३० जून, २०१६

झाडे लावा झाडे जगवा

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे 

उद्या १ जुलै ला महाराष्ट्र शासनाने  १ करोड झाडे लावण्याचा  उपक्रम हाती घेतला आहे. आपण ही सर्वानी शक्य तेवढे  वृक्षारोपण करू या 


झाडे लावा   झाडे जगवा 





For blog article on whatsapp contact on 9819830770

२३ जून, २०१६

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी - २३/६/२०१६

वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या नवव्या भागात आज आपण माहिती घेऊ
चिरनेरच्या  महागणपतीची  : -
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक गाव पनवेल पासून २२ किलो मिटर तर उरण शहरापासून १६ किलोमिटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल खेडेगाव. आजूबाजूला डोंगर, तळी, खाडी ने आच्छादलेल हे छोटस खेडं.
ह्याच गावात एक जागृत, ऐतीहासीक महागणपतीचं देवस्थान आहे. देवळाच्या दिशेला जाताना गावात गल्ली गल्लीतून आत शिरताना कुंभारकामाचे नमुने पहायला मिळतात.
उरण-चिरनेर गावचे हे मंदीर ऐतीहासीक नोंदीतले आहे. ह्या देवळाने इतिहास जोपासला आहे. यादव राजवटीच्या काळात महाराष्ट्रावर परकीयांचे आक्रमण झाले. यादवांचे राज्य अल्लाउद्दिनने १२९४ मध्ये उडविले. सुलतानशाही आणि पोर्तुगिजांच्या आक्रमणाने गणपतीच्या मुर्ती तळ्यात, विहिरीत आणि जमिनीत लपविण्यात आल्या. अशाच मार्गाने चिरनेरचा गणपतीही तळ्यात लपविण्यात आला अशी नोंद आहे.
चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची स्थापना नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दित झाली. त्यांचे सुभेदार रामाजी महादेव फडके हे पेशव्यांप्रमाणेच गणेशभक्त होते. धर्मासाठी छळ करणार्‍या पोर्तुगीजांचा पुढे पेशव्यांनी पराभव केला. नानासाहेब पेशव्यांनी उरण व पाली ही आंग्र्यांची ठिकाणे घेतली. सुभेदार व पेशवे सुभेदार रामजी फडके यांना चिरनेर गावच्या तळ्यातील गणपतीने दृष्टांत दिला की मी तळ्यात उपडा पडलो आहे. वर काढून माझी प्रतिष्ठापना करा. मग तळ्यामध्ये मुर्तीची शोधाशोध सुरू झाली व गणेशमुर्ती तळ्यात सापडली. ह्या तळ्याला देवाचे तळे नाव पडले.
सुभेदार रामाजी फडके यांनी तळ्यातून काढलेल्या गणपतीचीच्या मुर्तीची हेमाडपंथीय धाटणीच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्या गणपतीला महागणपती संबोधण्यात येते. मंदीरातील मूर्ती ७ फुट व रुंदी ३.५ फुट आहे. मुर्ती भव्य व शेंदूरचर्चित आहे. गणेशाची सोंड डावीकडे वळलेली आहे.

चिरनेरच्या महागणपतीची मूर्ती तिळातिळाने वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ह्याची ख्याती पुर्ण उरण परीसरात आहे. त्यामुळे आता इथे भक्तगणांची संख्या वाढली आहे. पुर्वी चिरनेर गावातील लोक न्यायनिवाडा करण्यासाठी गणपतीला कौल लावायचे. माघी गनेशुत्सव व संकष्ट चतुर्थीला गणेशमूर्तिला सजवण्यात येते. तिला चांदीचा मुकुट चढविण्यात येतो. कालांतराने ह्या चांदीच्या मुकूटाचे सोन्याच्या मुकुटात रुपातर होईल ह्यात शंकाच नाही.
उरण-चिरनेरच्या ह्या महागणपतीने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेउन त्याचे चटकेही सोसले आहेत. त्यामुळे चिरनेरच्या महागणपतीच्या मंदीराची गणना भारताच्या ऐतिहासिक मंदीरामध्ये होते.
इंग्रज राजवटीत चिरनेर गावात मोठे जंगल होते अजूनही आहे. त्या काळी चिरनेर गावातील बर्‍याचशा लोकांचा व्यवसाय, त्यांच्या पोटापाण्याची सोय ही जंगलावर अवलंबून होती. जंगलातील मध, सुकी लाकडे, फळे, रानभाज्या, शिकार विकून स्थानिक आपला गुजारा करत असत. पण इंग्रजांनी देशात जंगलावर स्थानिकांना बंदी घातली. त्यामुळे येथिल स्थानिकांचे पोटापाण्याचे हाल होऊ लागले. देशभरातील जंगलावर अवलंबून असणार्‍या सर्व कुटुंबांवर हिच परिस्थिती ओढावली होती. त्या अनुषंघाने १९३० साली देशभार जंगल सत्याग्रह पुकारला गेला. ह्या जंगलसत्याग्रहाला उरण-चिरनेरच्या स्थानिकांनी भरगोस पाठिंबा दिला.
अहिंसेच्या मार्गाने जाणार्‍या ह्या सत्याग्रहाचे रुप हिंसेत बदलले. दिनांक २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानावर ब्रिटिशांच्या हुकुमावरुन स्थानीक पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात काही स्थानिक शहीद झाले. मग ह्या गोळीबारातील तपासणी दरम्यान चिरनेर गावचे काही रहिवासी आरोपी म्हणून पकडले गेले. गावात पोलीस चौकी नव्हती म्हणून चिरनेरच्या महागणपतीच्या देवळात ह्या आरोपींना कोंडण्यात आले व देवळाच्या दगडी खांबांना त्यांना करकचून बांधून त्यांना मारहाण केली. पण गणपतीचा आशिर्वाद पाठीशी असल्याने कोणीही देशभक्त माफीचा साक्षिदार झाला नाही. या सामान्य माणसांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडविला गणपतीच्या आशिर्वादाने. उरण-चिरनेरच्या महागणपतीच्या देवळा समोर हया शहिद स्वातंत्र्य वीरांचे हुतात्मा स्मारक बांधले आहे.
माहिती संकलीत : मायबोली संकेतस्थळ 
( धागा - उरण चिरनेर येथिल ऐतिहासिक महागणपती )
साभार : मायबोली 






For blog article on whatsapp contact on 9819830770

२५ मे, २०१६

संकष्टी चतुर्थी - टेकडी गणेश , नागपूर

संकष्टी चतुर्थी - २५/५/२०१६

वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या आठव्या भागात आज आपण माहिती घेऊ नागपूर मधील टेकडीवरच्या गणपतीची



प्रत्येक गावाची ग्रामदेवता असते. नागपूरचे दैवत म्हणजे टेकडी गणेश. नागपूरचा हा गणपतीही खरं तर वरद विनायक पण, तो ओळखला जातो तो टेकडी गणेश म्हणून. नागपूरच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी टेकडीवर ही गणेशमूर्ती आहे. सध्याचे मंदिर अलीकडचे असले तरी मूर्ती प्राचीन आहे. नागपुरात रेल्वेने आले की आधी दर्शन होते ते या गणेशाचे. मुख्य रेल्वे स्थानकापुढील टेकडीच्या उतारावर हा गणाधीश आहे. 

संकट निवारक

नागपूरचा आद्य गणपती अशी टेकडी गणेशाची ओळख आहे. मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे

उजव्या सोंडेची बैठी मूर्ती

शुक्रवार तलाव आज मंदिरापासून बराच दूर आहे. पण एक काळ असा होता की, हा तलाव मंदिराच्या पायथ्यापर्यंत होता. भोसले राजे नौकेतून गणेश दर्शनासाठी येत. टेकडीवर भोकरीच्या झाडाखाली ही मूर्ती उघड्यावर होती. याठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते, परंतु मुस्लिम राजवटीत ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड-पिंपळाची झाडे आहेत. त्यामुळे परिसर निसर्गरम्य वाटतो. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून संपूर्ण मूर्ती पूर्वी स्पष्ट दिसायची. आता शेंदुराच्या पुटांमुळे हे काही दिसत नाही. बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती साडेचार फूट उंच व तीन फूट रूंद आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे.

१२व्या शतकातील मंदिर

नागपूरचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. येथे नाग नदीच्या परिसरात छोटी गावे होते. त्यांना टोली म्हणायचे. आजही नागपुरातील अनेक वस्त्यांची नावे, कुंभारटोली, मरारटोली अशी आहेत. सीताबर्डी भागात गवळ्यांची टोली होती. या टेकडीवर महादेवाची तसेच काही गणपतीची मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. आजही टेकडीवर टेकडी गणेशसह फौजेचा गणपतीही आहे. सीताबर्डी भागात गवळ्यांसह गोसावी लोकही राहायचे. त्यांचे राम अन् हनुमानाचे मंदिर गणेश मंदिराच्या पायथ्याशी आहे. आज प्रसिद्ध असलेल्या टेकडीवरील गणेश मंदिराचा जिर्णोद्धार वाकाटकांच्या आणि नंतर यादवांच्या काळात झाला होता. १२व्या शतकात हेमाद्री पंडितांनी हे मंदिर बांधले होते. हे मंदिर प्राचीन असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे शिलालेख. सध्या हा शिलालेख नागपूरच्या अजब बंगल्यात आहे. हा शिलालेख सीताबर्डीत सापडलेल्या एका कोरीव स्तंभावर लिहिलेला आहे. या शीलालेखावर, जमीन गाई चराईकरिता देवस्थानला दिल्याचा उल्लेख आहे. सहावा विक्रमादित्य याच्या कार्यकाळात तो लिहिला गेला. शके १००८ वैशाख शुद्ध ३ प्रभवनाम संवत्सर असा या शीलालेखाचा काळ दिला गेला आहे.


विविध सामाजिक उपक्रमांमध्ये या मंदिराचा नेहमीच सहभाग राहिला आहे. 

माहिती : संकलीत ( महाराष्ट्र टाईम्स 

यापूर्वीचे भाग :
भाग १- कसबा पेठ गणपती ( मानाचा पहिला ) , भाग २- तासगावचा गणपती   , भाग ३ - दशभूजा गणपती हेदवी  ,  भाग ४ - वाईचा ढोल्या गणपती  ,  भाग ५- सांगलीचा संस्थानाचा गणपती   , भाग ६ - टिट्वाळा महागणपती   भाग ७ -  सारसबाग गणपती 




For blog article on whatsapp contact on 9819830770

२३ मे, २०१६

५ लाखाचा टप्पा पार

संकेत्स्थळाला भेट देणा-याच्या संखेने  पार केला ५ लाखाचा टप्पा 
( कालावधी मे  २०१० ते मे २०१६ )

सर्वांचे अनेक आभार 


कर्दळीवन

  - 

अस म्हणतात की ही परिक्रमा  करणे  फार अवघड आहे. नृसिंह सरस्वती इथे  गुप्त झाले आणि श्री स्वामी समर्थ  इथे प्रकट झाले इतपत जुजबी माहितीच आपणास आहे . 
या कर्दळीवना संबंधी  माहिती देणारा हा व्हिडिहो  यू ट्यूब वर मिळाला 

तो  इथे माहितीसाठी देत आहे , अवश्य पहा 


पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या