१२ डिसेंबर, २०१३

दक्षिण दिशेस पाय करुन झोपणे

शास्त्रानुसार  दक्षिण दिशेस पाय करुन झोपणे निषिध्द मानले आहे.

या शास्त्रामागे पूर्ण पणे आरोग्यशास्त्रीय सत्य आहे. विश्वातील प्रत्येक अणुरेणुमध्ये एक प्रकारचे आकर्षण - प्रत्याकर्षण असून प्रतेक कण  कोणत्या तरी विशाल कणाकडे  ओढला जातो. याचा परिणाम म्हणून  प्रतेक सूक्ष्म कणास एक प्रकारची भ्रमण  गती असते. ' ध्रुव ' नामक ता-याकडे आपले विश्व सतत आकर्षिले जाते.ध्रुव तारा ज्या बाजूला असेल त्या दिशेस देहातील अणूरेणू इ. कणांचे आकर्षण होत असते.  अगदी पोटातील अन्नपदार्थ ही त्याच दिशेने सूक्ष्मतया खेचले जातात यामुळे उत्तरेकडे पाय केल्यास नैसर्गीकरित्या उपरोक्त आकर्षणाचा लाभ देहास आपोआप मिळतो.  पण त्याउलट दक्षिणेकडे पाय केल्यास  देहातील सर्व सुक्ष्म तंतूचे आकर्षण उलट दिशेस  होत राहिल्यामुळे अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो , मस्तकास शीण येतो, वरचेवर जाग येते


म्हणून दक्षिणेकडे पाय करुन झोपू नये असे शास्त्र सांगते
संदर्भ - शास्त्र असे सांगते  भाग १ - पान नंबर १८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या