *डरो ना* असे यानिमित्ताने तमाम सृष्टीतील अविवेकी जनतेस सांगावेसे वाटते.
इतर ग्रहांप्रमाणेच तुमचे ही सध्याचे मेष राशीतील भ्रमण बारा राशीच्या लोकांना *आरोग्यदायी जावो* या तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🙏🏻💐
वायो विजांचे तडाखे !
तेणे पृथ्वी अवघी तरखे!
कठिणत्व अवघेंचि फांके!
चहूंकडे !!
तेथें मेरुची कोण गणना!
कोण सांभाळिल कोणा!
चंद्र सूर्य तारंगणा!
मूस झाली !!
पृथ्वीने विरी सांडिली! अवघी धगधगायमान जाली!
ब्रम्हांडभटी जळोन गेली! येकसरां!!
📝 ( ग्रहांचा मित्र) अमोल
१३/०३/२०२०
*
( ग्रह योग संदर्भ : म.दा. भट यांचे पुस्तक)

४ मार्च, २०२०
प्लूटो - ग्रह बदल
*प्लूटो* ग्रह - राशी बदल
१९३० साली शोध लागलेला हा ग्रह. आज ४ मार्चला धनू राशीतून मकर राशीत आला आहे.
एका राशीत तब्बल २४ वर्ष मुक्काम करणारा हा ग्रह. म्हणजे बघा आपला ७४/ ७५/७६/७७ जन्म आहे त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिकेत प्लुटो ग्रह 'कन्या' राशीतच असेल.
शोध लागल्यापासून अजून या ग्रहाची संपूर्ण राशीचक्रातून फेरीही झालेली नाही.
या ग्रहाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो याचा संपूर्ण अभ्यास व्हायचाय. त्यामुळेच की काय पत्रिकेत या ग्रहाबद्दल फारसा विचार केला गेलेला दिसत नाही
एकटा जोतिषी या ग्रहाच्या संपूर्ण राशीचक्रातील भ्रमणाचा अभ्यास करणे ही शक्य नाही. आज वयाने ४० वर्षाचे जे जोतिषी आहेत ते फारफार तर अजून 'मकर', कुंभ' राशीतील प्लुटोचा अभ्यास करु शकतील. मात्र हे ज्ञान पुढच्या पिढीला म्हणजे अजून ५० वर्षानंतर जे जोतिषी असतील त्यांच्यापर्यत पोहोचले पाहिजे. त्यासाठी मकरेतील प्लूटो किंवा कुंभेतील प्लूटो असे लिखाण कायमस्वरूपी पुस्तक रुपात राहणे आवश्यक आहे.
प्लूटोचे व्यक्तीपेक्षा राष्ट्राच्या व सामूहिक जीवनाच्या दृष्टीने जास्त महत्व आहे. सामाजिक क्रांती, लढाया, संक्रमणे, राजकीय उलाढाली वगैरे गोष्टी प्लूटोच्या कारकत्वाखाली येतात. या ग्रहाबाबत अद्याप बरेच संशोधन होणे बाकी आहे.
आपल्या भारत देशाची रास 'मकर' मानली जाते. आज प्लूटो 'मकर' राशीत आलाय आणि त्याचा मुक्काम साधाएण २४ वर्षे इथे असेल.
भारतासाठी आणि प्लूटो अभ्यासकांसाठी त्याचे मकर राशीतून भ्रमण सुखावह जावो या शुभेच्छा 💐
📝( ग्रहांकीत) अमोल

१५ फेब्रुवारी, २०२०
६ फेब्रुवारी, २०२०
नक्षत्र दैनंदिनी
श्रीराम 🙏🏻🌺
नवीन वर्ष सुरु झाले की आपण बरेच जण डायरी / रोजनिशी लिहितो. जानेवारी २०२० पासून ही अनेक जण प्रत्येक दिवशी रोजनिशी लिहीतच असतील
ही संकल्पना घेऊन ज्योतिष अभ्यासक किंवा साधारण या विषयाची माहिती असणा-यांसाठी एक नवीन गोष्ट सुचवतोय . आवडली तर अमलात आणा नाही आवडली तर सोडून द्या.
यासाठी तुम्हाला ३६५ पाने नसली तरी चालतील २७ पाने पुरतील.
प्रत्येक पानावर एका नक्षत्राचे नाव लिहा ( अश्विनी ते रेवती )
आता जेव्हा आयुष्यात एखादी महत्वाची घटना सुरु कराल, किंवा घडली असेल मग ती व्यावसायिक असू दे कौटूंबिक असू दे किंवा वय्यक्तिक यश अपयश काही ही असू दे . ज्या गोष्टीची विशेष नोंद ठेवावी असं वाटेल अशी घटना मग भले अगदी एकादा देवदर्शनाचा योग आला असू दे , परदेशात जायचा योग आला असू दे. , तुम्हाला जे महत्वाचे वाटते ते सर्व
तर अशी कुठलीही घटना घडली की ती कुठल्या नक्षत्रावर घडली आहे त्या नक्षत्राच्या पानावर ते लिहून ठेवायचे. (काही अडचणी आल्या असतील तर त्या लिहायच्या )
आता ते नक्षत्र ( रास ) तुमच्या स्वतः: च्या पत्रिकेत कुठल्या भागात आहे हे तुम्हाला माहीत असतेच . यावरून तुमचा तुम्हालाच काही अभ्यास करता येईल
उदा. उद्या पुनर्वसू नक्षत्रावर ( पुनर्वसू नक्षत्रावर - त्यातही मिथुन रास आणि कर्क रास वर घटनांची वेगळी नोंद करून ठेवलेली असावी ) अमुक वाजे पर्यंत मिथुन रास आहे आणि काही महत्वाची मिटींग आहे तर , पुनर्वसू नक्षत्राचे आपण लिहिलेले पान काढायचे. त्या नक्षत्रावर आत्तापर्यत काय काय काम झाली आहेत / काय काय घटना घडल्या आहेत यावरून साधारण अंदाज घ्यायचा ( कर्क / मिथुन रास तुमच्या पत्रिकेत कुठल्या स्थानात आहे यावरूनही काही गोष्टी समजू शकतील )
अर्थात एक विचार मांडलाय.
मी अशी सुरवात केली आहे.
अगदी फार छोट्या गोष्टी लिहायची आवश्यकता नाही पण महत्वाच्या गोष्टींची तरी नोंद ठेऊन बघायला काय जातंय ?
मला वाटतंय पूर्वजांनी नक्षत्राबद्दल संपत, विपत, क्षेम, प्रत्यर , साध्य , मैत्र हे जे लिहून ठेवली त्याचा अभ्यास या ' नक्षत्र दैनंदिनी ' मधून मिळू शकतो .
शुभेच्छा
अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
२४ जानेवारी, २०२०
साडेसाती आणि महादशा
दर अडीच वर्षानी शनी चा ग्रह बदल झाला की साडेसाती वर वारेमाप चर्चा होते.
साडेसाती सुरु म्हणजे त्रास सुरु होणार / संपली म्हणजे आनंदी आनंद असं काहीच नसतं
ज्या राशीचा साडेसाती शी दुरान्वये संबंध नसतो अशा राशींच्या व्यक्ती ही जिवनात तितक्याच त्रस्त असतात. काही जण म्हणतात आमची साडेसाती संपली तरी अजून त्रास आहे, असे का?
तर मंडळी माझ्यामते आपल्या जिवनात साडेसाती पेक्षा ही सगळ्यात निर्णायक घटक ठरतो तो म्हणजे तुम्हाला कुठल्या ग्रहाची महादशा आहे ते.
गुरु ( १६ वर्षे) , शनि ( १९ वर्षे) , बुध ( १७ वर्षे) , शुक्र ( २० वर्षे) यांच्या दशांचा कालावधी हा साडेसाती पेक्षाही खूप मोठा असतो. आणि हे ग्रह ( आणि त्यांचे नक्षत्र स्वामी) पत्रिकेतील ६,८,१२ चे कार्येश असतील तर भले साडेसाती नसली तरी आयुष्यात अनेक संकटे उभी राहू शकतात. साडेसाती ही एकत्र असेल तर दुष्काळात तेरावा.
साडेसाती संपली तरी परिस्थितीत फरक पडत नाही
चांगल्या ग्रहाची दशा ( पत्रिकेत चांगले स्थान देणा-या) आणि साडेसाती माझ्यामते बॅलेन्स लाईफ देतात
शिक्षणाच्या काळात आलेल्या राहू सारख्या ग्रहाची दशा शिक्षणाची वाट लावतातच. अशीच दशा विवाहाच्या काळात आंतरजातीय विवाह घडवून आणू शकते ( इतर ग्रह योग ही विचारात घ्यावे लागतात )
त्यामुळे आयुष्याच्या घडणा-या अनेक ब-या वाईट गोष्टीत साडेसाती बरोबरच महादशा/ अंतर्दशा यांचाही विचार होणे आवश्यक
📝 अभ्यासक

२२ जानेवारी, २०२०
२१ जानेवारी, २०२०
७ डिसेंबर, २०१९
भूपाळी
.*दश दिशा " भूपाळी " म्हणती* . . . . .
वरची ओळ वाचलेल्यांच्या मनात पहिले वाक्य ही नकळत पणे आले असणार ते म्हणजे
' *प्रभाती सूर नभी रंगती* ' 🎼
काय जादू होती ना या पहाटेचा गाण्यांमध्ये , अगदी तोंडपाठ असायची ही गाणी .
*भूपाळी* - रात्री शेजारती झाल्यावर मंदिराचा गाभारा बंद करून आपण जस झोपी जातो तसे साक्षात देवही झोपी जातात आणि मग पहाटे पूजा-अर्चा, काकड आरती करण्याआधी गाणे म्हणून म्हणजेच भूपाळी ने त्यांना जागे करण्याची ही प्रथा .
फारच कल्पक. पहाट वेळच्या निसर्गाचे, पक्षी,प्राणी, सृष्टी यांचे हुबेहूब वर्णन या भक्ती गीतांतून/ भूपाळीतून बघायला मिळते. ही बरीचशी गाणी ' भूप ' रागात आढळतात.
काही गाण्यातून स्वत: ला आठवण करून देणे , की बाबा आजची पहाट तू पहात आहेस त्या विध्यात्याचे आभार मान. कुठल्याही गोष्टीची सुरवात गणपतीला स्मरुन करावी
*उठा उठा हो सकळिक वाचे स्मरावा गजमुख*
रिध्दीसिद्धी चा नायक सुखदायक भक्तांसी
तुझ्या कांतीसम रक्तपताका
पूर्वदिशा उजळती
अरुण उगवला, पहाट झाली
*उठ महा-गणपती*🙏🏻🌺
सृष्टीचा पालनकर्ता जागा झालाय , केवढा आनंद , तो इतरांनाही कळावा म्हणून इतरांनाही जागे करायचे
*उठा सकलजन उठिले नारायण*
आनंदले मुनिजन तिन्ही लोक
पण काही भूपाळ्या ह्या मानवी अवतारात असताना 'देव लहान होते' त्यावेळी त्यांना जागे करण्यासाठीच्या असाव्यात असा माझा अंदाज
रात्री कौसल्या माता छोट्या रामाला गोष्ट सांगत असताना तो आकाशातला चंद्र हातात पाहिजे म्हणून हट्ट करतो. मग सुमंत एक आरसा रामाच्या हातात ठेऊन त्याचे प्रतिबिंब आरशात पाडून बाळ श्रीरामाचे समाधान करतात. श्रीराम झोपी जातात. त्यांना जाग करण्यासाठी म्हणल्या गेलेल्या भूपाळीत त्याचे वर्णनं किती छान केलय बघा :-
*काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा*
*त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय पहा*
*वसिष्ठ मुनिवर घेऊन गेले* *पूजापात्र राउळी*
*उभी घेउनी कलश दुधाचा* *कौसल्या माऊली*
*उठी श्री रामा* . . . . .
सुरेख वर्णन ना ?
असेच वर्णन ' श्रीकृष्णासाठी पण बरं का ? आजही आपण आपल्या मुलांना उठवताना म्हणतोच की उठ हा लवकर , आवर , शाळेचे वाहन येईल किंवा रविवारी अरे तो तुझा मित्र आला बघ आवरुन, उठ, आवर इ इ ,
*घनश्याम सुदंरा श्रीधरा अरुणोदय झाला*
*उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला* .
इथे मित्र म्हणजे साक्षात रवी / सूर्य असला तरी मला इथे कुठेतरी गोविंदाचा लाडका सुदामा ही असू शकेल असे कायम वाटत राहिले आहे
भूपाळी ज्याच्यात त्या त्या देवतांची स्तुती केली आहे , त्यांच्या चांगल्या गुणाचे वर्णन केले आहे . हे प्रत्यक्षात त्यांचासाठी आहे आणि शिवाय आपल्यातील त्याचा अंशाला ' देवत्वाला ' / आत्म्याला केलेली ही आळवणी असावी असे माझे ठाम मत
उठी उठी सद्गुरू माय, अरुणोदय झाला - गोंदवलेकर महाराज
उठा उठा श्री साईनाथ गुरु, - साईबाबा
उठ पंढरीच्या राजा - विठ्ठल
उठी गोविंदा, उठी गोपाला
चल उठ रे मुकुंदा
उठ जगत माऊली
उठा उठा श्री गजानना
अशा अनेक भूपाळ्या अनेकांना पाठ असतील , रोज ते म्हणत ही असतील
आमच्या इथे शांतिनिकेत वसतिगृहात पहाटे ५ वाचता भूपाळी , भक्ती गीते लागायची आणि पहाटेचा जो " *उष:काल झाला* .. " त्याचे चैतन्य जाणवू लागायचे . मला तर खात्री आहे त्या वसतिगृहातील मुले / मुली कँटीनमधल्या कौसल्या माई कलश चहाचा घेऊन यायचा आधीच त्यांचे " *उठी लवकरी* ' होत असणार
*उठा उठा सकाळ झाली , अमुक साबणाने अभ्यंगस्नान करायची वेळ झाली* ही जहिरात पाठ असणा-या नव्या पिढीला या वरच्या भूपाळी / अभंग माहीत असतील ही अाशा.
मात्र ज्यांना या भूपाळीचा वगैरे अजिबात गंध नाही त्याचासाठी या खास चार ओळींनी लेखनाचा शेवट
नित्य रोज सकाळी
ऐकावी भूपाळी
प्रारब्द्ध नसता कपाळी
तो अभागी एक
📝७/१२/१९
देवा तुझ्या द्वारी आलो

kelkaramol.blogspot.in
१२ सप्टेंबर, २०१९
पुढल्या वर्षी लवकर या
.
*या रे या सारे या,गजाननाला आळवूया*
🙏🏻🌺
बाप्पा, उद्या तू परत आपल्या घरी चाललास. दु:ख तर होतच आहे पण *आपलं ठरलयं* 👍🏻
संकल्प आहेच, संपर्कही राहीलच
सकाळी आपल्याच श्वासाची जाणीव होऊन जेंव्हा जाग येईल तेंव्हा 'आधी वंदू तुज मोरया' मगच कराग्रे वसते लक्ष्मी . मुलांना 'वक्रतुंड' म्हणा रे असं सांगताना नकळत आपल्याकडून ही होणारी प्रार्थना, पुजेच्या वेळी 'प्रणम्य शिरसा देवं' आणि ' अथर्वशिर्षाचे एक आवर्तन' हा नित्य दिनक्रम, अचानक दृष्टीस पडणारे लाल जास्वंदीचे फूल, तळमजल्यामुळे अगदी बिंधास्त इकडे तिकडे फिरणारे मुषक, वर्षातील ५२ मंगळवार, १२ संकष्ट्या, तेवढ्याच विनायकी, माघी जयंती , सत्यनारायण- दसरा-लक्ष्मी पूजन आणि इतर कुठल्याही धार्मिक कार्यात/ उत्सवात होणारे तुझे 'सुपारी' रुपी पूजन, सांस्कृतिक कार्यक्रमात होणारी पहिली 'गणेश वंदना', गणेश पुराण पारायणे , अगदी गाडी चालवताना समोरच विराजमान असलेला तू, अष्टविनायक -सिध्दिविनायक- दशभूजा इ. प्रकारात वर्षातून वेळोवेळी भेटणारा तू, अचानक काही 'विघ्न' आली तरी 'सूख' वार्ता ही घेऊन येणारा तूच. आजूबाजूच्या प्रणव, प्रथमेश, मंदार, ओंकार, विनायक, वरद,अथर्व यांच्यातून आठवणीत येणारा तूच आणि कागदावर उमटणाऱ्या *अक्षरा... अक्षरातून*.... *शब्दा*... *शब्दातून* प्रकटणारा *बुद्धीची देवता* म्हणजे *साक्षात तूच* 📝
'भक्ती' मार्गाच्या या संकल्पात, वरील विविध प्रकारे 'संपर्क' ही राहणारच हे नक्की ✔
हे 'अनाथांच्या नाथा '
पुढल्या वर्षी तुम्ही येणार आहात २२ आॅगस्टला
ही तारिख लवकर येऊ दे 🙏🏻
तरीपण ' हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा, विसरन व्हावा तूझा विसरन व्हावा '
"तूज नमो" 🙏🏻🌺
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया
उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया
📝 देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.in
#देवाक काळजी

२८ ऑगस्ट, २०१९
गणपती प्राण प्रतिष्ठापना पूजा विधीची ध्वनीफीत
दरवर्षी प्रमाणे - गणपती प्राण प्रतिष्ठापना पूजा विधीची ध्वनीफीत
इथे उपलब्ध आहे
https://od.lk/d/MV8xNTczNDI5NzRf/Ganpati%20Pran%20Pratishtha%20Maha%20Pooja.mp3
ही ध्वनीफीत जुनी असल्याने पूजा करताना खालील बदल लक्षात ठेवावा
"विकारीनाम संवत्सर
सोमवासरे
#ज्ञानप्रबोधिनी
#झी २४ तास
मंगलमूर्ती मोरया
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)