१० जानेवारी, २०११

नवग्रह स्तोत्र


जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् !
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् !!

----------------
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव-संभवम् !
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम् !!
--------------------
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् !
कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् !!
-------------------------
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम् !
सौम्यं सौम्य्गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् !!
----------------------

देवानांच ऋषीणांच गुरु कांचनसन्निभम् !
बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् !!
---------------------
हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परम्म गुरुम् !
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् !!
---------------
निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् !
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् !!
--------------------------------

अर्धकायं महाविर्यं चंद्रादित्य विमर्दनम् !
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् !!
----------------------

पलाशपुष्पसंकाशं तार्काग्रह मस्तकम् !
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् !!


इतिव्यासमुखोद्गितं यः पठेत सुसमाहितः !
दिवा वा यति वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यते !!

नरनारी नृपाणांच भवेत् दु:स्वप्ननाशनम् !
ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् !!
ग्रहनक्षत्रजा: पीडास्तस्कराग्निसमुद्भवा: !
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासोब्रूते न संशयः !!
इति श्री व्यासविरचितम् !
आदित्यादि नवग्रहस्तोत्रं संपूर्णम् !!

७ जानेवारी, २०११

काही तोडगे -उपाय

आजारीपण-

एखादे वेळी घरातील व्यक्ती फार आजारी होते. औषध पाण्याचा काहीच गुण येत नाही व त्याच्या जीविताबद्दल काळजी वाटू लागते. अशावेळी करावयाचा तोडगा-सकाळी स्नान झाल्यावर देवासमोर बसुन २७ वेळेला गायत्री मंत्राचा जप करावा. नंतर एक पाट पुढे मांडून त्यावर दुधाने पाऊण भरलेला पेला ठेवावा व त्यावर हात ठेवून ओम चैतन्य अश्विनी कुमाराय नम:... या मंत्राचा १०८ जप करुन
ते दुध आजारी माणसास पिण्यास द्यावे . असे ७ दिवस करावे.

----------------------------------------------------------------------------------------

मुलीचा विवाह -


मुलीने आपल्या पत्रीकेत ज्यावेळी वृषभ राशीत चंद्र येईल त्या दिवसापासून तो कर्क राशीत येईपर्यंतच्या काळात " श्री लक्ष्मीनारायणाय नम:" या मंत्राचा रोज स्नानानंतर १०८ वेळा जप करावा . जप काळात कांदा व लसूण खाऊ नये व परगावी
जाऊ नये. जपकाळातील मंगळवारी एकभुक्त रहावे.रोज रात्री ज़ोपण्यापुर्वी आईला अगर घरातील सुवासिनीला नमस्कार करावा. लाजू नये

संदर्भ - श्रीभविष्य दर्शन मासिक - मे १९७३

३१ डिसेंबर, २०१०

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा

आमच्या सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, हितचिंतक, जातकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा .

आपणा सर्वास येणारे २०११ वर्ष सुखाचे, समाधानाचे , भरभराटीचे जावो. आपले सर्व संकल्प., योजना, अडकलेली कामे पुर्ण होवोत . सगळयात महत्त्वाचे म्हणजे आपणास मानसीक समाधान मिळो या साठी शुभेच्छा !!

नववर्षाचे स्वागत करताना कृपया आपण रस्तावर वाहन चालवताना काळजी घ्या

अमोल केळकर


२० डिसेंबर, २०१०

!! घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकात्त्मक स्तोत्रम !!

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव !
श्रीदत्ता$स्मान् पाहि देवाधिदेव !!
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते !
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! १!!
--------------------------------------------------------------
त्वं नो माता त्वं पिता$$ प्तो$ धिपस्त्वम् !
त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् !!
त्वं सर्वस्वं नो$प्रभो विश्वमूर्ते
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! २ !!
---------------------------------------------------------------
पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं !
भीतिं क्लेशं त्वं हरा$शुत्वदन्यम् !!
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते !
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! ३ !!
---------------------------------------------------------------
नान्यत्राता नापि दाता न भर्ता !
त्वतो देव त्वं शरण्यो$कहर्ता !!
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते !
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! ४ !!
---------------------------------------------------------------
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं !
सत्सङ प्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् !!
भावासक्तिं चखिलानन्दमुर्ते !
घोरात्कष्टादुध्द्रास्मान्न्मस्ते !! ५ !!
--------------------------------------------------------------
श्लोक पञ्चकमेतद्यो लोकमन्गलवर्धनम् !!
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् !!६ !!
---------------------------------------------------------------
!! इति श्रीमत् परमहंस परिब्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं अधोरकष्टोध्दरण स्तोत्रं सम्पूर्णम्

१ डिसेंबर, २०१०

सौ उज्ज्वला केळकर यांना ' पंकस' अ‍ॅकॅदमीचा विशिष्ठ अ‍ॅकदमी सन्मान

पंकस' अ‍ॅकॅदमी - पंजाब कला साहित्य अकादमी जालंदर ही संस्था गेली १३ वर्षॅ समाज, साहित्य, कला शिक्षण , पत्रकारितेशी संबंधीत अशा विभिन्न राज्यांच्या विभिन्न क्षेत्रातील व्यक्तींचा विशिष्ठ अकादमी सन्मान, विशेष अकादमी सन्मान , अकादमी सन्मान देऊन गौरव करत असते. यंदाच्या १४ व्या अ‍ॅकॅडमी अवार्ड वितरण सोहळ्यात माझी आई लेखिका सौ उज्ज्वला केळकर यांना विशिष्ठ अकादमी सन्मान देऊन गौरवण्यात आले . पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश इ. हिंदी भाषिक प्रदेशांबरोबरच अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणीपूर, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश इ. हिंदी राज्य भाषा नसलेल्या १६ प्रांतातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तिंची सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. सोहळ्यात एक प्रकारे मिनी इंडिया अवतरला होता.

सौ. उज्ज्वला केळकर यांची आत्तापर्यंत ३७ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यात बालवाड़मय , कथा कविता, संकीर्ण, अनुवादित ( लघुकथा, कथा , कादंबर्‍या ) यांचा समावेश आहे.त्यांची बालवाड़मयाची १० व अनुदादित ४ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

१५ ऑक्टोबर, २०१०

श्री मंगलचंडिका स्तोत्र

रक्ष रक्ष जगन्माता देवि मंगल चंडिके !
हारिके विपदां हर्ष मंगल कारिके !
हर्ष मंगल दक्षेच हर्ष मंगल दायिके !
शु
भे मंगल दक्षेच शुभे मंगल चंडिके !
मंगल मंगल दक्षेच सर्व मंगल मांगल्ये !
सदा मंगलदे देवी सर्वेषां मंगलाल्ये !
पुज्ये मंगलवारे च मंगलाभिष्ट देवते !
पूज्ये मंगल भूपस्य मनुवंशस्य संततीं !
मंगलाधिष्टिता देवी मंगलांनाच मंगले !
संसार मंगलधारे मोक्ष मंगल दायिनि !
सारेच मंगलधारे पारेच सर्व कर्मणा !
प्रति मंगळवारेच पूज्य मंगल सुखप्रदे !!

!! इति श्री मंगलचंडिका स्तोत्र संपूर्णम् !!

८ ऑक्टोबर, २०१०

महालक्ष्मी अष्टक




नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुर पूजिते !
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते !!

नमस्तेतु गरुदारुढै कोलासुर भयंकरी !
सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!

सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी !
सर्वदुख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!

सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्ति मुक्ति प्रदायनी !
मंत्र मुर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!

आध्यंतरहीते देवी आद्य शक्ति महेश्वरी !
योगजे योग सम्भुते महालक्ष्मी नमोस्तुते !!

स्थूल सुक्ष्मे महारोद्रे महाशक्ति महोदरे !
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!




पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी !
परमेशी जगत माता महालक्ष्मी नमोस्तुते !!

श्वेताम्भर धरे देवी नानालन्कार भुषिते !
जगत स्थिते जगंमाते महालक्ष्मी नमोस्तुते!!

महालक्ष्मी अष्टक स्तोत्रं य: पठेत भक्तिमान्नर:!
सर्वसिद्धि मवाप्नोती राज्यम् प्राप्नोति सर्वदा !!

एक कालम पठेनित्यम महापापविनाशनम !
द्विकालम य: पठेनित्यम धनधान्यम समन्वित: !!

त्रिकालम य: पठेनित्यम महाशत्रुविनाषम !
महालक्ष्मी भवेनित्यम प्रसंनाम वरदाम शुभाम !!

४ ऑक्टोबर, २०१०

रांगेचा फायदा सर्वांना


आजच एक बातमी ऐकली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीने असा निर्णय घेतला आहे की नवरात्रीत कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणा-या सर्व भाविकांना एकाच रांगेतून दर्शन मिळेल. सर्व मंत्री, अती महत्त्वाच्या व्यक्ती यांना ही हाच नियम लागू असेल.
असा हा योग्य निर्णय घेतल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन . देवाच्या दरबारात सर्वजण सारखेच असतात. तिथे लहान - मोठा, मंत्री - सामान्य माणूस असा भेदभाव नसतो हेच खरे.
हा निर्णयाची अंबलबजावणी अगदी काटेकोरपणे व्हावी हीच इच्छा. तसेच महाराष्ट्रातील इतर देवस्थानांनी ही जसे शिर्डी, शेगाव, पंढरपुर, सिध्दीविनायक, दगडूशेठ आणि हो अगदी लालबागचा राजा येथेही हाच नियम लवकरात लवकर लागू व्हावा.

देवाचिया द्वारी उभा क्षण भरी ! तेणे मुक्ती चारी साधियेला !!

३ ऑक्टोबर, २०१०

बालाशिष स्तोत्र

लहान मुलामुलींना आरोग्य व आशीर्वाद देणारे अमोघ दुर्मिळ प्रभावी असे " बालाशिष" स्तोत्राचा मराठी अनुवाद डॉ. के. रा जोशी यांच्या सौजन्याने -

तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा !
सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदिशा !! १!!

प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री केंव्हाही !
शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही !!२!!

दुष्ट नजर त्य कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी !
गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी, फोडी तू मोडी !! ३ !!

त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी !
तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी !! ४!!

अश्विनीवेषा हे जगदिशा कुमार माझा तू रक्षी !
झोपी जावो उभा असो वा असो कुठेही तू साक्षी !! ५ !!

दीर्घायु हे बालक होवो ओजबलने युक्त असो !
मुमुक्षत्व तू मला देउनी बालकचिंता तुला असो !! ६ !!

१० सप्टेंबर, २०१०

श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!






६ सप्टेंबर, २०१०

कृष्णमुर्ती अभ्यासकांसाठी खुशखबर


कृष्णमुर्ती पध्दत शिकत असताना सुरवातीला ज्यांच्याकडे अधुनिक सॉफट्वेअर नसते त्यांना प्रश्नकुंडलीवरुन उत्तरे देणे अवघड जाते. यासाठी नुकतेच एक संकेतस्थळ पहाण्यात आले ज्यावर आपल्या प्रश्नकुंडली मांडता येते. अर्थात हे संकेतस्थळ ही सेवा पुर्णपणे मोफत देत आहे. त्यामुळेच येणारी माहिती किती बरोबर आहे हे सांगणे अवघड. जयाने त्याने पडताळून पहावी पण सुरवातीच्या अभ्यासाच्या काळात हे संकेतस्थळ नक्कीच उपयोगी ठरेल


http://www.gpshorary.com/

३१ ऑगस्ट, २०१०

ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.

डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे यांनी मिसळपाव डॉट कॉम या मराठी संकेतस्थळावर लिहिलेला हा लेख त्यांच्या परवानगीने इथे आहे तसा देत आहे.

ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे. ऋषी पराशर हे या शास्त्राचे जनक होत.ज्योतिष शास्त्र हे "ज्योती" म्हणजे "प्रकाश"अथवा "दिशा"(मार्ग) दाखवणारे शास्त्र होयगम्मत म्हणजे.या शास्त्रास स्वातंत्रपूर्व काळात अमाप राजाश्रय लाभला होता. तरं पाश्चिमात्य जगात ते एक थोतांड व फसवे शास्त्र म्हणून नाकारले जात होते पण १९५० नन्तर चित्र अगदी उलट झाले .पाश्चिमात्य जगात या शास्त्राचे संशोधन सुरु झाले,तरं भारतात बुद्धी वाद्यांचा ,शास्त्रज्ञांचा यांचा या शास्त्राला विरोध सुरु झालायात अंधश्रधा निर्मूलन वाल्यांची गरळ चालू झाली , पहानाf, फ्युचरोलोजी (Futurology ) ज्याला भविष्य शास्त्र म्हणतात आणि ज्यात मागील घडलेल्या घटनाक्रमावर आधारित भविष्यात शकणाऱ्या घटनांचा वेधअथवा अंदाजच घेतला जातो त्याला शास्त्र म्हणून मान्यता आहे. खरेतर ते एक अंदाज शास्त्र आहे. पण खागोलशात्रीय घटना व बाबींवर आधारित भविष्य सांगणारे ज्योतिष हे शास्त्रच नाही,व ते एक फसवे शास्त्र आहे असे म्हणणे म्हणजे केवढा विरोधाभास .असे म्हणणारे सांगतात शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. तसेच सूर्य ,राहू,केतू हे ग्रह नाहीतच म्हणून त्यांचा ग्रह म्हणून विचारच करणे चुकीचे आहे. ज्योतिष अथवा शास्त्र हे सामाजिक घटनांवर भाष्य करत नाही किंवा सार्वत्रिक घडामोडींवर व घटनांचे भविष्य वर्तवत नाही असा आक्षेप घेतला जातो.हर्शल नेपच्यून,प्ल्युटो,हे गेले ग्रह आधुनिक काळात शोधले गेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार या शास्त्रात केला जात नाही. त्यात आता हल्लीच अस्त्रोनोमिकाल सोसायटीने तेरावी रास "भुजंग धारी " शोधून काढली आहे .या सर्व बाबींमुळे ज्योतिष शास्त्र निकालातचकाढले जाते.शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. पण हे म्हणणे चुकीचे आहे .कारण एका शास्त्राच्या कसोटीवर दुसऱ्या शास्त्राचे मोजमाप करणे किती योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होईल. नैसर्गिक शास्त्राच्या कसोटीवर मानस शास्त्र व इतर सामाजिक शास्त्रे पण फसवी ठरतील. खरेतर ती तशी ठरवली गेलीच होती. गेल्या शतकाच्या उत्तरार्द्धापर्यंत मानस शास्त्र हे शास्त्र म्हणून मान्यता पावले न्हवते.कारण मन ही सज्ञाच शास्र ,मुख्यत्वे पाश्चात्य शास्त्रज्ञ , मान्य करीत न्हवते . मन ही भौक्तिक वा दृश्य वस्तू म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही जसा मेंदू ,हृदय इ.अशी त्यांची धारणा होती ,व शास्त्र निरीक्षणात्मक व दृश्य वास्तुमानाचाच विचार करतंआणि आज फक्त विलाज नाही म्हणूनच ,कारण ते शास्त्र नाही म्हणून सिद्ध करता येत नाही आणि त्याच अतीत्वा नाकारता येत नाही अशीं सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवस्था झल्याने, आज त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. थोडक्यात शास्त्राचा आवाकाच थिटा आहे .त्याच्या थिटे पणात ज्योतिष शास्त्रच काय इतर अनेक गोष्टी अथवा विद्या जसे अष्ट सिद्धी /विद्या व योगिक शक्ती ज्याला भारतीय परंपरेत शास्राचाच दर्जा आहे बसत नाहीत.तसेच सूर्य ,राहू,केतू, यांना ग्रह मानाने ही एक सोय आहे. त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव व त्याचा अभ्यास महत्वाचा .जसं अर्थाश्स्त्रात नफा हा व्याजाचाच घटक अथवा जमीन (land) ह्या संकल्पनेत .सर्व निसर्ग संपत्ती ग्राह्य धरली जाते, त्यामुळे कुणी अर्थशास्त्र निकालात काढत नाही,,तसेच ज्योतिशास्त्र एक सोय म्हणूनच ग्रह,तारे ,छायाग्रह यांना सोयीस्कर रित्या ग्रह म्हणून संबोधले जाते. त्याला या मुद्द्यावरून नाकारणे म्हणजे अर्थश्स्त्र पण खोटे आहे ,फसवे आहे असे म्हणावे लागेल.हर्शल,नेपच्यून ,प्लुटो ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले तरी ते त्याआधीही होते व त्यांचा अस्तित्वाचा उल्लेख आढळतो .महाभारतात त्यांचा उल्लेख श्यामल वरुण,आणि,प्रजापती असा उल्लेख आढळतो .त्यांची आजही नाव ग्रहांबरोबर ,विशेषता वरुणाची ,पूजा होते व ते अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्फोटके ,अणु परमाणु(हर्शल),अंतर्मन(नेपच्यून) ,व सामाजिक घटना (प्रजापती) दर्शवतात. थोडक्यात ज्योतिष शास्त्राला फसवे ठरवण्याही. साठी घेतले जाणारे सारे आक्षेपच " फसवे " ठरतात.
या उलट ज्योतिष शास्त्रावरील विश्वासाची अतालता जगात कोठेही नाकारता येत नाही. . उदा. या एप्रिल महिन्यात आपल्या एका ( हाय मर जावां ) चित्रपटाच्या प्रमोशन करतेवेळी E .T .C .या चानलवर मान्य केले कि तिच्या विवाहाचे भविष्य बद्री उझ्मान या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नटाने सांगितल्या प्रमाणे तंतोतंत खरे झाल्याचे सांगितले. येव्ध्येच न्हावे तरं बडे बडे लोक जे जाहीरपणे ज्योतिष व देवाला रिटायर करा असे सांगतात ते लपून छपून आपल्या समस्यांचं समाधान ज्योतिषाकडे करतात. हा इतर व्यवसायांप्रमाणे येथेही दांभिकता आहे,अर्धवट ज्ञान असलेले लोक आहेत पण त्यामुळे शास्त्र खोटे ठरत नाही .राशी भविष्य हे सर्व साधारण भविष्य असते एखादा पोपट वाला ज्योतिषी किंवा सुशिक्षित सज्जन ज्योतिषी पण चूक करू शकतो पण त्यामुळे शास्त्रच निकालात काढणे म्हणजे एखाद्या डॉक्टरच निदान चुकलं म्हणून वैद्यक शास्त्रच अवैध ठरव्ण्या सारख आहे .जेवढ एखाद्याच्या ज्ञानाचं कुंपण तेवढी त्या व्यक्तीची झेप. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचा औपचारिक अभ्यास होणे महत्वाच व अती आवश्यकच आहे. औपचारिक अभ्यास सुरु केल्यानंतर सुशिक्षित व जबाबदारज्योतिषी तयार होतील.त्यांची बार कौन्सिल वा मेडिकल कौन्सिल सारखी regulatory authority स्थापन होऊ शकेल त्यामुळे शास्त्राची औपचारिक विश्वासाहर्ता वाढेल .थोडक्यात या शास्त्राचा अभ्यास होणे महत्वाचे होय. या संदर्भात न्यूटनने एडमंड ह्यले याला दिलेले उत्तर समर्पक आहे.न्यूटनचा ज्योतिष शास्त्रावर गाढ विश्वास होता. ह्यालेने त्यांना आपला ज्योतीशास्त्रावर एवढा विश्वास कसा काय? असा प्रश्न केला तेंव्हा "मी वस्तू विषयाचा अभ्यास केला आहे तू तो केलेला नाहीस म्हणून माझा विश्वास आहे तुझा नाही." असे उत्तर दिलेया मुळेच कदाचित विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants commission) ,जी भारतीय उच्य शिक्षणाची शिखर संस्था आहे,ज्योतिष अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवण्याची शिफारस केली. या मुले सुशिक्षित ज्योतिषी तयार होतील वा या शास्त्राचा औपचारिक अभ्यास होईलआणि ढोंगीपणावर ताबा ठेवता येईल. ही शिफारस २००१ साली वा ती स्वीकारली गेली असती तरं एव्हांना दोन तुकड्या तयार झाल्या असत्या .पण ते भाग्य या शास्त्राच्या वाट्यास यावयास अजून अवकाश होता.कारण त्या शिफारशीच्या विरुद्ध आव्हाहन दिले गेले हे आव्हाहन श्री भार्गव नावाच्या व्यक्तीने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात दिले गेले परंतु ते आव्हाहन उच्च न्यायालयाने फेटाळून लावले .पण याने समाधान होईल ते बुद्धिवादी कसले?
यासाठी जनहित मंच नावाची संस्था कामाला लागली. व या मंचच्या वतीने श्री भगवान रैयानी यांनी याचिका दाखल केली .ड्रग व मेजिक कायदा (Drug and Magic Act )१९५४ या खाली त्यांनी ज्योतिष ,वास्तू शास्त्र (भारतीय वस्तू विज्ञान महती ऐकून अमेरिकन राष्ट्र अधक्ष्यांनी अहमदाबादच्या स्वामी नारायण मंदिरास याच सुमारास भेंट दिली होती हे लक्षात घेणे येथे महत्वाचे)व इतर संबधित शास्त्रांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. या शास्त्रा वरबंदी घालण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली . पण ही ती याचीकापण एप्रिल २०१० च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे याच वर्षी रद्द केली गेली .यासंदर्भात ड्रग कंट्रोलर डॉक्टर पी. रामकृष्ण यांनी ज्योतिष शास्त्राचा बाजूने जनहितार्थ प्रतिज्ञापत्र सदर केले. या प्रतिज्ञापत्रात ते लिहतात "ज्योतीश्शात्र हे चार हजारहून अधिक जुने 'शास्त्र' असून त्यावर बंदी घालणे गैर व अनुचित आहे"
या पार्श्व भूमीवर "ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे"यावर केंद्र सरकारद्वारे शिक्कामोर्तबच झाला आहे .त्याचा आत्तातरी औपचारिक अभ्यास व संशोधन सुरुहोणे आवश्यक आहे मंचाद्वारे मी हे अपील करीत आहेकि भारतीय ज्योतिषशास्त्र हे सूक्ष्म व योग्य , वैशिष्ट्यपूर्ण आहे . भारतात या बाबतीतपुढाकार घेतला जाने आपल्या दृष्टीने हितावह आहे .
या बरोबरच ज्योतीश्शात्राच्या भविष्य कथनाचीपरीक्षा घेणे आवश्यक आहे असेसर्वश्री जयंत नारळीकर,,कुंटे,घाटपांडे यांनी करंट सायन्स च्या ( "Current Science ")९६ व्या व्हॉल्यूम पान ६४१-४६ मार्फत सुचवले आहे पण याच बरोबर भविष्य सांगण्याची पद्धत , नैतिकता , कायदा , मानसिकता ,सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर यावरही विचार विनिमय होणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने अभ्यासक्रम आखणे आवश्यक आहे. या पद्धतीनेच होमियोपथी या चिकित्सा पद्धतीने ने अलोपथी या पाश्चात्य चिकित्सा वा औषध पद्धतीला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे.ज्योतिष शास्त्रा चा चिकित्सा(dignosis )व औषधोपचार या साठी उपयोग केला जाउ शकतो .खरे तरं" औषध ज्योतिष "(Medical Astrology ) हा एक संपूर्ण विषयच आहे. म्हणजेच ज्योतिष शास्त्राचा साधारण (General ) व विशेष ( Special )(विवाह ज्योतिष,आरोग्य ज्योतिष, औषध ज्योतिष , रत्न ज्योतिष ,व्यवसाय ज्योतिष, गुन्हे ज्योतिष इ. ) आभ्यासक्रम तयार करता येउ शकतात .
सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पास्च्यात्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास व संशोधन सुरु केलेले आहे.मिशेल गौकालीन या नावाच्या संशोधकाने १९५५ साली मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा अभ्यास केला .त्याने अनेक अये एठलीटचा (मैदानी खेळाडूंचा )अभ्यास केला व त्यांचा मंगल बलवान असतो असा सिद्धांत मांडला व त्याला "मंगल परिणाम"="मार्स इफेक्ट "असे नामकरण केले.त्याचा हा मार्स इफेक्ट जगप्रसिद्धह आहे . (खरेतर खेळाडू ,पोलीस, मिलिटरी ,सर्जन ,इ चा मंगल बलवान असतो हे आपल्याकडे पूर्वापार सामान्यपणे माहित आहे. पण भाव मिशेल(पाश्चिमात्य संशोधक ) खावून जातो(जातात) हेही नवीन नाही .मिशेलच्या संशोधनानंतर तेहे ज्योतिष संस्था स्थापण्याचा व नियतकालिके निघण्याचा धपाटा सुरु झाला. तशी लाटच सुरु झाली. या पैकी एकूण दहा देशातील चौपन्न संशोधकांचे संशोधन "रिसेंट अडवान्सेस इन अष्ट्रोलोजी "=Recent Advances In Astrology "या नावे उपलब्द्ध आहे .तेथे चारशेच्यावर नियत्कालिक या विषयावर निघतात .पाश्चात्य विद्यापीठे ज्योतिषशास्त्राच्या संशोधनास प्रोत्साहन व मान्यता देतात. प्रतुत लेखाकांस संशोधनासाठी अशी परवानगी कोलंबस क्रेडीट गुनंकात भरपूर सूट देउन प्रोत्साहन दिले होते व श्री जमेस रीग्ग यांनी आनंदाने मार्गदर्शनाचे आव्हाहन स्वीकारत असल्याचे पत्र पाठविले होते. आज यामुळेच ज्योतिष शास्त्रास ४८ टक्के अमेरिकन्स ,व ४० टक्के जागतिक लोकसंखेचे पाठबळ आहे.
आज गरज आहे ती शास्त्रज्ञ ,व भारतीय बुद्धिवादी यांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची कारणभारतीय ज्योतिषशास्त्र हे जास्त व्यापक ,सूक्ष्म तरं आहेच पण त्याची उभारणी व मांडणी भक्कम सामाजिक ,धार्मिक व आध्यात्मिक पायांवर रचली गेली आहे. आपल्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल केला गेला नाही तरं आज फक्त भारतातच ५०,०००कोतिन्चि उलाढाल हा व्यवसाय एखादी पाश्चात्य संस्था बौद्धिक अधिकार (Intellectual Property Rights ) मिळून क्रेडीट व रोयाल्टी मिळवेलच पण हा आपलाच शोध असल्याचे सांगून ज्योतिष शास्त्राचे जनकत्व लाटेल .एवढेच न्हावे तरं भारतात संस्था उघडून आपलाच माल आपल्यालाच विकेल व श्रेय पण लाटेल.
डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E.
drsanjayhonkalse@gmail.comhttp://drsanjayhonkalse.tripod.com

५ ऑगस्ट, २०१०

गौरव ज्ञानाचा


काही व्यक्ती या वयाने लहान असल्यातरी आपल्या ज्ञानाने अतुच्य शिखर गाठतात . अशी अनेक उदाहरणे आपण ऐललेली आहेत पाहिलेली आहेत. आज अशाच एका व्यक्तिमत्वाची ओळख करुन देतो. श्री. वरदविनायक खांबेटे. माझे सर ज्यांचाकडे मी कृष्णमुर्ती ज्योतिष पध्दत शिकलो. वयाने साधारण तिशीच्या आतले.

नुकताच त्यांना 'फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे यांच्यातर्फॅ 'ज्योतिर्रविद्यावाचस्पती' हा अतुच्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मेडिकल अ‍ॅस्टॉलोजी संबंधीत सादर केलेल्या संशोधनास त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. आजपर्यंत हा पुरस्कार मिळालेल्यात वरद सर हे सगळ्यात कमी वयाचे आहेत.

या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. मी माझे भाग्य समजतो की अशा ज्ञानतपस्वीकडून मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली.

श्री वरद सरांना त्यांनी योजलेल्या सर्व कामात यश मिळो ही गुरुचरणी प्रार्थना. तसेच त्यांचा कवितासंग्रह ही लवकरच वाचावयास मिळावो या शुभेच्छा !!

अमोल केळकर

८ जुलै, २०१०

' ऑक्टोपसच्या अंतरंगात'

सध्या मी माझ्या ब्लॉगचे नाव 'भविष्याच्या अंतरंगात ' बदलण्याचा विचार करत आहे. ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' किंवा असेच काहीसे . आपणास आणखी काही सुचत असल्यास कृपया कळवावे।


सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे। स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत. यात पॉल ज्या टॅक मधे अस्तो तेथे त्याच्या खाद्याचे दोन बॉक्स सोडण्यात येतात . एका बॉक्सवर जर्मनीचा झेंडा तर दुसर्‍या बॉक्स वर जर्मनी विरुध्द संघाचा झेंडा लावण्यात येतो. ऑक्टपस ज्या बॉक्स मधला खाऊ खाईल तो संघ सामना जिंकेल असे अनुमान काढण्यात आले. आणि त्याचप्रमाणे घडले।




चला आता ऑक्टोपस बाजारात कुठे मिळतो ते पाहतो. माझ्या ब्लॅगचे नाव ' भविष्याच्या अंतरंगात ' बदलून ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' ठेवतो. ऑक्टोपसचा एक नवा वॉलपेपर घरातील भिंतीवर लावुन ठेवावा लागेल आता. तसेच जहिरातीची ' ऑक्टोपस कन्सल्टन्सी ' या नवीन नावने ५०० पत्रक छापतो. भविष्य पाहून घेणार्‍या पहिल्या १० जणांना ऑक्टोपसची छोटी मुर्ती किंवा गळ्यातला ताईत सप्रेम भेट मिळेल. ऑफर वल्ड कप संपेपर्यंत मर्यादित.

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या