आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥ काय सांगो जालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा