२४ ऑगस्ट, २०१५
२० ऑगस्ट, २०१५
श्री गणेश पूजा - ध्वनिफीत
येत्या १७ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे . आजकाल गणपतीची प्राण - प्रतिष्ठापणा करण्यासाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. ही अडचण लक्षात घेऊन पूजेची ध्वनिफीत डाउनलोड करून घेण्याची सोय देत आहे
१९ ऑगस्ट, २०१५
महाराष्ट्र भूषण - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
महाराष्ट्र भूषण - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र
ब. मो. पुरंदरे यांनी आपल्या ‘महाराज’ या चरित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या ‘अवतारी पुरुषाचे’ शौर्य, पराक्रमाचे वर्णन एका ओजस्वी अशा काव्यातून केलेले आहे. ते म्हणतात-
कोण तू रे, कोण तू?
कालिकेचे खड्ग तू? की इंदिरेचे पद्म तू?
जानकीचे अश्रू तू? की उकळता लाव्हाच तू?
खांडवातील आग तू? की तांडवातील त्वेष तू?
वाल्मीकीचा श्लोक तू? की गायत्रीचा मंत्र तू?
भगिरथाचा पुत्र तू? की रघुकुलाचे छत्र तू?
मोहिनीची युक्ती तू? की नंदिनीची शक्ती तू?
अर्जुनाचा नेम तू? की गोकुळीचे प्रेम तू?
कौटिलाची आण तू? की राघवाचा बाण तू?
वैदिकांचा घोष तू? की नीतीचा उद्घोष तू?
शारदेचा शब्द तू? की हिमगिरी नि:शब्द तू?
की सतीचे वाण तू? वा मृत्यूला आव्हान तू?
शंकराचा नेत्र तू? की भैरवाचे अस्त्र तू?
की ध्वजाचा रंग तू? वा बुद्धीचा श्रीरंग तू?
कर्मयोगी ज्ञान तू? की ज्ञानियांचे ध्यान तू?
चंडिकेचा क्रोध तू? की गौतमाचा बोध तू?
तापसीचा वेष तू? की अग्नीचा आवेश तू?
मयसभेतील शिल्प तू? नवसृष्टीचा संकल्प तू?
द्रौपदीची हाक तू? प्रलयंकराचा धाक तू?
गीतेतला संदेश तू अन् क्रांतीचा आदेश तू!
संस्कृतीचा मान तू अन् आमुचा अभिमान तू!
संकलीत
१७ ऑगस्ट, २०१५
१२ ऑगस्ट, २०१५
१० ऑगस्ट, २०१५
आजचे पंचांग
श्री गणेशाय नम :
श्री रामेश्वर प्रसन्न
दिनांक १०/८/२०१५
वार : सोमवार
शालिवाहन शक १९३७,( विक्रम संवत २०७१)
संवत्सर नाम : मन्मथ
मास(महिना) : आषाढ
पक्ष : कृष्णपक्ष
तिथी : एकादशी ( १६:४६ पर्यंत )
पक्ष : कृष्णपक्ष
तिथी : एकादशी ( १६:४६ पर्यंत )
चंद्रनक्षत्र : मृगशीर्ष ( १९:०१ पर्यंत ) नंतर आर्दा
चंद्र राशी : मिथुन
सूर्य राशी : कर्क
गुरु(बृहस्पती) राशी : सिंह
चंद्र राशी : मिथुन
सूर्य राशी : कर्क
गुरु(बृहस्पती) राशी : सिंह
राहू काल: ०७:३० ते ९:००
आजचा दिवस सर्वांना सुखाचा जावो
------------------------------ ------------------------------
धार्मिक स्तोत्रे , मंत्र , अध्याय आणि इतर धार्मिक माहिती साठे अवश्य भेट द्या
८ ऑगस्ट, २०१५
३१ जुलै, २०१५
२५ जुलै, २०१५
जातां पंढरीस सुख वाटे जीवा
जातां पंढरीस सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥ ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥ ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर । ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥ सेना म्हणे खूण सांगितली संती । या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
२४ जुलै, २०१५
२१ जुलै, २०१५
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाईं रे । क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा हार मिरविती गळां । टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥ वर्णअभिमान विसरली याती एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥ होतो जयजयकार गर्जत अंबर मातले हे वैष्णव वीर रे । तुका ह्मणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥४॥
२० जुलै, २०१५
१८ जुलै, २०१५
चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी॥
|
१७ जुलै, २०१५
१६ जुलै, २०१५
अभंगवाणी - पावलो पंढरी
पावलों पंढरी वैकुंठभुवन । धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥ पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलों ॥३॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥४॥ पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥ पावलों पंढरी आपुले माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥६॥
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

















