अश्वत्थाचे झाड म्हणजे पिंपळाचे झाड . या वृक्षाची महती अनेक धार्मीक ग्रंथात वर्णन केली आहे.
अश्वत्थ हा वृक्ष साक्षात हरिरुपच आहे. प्रतीकरुपाने अश्वत्थ सेवा ही विष्णुसेवाच होते. स्कंदपुराणात म्हणले आहे -
मूले विष्णु: स्थितो नित्यं स्कन्धे केशव एव च !
नारायणस्तु शाखासु पत्रेषु भगवान् हरि: ! !
फलेsच्युतो न संदेहः सर्वदेवै: समन्वितः !
स एव विष्णुर्द्रुम एव मूर्तो महात्मभि सेवित पूण्यमूलः !!
यस्याश्रयः पापसहस्रहन्ता भवेनृणां कामदुधो गुणाढ्यः !!
