पावलों पंढरी वैकुंठभुवन । धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥ पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलों ॥३॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥४॥ पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥ पावलों पंढरी आपुले माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥६॥
पावलो पंढरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
पावलो पंढरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
१६ जुलै, २०१५
अभंगवाणी - पावलो पंढरी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
