|
|
|
|
|
|
|
श्री
गणेशाय नमः । जयजयाजी करुणाघना । जयजयाजी अघशमना । जयजयाजी परमपावना । दीनबंधो
जगदगुरु ॥१॥ |
आपुल्या
कृपे निश्चित । त्रयोदश अध्यायापर्यंत । वर्णिले स्वामी चरित्रामृत । आता पुढे
वदवावे ॥२॥ |
|
|
आपुल्या
कथा वदावया । बुद्धी देई स्वामीराया । चरित्र ऐकोनी श्रोतया । संतोष होवो बहुसाळ
॥३॥ |
|
|
कैसी
करावी आपुली भक्ती । हे नेणे मी मंदमती । परी प्रश्न करिता श्रोती । अल्पमती
सांगतसे ॥४॥ |
|
|
प्रातः
काळी उठोन । आधी करावे नामस्मरण । अंतरी घ्यावे स्वामीचरण । शुद्ध मन करोनी ॥५॥ |
|
|
प्रातः
कर्मे आटपोनी । मग बैसावे आसनी । भक्ती धरोनी स्वामीचरणी । पूजन करावे विधियुक्त
॥६॥ |
|
|
एकाग्र
करोनी मन । घालावे शुद्धोदक स्नान । सुगंध चंदन लावोन । सुवासिक कुसूमे अर्पावी
॥७॥ |
|
|
धूप
- दीप - नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध । अर्पावे नाना खाद्य ।
नैवेद्याकारणे स्वामींच्या ॥८॥ |
|
|
षोडशोपचारे
पूजन । करावे सदभावे करुन । धूप - दीपार्ती अर्पून । नमस्कार करावा ॥९॥ |
|
|
|
जोडोनिया
दोन्ही कर । उभे रहावे समोर । मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र । नाममंत्र
श्रेष्ठ पै ॥१०॥ |
|
|
, |
आजानुबाहू
सुहास्यवदन । काषायवस्त्र परिधान । भव्य आणि मनोरम । मूर्ती दिसे साजिरी ॥११॥ |
|
|
मग
करावी प्रार्थना । जयजयाजी अघहरणा । परात्परा कैवल्यसदना । ब्रह्मानंदा यतिवर्या
॥१२॥ |
|
|
जयजयाजी
पुराणपुरुषा । लोकपाला सर्वेशा । अनंत ब्रह्मांडाधीशा । वेदवंद्या जगदगुरु ॥१३॥ |
|
|
|
सुखधामनिवासिया
। सर्वसाक्षी करुणालया । भक्तजन ताराया । अनंतरुपे नटलासी ॥१४॥ |
|
|
|
तू
अग्नि तू पवन । तू आकाश तू जीवन । तूची वसुंधरा पूर्ण । चंद्र सूर्य तूच पै ॥१५॥ |
|
|
|
तू
विष्णू आणि शंकर । तू विधाता तू इंद्र । अष्टदिकपालादि समग्र । तूच रुपे नटलासी
॥१६॥ |
|
|
|
कर्ता
आणि करविता । तूच हवी आणि होता । दाता आणि देवविता । तूच समर्था निश्चये ॥१७॥ |
|
|
जंगम
आणि स्थिर । तूच व्यापिले समग्र । तुजलागी आदिमध्याग्र । कोठे नसे पाहता ॥१८॥ |
|
|
|
असोनिया
निर्गुण । रुपे नटलासी सगुण । ज्ञाता आणि ज्ञान । तूच एक विश्वेशा ॥१९॥ |
|
|
|
वेदांचाही
तर्क चाचरे । शास्त्रांतेहि नावरे । विष्णू शंकर एकसरे । कुंठित झाले सर्वहि
॥२०॥ |
|
|
|
मी
केवळ अल्पमती । करु केवी आपुली स्तुती । सहस्त्रमुखही निश्चिती । शिणला ख्याती
वर्णिता ॥२१॥ |
|
|
दृढ
ठेविला चरणी माथा । रक्षावे मजसी समर्था । कृपाकटाक्षे दीनानाथा । दासाकडे पहावे
॥२२॥ |
|
|
आता
इतुकी प्रार्थना । आणावी जी आपुल्या मना । कृपासमुद्री या मीना । आश्रय देईजे
सदैव ॥२३॥ |
|
|
पाप
ताप आणि दैन्य । सर्व जावो निरसोन । इहलोकी सौख्य देवोन । परलोकसाधन करवावे ॥२४॥ |
|
|
दुस्तर
हा भवसागर । याचे पावावया पैलतीर । त्वन्नाम तरणी साचार । प्राप्त होवो मजला ते
॥२५॥ |
|
|
आशा
मनीषा तृष्णा । कल्पना आणि वासना । भ्रांती भुली नाना । न बाधोत तुझ्या कृपे
॥२६॥ |
|
|
|
किती
वर्णू आपुले गुण । द्यावे मज सुख साधन । अज्ञान तिमिर निरसोन । ज्ञानार्क हदयी
प्रगटो पै ॥२७॥ |
|
|
शांती
मनी सदा वसो । वृथाभिमान नसो । सदा समाधान वसो । तुझ्या कृपेने अंतरी ॥२८॥ |
|
|
|
भवदुःखे
हे निरसो । तुझ्या भजनी चित्त वसो । वृथा विषयांची नसो । वासना या मनाते ॥२९॥ |
|
|
|
सदा
साधु - समागम । तुझे भजन उत्तम । तेणे होवो हा सुगम । दुर्गम जो भवपंथ ॥३०॥ |
|
|
|
व्यवहारी
वर्तता । न पडो भ्रांती चित्ता । अंगी न यावी असत्यता । सत्य विजयी सर्वदा ॥३१॥ |
|
|
|
आप्तवर्गाचे
पोषण । न्याय मार्गावलंबन । इतुके द्यावे वरदान । कृपा करुनी समर्था ॥३२॥ |
|
|
|
असोनिया
संसारात । प्राशीन व नामामृत । प्रपंच आणि परमार्थ । तेणे सुगम मजलागी ॥३३॥ |
|
|
|
ऐशी
प्रार्थना करिता । आनंद होय समर्था । संतोषोनि तत्त्वता । वरप्रसाद देतील ॥३४॥ |
|
|
|
गुरुवारी
उपोषण । विधियुक्त करावे स्वामीपूजन । प्रदोषसमय होता जाण । उपोषणे सोडावे ॥३५॥ |
|
|
तेणे
वाढेल बुद्धी । सत्यसत्य हे त्रिशुद्धी । अनुभवाची प्रसिद्धि । करिताती
स्वामीभक्त ॥३६॥ |
|
|
|
श्री
स्वामी समर्थ । ऐसा षडाक्षरी मंत्र । प्रीतीने जपावा अहोरात्र । तेणे सर्वार्थ
पाविजे ॥३७॥ |
|
|
|
ब्राह्मणा
क्षत्रियांदिका लागोनी । मुख्य जप हा चहूवर्णी । स्त्रियांनीही निशिदिनी । जप
याचा करावा ॥३८॥ |
|
|
प्रसंगी
मानसपूजा करिता । तेहि प्रिय होय समर्था । स्वामीचरित्र वाचिता ऐकता । सकल दोष
जातील ॥३९॥ |
|
कैसी
करावी स्वामी भक्ती । हे नेणे मी मंदमती । परी असता शुद्धचित्ती । तेची भक्ती
श्रेष्ठ पै ॥४०॥ |
|
|
आम्ही
आहो स्वामी भक्त । मिरवू नये लोकात । जयासी भक्तीचा दभ व्यर्थ । निष्फळ भक्ती
तयाची ॥४१॥ |
|
|
दंभ
षोडशोपचारे पूजिता । परी प्रिय नव्हेचि समर्था । भावे पत्र - पुष्प अर्पिता ।
समाधान स्वामीते ॥४२॥ |
|
|
जयाजयाजी
आनंदकंदा । जयाजयाजी करुणासमुद्रा । विष्णू शंकराचिया छंदा । कृपा करोनी पुरवावे
॥४३॥ |
|
श्री
स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त ।
चतुर्दशोऽध्याय गोड हा ॥४४॥ |
|
श्रीरस्तु
। शुभं भवतु ॥ |
|
|
|
|
|
|
|
|
|
No comments:
Post a Comment