नक्षत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नक्षत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२४ जुलै, २०१२

हस्त नक्षत्र



या नक्षत्राची चारही चरण  कन्या राशीत येतात

चरण १  -  कन्या रास  -  १०.०१ ते १३.२०   -   नवमांश  - मेष
चरण २  -  कन्या रास  -  १३.२१  ते १६.४०   - नवमांश  - वृषभ
चरण ३   -  कन्या रास  -  १६.४१  ते २०.०-  - नवमांश  -  मिथून
चरण ४   -  कन्या रास  -  २०.०१  ते २३.२०  - नवमांश  -  कर्क

चरणानुक्रमे पीडेचे दिवस  १५-५-५-५२
 चरणांची अद्याक्षरे -  पू , पा , णा , ठा

मंद नक्षत्र असल्याने - हरवलेली वस्तू  प्रयत्नाने ३ दिवसानंतर सापडते ( दक्षिण दिशे कडे शोधावे )

प्रथम, पंचम, नवम या स्थानी पंचमेश वा नवमेश यासह हस्त नक्षत्र असता  चांगले
सप्तमेश प्रथमात  या नक्षत्रात असेल तर पत्नी  वा सहचर खानदानी / श्रीमंत मिळेल

दशमेश  - सप्तम वा चतुर्थस्थानी हस्त नक्षत्रात असेल तर धंद्यात उत्तम कमाई होईल

या नक्षत्रावर रोग झाल्यास  साध्य समजावे  - रोगाची मुदत १५ दिवस असते.



२३ जुलै, २०१२

उत्तरा नक्षत्र

उत्तरा  नक्षत्र

रविचे नक्षत्र

पहिले चरण  - सिंह राशीत  ( २६.४१ ते ३० .०० अंश )   - धनू नवमांश
दुसरे  चरण -  कन्या राशीत ( ००० ते ३.२० अंश )  - मकर नवमांश
तिसरे  चरण -  कन्या राशीत ( ३.२१ ते ६.४० अंश )  - कुंभ नवमांश
चौथे   चरण -  कन्या राशीत ( ६. ४१ ते १०.०० अंश )  - मीन  नवमांश

अंध नक्षत्र  - या नक्षत्रावर  वस्तू हरवल्यास लवकर सापडते  ( पुर्वे कडे मिळण्याची शक्यता जास्त )

अद्याक्षरे -  टे, टो, पा, पी

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या