नित्य वाचे प्रभूनाम गाऊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नित्य वाचे प्रभूनाम गाऊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२४ जुलै, २०१५

नित्य वाचे प्रभूनाम गाऊ

नित्य वाचे प्रभूनाम गाऊ
पांडुरंगी सदा लीन राहू

हा फेर जनन मरणाचा
चुकविताही ना चुकण्याचा
सुखेदु:खे समानच साहू

कोणी ब्राह्मण कोणी महार
करू नका असा अविचार
एकमेकां म्हणू भाऊ-भाऊ

सुख दारा घर सन्मान
नको वृथाच हा अभिमान
प्रभू पायी तनू-ध्यान वाहू

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या