संकष्टी चतुर्थी, गुरुवार
१९/०५/२२
संकष्टी चतुर्थी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
संकष्टी चतुर्थी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
१९ मे, २०२२
२३ जून, २०१६
संकष्टी चतुर्थी
संकष्टी चतुर्थी - २३/६/२०१६
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या नवव्या भागात आज आपण माहिती घेऊ
चिरनेरच्या महागणपतीची : -
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक गाव पनवेल पासून २२ किलो मिटर तर उरण शहरापासून १६ किलोमिटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल खेडेगाव. आजूबाजूला डोंगर, तळी, खाडी ने आच्छादलेल हे छोटस खेडं.
ह्याच गावात एक जागृत, ऐतीहासीक महागणपतीचं देवस्थान आहे. देवळाच्या दिशेला जाताना गावात गल्ली गल्लीतून आत शिरताना कुंभारकामाचे नमुने पहायला मिळतात.
उरण-चिरनेर गावचे हे मंदीर ऐतीहासीक नोंदीतले आहे. ह्या देवळाने इतिहास जोपासला आहे. यादव राजवटीच्या काळात महाराष्ट्रावर परकीयांचे आक्रमण झाले. यादवांचे राज्य अल्लाउद्दिनने १२९४ मध्ये उडविले. सुलतानशाही आणि पोर्तुगिजांच्या आक्रमणाने गणपतीच्या मुर्ती तळ्यात, विहिरीत आणि जमिनीत लपविण्यात आल्या. अशाच मार्गाने चिरनेरचा गणपतीही तळ्यात लपविण्यात आला अशी नोंद आहे.
चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची स्थापना नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दित झाली. त्यांचे सुभेदार रामाजी महादेव फडके हे पेशव्यांप्रमाणेच गणेशभक्त होते. धर्मासाठी छळ करणार्या पोर्तुगीजांचा पुढे पेशव्यांनी पराभव केला. नानासाहेब पेशव्यांनी उरण व पाली ही आंग्र्यांची ठिकाणे घेतली. सुभेदार व पेशवे सुभेदार रामजी फडके यांना चिरनेर गावच्या तळ्यातील गणपतीने दृष्टांत दिला की मी तळ्यात उपडा पडलो आहे. वर काढून माझी प्रतिष्ठापना करा. मग तळ्यामध्ये मुर्तीची शोधाशोध सुरू झाली व गणेशमुर्ती तळ्यात सापडली. ह्या तळ्याला देवाचे तळे नाव पडले.
सुभेदार रामाजी फडके यांनी तळ्यातून काढलेल्या गणपतीचीच्या मुर्तीची हेमाडपंथीय धाटणीच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्या गणपतीला महागणपती संबोधण्यात येते. मंदीरातील मूर्ती ७ फुट व रुंदी ३.५ फुट आहे. मुर्ती भव्य व शेंदूरचर्चित आहे. गणेशाची सोंड डावीकडे वळलेली आहे.
चिरनेरच्या महागणपतीची मूर्ती तिळातिळाने वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ह्याची ख्याती पुर्ण उरण परीसरात आहे. त्यामुळे आता इथे भक्तगणांची संख्या वाढली आहे. पुर्वी चिरनेर गावातील लोक न्यायनिवाडा करण्यासाठी गणपतीला कौल लावायचे. माघी गनेशुत्सव व संकष्ट चतुर्थीला गणेशमूर्तिला सजवण्यात येते. तिला चांदीचा मुकुट चढविण्यात येतो. कालांतराने ह्या चांदीच्या मुकूटाचे सोन्याच्या मुकुटात रुपातर होईल ह्यात शंकाच नाही.
उरण-चिरनेरच्या ह्या महागणपतीने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेउन त्याचे चटकेही सोसले आहेत. त्यामुळे चिरनेरच्या महागणपतीच्या मंदीराची गणना भारताच्या ऐतिहासिक मंदीरामध्ये होते.
इंग्रज राजवटीत चिरनेर गावात मोठे जंगल होते अजूनही आहे. त्या काळी चिरनेर गावातील बर्याचशा लोकांचा व्यवसाय, त्यांच्या पोटापाण्याची सोय ही जंगलावर अवलंबून होती. जंगलातील मध, सुकी लाकडे, फळे, रानभाज्या, शिकार विकून स्थानिक आपला गुजारा करत असत. पण इंग्रजांनी देशात जंगलावर स्थानिकांना बंदी घातली. त्यामुळे येथिल स्थानिकांचे पोटापाण्याचे हाल होऊ लागले. देशभरातील जंगलावर अवलंबून असणार्या सर्व कुटुंबांवर हिच परिस्थिती ओढावली होती. त्या अनुषंघाने १९३० साली देशभार जंगल सत्याग्रह पुकारला गेला. ह्या जंगलसत्याग्रहाला उरण-चिरनेरच्या स्थानिकांनी भरगोस पाठिंबा दिला.
अहिंसेच्या मार्गाने जाणार्या ह्या सत्याग्रहाचे रुप हिंसेत बदलले. दिनांक २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानावर ब्रिटिशांच्या हुकुमावरुन स्थानीक पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात काही स्थानिक शहीद झाले. मग ह्या गोळीबारातील तपासणी दरम्यान चिरनेर गावचे काही रहिवासी आरोपी म्हणून पकडले गेले. गावात पोलीस चौकी नव्हती म्हणून चिरनेरच्या महागणपतीच्या देवळात ह्या आरोपींना कोंडण्यात आले व देवळाच्या दगडी खांबांना त्यांना करकचून बांधून त्यांना मारहाण केली. पण गणपतीचा आशिर्वाद पाठीशी असल्याने कोणीही देशभक्त माफीचा साक्षिदार झाला नाही. या सामान्य माणसांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडविला गणपतीच्या आशिर्वादाने. उरण-चिरनेरच्या महागणपतीच्या देवळा समोर हया शहिद स्वातंत्र्य वीरांचे हुतात्मा स्मारक बांधले आहे.
माहिती संकलीत : मायबोली संकेतस्थळ
( धागा - उरण चिरनेर येथिल ऐतिहासिक महागणपती )
साभार : मायबोली
For blog article on whatsapp contact on 9819830770
२५ मे, २०१६
संकष्टी चतुर्थी - टेकडी गणेश , नागपूर
संकष्टी चतुर्थी - २५/५/२०१६
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या आठव्या भागात आज आपण माहिती घेऊ नागपूर मधील टेकडीवरच्या गणपतीची
प्रत्येक गावाची ग्रामदेवता असते. नागपूरचे दैवत म्हणजे टेकडी गणेश. नागपूरचा हा गणपतीही खरं तर वरद विनायक पण, तो ओळखला जातो तो टेकडी गणेश म्हणून. नागपूरच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी टेकडीवर ही गणेशमूर्ती आहे. सध्याचे मंदिर अलीकडचे असले तरी मूर्ती प्राचीन आहे. नागपुरात रेल्वेने आले की आधी दर्शन होते ते या गणेशाचे. मुख्य रेल्वे स्थानकापुढील टेकडीच्या उतारावर हा गणाधीश आहे.
संकट निवारक
नागपूरचा आद्य गणपती अशी टेकडी गणेशाची ओळख आहे. मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे
उजव्या सोंडेची बैठी मूर्ती
शुक्रवार तलाव आज मंदिरापासून बराच दूर आहे. पण एक काळ असा होता की, हा तलाव मंदिराच्या पायथ्यापर्यंत होता. भोसले राजे नौकेतून गणेश दर्शनासाठी येत. टेकडीवर भोकरीच्या झाडाखाली ही मूर्ती उघड्यावर होती. याठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते, परंतु मुस्लिम राजवटीत ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड-पिंपळाची झाडे आहेत. त्यामुळे परिसर निसर्गरम्य वाटतो. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून संपूर्ण मूर्ती पूर्वी स्पष्ट दिसायची. आता शेंदुराच्या पुटांमुळे हे काही दिसत नाही. बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती साडेचार फूट उंच व तीन फूट रूंद आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे.
१२व्या शतकातील मंदिर
नागपूरचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. येथे नाग नदीच्या परिसरात छोटी गावे होते. त्यांना टोली म्हणायचे. आजही नागपुरातील अनेक वस्त्यांची नावे, कुंभारटोली, मरारटोली अशी आहेत. सीताबर्डी भागात गवळ्यांची टोली होती. या टेकडीवर महादेवाची तसेच काही गणपतीची मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. आजही टेकडीवर टेकडी गणेशसह फौजेचा गणपतीही आहे. सीताबर्डी भागात गवळ्यांसह गोसावी लोकही राहायचे. त्यांचे राम अन् हनुमानाचे मंदिर गणेश मंदिराच्या पायथ्याशी आहे. आज प्रसिद्ध असलेल्या टेकडीवरील गणेश मंदिराचा जिर्णोद्धार वाकाटकांच्या आणि नंतर यादवांच्या काळात झाला होता. १२व्या शतकात हेमाद्री पंडितांनी हे मंदिर बांधले होते. हे मंदिर प्राचीन असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे शिलालेख. सध्या हा शिलालेख नागपूरच्या अजब बंगल्यात आहे. हा शिलालेख सीताबर्डीत सापडलेल्या एका कोरीव स्तंभावर लिहिलेला आहे. या शीलालेखावर, जमीन गाई चराईकरिता देवस्थानला दिल्याचा उल्लेख आहे. सहावा विक्रमादित्य याच्या कार्यकाळात तो लिहिला गेला. शके १००८ वैशाख शुद्ध ३ प्रभवनाम संवत्सर असा या शीलालेखाचा काळ दिला गेला आहे.
विविध सामाजिक उपक्रमांमध्ये या मंदिराचा नेहमीच सहभाग राहिला आहे.

माहिती : संकलीत ( महाराष्ट्र टाईम्स
यापूर्वीचे भाग :
भाग १- कसबा पेठ गणपती ( मानाचा पहिला ) , भाग २- तासगावचा गणपती , भाग ३ - दशभूजा गणपती हेदवी , भाग ४ - वाईचा ढोल्या गणपती , भाग ५- सांगलीचा संस्थानाचा गणपती , भाग ६ - टिट्वाळा महागणपती भाग ७ - सारसबाग गणपती
For blog article on whatsapp contact on 9819830770
२५ एप्रिल, २०१६
संकष्टी चतुर्थी
संकष्टी चतुर्थी - २५/४/२०१६
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या
या लेखन मालेच्या सातव्या भागात आज आपण माहिती घेऊ पुण्यातील
तळ्यातल्या गणपतीची ( सारसबाग गणपती )
पुण्यातील
सारसबागेतील तळ्यात सवाई माधवराव पेशवे यांनी 17 व्या शतकात थेऊरच्या
उजव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिकृतीची प्रतिष्ठापना केली होती. तोच हा
'तळ्यातला सिद्धिविनायक'. आता हा गणपती पुणेकरांचीच नव्हे; तर अवघ्या
महाराष्ट्रची ओळख झाला आहे. पेशवेकालीन मूर्ती कालांतराने भंगल्याने दोनदा
नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पर्वतीच्या पायथ्याशी सारसबाग
आहे. या बागेत सुमारे अडीचशे वर्षांपासून हा उजव्या सोंडेचा चिंतामणी
विराजमान आहे. मंदिर आकर्षक आहे. मंदिराच्या सभामंडपात गेल्यागेल्याच
मनमोहक श्री सिद्धिविनायकची मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेते. हिवाळयात
अवघे पुणे थंडीने गारठलेले असते. सारसबागेतील आपल्या लाडक्या
सिद्धिविनायकला थंडी वाजू नये, म्हणून स्वेटर घालण्यात येते. हे या गणपतीचे
वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
मंदिर परिसरातून जाताना हात जोडल्याशिवाय पुणेकर पुढे जाऊच शकत नाही. मंदिर परिसर पाना फुलांनी नटलेला आहे. रम्य अशा वातावरणामुळेही या मंदिरात कायमच भक्तांची गर्दी असते. सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे.श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तीन वर्षे या तलायाचे काम चालले. तलाव तयार झाल्यानंतर नौकाविहारासाठी त्याचा उपयोग करण्यात येत होता. त्यानंतर तलावात सारस पक्षी सोडले गेले. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५ हजार चौरस फुटाचे बेट तयार करून तो मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आला. त्यानंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक 'सारस बाग' असे नामकरण केले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. तोच हा 'तळ्यातला गणपती'.
पुण्याच्या सारसबागेतील गणेश मंदिरामागे असलेले 'गणेश दर्शन संग्रहालयाला' जरूर भेट द्यावी. तेथे श्रीगणेशाची शेकडो रूपे आपणास पाहावयास मिळतील. या संग्रहालयातील गणेशरूप मोठे आव्हानात्मक व मोहविणारे असे आहे. पाषाण, माती (मृत्तिका) याचबरोबर रुईचे (मंदार) खोड, चंदनाची मूर्ती, पोवळे, यासह मध्ययुगात हस्तिदंती, काष्ठशिल्प, आदींसह आधुनिक युगात पारदर्शक काचेच्या मूर्ती, फायबर, प्लास्टिक, तांदळावर कोरलेला आदी अनेक प्रकारात गणेशमूर्ती पाहावयास मिळतात..

माहिती : संकलीत
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी भेट द्या
For blog article on whatsapp contact on 9819830770
२७ मार्च, २०१६
संकष्टी चतुर्थी
संकष्टी चतुर्थी - २७/३/२०१६
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या सहाव्या भागात आज आपण माहिती घेऊ टिटवाळ्याच्या महागणपतीची
पेशव्यांचा कुलस्वामी गजानन . श्रीमंत माधवरावांच्या कारकिर्दीत एक घटना घडली .
कारभारी रामचंद्र मेहंदळे यांनी टिट्वाळ्या गावातील वस्तीला आणि शेतीभातीला पाण्याचा उपयोग होईल या हेतूने अनेक वर्ष बंद असलेल्या तळ्याचा उपसा चालू केला . त्याचवेळी पुण्यात श्रीमंताना स्वप्नी दृष्टांत झाला की मजूर खोदकाम करत आहेत , एक एक कंगोरेदार पायरी उत्खननातून वर येत आहे आणि एके ठिकाणी अवचित सिंधुरी प्रकाशाचा झोत वर उसळतो आहे . श्रीमंत घाईने म्हणतात अरे तिथं बघा . त्या तिथं . . . . . . . .
इकडे रामचंद्रपंतांना सुमारे साडेतीन फूट उंचीची गणपती मूर्ती सापडली. तेथून अलगद उचलून त्यांनी ती काठावर आणली. रामचंद्रपंतांना जाणवले की भवतीचा परिसर अलौकिक तेजाने भरून गेला आहे , प्रासादिक सुगंधाने परिमळू लागला आहे.
श्रीमंतांच्या धार्मिक आणि भाविक सातेने मग मंदिर उभे राहिले आणि त्यांच्या उपस्थितीत गणराज्य महोत्सव साजरा झाला .
पेशव्यांनी भाविकतेने मखर दिले आणि आज एक भव्य मंदीर त्याच तळ्याकाठी उभे आहे . तोच महागणपती तिथे वस्तीला आहे व भक्तांच्या सर्व मनोकामना तो पुरवत आहे
या महागणपतीची एका भक्ताने केलेले स्तवन
कोकण प्रांती गणेश स्थान क्षेत्र टिट्वाळा
दासावरती करितो दया लाउनी जिव्हाळा
महागणपती असे सुंदर मूर्ती मनोहर
कंठी हार मस्तकी दुर्वा दिसे डौलदार
तीन्ही त्रिकाळी चाले पूजा दुर्वा शमिपत्रे
नैवेद्यासी असती मोदक अति आदरार्थे
तीन्ही त्रिकाळी चाले आरती अहो गणेशाची
गणेश दर्शना रीघ लागते आर्त भाविकांची
दासांचे आर्त भाव ऐके गणपती
प्रसन्नत्वे होऊनी दासा करि कामनापूर्ती
ऐसी असे ही वरद मूर्ती दासावर दात्री
भावे नमितो साष्टांगेसी होऊनी शरणार्थी
शरण येतो दिना नाथा अहो गजानना
माझे मनींची पूजा स्वीकारा अहो दयाघना
दयेचे सागर तुम्ही अहा मूर्तीमंत
पंचोपचारे करितो पूजा घेई पदरांत
दुर्वा शमीपत्रे अर्पूनी अर्पितो मांदारा
नैवेद्यासी मोदक देवा कैसे सुंदरा
मोदकाचा नैवेद्य अर्पूनी घालितो नमस्कार
घ्यावी सेवा गोड करुनी मागणे निरंतर
गणपती बाप्पा मोरया
For blog article on whatsapp contact on 9819830770
२६ फेब्रुवारी, २०१६
संकष्टी चतुर्थी
आज संकष्टी चतुर्थी 
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या पाचव्या भागात आज आपण माहिती घेऊ सांगलीच्या पटवर्धन संस्थानच्या गणपतीची :-

सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै.आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर इ.स. १८४३ साली बांधले. " श्री गणपती " हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून सांगलीकर नागरिकांचेही श्रध्दास्थान आहे.
कृष्णा काठावर असलेले एक दुमदार गांव म्हणजे सांगली ! पूर्वीचं एक छोटे संस्थान असलेले हे गांव आज महानगरीत रूपांतरित झाले आहे. गांव मोठं झालं, त्यातील श्रध्दासुध्दा अधिक गतीने विकसित होत आहेत.
सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान / राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं. अन् त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला. सांगलीची त्यावेळची वस्ती एक हजार होती. आज काही लाखांत झाली आहे.
पटवर्धन घराण्याचं मूळ दैवत गणपती ! त्यामुळे संस्थान स्थापनेबरोबरच गणपती मंदिर बांधण्याची कल्पना साकारू लागली. मिरज संस्थानातून विभक्त होताना श्रीमंत आप्पासाहेबांजवळ ताम्र धातूची सिहांसनारूढ धातूची गणपतीची मूर्ती होती. ``संस्थान चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होऊ देत. मी तुझी एका मंदिरात प्रतिष्ठापना करेन `` असा विश्वास या मूर्तीसमोर व्यक्त करून संस्थानची उभारणी सुरू झाली. सध्याच्या माळबंगल्यातील " स्वानंद भुवनाजवळ" गणपती मंदिर बांधण्याचे निश्चित झाले होते. पण तेथे पाण्याची कमतरता आहे हे दिसून येताच, पाण्याची मुबलकता असलेल्या कृष्णाकाठावर गणपती मंदिर स्थापण्याचे निश्चित झाले.
कृष्णानदीचा परिसर सुंदर ! पाण्याची मुबलकता ! पण नदीकाठावर नेहमी पुराचा धोका अन् गाळाची जमीन त्यामुळे मंदिराचे बांधकामात वेगळाच विचार करावा लागला. गाळ मातीवर मंदिर उभारणी करताना प्रथम खोलगट भाग वाळू आणि चुन्याने भरून काढला आणि प्रत्यक्ष मंदिराचे बांधकाम भक्कम अशा पायावर केले गेले. त्यामुळे पूर्वी सांगलीत पुराचे पाणी जरी शिरले तरी मंदिर उंचावर बांधल्यामुळे पुराचा धोका राहिला नाही.
संस्थान निर्मितीनंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे १८११ मध्ये गणपती मंदिराच्या बांधकामास सुरूवात झाली. यापूर्वी गणेशदुर्ग या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम १८०४-०५ मध्ये सुरू झाले असल्यामुळे बांधकाम साहित्याबद्दल चोखंदळपणे चौकशी झाली. नदीकाठावरील मंदिर भक्कम असावे यासाठी गणपती मंदिर बांधकामासाठी ज्योतिबाचे डोंगरावरून काळा कठीण दगड आणला गेला. मंदिर बांधकाम ३०-३२ वर्षांत झाले. गणपती मंदिराचे आवारात मध्यभागी प्रशस्त असे श्री गजाननाचे मंदिर बांधले असून बाजूला श्री चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरीदेवी, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे बांधली आहेत. यामुळे या रम्य परिसरात ``गणपती पंचायतन``, असा सहसा न दिसणारा एक मनोहारी अविष्कार साकारला गेला आहे. या पाचही मंदिरातील देवांच्या मूर्ती शुभ्र संगमरवरी आहेत. पुण्याचे चिंतामण दीक्षित यांच्याशी विचार विनिमय करून मूर्तीबाबतचे सर्व तपशील, मूर्ती कशा असाव्यात ठरविण्यात आले. स्थानिक कारागीर, मुकुंदा आणि भिमाण्णा पाथरवट यांनी अतिशय कौशल्यपूर्णरीत्या मूर्ती साकारल्या. मूर्तीच्या सिंहासनासाठी सोने, चांदी, पंचरत्ने इ. मौल्यवान गोष्टी वापरल्या आहेत. १८४४ मध्ये चैत्र शुध्द १० शके १७६९ या दिवशी गणपती मंदिर `अर्चा ` समारंभ अतिशय थाटात संपन्न झाला. अनेक शास्त्री पंडितांना मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित केले होते. पाचही मंदिरात अतिशय धार्मिकतेने आणि राजवैभवाच्या दिमाखात मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. पूर्वी आप्पासाहेबांजवळ जी ताम्रमूर्ती गणेशाची होती तिचीपण शेजारीच स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे गणपती मंदिराची स्थापना झाल्यावर राहिलेली कामे अधूनमधून चालूच होती.
८ मार्च १९४८ ला सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. यानंतरही दुसर्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धनांनी मंदिराच्या सभामंडपाचे व भव्य अशा महाद्वाराचे काम पूर्ण केले.
गजानन मंदिरात अष्टखांबी विशाल सभा मंडप असून गणपतीचा गाभारा काळया गुळगुळीत ताशीव दगडापासून बनविलेला आहे. मंदिरात श्री गजाननासमवेत ऋध्दीसिध्दींनाही पूजेचा मान मिळालेला आहे. सभामंडपात मध्यभागात असंख्य लोलकांचे झुंबर आहे. सभोवताली हंड्या तसेच अनेक फोटो विराजमान झाले आहेत.
सांगलीकर राजेसाहेबांनी `श्री गणपती पंचायतन संस्थान ` हा खाजगी ट्न्स्ट स्थापन केला. या ट्न्स्ट मार्फत नित्यनेमाने व पारंपारिक पध्दतीने मंदिरातील सर्व पूजा अर्चा होत असते. मंदिरात रोज सकाळी काकडआरती, सूर्योदय व सूर्यास्तानंतर एक तासाने आरती, शेजारती आणि मंत्रपुष्प असतो. पहाटे चौघडा सनईचे साक्षीत गायन असते. प्रत्येक महिन्यात विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शिवरात्र, शुध्द सप्तमी, शुध्द अष्टमी, शुध्द चतुर्दशी या सहा तिथींना छबिना असतो. पूर्वी मंदिराकडे अठरा हत्ती होते.
एकूणच गणपती मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असून पूर्वीपासून तेथे स्वच्छता अन् मंगलमय वातावरण असल्याने मंदिर अतिशय प्रसन्न वाटते. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, राजस्थानी लाल-गुलाबी पाषाणापासून साकारल्याने मंदिराची शोभा अधिकच वाढविते.
मधेच काही काळ मंदिराचा परिसर काहीसा उदासवाणा दिसू लागला होता. जुन्याची डागडुजी करून मंदिर पूर्वीच्याच श्रध्देने सर्वांना बोलावित होतं. २००२ वर्ष उजाडलं ! अन् मंदिराचे नव वैभव अधिक तेजाळून निघाले. श्रीमंत विजयसिंह पटवर्धन यांनी कार्यबाहुल्यातून वेळ काढून सांगलीकडे दृष्टिक्षेप टाकला अन् पाहता पाहता मंदिर नवतेजाने उजळू लागले. पूर्वीच्या जुन्या झालेल्या वास्तूत नवलाईचा हात फिरू लागला. जुन्या पडक्या झालेल्या इमारतीचे जागी नवीन बदल साकारू लागले. सर्व परिसरालाच एक नवं चैतन्य लाभले. आता संकष्टी आणि वर्षातील सर्व सण समारंभाचे वेळेस मुख्य मंदिरातील फुलांची आरास सर्वांंची नजर खेचून घेते. मंदिराच्या आवारात कापडी मंडप, छत, स्वच्छता, कामगारांची नियुक्ती आणि नारळ वाढविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था झाल्याने सभामंडप अधिक देखणा झाला आहे. दर्शनासाठी स्त्री - पुरूषांसाठी स्वतंत्र ओळी तयार केल्याने सर्वांनाच दर्शनाचा उत्तम लाभ होतो. सुविधा केल्या आहेत. मंदिराच्या आवारात पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय इ. सोयी असून रोज अन्न छत्र चालू केले आहे त्यामुळे गरजूंची चांगली सोय झाली आहे. सर्व मंदिराचे कळसाचे रंगकाम केल्याने मंदिराला नवरूप प्राप्त झाले आहे. तसेच दर्शनी भागात रंगीत कारंज्याची रोेषणाई अन् पुष्करणी निर्माण केल्याने पूर्वीचा हा काहीसा उदास वाटणारा परिसर नवतेजाने उजळून निघाला आहे. आवारात सुंदर बाग, पाठशाळा, हेरंब कार्यालय, अशा सुविधा पण आहेत. मुंबईतील सिध्दी विनायक मंदिर व बालाजी मंदिराप्रमाणे इंटरनेटवरून मागणी केल्यास दर्शन, प्रसाद इ. सुविधा पुरविण्याचा ट्न्स्ट विचार करीत आहे.
पूर्वीपासूनच गणपती मंदिर हे सर्व जातीच्या लोकांना आपले श्रध्दास्थान वाटत असल्याने, मंदिराचा झालेला कायापालट पाहून सर्वांनाच आनंद होत आहे.
---प्रा. सौ. सरोज गोळे, विश्वस्त ज्ञानदीप फौंडेशन, सांगली
---- संकलन अमोल
९ मार्च, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)