Showing posts with label प्रदोष. Show all posts
Showing posts with label प्रदोष. Show all posts

July 20, 2013

प्रदोष

आमचे फेसबुकवरील दोस्त श्री मंदार संत यांनी प्रदोष व्रता  बद्दल  दिलेली  ही उपयुक्त माहिती त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.

अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की,
--संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष'
--ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि
--शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष'
अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय
--आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष'
अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि

'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।

रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥

उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।

ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'

अशी प्रार्थना करुन भोजन करावे.

सूर्यास्ताचे वेळी स्नान करून लाल जास्वंद, लाल गंध आणि धूपदीप आदी उपचारांनी पूजा करून प्रदोषकाळी एकवेळ जेवावे. जर या दिवशी 'शनिवार' असेल तर अधिक चांगले.

प्रदोषकाळी म्हणजे संधिकाली भ. शंकरांच्या जवळ यक्ष, गंधर्व, उरग, सिद्ध, साध्य, विद्याधर, देव, अप्सरा आणि भूतगण जमलेले असतात, म्हणून यावेळची पूजा सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे.

संदर्भ : कालनिर्णय , खापरे , दाते पंचांग, लाटकर पंचांग , शर्मा सारिणी

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या