.
३० जानेवारी, २०२२
२९ जानेवारी, २०२२
२० जानेवारी, २०२२
१७ जानेवारी, २०२२
८ जानेवारी, २०२२
शनि महात्म्य
.
आज उत्तरभाद्रपदा हे शनि महाराजांचे नक्षत्र , शनिवार आणि सुरु असलेली साडेसाती या योगावर 'शनी महात्म्य' वाचले. दरवेळेला जेंव्हा हे शनि महात्म्य वाचतो तेंव्हा एक वेगळा विचार शनि महाराज देतात. तसा आजही एक वेगळा विचार सुचला
साडेसातीचे अडीच अडीच वर्षाचे तिन टप्पे असतात हे आपणास माहितच आहे. प्रत्येक राशीला हे तिन टप्पे कसे जातात हे ही अनेक पुस्तकात दिलेले आहे. साडेसातीत केल्या जाणा-या उपायांचा मधे 'शनि महात्म्य' वाचन हे ही सांगितले आहेच. आज हे वाचन केल्यानंतर मनात विचार आला की ज्या राजा विक्रमादित्याची कथा यात सांगितली आहे ती संपूर्ण कथा तीन टप्प्यात विभागली तर साधारण प्रत्येकाला तसा अनुभव साडेसातीच्या तीन टप्प्यात येतो.
शनि महाराजांची साडे असतो साक्षात प्रभुरामचंद्र, श्रीकृष्ण, कैलासपती महादेव, साक्षात गुरु यांनाही चुकलेली नाही ( फक्त काहींनी याचा कालावधी कमी करुन घेतला, असा उल्लेख शनि महात्म्यात आहे) . आपल्या कर्माचा झालेला गर्व कमी होणे हे साडेसातीचे प्रयोजन.
तर कथेचा पहिला टप्पा
सभेत नवग्रहात श्रेष्ठ कोण यावर चर्चा सुरु असताना नकळत राजाकडून शनि महाराजांची टिंगल होते, नंतर राजाला आपली चूक समजते पण ग्रह दशेप्रमाणे आता जे होईल त्याला सामोरे जायचे अशी मनाची तयारी होते. घोडे विकणारा व्यापारी बनून शनि महाराज येतात, एक छान घोडा राजाला दाखवतात, तो उधळतो आणि राजाला खूप लांब अरण्यात सोडतो
( अचानक वेगळ्या परिस्थितीला सामोरे जाणे, काय घडतय हे न कळणे)
दुसरा टप्पा :-
एका गावात आसरा मिळालेल्या राजावर चोरीचा आळ येणे, तिथल्या राजाने त्याला हात- पाय तोडून टाकण्याची शिक्षा देणे
( हा टप्पा जेंव्हा गोचरीचा शनी तुमच्या राशीतून/ जन्मस्थ चंद्रावरुन भ्रमण करतो, अनेक अडचणी येणे, काय करावे हे न सुचणे, झालेल्या चुकांची जाणिव होणे इ इ )
टप्पा ३ रा
हात-पाय तोडलेल्या विक्रमादित्य जाला त्याच्या राज्यातील माहेरवाशीण ओळखते, सेवा करायची परवानगी इथल्या राजाला मागते, अन्न-पाणी निवारा देते आणि एक दिवस शनि महाराजांच्या कृपेने परत सगळे व्यवस्थित होते
( परिस्थितीनुसार करावे लागलेले बदल, नवीन गोष्टीत किंवा जुन्याच गोष्टी परत नवीन प्रकारे हळूहळू अंगीकारणे आणि परत पूर्ववत आशादायक जीवनाचा लाभ होणे)
तर साडेसातीत आपले अगदी विक्रमादित्या एवढे हाल होत नाहीत पण साधारण त्या चक्रातून शनि महाराज आपल्याला नेऊन आणतात
असे हे शनि महात्म्य, ज्यांनी अजून वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचा, योग्य तो बोध घ्या आणि महाराजांच्या कृपेने वाटचाल करीत रहा ते
इदं न मम ! ही भावना ठेऊन
( शनी भक्त) 📝
पौष शु. षष्ठी
८/१/२०२२
www.kelkaramol.blogspot.com
टिप:
आता २९ एप्रिल ला शनी कुंभेत गेल्यावर 'धनु ' वाल्यांची साडेसाती संपून 'मीन ' राशीला साडेसाती सुरु होईल. पण जुलै महिन्यात शनि महाराज वक्री होऊन परत मकरेत येतील तेंव्हा परत धनु साठी साडेसाती असेल ती जाने २०२३ पर्यत आणी मग मीन राशीला परत सुरु होईल
साडसाती २०२२
२९ एप्रिल २०२२ पर्यत
धनु, मकर, कुंभ
२९ एप्रिल ते १२ जुलै
मकर, कुंभ, मीन
१३ जुलै ते १७ जानेवारी २०२३
धनु, मकर, कुंभ
३ जानेवारी, २०२२
तुजवीण शंभो मज कोण तारी
.
🌹☘️🍂🌸💙
वैराग्य योगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी । उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
💙🌸🍂☘️🌹
२९ डिसेंबर, २०२१
गोंदवले
हृदयी नित्य 'रामनाम'
जिथे मनावर गोंदले
तेच पुण्यपवित्र
ग्राम वसे गोंदवले
ब्रह्मचैतन्याचे प्रतिक
गोंदवलेकर महाराज
शतकोटी वंदन त्यांना
पुण्यतिथी निमित्य आज 🙏🌺
📝 मार्गशीर्ष कृष्ण दशमी
२९/१२/२०२१
१४ डिसेंबर, २०२१
निघालो घेऊन दत्ताची पालखी
गोष्ट छोटी आहे पण अनुभूती मोठी मिळाली म्हणून सांगतोय/लिहितोय. पारायणाचा आज ४ था दिवस. योगींच्या आशीर्वादाने, जमेल तेवढे आवश्यक नियम पाळून पुढे जाणे क्रमप्राप्त आहे. दिनक्रमात थोडासा आवश्यक बदल ही झाला आहे.
तर नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी ८ ला बेलापूर बसस्थानकात आलो. ८:०३ ची नेहमीची ठरलेली ठाणे बस आली. सगळा नित्यक्रम. बस मधे चढणारे प्रवासी तेच, बस तीच. नेहमीच्या माझ्या जागेवर म्हणजे चालकाच्या लगेचच मागे असणाऱ्या सिटवर बसलो.
फक्त एक गोष्ट नव्हती ती म्हणजे नेहमीचे चालक, वाहक
बस पनवेल- सायन महामार्गावर लागल्यावर बेलापूरखिंड गेल्यावर अचानक ऐकू यायला लागले 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'.
चालकाने आपल्या मोबाईलवर दत्तप्रभूंची गाणी लावली होती. मी लगेचच मागे असल्याने मला ही त्याचा लाभ झाला होता. नेहमीचा उतरायचा थांबा येईपर्यंत ३०-४० मिनिटात अनेक गाणी ऐकता आली.
उतरल्यावर एक गोष्ट आठवली ती अशी की गुरूचरित्र पोथी वाचन करतानाच्या नियमात असा उल्लेख केला गेलाय की दत्त गुरुंना संगीत प्रिय आहे तेंव्हा शक्य असेल त्या पद्धतीने अभंग / भक्ती गीते म्हणावीत.
रोजच्या दिनक्रमात जी गोष्ट माझ्याकडून राहून गेली ती गुरुंनीच घडवून आणली यात शंका नाही.
म्हणून सुरवातीला म्हणल्याप्रमाणे गोष्ट छोटी आहे, अनुभूती मात्र मोठी आहे.
सातजन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांत मायामूर्ति पहाटेसारखी
निघालो घेऊन दत्ताची पालखी..
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺
#मोक्षदा_एकादशी 📝
१४/१२/२१
९ डिसेंबर, २०२१
दत्तजयंती
.
दत्तजयंतीच्या आधी अनेकजण श्री गुरु चरित्राचे पारायण करतात. श्री दत्त जयंती १८ डिसेंबरला ( शनिवारी) आहे म्हणजे १२ डिसेंबर रविवार पासून सुरु करुन शनिवारी दत्त जयंतीला सप्ताह पूर्ण करता येईल
पोथीत जे नियम दिलेत त्यात असे म्हणले आहे की पारायणाची सुरुवात शक्यतो 'शनिवारी ' करावी.
योगायोगाने शनिवारी ११ डिसेंबरला गुरुचेच पूर्वा-भाद्रपदा नक्षत्र आहे. ज्यांना पारायण करायचे आहे त्यांनी अवश्य ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर करावे आणि १८ ला श्री दत्त जयंती साजरी करावी.
श्री गुरूदेव दत्त 🙏🌺
देवा तुझ्या द्वारी आलो 📝
www.kelkaramol.blogspot.com
२३ सप्टेंबर, २०२१
ज्योतिष शास्त्र "- बाण लागला तर लागला
.
."ज्योतिष शास्त्र "- बाण लागला तर लागला 🏹
अगदी अशीच एक प्रतिक्रिया मध्यंतरी मला मिळाली. त्यावर मनात आलेले हे विचार.
हे एक दैवी शास्त्र आहे.कुणी कितीही याचे ज्ञान घेतले / अभ्यास केला तरी तो कमीच आहे कारण याची व्याप्ती समुद्रा सारखी प्रचंड आहे. त्यामुळे मी " अगदी प्रत्येक वेळी, कुठल्याही प्रश्णाचे अगदी अचूक भविष्य सांगू शकतो " असा गर्व कुठलाही ज्योतिषी करत नाही/कुणी करत असेल तर तसा करु नये.
त्यामुळे या शास्त्राबद्दल एखाद्याला ' बाण मारणे ' असे वाटणे चुकीचे नाही. कारण एवढ्या व्यापक असलेल्या या शास्त्रात एखाद्या प्रश्णाबाबत दोन ज्योतिषी त्यांच्या पद्धतीने वेगळे नियम लावू शकतात ,जसे एखाद्या कोर्ट केसमधे दोन वकील कायद्याचे अनेक बाण सोडतात. पण विजय एकाचाच होतो. मग हरलेला पुढच्या न्यायालयात जातो तिथे कदाचित परत कायद्याचे अनेक बाण सोडले जातात.
साधारण तसेच
मग तरीही ज्योतिषांकडे मार्गदर्शनासाठी का जावे? किंवा का जातात.
बाण अचूक लागेल हे जरी सांगता आले नाही तरी निदान कुठल्या दिशेला बाण सोडायचे हे कळले तरी आयुष्याच्या वाटचालीत खूप फरक पडतो.
खरं म्हणजे काही कुलकर्णी / जोशी * घराण्याचा हा परंपरागत व्यवसाय , उदरनिर्वाहाचे साधन हे होते. अजूनही खेडेगावात लोकं यांच्याकडे मार्गदर्शन मिळावे म्हणून जातात. यात त्यांना फार दक्षिणा मिळते असेही नाही पण चरितार्थ चालू शकतो. आज त्यांची पुढची पिढीच ( अपवादात्मक) चार पुस्तकं शिकली काय या शास्त्राला नावे ठेऊ लागली हे दुर्देव.
तर जोपर्यंत लोकांना
१) अमेरिकेत/ परदेशात २४ तासाच्या आत जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्याची अद्याक्षर पाहिजे असतील
२) नवीन गाडी,घर, पायाभरणी, दुकान चालू करणे ,वस्तू खरेदी करणे या करता लागणारा मुहुर्त माहिती पाहिजे असेल
३) शेतकरी बंधूंना पावसाळी वाहन समजून घ्यायचे असेल
४) अनेक धार्मिक गोष्टींसाठी, लग्न- मुंज यासाठी मुहूर्त लागणार असतील
५) आपल्या मुला-मुलींचे / बेसिक शिक्षण/ परदेश शिक्षण/ नोकरी-का व्यवसाय / लग्न / संसार असे प्रश्ण मनात येत असतील आणि याबाबत सल्ला हवा असेल
६) कोट्यावधी फी वकिलाकडे भरून ही मला जामीन मिळेल का / माझी आरोपातून सुटका होईल का / मला शिक्षा होईल का? हे जाणण्याचा प्रयत्न करु असे वाटेल
७) मी कुठल्या दैवताची उपासना करावी ? हे जाणून घ्यायची इच्छा होत असेल
८) सध्याचा वाईट काळ केंव्हा बदलेल? हे जाणून घ्यायची इच्छा होईल, आणि असेच इतर अनेक प्रश्ण पडतील तेंव्हा
जगाच्या अंतापर्यत कुलकर्णी/ जोशी* ( प्रातिनिधीक नावे * ) आपले बाण सोडण्याचे काम इमाने इतबारे करतच राहतील यात शंका नाही .
आधी उल्लेख केल्याप्रमाणे या बाणांना योग्य दिशा देण्याचे काम मात्र सर्वच ज्योतिषांनी प्रयत्नपूर्वक केले पाहिजे
शहाण्या माणसाने
" कोर्टाची पायरी चढू नये " असे म्हणले गेले आहे, पण ज्योतिषाच्या घरची ( किंवा कार्यालयाची) पायरी चढू नये असे कधी ऐकलंय?
फरक स्पष्ट आहे
तर या ना त्या कारणाने मार्गदर्शनासाठी माझ्या घरची पायरी चढलेल्या, पायरीवर असणा-या आणि पुढेही येणा-या सर्वांना सदर लेखन कृतज्ञतापुर्वक समर्पित. 📝 🙏
( 🎣) अमोल
भाद्रपद. कृ द्वितीया, रेवती नक्षत्र
२२/०९/२१
kelkaramol.blogspo
१० सप्टेंबर, २०२१
लालबागचा राजा, मुंबईचा राजा २०२१
ही शान कुणाची ??
https://youtu.be/
लालबागच्या राजाची
मोरया
( दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ चालू करा)
मुंबईचा राजा २०२१
( दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ चालू करा)
९ सप्टेंबर, २०२१
हे क्षण माझे मला जगू द्या
.साधारण २ वर्षांपूर्वी 'मुंबई मेट्रो' ची एक जहिरात लागायची, त्यातील एक वाक्य फारच लक्षवेधी होते
kelkaramol.blogspot.com 📝
" हे क्षण माझे मला जगू द्या "
२०२० आणि आता २०२१ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आज गणपती बाप्पाला हेच मागणे मागावेसे वाटते
बाप्पा,
ते गणेशोत्सवातील सर्व क्षण परत आम्हाला मिळवून द्या
मिरवणूक, मंडळांचे देखावे, लांबचलांब रांगा, एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन, सामुहिक आरत्या, प्रसाद, सहस्त्रावर्तन, विविध कलाकारांचे कार्यक्रम आणि बरच काही
ढोल, लेझीम , ताशा
निनादू देत ही आशा
भाग्याची येऊ दे दशा
तुझ्याच कृपा दृष्टीने
सर्व कलाकारांना तुझी सेवा करायची संधी सतत मिळू दे अशी मनापासून प्रार्थना
तुज नमो 🙏🌺
#तूच_गणेशा_दैवत_माझै
भाद्रपद शु.तृतीया
०९/०९/२१
८ सप्टेंबर, २०२१
गणेश पूजा
गणेश चतुर्थी निमित्य अनेकांना पूजेसाठी गुरुजी मिळत नाहीत. कालनिर्णय ने हे खास अँप तयार केले आहे.
प्ले स्टोर वरुन घेऊ शकता
३० ऑगस्ट, २०२१
श्रीकृष्ण जन्माष्टमी
.आज श्रीकृष्ण जन्माष्टमी 🌷
#गोकुळाष्टमी 📝
आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे आज चंद्र वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रातच असणार आहे. जे श्रीहरींचे जन्म नक्षत्र आहे.
शुक्राची रास, चंद्राचे नक्षत्र यामुळे हे नक्षत्र रसिकता देते जी श्रीकृष्णाच्या जीवनात ही दिसून येते. चंद्राचे पण हे सगळ्यात आवडते नक्षत्र.
गोकुळाष्टमीच्या सर्वांना ग्रह-नक्षत्रांकित शुभेच्छा
💐💐🙏
२७ ऑगस्ट, २०२१
राशी भविष्य - सप्टेंबर २०२१ ( मेष रास)
.श्री गणेशाय नम: !
#Tarot_card_reading
राशी भविष्य -सप्टेंबर २०२१
( येणारा महिना कसा जाईल)
रास - मेष
कार्ड: व्हिल आँफ फाँरच्यून ( wheel of fortune)
( टिप: याठिकाणी चित्रावरून या राशीच्या लोकांनी आपल्या मनात जो विचार येतोय त्याची नोंद करावी. महिन्याच्या शेवटी तसे झाले का ते कळवावे.
एका राशीची लाखो लोक असतात. प्रत्येकाचे भविष्य एकाच साच्यात काही शब्दांत ठेवणे योग्य नाही. पण चित्र बघून प्रत्येकाच्या मनात विचार वेगळे येऊ शकतात आणि त्या प्रमाणे त्यांच्या आयुष्यात तसे घडते का हे पाहण्याचा हा प्रयत्न)
इतर राशीच्या व्यक्ती ज्यांना आपल्या राशीचे कार्ड पहायचे असेल आणि अगामी महिना कसा जाईल याचा अंदाज घ्यायचा असेल तर खालील नंबर वर व्हाटसप करा.
अमोल केळकर
९८१९८३०७७०
a.kelkar9@gmail.com 📝
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



