May 11, 2018

कर्नाटक निवडणूक अंदाज

एक अभ्यास म्हणून प्रश्ण सोडवतोय
भाजपला कर्नाटकात किती जागा मिळतील

पर्याय
१) ५० पेक्षा कमी
२) ५० ते ८०
३) ८० ते ११०
४) ११० पेक्षा जास्त

प्रश्ण मनात धरला ती तारिख, वेळ:- ११ मे २०१८, १५:३७
रुलिंग प्लॅनेट
लग्न - कन्या - बुध
नक्षत्र -  उ.भा - शनि ( वक्री)
रास - मिन - गुरु ( वक्री)
दिवस - शुक्रवार - शुक्र

निकाल लागे पर्यत शनी, गुरु वक्रीच असणार आहेत त्यामुळे ते रुलिंग मधे पकडायला हरकत नाहीत.

बुध = ९
शनी = ३
गुरु = ३
शुक्र = ९
बेरीज = २४

एकंदर पर्याय ४
२४/४ = ६ बाकी शून्य
म्हणजे शेवटचा पर्याय ४) हे उत्तर
🌷

टिप: बुध रुलिंग मधे आल्याने उत्तर चुकण्याची शक्यता 😁

वक्री ग्रह वगळून विचार केला तर पर्याय २)

Expert comment please 😊

May 5, 2018

सायकल सायकल

सायकल 🚲

मंडळी नमस्कार 🙏🏻

काल ' सायकल ' हा मराठी सिनेमा पाहिला. अगदी fist day,  first show नाही पण first day last show तरी पाहिला.
पण जेंव्हा असा सिनेमा येणार असे ऐकले होते तेंव्हा पासूनच हा सिनेमा नक्की पहायचे असे ठरवले होते. कारण हेच लहानपणापासून सायकल बद्दल असणारा ' जिव्हाळा '. लहानपणी सायकल चालवली नाही असा कोणी असेल असे मला तरी वाटत नाही. 

तर या सिनेमाचा नायक ' केशव' याची ही एक सायकल होती.ती त्याला त्याच्या आजोबांकडून मिळाली होती. फार फार जपायचा तिला,  कुणालाही द्यायचा नाही. एकदा गावात संगीत सौभद्र चा प्रयोग पाहण्यात सगळे  मग्न असताना दोन चोर येतात आणी काही दागिने, देव वगैरे चोरतात.  ते चोरून जात असताना गावातील कुत्री त्यांच्या मागे लागतात आणी मग त्यांच्या पासून बचावासाठी केशवच्या दारातली सायकल घेऊन ते पळतात.  आणी मग पुढे कथा/ सिनेमा रंगत जातो.

जुन्या काळात, कोकणातील एका गावाची पार्श्वभूमी यात आहे. निसर्गाचे सुंदर दर्शन तर होतेच पण ' माणुसकी ' पूर्वी घरोघरी कशी नांदायची हे ही दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला असे वाटते. नाही म्हणजे सिनेमात थोडी जास्त गाणी टाकून( १ एच गाणे आहे)  सिनेमाची लांबी वाढवता आली असती. पण सायकल चोरीची कथा असून एक ही पोलीस न दाखवता कथा पूर्ण करणे हे मराठी सिनेमातच घडू शकते.

आता जरा  जास्त interestinng.  
केशव हा त्या गावचा प्रसिद्ध जोतिषी. पंचक्रोशीत त्याची ख्याती. त्या काळी जोतिषाला किती मान होता, जोतिषी ही किती निस्वार्थी पणे या ज्ञानाचा उपयोग करायचे हे नक्कीच पाहण्यासारखे. 
 'माणूसकी' बरोबरच ' 'मानसशास्त्राचे ' उत्तम धडे हा सिनेमा देतो.  केवळ पत्रिकेतील ग्रह,  तारे काय सांगत आहेत हे पहात असताना वाईट घडणार असे पत्रिकेत दिसत असतानाही त्या जातकाला मनाने उभारी कशी द्यायची हे केशवने ( हृषिकेश जोशी)   छानच रंगवलय. पण त्याचवेळी स्वत: आपण जोतिषी असून आपल्या हरवलेल्या / चोरीला गेलेल्या सायकलचा  आपण छडा लावू शकत नाही ही घालमेल ही उत्तम जमली आहे. 
So जोतिषी ही माणूसच आहे. एखाद्यी वाईट वेळ त्याच्याही  वाट्याला येते, अशावेळी तो मनासारखे consulting करु शकत नाही, त्याचेही लक्ष लागत नाही, जोतिष शास्त्र म्हणजे थोतांड आहे हा समज पूर्वीही होता, जोतिषाला विरोध जवळच्या माणसांकडूनही  होत असतो या अगदी बारीक सारिक गोष्टी टिपण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. 

जोतिषी नायक असलेला हा मराठीतील पहिलाच सिनेमा असावा.  एकच गोष्ट खटकणारी वाटली ती म्हणजे एक म्हातारी मरणाला टेकली असताना 'वैद्याला' बोलवण्याएवजी केशव ' जोतिषाला' बोलवले जाते.

सिनेमाचा शेवट ही मानवी नात्यातील एका अनोख्या पैलू ने होतो

So summary

तुम्ही जोतिषी असाल तर हा सिनेमा पहाच

तुमच्या मनात जोतिषी / किंवा या शास्त्राबद्दल भ्रामक कल्पना असतील तर हा सिनेमा पहाच

सरळ , सोपा, साधा सिनेमा कसा असतो हे पहायचे असेल तर हा सिनेमा पहा

माणुसकी, कोकण,  कोकणी माणसांची आपुलकी काय असते हे पहाण्यासाठी हा सिनेमा पहा

'एलिझाबेद एकादशी ' ची आठवण घेण्यासाठी हा सिनेमा पहा

सोज्वळ भाऊ कदम पहायचाय? मग बघाच हा सिनेमा😁

लहानपणी सायकल चालवलीय? परत अनुभवायची असेल तर हा सिनेमा पहाच

📝अमोल ५/५/१८
🎬🚲

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या