December 28, 2018

हनुमान चालिसा , बजरंग बाण , हनुमान अष्टक

हनुमान चालिसा , बजरंग बाण  , हनुमान अष्टक  यांची ध्वनीफीत असणारं  हे एक चागले ऍप आहे

ते इथून घेऊ  शकता
https://play.google.com/store/apps/details?id=adsimdsfttt.com.hanumanchalisa

December 26, 2018

हनुमान अष्टमी

हनुमान अष्टमी : -
 ( बजरंगबलीचा  विजय उत्सव ) 

पौष महिन्यातील कृष्ण अष्टमीला " हनुमान अष्टमी " म्हणतात.  यंदा ही अष्टमी २९ डिसेंबरला आहे.  या अष्टमीबाबत आपल्याकडे विशेष  माहिती नाही . एका हिंदी संकेतस्थळावर   याबद्दल माहिती मिळाली  जी नवीन वाटली म्हणून  ती  इथे आहे तशी देत आहे 

हनुमान अष्टमी का यह पर्व विजय उत्सव के रूप में भी मनाया जाता है। जो भक्त इस खास मौक पर हनुमान जी का दर्शन और उनकी पूजा आराधना करता है उसकी हर मनोकामना पूरी होती है। शास्त्रों में हनुमान अष्टमी को हनुमानजी का विजय उत्सव मानने के पीछे प्रसंग है। जिसके अनुसार भगवान राम और रावण के बीच युद्ध के समय जब अहिरावण ने भगवान राम और लक्ष्मण को कैद करके पाताल लोक में ले जाकर दोनों की बलि देना चाहता था, तब भगवान हनुमान ने उसे युद्ध में हरा कर और उसका वध कर भगवान को छु़ड़ाया था। युद्ध के दौरान ज्यादा थक जाने के कारण हनुमानजी पृथ्वी के नाभि स्थल अवंतिका में आराम किया था। हनुमान जी बल के कारण भगवान राम प्रसन्न होकर आशीर्वाद दिया की पौष कृष्ण की अष्टमी को जो भी भक्त पूजा करेगा उसके सारे  कष्ट दूर हो जाएंगे। ऐसी मान्यता है तभी से इस दिन विजय उत्सव का पर्व मनाया जाता है । हनुमान अष्टमी के दिन हनुमान मंदिर जा कर हनुमानजी के दर्शन करना चाहिए और इस दिन हनुमान जी के 12 नामों का जप करना चाहिए ऐसा करने से 12 नामों का जप करने से आपकी हर मनोकामना पूरी हो जाएगी।

दुस-या एका संकेतस्थळावर  अशी माहिती दिली आहे 

 शनि ग्रह से पीड़ित जातकों को हनुमान आराधना करना चाहिए। बाधा मुक्ति के लिए श्रद्घालु हनुमान यंत्र स्थापना के साथ बजरंग बाण या हनुमान चालीसा का पाठ कर सकते हैं। इससे निश्चित ही हनुमानजी प्रसन्न होते है।

बजरंग बाण  खालील👇🏻
http://kelkaramol.blogspot.com/2013/02/blog-post_2.html?m=1

 लिंकवर वाचावयास  मिळेल .

यात  एके ठिकाणे असं ही  म्हणलं आहे की 
 ' हनुमान अष्टमी ' ही पूर्वी फक्त उज्जैन मध्ये साजरी व्हायची , आता ती  अनेक ठिकाणी साजरी  होते . 

 हनुमानाची १२ नावे असलेली हनुमान स्तुती इथे देत आहे 

हनुमान द्वादशनाम स्तुति
हनुमानअंजनीसूनुर्वायुपुत्रो महाबल:।
रामेष्ट: फाल्गुनसख: पिंगाक्षोअमितविक्रम:।।
उदधिक्रमणश्चेव सीताशोकविनाशन:।
लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा।।
एवं द्वादश नामानि कपीन्द्रस्य महात्मन:।
स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले च य: पठेत्।।
तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भवेत्।
राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन।। 

खालील मंत्र ही म्हणावयास हरकत नाही 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने।।

साडेसातीत हनुमान उपासना सांगितली असल्याने  येत्या २९ तारखेला " हनुमान अष्टमीच्या" निमित्याने अवश्य  हनुमानाची आराधना करावी असे सांगावेसे वाटते म्हणून हे लेखन . 

वरील माहिती विविध संकेतस्थळावरून संग्रहित 


धर्म जागरण आणि धर्मजागृती ह्यातच माझे सौख्य सामावले आहे

December 14, 2018

दत्त जयंती - माहिती

दत्त जयंती बद्दल श्री शरद  उपाध्ये यांनी सांगितलेली माहिती इथे एका

श्री गुरुचरित्र पारायण-पद्धतीसौजन्य :यु ट्यूब 

दत्त उपासना ऑडिओ - ऍपआवडलेल्या धार्मिक ऍप  मध्ये  मी  याचा आवर्जून समावेश करेन . यात श्री दत्त गुरूंचे  सोळा  श्लोक  ध्वनीफीत रूपात आहेत.  ते असे 

१) ५२ श्लोकी गुरुचरित्र  -  वेळ  १०. ०५ मिनिटे 
२) श्री गुरुपादुका अष्टक   -  वेळ  ०३.१४ मिनिटे 
३) करुणा त्रिपदी   -  वेळ  ०४.०८ मिनिटे 
४) श्री दत्तात्रय स्तोत्र -१  -  वेळ  ०४.३९ मिनिटे 
५) श्री दत्त मंत्र १०८ वेळा   -  वेळ  १७.१६ मिनिटे 
६) अघोर कष्ट उद्धारण स्तोत्र   -  वेळ  ०२.१० मिनिटे 
७) श्री भृगुऋषी विरचित श्री दत्तस्तोत्र   -  वेळ  ०५.२४ मिनिटे 
८) श्री दत्त स्तोत्र   -  वेळ  ०२.४२ मिनिटे 
९) श्री दत्त स्तव स्तोत्र   -  वेळ  ०२.४० मिनिटे 
१०) श्री दत्तात्रय ध्यानमंत्र    -  वेळ  ०३.४२ मिनिटे 
११) श्री दत्तात्रय अपराध क्षमापन स्तोत्र     -  वेळ  ०३.०१ मिनिटे 
१२) श्री दत्तात्रय अष्टोत्तर शतनाम स्तोत्र     -  वेळ  ०४.५७ मिनिटे 
१३) श्री दत्तात्रय स्तोत्र -२  -  वेळ  ०४.४२ मिनिटे 
१४) श्री शंकराचार्य विरचित श्री दत्त अष्टकम  -  वेळ  ०४.०२ मिनिटे 
१५) श्री टेबे स्वामीकृत श्री दत्त स्तोत्र   -  वेळ  ०१.५८ मिनिटे 
१६) श्री टेबे स्वामीकृत श्री दत्तात्रेय  स्तोत्र   -  वेळ  ०२.३३ मिनिटे 

हे ऍप  उतरून घेतल्यानंतर  एखादा श्लोक एकाचा असेल तर डाउनलोड करा असा मेसेज येतो .  सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे एकदम सर्व श्लोक  उतरवून घेणे . यासाठी तुमच्या भ्रमणध्वनीत साधारण ५५ एमबी   जागा असणे आवश्यक 

पहिला श्लोक लावल्यानंतर  पुढचे सगळे श्लोक क्रमाने येतात आणि साधारण १ तास भक्तीरंगात रंगून जायला होते . श्री गुरुदेव दत्त 

श्रीराम पाठ

गुरुचरित्र ऑडिओ ऍप
दत्त जयंती  जवळ आली  की त्याच्या आजूबाजूला अनेक जण  ' गुरुचरित्राचे पारायण करतात ' हे पारायण करताना  जास्तीजास्त नियम कसे पाळता येतील हे पाहणे आवश्यक असते.  मात्र हे जे ऍप आहे ते यांच्यासाठी नाही . कारण  याचे वाचन शास्त्रोत्र बैठक घालून , पोथीतून वाचन अभिप्रेत आहे. 

मात्र काही कारणाने  ( वयोमानानुसार , फिरतीवर असणे, आजारी असणे  इ इ )  ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी हे ऑप उतरवून घ्यायला हरकत नाही 

हे ऍप  सुरु करताच  ' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ' चा श्रवणीय मंत्र  लागून राहतो .  त्यानंतर पुढे गेल्यावर  पारायण , करुणात्रिपदी , घोरकष्टोद्धरण  स्तोत्र हे पर्याय दिसतात . आपल्याला  हवा तो पर्याय घेऊन ध्वनीफित ऐकता येत्तात . ध्वनीफित निवडली की लागायला थोडा वेळ लागतो 

पण एकंदर हे ही दत्तभक्तांना उपयुक्त ऍप  आहे . ते इथून घेऊ शकता 

स्त्रियांनी  गुरुचरित्र वाचावे की नाही  हा ज्याच्या त्याचा श्रध्येचा प्रश्न असल्याने  अधिक या विषयात न गेलेले बरे 

गुरुदेव दत्त 


December 13, 2018

श्रीराम पाठ

श्री दत्तमहात्म्य कथांमृतसार - अँपकाही आवडलेली निवडक  धार्मिक अँप   द्यायचा विचार आहे . 

नुसती लिंक  न देता त्यात काय काय आहे ही ही द्यायचा प्रयत्न करेन जेणेकरून 
ते स्वतः:साठी उपयुक्त आहे की नाही हे  वाचणारा ठरवू शकेल 

येत्या २२ तारखेला दत्त जयंती आहे.  यानिमित्याने सुरवातीला या संबधीतच काही अँप 
देत आहे 

श्री दत्तमहात्म्य कथांमृतसार  अँप - परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे स्वामी )
यांनी १८२३  मध्ये या ग्रथाची रचना केली. त्यात श्री दत्त प्रभूंचे चरित्र तसेच  सहस्त्रार्जुन , परशुराम , अलर्क यदु, आयु यांसारख्या  दत्त भक्तांच्या महान  अद्भुत , रसाळ चरित्राचे वर्ण केले आहे. 
अनेक जण या ग्रथाचे घरोघरी पारायण करतात.  ही सगळी माहिती प्रस्तावनेत वाचून झाल्यानंतर मग ध्यानमंत्र दिला आहे. 

त्यानंतर १ ते ५१ अध्याय ( अवतरणिका ) आहेत . वाचायला सोपे असे हे अँप दत्तभक्तांना नक्की आवडेल 
December 4, 2018

गर्वहरण

गर्वहरण 

महाभारतात भीमाचे गर्वहरण ही ही एक कथा सगळ्यांना माहित असेल
ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी 

एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती.
भीमाने माकडाला शेपटी बाजूला घ्यायला सांगितले.  माकड म्हणाले मी आजारी आहे तेंव्हा तूच घे
भीम म्हणाला मी नाही तुझ्या घाणेरड्या शेपटीला हात लावणार.
माकड म्हणाले ठिक आहे तुझ्या हातातील गदेने तरी बाजूला करशील? 

भीमाने खुप प्रयत्न केला पण त्याला माकडाची शेपटी थोडीदेखील हलवता आली नाही. शेवटी तो माकडाला शरण गेला आणि हनुमानाने त्याला दर्शन देऊन त्याचे गर्व हरण केले. अशी ही कथा

ही कथा आठवली याचे कारण सध्या अनेक राजकीय नेत्यांना/ योगी/ मुनींना  हनुमान कुठल्या जातीचा आहे हे ठरवण्याची खुमखुमी आलेली आहे.

हनुनानाने असेच त्यांच्या मार्गात. वानररुपात येऊन बसावे.  जी जात किंवा ज्या जातीचा समुह वाटेतील शेपूट बाजूला करेल त्या जातीचा मी असे जाहीर करून जातीरुपी भिम जो सगळ्यांच्यात संचारलाय  त्याचे गर्वहरण करावे.


अनेक गोष्टी अशा आहेत की माणसांचे गर्विष्ठ भीमात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही आहे.
राजकीय नेते हे सहज दिसणारे उदाहरण. त्याखालोखाल अभिनेते, नायिका, खेळाडू,  वक्ते,     व्यवसायिक, लेखक, वक्ते इ.इ

मलावाटते प्रत्येकवेळी हे गर्वहरण  करायाला बजरंग बली पोचू शकत नाही म्हणून 'शनी' महाराजांबरोबर युती करुन ' साडेसातीचा फाॅर्म्यूला ' नियतीने केला असावा.

शनीचा फेरा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर माणसातील गर्वरुपी भीमाला परत माणूस बनवणे.

मारूती राया तुझी लीला अगाध आहे 🙏🏻🙏🏻🌺

📝४/१२/१८
देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.in

November 10, 2018

लक्ष्मी पूजन आणि विपर्यास

*लक्ष्मी पूजन आणि विपर्यास*

मंडळी,  गेले काही दिवस Whatsapp वर एक फोटो सगळीकडे फिरतोय. तुम्ही पण पाहिला असेलच. एक नवरोबा आपल्या बायकोला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ओवाळतोय आणि दोन विनोदाच्या स्माईली.

या वर माझ्या जे मनात आलय ते लिहितोय. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकेल

तर पहिला आक्षेप विनोदी स्माईलिंना. कारण हा विनोद म्हणून पाठवला असला तरी यातील आशय चांगला आहे.
( पण अर्थातच प्रत्येक वेळेला हिंदू धर्माच्या चालीरीतींवर चेष्टेच्या स्माईली/ विनोद पाठवणे हा आता नवीन रीतिरिवाज रुढ होतो आहे ही शरमेची गोष्ट)

तर आता चित्राचा आशय.
नवरोबा, घरची पूजा करुन नंतर आपल्या बायकोला पण ओवाळत आहेत. या मागची भावना माझ्यामते आज मी इथपर्यंत यशस्वी झालो ते तुझ्या सहकार्याने, तुझ्या पाठिंब्याने किंवा माझी जी भरभराट झाली आहे, व्यवासायात / नोकरीत यश मिळाले आहे,  श्रीमंती आली आहे ती तुझ्याच पायगुणाने  ( नशिबावर विश्वास नाही पण बायकोच्या पायगुणांवर आहे).
 तेंव्हा तूच माझी 'गृहलक्ष्मी' म्हणून मी तुझे 'औक्षण' करत आहे
 
👆🏻हा विचार म्हणून चांगला आहे यात शंका नाही. पण म्हणून लक्ष्मी पूजनाला बायकोला  लक्ष्मी समजून  ओवाळणे हा अंमळ परंपरेचा विपर्यास वाटतो / विडंबन वाटते.
आम्ही कसे आधुनिक,  जुन्या परंपरा कशा बुरसटलेल्या आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.

एखादी गोष्ट आवडली नाही पटली नाही, पर्यावरण पुरक नसेल, नासाडी होत असेल तर करु नका. उदा. सत्यनारायण करणे, दहीहंडीचे मनोरे लावणे , फटाके फोडणेे,  रंगपंचमी पाणी वाया घालवणे, डाॅल्बी वाजवणे, आपट्याची पाने देणे, आणि हो देवाला लाडू चढवणे इ.इ

पण निदान ज्या चालीरीती,  परंपरा म्हणून आहेत त्याचा विपर्यास तरी नको जो इथे या फोटोत दिसतो.

गृहलक्ष्मीला ( बायकोला) घरातील निर्णय घेताना मानाचे स्थान द्या, तिचे मत जाणून घ्या, तिला घरकामात मदत करा , स्वातंत्र्य द्या पण ही कसली लक्ष्मी पूजनाचा दिवशी तिलाच ओवाळायची वैचारिक घालमेल 
( इथे मुद्दाम दिवाळखोरी हा शब्द वापरलेला नाही)

आता समजा एखाद्याच्या दुर्दैवाने एखाद्याची परिस्थिती नाजूक झाली असेल, आर्थिक विवंचना असेल, कर्जे झाली असतील, नुकसान झाले असेल.  अशावेळी तो बायकोला ओवाळेल का?
तर अशा परिस्थितीत दोघांनी मिळून 'लक्ष्मी पूजन' करुन,  देवतेला स्मरून पुढील वाटचाल अधिक जोमाने करणे योग्य ठरणार नाही का?

 आपल्या धर्मात ज्या काही रीतीरिवाज , परंपरा आहेत ना त्यात नवी नवरी घरी आली की 
" लक्ष्मी पूजन" ( दिवाळीतले नव्हे) करतातच. 

त्यानंतर दोघांनी मिळून संसार करता करता अनेक चालीरीती , रितीरिवाज( जसे पाडवा, हरतालिका, वटपोर्णीमा, मंगळागौर इ इ) सांभाळत पुढे जायचे असते.
हे आमच्या आधुनिक  नारायणरावांना कळणार आहे का? 

नारायणी नमोस्तुSते 🙏🏻🌺
९/११/१८

September 13, 2018

संग्रहित जोतिष १

श्री गणेशाय नम:


रविशशिकुजबुधगुरुसितरविजगणेशान्प्रणम्य भक्त्त्यादौ!
वक्ष्येSहं  स्पष्टतरं प्रश्णज्ञानं हिताय दैवविदाम् !१!

रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र शनि व श्रीगणेशाला नमस्कार करून जोतिष्यांच्या हितासाठी मी हे प्रश्णज्ञान स्पष्ट करीत आहे

गणेशचतुर्थी
१३/९/१८

August 12, 2018

आश्लेषा नक्षत्र आणि Parker Solar Probe

जोतिष शास्त्रात  प्रत्येक नक्षत्रावर काय करावे हे फार पूर्वी  सांगितले आहे.  उदा. विहीर खणणे , खोदकाम  इ खालच्या दिशेने करावयाची कामे अधोगामी  नक्षत्रावर करावीत असे म्हणले आहे.  आता  असं असताना म्हणजे अधोगामी नक्षत्र असताना बरोबर उलटी गोष्ट   ' उपग्रह / यान याचे उड्डाण  ( जे अर्ध्वगामी आहे )  कारावे का ?

काल  आश्लेषा नक्षत्र होते जे अधोगामी आहे . तसेच बुधाचे नक्षत्र  आहे.  बुध  ग्रह एक गोष्ट परत परत घडवून आणतो . आणि  ज्याची  भीती होती तेच झाले

नासा ही संस्था काल  सूर्य ग्रहाच्या  अभ्यासातही एक यान अवकाशात पाठवणार होती. यापूर्वी ही नासाने अनेक क्षेपणास्त्रे / उपग्रह  याचे यशस्वी उड्डाण केले  आहे यात शंका नाही . त्यामुळे खरं तर यात काहीच वावगं नव्हतं पण  काल काही तांत्रिक गोष्टीमुळे उड्डाण लांबले

Liftoff of NASA's Parker Solar Probe, now is scheduled for 3:31 a.m. EDT, Aug. 12. The launch attempt planned for Aug. 11 was postponed due to a violation of a launch limit, resulting in a hold. Liftoff atop a United Launch Alliance Delta IV Heavy rocket will take place from Space Launch Complex 37 at Cape Canaveral Air Force Station. The mission will perform the closest-ever observations of a star when it travels through the Sun's atmosphere, called the corona. The probe will rely on measurements and imaging to revolutionize our understanding of the corona and the Sun-Earth connection.

https://www.nasa.gov/image-feature/new-launch-date-for-parker-solar-probe

थोडक्यात काय

काही जणांना  आपण किती मागासलेले आहोत  ग्रहण , अमावस्यां  यात गुरफटलेले आहोत  आणि अमेरिका वाले  किती पुढारलेले आहे वगैरे वगैरे यावर अती  विश्वास असतो  मात्र ग्रह तारे आपले काम व्यवस्थित  करता असतात 

May 11, 2018

कर्नाटक निवडणूक अंदाज

एक अभ्यास म्हणून प्रश्ण सोडवतोय
भाजपला कर्नाटकात किती जागा मिळतील

पर्याय
१) ५० पेक्षा कमी
२) ५० ते ८०
३) ८० ते ११०
४) ११० पेक्षा जास्त

प्रश्ण मनात धरला ती तारिख, वेळ:- ११ मे २०१८, १५:३७
रुलिंग प्लॅनेट
लग्न - कन्या - बुध
नक्षत्र -  उ.भा - शनि ( वक्री)
रास - मिन - गुरु ( वक्री)
दिवस - शुक्रवार - शुक्र

निकाल लागे पर्यत शनी, गुरु वक्रीच असणार आहेत त्यामुळे ते रुलिंग मधे पकडायला हरकत नाहीत.

बुध = ९
शनी = ३
गुरु = ३
शुक्र = ९
बेरीज = २४

एकंदर पर्याय ४
२४/४ = ६ बाकी शून्य
म्हणजे शेवटचा पर्याय ४) हे उत्तर
🌷

टिप: बुध रुलिंग मधे आल्याने उत्तर चुकण्याची शक्यता 😁

वक्री ग्रह वगळून विचार केला तर पर्याय २)

Expert comment please 😊

May 5, 2018

सायकल सायकल

सायकल 🚲

मंडळी नमस्कार 🙏🏻

काल ' सायकल ' हा मराठी सिनेमा पाहिला. अगदी fist day,  first show नाही पण first day last show तरी पाहिला.
पण जेंव्हा असा सिनेमा येणार असे ऐकले होते तेंव्हा पासूनच हा सिनेमा नक्की पहायचे असे ठरवले होते. कारण हेच लहानपणापासून सायकल बद्दल असणारा ' जिव्हाळा '. लहानपणी सायकल चालवली नाही असा कोणी असेल असे मला तरी वाटत नाही. 

तर या सिनेमाचा नायक ' केशव' याची ही एक सायकल होती.ती त्याला त्याच्या आजोबांकडून मिळाली होती. फार फार जपायचा तिला,  कुणालाही द्यायचा नाही. एकदा गावात संगीत सौभद्र चा प्रयोग पाहण्यात सगळे  मग्न असताना दोन चोर येतात आणी काही दागिने, देव वगैरे चोरतात.  ते चोरून जात असताना गावातील कुत्री त्यांच्या मागे लागतात आणी मग त्यांच्या पासून बचावासाठी केशवच्या दारातली सायकल घेऊन ते पळतात.  आणी मग पुढे कथा/ सिनेमा रंगत जातो.

जुन्या काळात, कोकणातील एका गावाची पार्श्वभूमी यात आहे. निसर्गाचे सुंदर दर्शन तर होतेच पण ' माणुसकी ' पूर्वी घरोघरी कशी नांदायची हे ही दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला असे वाटते. नाही म्हणजे सिनेमात थोडी जास्त गाणी टाकून( १ एच गाणे आहे)  सिनेमाची लांबी वाढवता आली असती. पण सायकल चोरीची कथा असून एक ही पोलीस न दाखवता कथा पूर्ण करणे हे मराठी सिनेमातच घडू शकते.

आता जरा  जास्त interestinng.  
केशव हा त्या गावचा प्रसिद्ध जोतिषी. पंचक्रोशीत त्याची ख्याती. त्या काळी जोतिषाला किती मान होता, जोतिषी ही किती निस्वार्थी पणे या ज्ञानाचा उपयोग करायचे हे नक्कीच पाहण्यासारखे. 
 'माणूसकी' बरोबरच ' 'मानसशास्त्राचे ' उत्तम धडे हा सिनेमा देतो.  केवळ पत्रिकेतील ग्रह,  तारे काय सांगत आहेत हे पहात असताना वाईट घडणार असे पत्रिकेत दिसत असतानाही त्या जातकाला मनाने उभारी कशी द्यायची हे केशवने ( हृषिकेश जोशी)   छानच रंगवलय. पण त्याचवेळी स्वत: आपण जोतिषी असून आपल्या हरवलेल्या / चोरीला गेलेल्या सायकलचा  आपण छडा लावू शकत नाही ही घालमेल ही उत्तम जमली आहे. 
So जोतिषी ही माणूसच आहे. एखाद्यी वाईट वेळ त्याच्याही  वाट्याला येते, अशावेळी तो मनासारखे consulting करु शकत नाही, त्याचेही लक्ष लागत नाही, जोतिष शास्त्र म्हणजे थोतांड आहे हा समज पूर्वीही होता, जोतिषाला विरोध जवळच्या माणसांकडूनही  होत असतो या अगदी बारीक सारिक गोष्टी टिपण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. 

जोतिषी नायक असलेला हा मराठीतील पहिलाच सिनेमा असावा.  एकच गोष्ट खटकणारी वाटली ती म्हणजे एक म्हातारी मरणाला टेकली असताना 'वैद्याला' बोलवण्याएवजी केशव ' जोतिषाला' बोलवले जाते.

सिनेमाचा शेवट ही मानवी नात्यातील एका अनोख्या पैलू ने होतो

So summary

तुम्ही जोतिषी असाल तर हा सिनेमा पहाच

तुमच्या मनात जोतिषी / किंवा या शास्त्राबद्दल भ्रामक कल्पना असतील तर हा सिनेमा पहाच

सरळ , सोपा, साधा सिनेमा कसा असतो हे पहायचे असेल तर हा सिनेमा पहा

माणुसकी, कोकण,  कोकणी माणसांची आपुलकी काय असते हे पहाण्यासाठी हा सिनेमा पहा

'एलिझाबेद एकादशी ' ची आठवण घेण्यासाठी हा सिनेमा पहा

सोज्वळ भाऊ कदम पहायचाय? मग बघाच हा सिनेमा😁

लहानपणी सायकल चालवलीय? परत अनुभवायची असेल तर हा सिनेमा पहाच

📝अमोल ५/५/१८
🎬🚲

April 8, 2018

७ एप्रिल २२१८

आज ७ एप्रिल २२१८

२०० वर्षापूर्वी आजच्याच दिवशी एका मराठी तरूणाने ब्राव्हो विजय स्वकीयांन विरूद्ध मिळवून दिला होता. त्या निमित्ताने आजच्याच दिवशी मुंबापुरीत 'विजय दिन' साजरा करण्यात येतो.

याचा इतिहास असा साधारण २०० वर्षांपुर्वी तेंव्हा भारत खंडात धर्मा वरुन, जाती वरुन लढाया होत असत.  कालानंतराने या लढाया शहरा शहरां मधे घ्यायचे  या लढायांचे एक प्रणेते ' मोदी ' यांनी ठरवले.  फार पूर्वीचे राजे ' कोंबड्यांच्या झुंजी लावत असत. पण त्याकाळी एका काळवीट प्रकरणात  वाघाला शिक्षा झाल्याचे  निमित्य होऊन ही प्रथा बंद पडून नंतर माणसांच्यातच या लढाया होऊ लागल्या.

त्यातील एक रोहमर्षक लढत मुंबई विरूद्ध चेन्नई त्याकाळी मुंबईत झाली होती. तामिळ संघाकडून खेळणाऱ्या के धार नामक खेळाडूने आपले एक एक वीर धारातीर्थी पडत असतानाच मोक्याच्या क्षणी स्वकियांच्या मुंबई संघाला पाणी पाजले होते/ हरवले होते.
आपल्या धोनी कानांनी  ' के धार जा- धाव ' असे शेवटचे परवलीचे शब्द ऐकताच ' हर हर महादेव ' म्हणत चौकार,   षटकार मारत न धावताच त्याने हाय फिल च्या पहिल्याच सामन्यात विजयश्री खेचून आणली होती.
  दुर्दैवाने या रोहमर्षक सामन्याचा आनंद घेण्यास अनेक जण मुकले होते असे काही जाणकार इतिहास तज्ञ म्हणतात.  त्याकाळी अनेक जणांकडे मनोरंजनासाठी इडिएट बाॅक्स होते. मुंबई संघ एकतर्फी सामना जिंकणार असे वाटून अनेकांनी ' ग्रहण' ही त्यावेळची काॅमेडी मालिका लावली. ज्याक्षणी पल्लवी या नटीने डोळे वटारले त्याच क्षणापासून मुंबई संघास ग्रहण लागल असेे काही विदूषी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन सांगतात

तर असा हा ' विजय दिन ' . आज यानिमित्ताने मुंबईत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  खास चेन्नई हून स्पेशल पिवळ्या रंगाच्या ४ बुलेट ट्रेन मुंब ई साठी सोडण्यात येणार आहेत. बिकेसी टर्मिनल्स इथे महामेळावाही आयोजित केला आहे तिथून वानखेडे पर्यत महामोर्चाचे आयोजन केले आहे.  तुम्हालाही सर्वाना या दिवसाच्या शुभेच्छा

📝 जीवन सुंदर आहे.
 फक्त टुकार लिहिता आलं पाहिजे 🏏

April 3, 2018

सेफ्टी आॅडिट

शनी पँसेंजरला ओलांडून मंगळ सुपरफास्ट पुढे गेली आहे.
आता हळूहळू ' आगी' लागण्याच्या / लावण्याच्या घटना जाणवण्याइतपत कमी होतील ( ८-१० एप्रिलनंतर)

तरी देखील ज्यांनी आपले, आपल्या कुटुंबियांचे * सेफ्टी आँडीट केलेले नाही त्यांनी ते अवश्य करुन घ्यावे.

त्यासाठी लागणारे साहित्य
नाव, जन्म दिनांक, जन्म वेळ, जन्म ठिकाण.

मोरया 🌺🙏🏻
( *जहिरात हितार्थ जारी 📝)

April 1, 2018

शनी आणी मारुती

"भविष्य दर्पण" या प्रो. मा.कृ बेहेरे लिखित पुस्तकात एक interesting माहिती  वाचली. त्यात त्यांनी मारुती आणि शनी यांची गोष्ट दिली आहे.
त्याचा सारांश असा

एकदा शनी मारूती कडे गेला आणि म्हणाला आम्ही सगळ्यांच्या राशीला गेलो पण तुमच्या आलो नाही. 
मारुती म्हणाला हरकत नाही ये. बस माझ्या डोक्यावर.  शनी बसला.
सकाळी लोक देवळात आले आणी पाहतात ते काय एक विचित्र प्राणी,  चमत्कारिक आकार मारूतीरायांच्या डोक्यावर बसलेला. त्याला हुसकावून लावण्यासाठी त्यांनी भराभर दगड मारले. शनीला मार बसावयास लागताच तो पळून जावयास लागला पण मारूतीने शेपटीने त्याला गुंडाळून ठेवले होते.
Finally शनीने मारूती रायांची माफी मागून परत त्यांच्या वाटेला जाणार नाही असे सांगितले.

मारूतीला मंगळाचा अवतार मानले आहे. म्हणूनच साडेसातीत मंगळाची उपासना करावी असे म्हणतात.  

आता जोतिशास्त्रात शनी - मंगळ युती का वाईट मानली जाते याच्या मागचे  कारण वरील गोष्ट वाचूनही लक्षात येईल.

गेले अनेक दिवशी मंगळ ग्रह जसाजसा धनू  राशीत शनी कडे वाटचाल करताना अनेक अप्रिय घटना ( आगी लागणे/ लावणे, सामाजिक / राजकीय अस्थिरता)    घडल्याचे दिसले.

आज ३१ मार्चला मंगळ ग्रह धनू राशीत पु.षाढा नक्षत्र चरण १ मधे आला आहे.(  १३ अंश , २६ कला)
शनी महाराज इथेच ( १४ अंश,  ४९ कला)  आहेत

आत्ताच असे ऐकले की पँलेस्टाईन, इस्राईल मधे बाॅम्बींग सुरु झाले आहे

ग्रह आपले काम बरोबरच करत असतात. आपल्याला ते अभ्यासता आले पाहिजे 

📝 जोतिष अभ्यासक

March 18, 2018

आजचे ग्रह विशेष - १८ मार्च

सर्वांना विलंबी नाम संवत्सराच्या शुभेच्छा

आज १८ मार्च

बुध-चंद्र - शुक्र युती ( मीन राशीत)
चंद्र - शनी केंद्र योग

रविचा उ.भाद्रपदा चरण १ मधे प्रवेश

संदर्भ कालनिर्णय पंचांग

January 8, 2018

महाराज माझे जवळी असावे


*महाराज माझे जवळी असावॆ*

( चमत्काराचा ( ब्रह्म ) चैतन्यकारी अनुभव : )

🙏🏻🌺


असं म्हणतात  की जेव्हा तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री जायचा विचार करता  तेव्हा तिथल्या देवाचे / संतांचे  बोलावणे यावे लागते त्याशिवाय  जाणं होत नाही . 


ब -याच दिवसापासून गोंदवले क्षेत्री जायचे ठरत होते. पण योग येत नव्हता . नवीन वर्षात पहिल्या शनिवारी योग जुळून आला. महाराजांनी नुसते बोलावले नाही तर संपूर्ण प्रवासात आपल्या बरोबर ते आहेत याची अनुभूती  झाली. 


मी आणि माझे कंपनीतले दोन सहकारी साधारण २ वाजता  कळव्याहून  निघालो . मागील दोन शनिवारी पुण्याला गेलो असल्याने आणि त्यावेळच्या वाहतूक कोंडीचा  अनुभव असल्याने  संध्याकाळी न निघता  दुपारी  निघावे असे ठरवले आणि  कुठलीही अडचण न येता साधारण साडेपाच च्या सुमारास शिरवळ जवळ पोचलो. थोडा विसावा घेतला . त्याचवेळी पुण्याच्या एका  मित्राने भक्त निवासातला नंबर दिलेला होता. तिथे फोन करून कळवावे म्हणून संपर्क केला पण फोन उचलला गेला नाही. पुण्याच्या मित्राला परत फोन केला असता तो म्हणाला ऑफीस बंद झाले असेल  ८ पर्यत  पोच आणि  काही अडचण आल्यास ओळखीची नावे सांगितली. त्याला मजेने म्हणले असं कस ८ ला बंद करतात. महाराजाना सांगायला पाहिजे आम्ही  एवढ्या लांबून येतोय 


तिथून निघून  साधारण ७ वाजता सातारा इथे पोचलो. हायवे वरून कोरेगाव कडे जाणारा रस्ता जिथे होता तिथे उड्डाण पुलावरून न जाता  खालच्या रोडने गेलो . त्या सर्वीस रोडवर एक मोठा स्पीड ब्रेकर होता. तो न दिसल्याने  गाडी जोरदार उडाली आणि खाली आली. हादरा जोरदार होता आणि लक्षात आले मागच्या बाजूचे चाक पंक्चर झाले आहे. सुदैवाने एका टायर वर्क शॉप पाशीच गाडी होती. पण त्यांनी पंक्चर काढत नाही असे सांगितले. गोंदवल्याला जायचे आहे ८ पर्यत पोचायचे आहे निदान चाक तरी बदलून द्या अशी विनंती केल्यावर मालक तयार झाले आणि त्यांनी तिथल्या एका कर्मच-याला सांगून चाक बदलून दिले . 


या सगळ्या गडबडीत १०-१५ मिनिटे गेली. सातारा - गोंदवले  साधारण ६० किलो मीटर अंतर. अपरिचित रस्ता, रात्रीची वेळ त्यात पंक्चर चाक तसेच  घेऊन जायचे का पंक्चर काढून  जायचे याबाबत द्विधा मनस्थिती. कारण परत थांबलो तर पोचायला उशीर होणार.  पण मग न थाबता गोंदवले ला जाऊ आणि पंक्चर सकाळी काढू  या विचाराने कोरेगाव रस्त्याला डावी कडे वळलो. एकदा हाच रस्ता ना ही खात्री करण्यासाठी  एका सद्गृहस्थानां  विचारता  ते म्हणाले हाच रस्ता आहे आणि मलाही  गोंदवलेच्या अलीकडे २० किमी जायचे आहे तर मी येऊ का ?  त्यांना घेऊन आमचा  पुढील प्रवास सुरु झाला.


 रस्त्यावर कामे चालू असल्याने ठिकठिकाणे तयार केलेलं वळण मार्ग , कारखाना चालू असल्याने  ऊस वाहतूक   या सगळ्यात एकच समाधानाची गोष्ट म्हणजे पुढे रस्ता विचारावा लागला नाही कारण ते सद्गृहस्थ . गोंदवलेच्या आधी उतरल्यावरही पुढे कसे जायचे किती चौक  येतील  हे सगळं व्यवस्थित सांगून ते उतरले आणि आम्ही साधारण ९  वाजता पोहोचलो . भक्त निवासाची चौकशी करण्यासाठी जेव्हा कार्यालयात गेलो तेव्हा त्यांनी आधी  ' प्रसाद ' घ्यायला सांगितले. प्रसाद घेऊन झाल्यावर भक्त निवासातील एक खोली मिळाली. वाहनतळावर गाडी लावण्यासाठी गाडी प्रवेशद्वारातून आत घेतली. बँगा  उतरवण्यासाठी  मित्र आला आणि मी त्याला सांगतोय अरे उजव्या बाजूचे मागचे दार घडत नाही आहे हे माहीत आहे ना तुला ? हे सांगत असतानाच त्याने दार ओढले आणि ते चक्क निघाले . गेले ५ -६ महिने बंद असलेले दार ( गँरेज मध्ये जाऊन दुरुस्त करण्यात  वेळ न झाल्याने ) चक्क उघडले ? विश्वास बसत नव्हता ?  पण जे घडले ते सत्य होते. माझ्या सारख्या  धार्मिक, आस्तिक माणसासाठी हा चमत्कारच होता 


रात्री समाधीस्थानाचे दर्शन घेऊन आल्यानंतर सहज विचार केला  जर आपण नास्तिक असतो  तर या घटनेची उकल आपण कशी केली असती. बरोबर  मंदिरात गेल्यावरच दार कसे उघडले ? असा विचार करत असताना  तो प्रसंग आठवला . साता-यात  गतिरोधकावर उडून जेव्हा गाडी आपटली खाली तेव्हा त्या झटक्याने काही कारणाने आतील लॉक  झालेले यंत्र  चालू झाले असेल पण ते दार उघडण्याचा प्रसंग योगायोगाने  मंदिरात गेल्यावरच आला 

असो नास्तिक, विज्ञानवादी यांना  हे वरचे विवेचनपटण्यासारखे आहे.


  *पण  महत्वाचा मुद्दा  इथे मला सांगावासा वाटतो की  अशी बुध्दी सुचणे / हा तर्कशुध्द्व विचार   ( लॉजिकल विचार करणे ? )  करण्याचे सामर्थ्य ही  आपल्याला  या संत, महंतांच्या संगतीने मिळत असेल का ?   मला वाटते नक्कीच 


या संपूर्ण प्रवासात  'महाराज सोबत आहेत  ' ही जाणीव वेळोवेळी  होत गेली. 


 शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज , पावसचे स्वरुपानंद , नरसोबावाडीचे म्हादबा पाटील महाराज , अक्कलकोटचे स्वामी समर्थ , सज्जनगडचे रामदास स्वामी किंवा गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज .'  आणी इतर. यांनी


भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम  किंवा गजानन महाराजांच्या  पसायदानातील  वाक्य '  महाराज माझे जवळी असावे '  

हे सतत म्हणावयास सांगितले आहे 

आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ही सगळी वेगवेगळी स्लोगन्स आहेत, सांगायचे मार्ग वेगवेगळे आहेत  पण अंतिम उद्देश एकच भक्ती आणि भक्तीतून येणारे शहाणपण. 


हा प्रवास चैतन्यदायी अनुभव देऊन गेला. या एकंदर प्रवासात  ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले त्या सर्वाचे आभार 🙏🏻


देवा तुझ्या द्वारी आलो 

८/१/१८

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या