|
सिटी हायस्कुल सांगली , वंदनीय गुरुजन
गुरु पोर्णीमा . गुरु -शिष्याच्या नात्यातील एक महत्वाचा दिवस. या सोहळ्याची ओळख साधारणतः प्रत्येकाला शाळेत होतेच . कारण आई - वडिलांनंतर पहिला गुरु प्रत्येकाला त्याच्या शाळेतच भेटतो .
शाळेत साजरा केलेला गुरु पोर्णीमेचा दिवस परत करता आला तर ? या कल्पनेतून सांगलीच्या सिटी हायस्कुल शाळेच्या दहावी ९१ च्या मित्र मंडळींनी आपल्या " मैत्रीचे अनोखे पर्व" या Whatsapp ग्रुपवर online गुरु पोर्णीमा दणक्यात साजरी केली . अनेक शहारात / देशात नोकरी, व्यवसाया निमित्य वास्तव्यास असलेले १०० राहून अधिक मित्र - मैत्रिणी ठरल्याप्रमाणे १९ जुलै ला सकाळी ९ वाजता ऑनलाईन जमले . त्याचवेळी शाळेतील गुरुजनांचा एक फोटो ग्रुपवर टाकण्यात आला आणि मग ओळीने सगळ्यांनी गुरुजनांना फुले देऊन त्याचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी अनेकांनी आपल्या प्रिय गुरुजनांच्या आठवणी सांगितल्या.
जुन्या मराठी चित्रपट कैवारीतील ' गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ! हे गाणे आपल्याच सिटी हायस्कुल ( सांगली) मध्ये चित्रित झाल्याची आठवण अनेकांनी सांगितली
' मैत्रीचे अनोखे पर्व, सोबतीला आपण सर्व '
सिटी हायस्कुल सांगली , दहावी १९९१ ( Whatsapp ग्रुप)
|
For blog article on whatsapp contact on 9819830770
No comments:
Post a Comment