अजि सोनियाचा दिनु । लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अजि सोनियाचा दिनु । लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३ जुलै, २०१५

अभंग - अजि सोनियाचा दिनु ।


अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरू ।
बाप रखमादेविवरू ॥५॥

रचना-संत ज्ञानेश्वर
संगीत-पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर-लता मंगेशकर
राग-भैरवी

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या