विठ्ठल आवडी प्रेमभावो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विठ्ठल आवडी प्रेमभावो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७ जुलै, २०१५

विठ्ठल आवडी प्रेमभावो



विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥

तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥२॥

म्हणा नरहरी उच्‍चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हां सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥३॥

नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥४॥

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या