February 17, 2019

गोंदवलेकर महाराज जन्मदिन

रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम
 आज माघ शु. द्वादशी प.पू. गोंदवलेकर महाराज जन्मदिन 🌺




 div di

February 12, 2019

मंगळ - हर्षल युती

मंगळ - मेष रास , हर्षल - मेष रास, दोघेही अश्विनी नक्षत्र चरण २ , अंशात्मक युतीत. परिणाम 🔥, दिल्लीत आग लागून १७ दुर्दैवी जीवांचा अंत




*संथ वाहते कृष्णामाई*

 महाबळेश्वरला साक्षात श्री महादेवाच्या सानिध्यात उगम पावून आपल्या इतर भगिनींबरोबर समाज कल्याणाचे व्रत घेऊन संथ पणे मार्गस्थ होणारी ही तपस्वीनी कृष्णा माई. आज रथसप्तमी पासून वाडीला तिचा उत्सव सुरु होतो. यानिमित्ताने तिच्यावरचे हे आठवणीतील गाणे

 *तीरावरल्या सुखदु:खांची जाणीव तीजला नाही*

 काय करणार बिचारी. तिला काय कमी दु:खं आहेत? गेली अनेक दशके शेरी नाल्याचा कचरा बिनबोभाट पचवून पुढे जातीय. आता तर मगरींच्या भितीने तिच्या अंगा, खांद्यावर बागडायला तिची लाडकी मुले ही फिरकत नाहीत. *नदी नव्हे ही निसर्ग निती, आत्मगतीने सदा वाहती* *लाभहानिची लवही कल्पना नाही तिज ठायी* प्रत्येक गोष्टीत स्वार्थी होत चालेल्या या माणसाने कृष्णेकडून शिकण्यासारखे बरंच काही आहे. महाबळेश्वरच्या निसर्गाच्या कुशीतून निघून, वाईला ढोल्या गणपतीचे दर्शन घेऊन, कराडला प्रेमाने आपल्या बहिणीला मिठीत घेऊन, औदुंबर सांगली हरिपूर मिरज ते नृसिंहवाडी तीर्थ क्षेत्रापर्यंतचा प्रवास आणि पुढे महाराष्ट्राची सिमा ओलांडून पुढे नागार्जुन सागर पर्यंतचा तिचा कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेला प्रवास कुणालाही अचंबीत करणारा

 *कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानती पूज्य देवता* *पाषाणाची घडवून मूर्ती, पुर्जीत कुणी नाही*

 देव, देवतांचे चिरंतन रुप म्हणजे ही कृष्णा माई. केवळ एखादे देऊळ बांधून त्यात मूर्तीची कायमस्वरूपी प्रतिष्ठापना करुन त्याचे बाजारीकरण हा प्रकार इथे नाही. सुसाट विकास करत जाणाऱ्या पुणे- बेंगलोर महामार्गावर भुईंज जवळ लागणारा कृष्णेचा पूल असो, सांगलीतील जुना आयर्विन किंवा नवा पूल असो, अंकली जवळचा पूल असो, नकळतपणे या कृ्ष्णेच्या वात्सल्याने मोठे झालेल्यांचे हात जोडले जातातच

 *सतत वाहते उदंड पानी, कुणीही वळवून नेई रानी* *आळशासही व्हावी कैसी, गंगा फलदायी?*

 केवळ दैवी देणगी असे न म्हणता विकासाचा दृष्टिकोन ठेऊन योग्य पध्दतीने योग्य ठिकाणी बांधलेली धरणे, काढलेले कालवे याजोगे ही पश्चिम महाराष्ट्राची गंगा तिन्हीत्रिकाळ वाहते आहे. 'असेल माझा हरी, तर देईल कृष्णा तिरी ' हा संकुचित विचार न केल्यानेच हे शक्य झाले आहे.

 *हे कृष्णामाई , तू अशीच संथपणे जनकल्याणासाठी वहात रहा*


🌺 अमोल केळकर 📝 १२/२/१९

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या