December 28, 2015

संकष्टी चतुर्थी

श्री  गणेशाय  नम :!


आज संकष्टी चतुर्थी 
 वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची  माहिती संकलीत करण्याच्या  उद्देशाने चालू केलेल्या   या लेखन मालेच्या तिस-या  भागात  आज आपण माहिती घेऊ  हेदवी  ( गुहागर  )   येथील  गणपतीचे .

 ( यापूर्वीचा   ' तासगावचा   गणपती ' वरचा लेख इथे वाचू शकाल

पेशवे काळातील हेदवी येथील गणपती मंदिर वेळणेश्वरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे . मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते  पूर्वी हे गाव जास्त प्रसिद्ध नव्हते मात्र दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे.
श्री दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल असे सांगण्यात येते कि, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. त्यांनी पेशवे यांची पुणे येथे भेट घेतली. केळकर स्वामींनी पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी १ लाख रुपये दिले. त्या पैशातून केळकर स्वामींनी हेदवी येथे हे मंदिर उभारले. मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते.
अशी हि भक्तांच्या हाकेला धावणारी वैशिष्यपूर्ण मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे अधिपत्य करणाऱ्यानाच असतो असा पूर्वापार संकेत आहे. त्यामुळे पेशवेकाळात अशा मूर्त्या फार कमी तयार केल्या गेल्या. मंदिराच्या उजव्या कोनाडयात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती हि विशेष रुपातली आहे. मूर्तीच्या बाजुला जय-विजय असून मूर्ती गरुडारुढ आहे. याचा अर्थ असा कि श्री विष्णू भगवान भक्ताची हाक ऐकताच त्याच्या मदतीला जाण्यास सिद्ध आहे. टप्याटप्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते.
संकलीत माहिती : मायबोली संकेतस्थळ ( लेखक - भ्रमर ) 
संकलन : अमोल केळकर 

December 21, 2015

दत्ताची आरती आणि इतर अभंग,गाणी

दत्त  जयंती ( २४ डिसेंबर )  निमित्य -  दत्ताची आरती  आणि इतर  अभंग,गाणी  आपल्या संगणकावर / मोबाईलवर उतरवून घ्या .  
( संग्रहीत : देवा तुझ्या द्वारी आलो / www.kelkaramol.blogspot.in )

दत्ताची आरती 


दिगंबरा  दिगंबरा 

गुरुचरित्राचे करावे पारायण 


गुरु महाराज गुरु जय जय 


दत्तासी गाईन 

धन्य धन्य हो प्रदक्षिणा 

श्रीपाद वल्लभ दिगंबरा :-


दत्त नामाचा लागो छंद :-

दत्त दिगंबर  दैवत माझे :-


दत्त दत्त नामाचा महिमा 

दत्ताचा प्रसाद 


निघालो घेऊन दत्ताची पालखी 


निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||

रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||

सात जन्माचि हो लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||

वात वळणाची जवालागे ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||

निघालो घेवून दत्ताची पालखी

गीता जयंती

आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीताजयंती, म्हणजे आपण हिंदू ज्या ग्रंथाला आपला धर्मग्रंथ म्हणतो त्या भगवद्गीतेची जयंती.कुरुक्षेत्रावर याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वेद आणि उपनिषदे यांचे सार सांगितले, आणि ते तत्वज्ञान म्हणजे 'भगवद्गीता' हिंदू समाजाने धर्मग्रंथ म्हणून स्विकारला आहे...!


आज परिस्थिती अशी आहे की शाश्वत तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीचा आणि पर्यायाने भगवद्गीतेचा अभ्यास जगभरात अनेक विद्वान करतात आणि इथे अनेक हिंदुंनाच गीतेमधे किती श्लोक आहेत ह्याचासुद्धा पत्ता नाही...! त्यात अगदी हिंदुत्वाचे डिंडिम वाजवणारे सुद्धा अनेक जण असतील !
आपला समाज आपल्याच अमूल्य तत्वज्ञानाकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो हे आपल्या समाजाचे पर्यायाने देशाचे दुर्दैव ! एक रूढ़ असलेला गैरसमज म्हणजे हे वृद्धापकाळात वाचन करायचे तत्वज्ञान आहे; हा समज फ़क्त आपल्या हिंदू समाजातच रुजला आहे !
खरे तर तरुण वयातसुद्धा भगवद्गीते सारखा अनमोल मार्गदर्शक  ग्रंथ नाही हे निखळ सत्य आपण तरुणांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे !
त्या दृष्टीने शाळा आणि कॉलेज जीवनात आणि नंतर सुद्धा भगवद्गीतेचा सार्थ* ग्रंथ अभ्यासल्यास आपल्या व्यक्तिगत आणि सामजिक अनेक समस्यांचे निराकरण सहज शक्य होईल !
केवळ ७०० श्लोक असलेला हा ग्रंथ आपल्या समाजाने अभ्यासणे हे भारताला उन्नतीकडेच नेईल हे निश्चित !
**
पुढल्या आठवड्यात ज्या संख्येने आवड,फॅशन म्हणून लाल टोप्या घातलेले छोटे आणि मोठे हिंदू बघायला मिळतील तितकेच किंबहुना त्याहुन जास्त भगवद्गीता वाचणारे अभ्यासणारे भारतीय जेंव्हा बघायला मिळतील तो सुदिन !
सण हवे ते साजरे करा पण आपल्या संस्कृतीची मुळं जिथे आहेत ती घट्ट राहतील हे सुद्धा बघणं आवश्यक आहे !
त्यात लज्जास्पद काहीही नाहीच उलट आपण गीता अभ्यासतो हे अभिमानाने सांगण्यासारखे आहे.
भगवद्गीतेचे लहानसे पुस्तक घेतल्यास त्यातही श्लोकाखाली संशिप्त अर्थ असतो आणि पुढे अभ्यासण्यासाठी विस्तृत अनेक विद्वांनाची विवेचने भाष्ये उपलब्ध आहेत !
भगवद्गीता संत ज्ञानेश्वरानी (ज्ञानेश्वरी) विस्तृतरूपात मराठी माणसासाठी लिहीली तशीच एका संस्कृत श्लोकाला एक मराठी श्लोक या साच्यात विनोबा भावे यांनी गीताई सुद्धा लिहीली !
अगदी शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक या दोघांनी याच भगवद्गीतेवर  आपापली भाष्ये लिहिली आहेत ! लोकमान्य टिळकांनी तर आपली मंडाले येथील तुरुंगवासातील वेळ या गीतारहस्य लेखनासाठी उपयोगात आणला !
आपण भारतीयांनी हा अनमोल ठेवा अभ्यासला पाहिजे.. नित्य जीवनात तो आपोआपच उपयोगात येईल  !
गीताजयंती निमित्ताने भारतियांनी गीताभ्यास चालू केला गेला तर गीताजयंती आपोआपच साजरी होईल !
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन: |
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||
(सर्व उपनिषदे ह्याच गाई, श्रीकृष्ण हाच त्यांचे दूध काढणारा, अर्जुन(आणि गीताभ्यास करणारे) हा ते दूध प्राशन करणारा भोक्ता (जणु वासरुच) आणि त्या गाईंचे दूध म्हणजे गीतारूपी अमृत.)
सर्वांना भगवद्गीता जयंती निमित्त शुभेच्छा !


हर्षद बर्वे.

December 8, 2015

दत्तजयंती

दत्तजयंती  - २४/१२/१५

२०१६ सालातील प्रमुख धार्मिक दिवस

२०१६ सालातील  प्रमुख  धार्मिक  दिवस 

१५ जानेवारी  - मकर संक्रांत -  ( रविचा मकर राशीत प्रवेश )
८ फेब्रुवारी - सोमवती अमावस्या
११ फेब्रुवारी - श्री गणेश जयंती 
१२ फेब्रुवारी - वसंत पंचमी
१४ फेब्रुवारी - रथ सप्तमी ( रविवार )
२३ फेब्रुवारी - गुरु प्रतिपदा
१ मार्च - श्री गजानन महाराज प्रकट दिन 
३ मार्च - श्री रामदास नवमी
७ मार्च - महाशिवरात्री ( सोमवार )
९ मार्च - सूर्य ग्रहण
२३ मार्च - हुताशनी पौर्णिमा  ( होळी )
२५ मार्च -श्री  तुकाराम बीज
२८ मार्च - रंगपंचमी
२९ मार्च - श्री  एकनाथ षष्ठी
८ एप्रिल - गुढीपाडवा 
९ एप्रिल - श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 
१४ एप्रिल - गुरु पुष्यामृत योग ( १४. नंतर )
१५ एप्रिल - श्रीराम नवमी
१९ एप्रिल - श्री महावीर जयंती
२२ एप्रिल - श्री हनुमान जयंती
५ मे  - श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी
८ मे  - श्री परशुराम जयंती
९ मे  - अक्षय तृतीया 
११ मे - श्री आद्य शंकराचार्य जयंती
१२ मे  - गुरु पुष्यामृत योग
२० मे  - श्री नृसिंह जयंती
२१ मे  - बौध्द पौर्णिमा
४ जून - शनैश्चर जयंती ( शनी अमावास्या ) 
९ जून  - गुरु पुष्यामृत योग ( सकाळी ७. पर्यंत )
१३ जून - महेश नवमी
१९ जून - वट पौर्णिमा
१९ जुलै  - गुरु पौर्णिमा
२ ओगस्ट - दीपपूजन
७ ऑगस्ट - नागपंचमी
९ ऑगस्ट - सीतला सप्तमी
१० ऑगस्ट- सिंहस्थ समाप्ती
११ ऑगस्ट - गुरु चा कन्या राशीत प्रवेश (  नरसोबावाडी कन्यागत पर्व सुरु )
१२ ऑगस्ट - वरदलक्ष्मी व्रत
१४ ऑगस्ट - पुत्रदा एकादशी
१७ ऑगस्ट - नारळी पौर्णिमा
१८ ऑगस्ट - रक्षा बंधन
२४ ऑगस्ट - श्रीकृष्ण जयंती
३१ ऑगस्ट - पिठोरी अमावस्या
१ सप्टेंबर - बैल पोळा
५ सप्टेंबर - श्री गणेश चतुर्थी 
६ सप्टेंबर - ऋषीपंचमी
९ सप्टेंबर - गौरी पूजन
१५ सप्टेंबर - अनंत चतुर्दशी
२० सप्टेंबर - भरणी श्राध्द
३० सप्टेंबर - सर्वपित्री अमावास्या
१ ऑक्टोंबर - घटस्थापना
६ ऑक्टोंबर - ललिता पंचमी
११ ऑक्टोंबर - दसरा 
१५ ऑक्टोंबर - कोजागिरी पौर्णिमा
२९ ऑक्टोंबर - नरक चतुर्दशी
३० ऑक्टोंबर - लक्ष्मी पूजन
३१ ऑक्टोंबर - दिवाळी पाडवा
५ नोव्हेंबर - पांडव पंचमी
१४ नोव्हेंबर -  त्रिपुरारी पौर्णिमा
२१ नोव्हेंबर -कालभैरव जयंती
२८ नोव्हेंबर - सोमवती अमावस्या
३० नोव्हेंबर - देव दीपावली
१३ डिसेंबर - दत्त जयंती 

December 7, 2015

लग्नाचे मुहूर्त २०१६

२०१६ लग्नाचे  मुहूर्त : ( संदर्भ दाते पंचांग )

जानेवारी २०१६ - १, २, ३ ( रविवार ), ४ , १७ ( रविवार) , २० , २१ , २६ , २८ , २९
                           ३० , ३१ ( रवि )
फेब्रुवारी २०१६ - १,२,३,४,५,११,१३,१६,१७,२२,२४ ,२५,२७ , २८ (रवि )

मार्च २०१६ - १,३,५,६ ( रवि) ,११,१४,१५,२० ( रविवार ) , २१, २५ ,२८, ३१

एप्रिल २०१६ - १, २, ४, १६, १७ (रवि), १९,२२,२३,२४ (रवि), २६,२७,२९,३०

मे २०१६ - १ (रवि)

जुलै २०१६ - ७, १० (रवि) , ११, १२, १३

नोव्हेंबर २०१६ - १६, २१, २३ , २५, २६

डिसेंबर २०१६ - १,३, ४ (रवि) , ५,६,८,१४,१८ (रवि), १९, २०, २४


संग्रहीत :
अमोल केळकर सीबीडी बेलापूर नवी मुंबई ९८१९८३०७७० a.kelkar9@gmail.com

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या