चला पंढरीसी जाऊं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चला पंढरीसी जाऊं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ जुलै, २०१५

अभंगवाणी - चला पंढरीसी जाऊं

चला पंढरीसी जाऊं ।
रखमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान ।
मना तेथें समाधान ॥२॥

संता महंता होतील भेटी ।
आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥

तें तीर्थांचे माहेर ।
सर्व सुखाचें भांडार ॥४॥

जन्म नाही रे आणीक ।
तुका म्हणे माझी भाक ॥५॥

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या