December 4, 2018

गर्वहरण

गर्वहरण 

महाभारतात भीमाचे गर्वहरण ही ही एक कथा सगळ्यांना माहित असेल
ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी 

एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती.
भीमाने माकडाला शेपटी बाजूला घ्यायला सांगितले.  माकड म्हणाले मी आजारी आहे तेंव्हा तूच घे
भीम म्हणाला मी नाही तुझ्या घाणेरड्या शेपटीला हात लावणार.
माकड म्हणाले ठिक आहे तुझ्या हातातील गदेने तरी बाजूला करशील? 

भीमाने खुप प्रयत्न केला पण त्याला माकडाची शेपटी थोडीदेखील हलवता आली नाही. शेवटी तो माकडाला शरण गेला आणि हनुमानाने त्याला दर्शन देऊन त्याचे गर्व हरण केले. अशी ही कथा

ही कथा आठवली याचे कारण सध्या अनेक राजकीय नेत्यांना/ योगी/ मुनींना  हनुमान कुठल्या जातीचा आहे हे ठरवण्याची खुमखुमी आलेली आहे.

हनुनानाने असेच त्यांच्या मार्गात. वानररुपात येऊन बसावे.  जी जात किंवा ज्या जातीचा समुह वाटेतील शेपूट बाजूला करेल त्या जातीचा मी असे जाहीर करून जातीरुपी भिम जो सगळ्यांच्यात संचारलाय  त्याचे गर्वहरण करावे.


अनेक गोष्टी अशा आहेत की माणसांचे गर्विष्ठ भीमात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही आहे.
राजकीय नेते हे सहज दिसणारे उदाहरण. त्याखालोखाल अभिनेते, नायिका, खेळाडू,  वक्ते,     व्यवसायिक, लेखक, वक्ते इ.इ

मलावाटते प्रत्येकवेळी हे गर्वहरण  करायाला बजरंग बली पोचू शकत नाही म्हणून 'शनी' महाराजांबरोबर युती करुन ' साडेसातीचा फाॅर्म्यूला ' नियतीने केला असावा.

शनीचा फेरा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर माणसातील गर्वरुपी भीमाला परत माणूस बनवणे.

मारूती राया तुझी लीला अगाध आहे 🙏🏻🙏🏻🌺

📝४/१२/१८
देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.in

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या