October 22, 2012

  !!   महालक्ष्मी कृपा प्रार्थना स्तोत्र    !!


 नमो माये , महा माये सर्वसिध्दिम् प्रदायिनी
अन्नं, वस्त्रं, तथा द्रव्यं  देहि मे परमेश्वरी
सर्व मंगल मांगल्ये , शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते

उमा गौरी, शिवा दुर्गा , भद्रा भगवती तथा
कुलदैवत चामुंडा रक्षतुं बालकं सदा
सर्वबाधा, निर्मुलाय, धनधान्य सुन्तविती
मनुष्यो यत् प्रयत्नेन भविष्यति नो संशयः

गायत्री चैव , सावित्री, पार्वतीच सरस्वती
वेदगर्भा वरारोहः गायत्री परम अंबिका

वरा मागितो एक ऐसाची द्यावा
घडू दे मनी, पूर्ण वांछित सेवा
तुझे गुण गाता स्फूरण दे स्वराला
तुला अर्पितो कालिके पुष्पमाला

संताचिया संगतीचा पुरावा
तुझे रुप डोळा दिसोनी उरावा
खरा मार्ग दावी सदा सज्जनाला
तुला अर्पितो रेणुके पुष्पमाला

तपस्वी तपस्येत, बैसुनी ध्यानि
तुझे अंबिका नाव ऐकोनी कानी
अति व्याकुळ ते तुझ्या दर्शनाला
तुला अर्पितो  एकविरे पुष्पमाला

पायी पडो मस्तक सेवकांचे
सदा नम्र धारी, असुरे जगाची
किती वर्णू मी या सुवर्णाक्षराला
तुला अर्पितो अंबिके पुष्पमाला

टळे विघ्न सारे तुझे नाम घेता
कधी दुर्जनाचा , नये काळ बाधा
सदा ठेव तू लोचनी बालकाला
तूला अर्पितो ललिते पुष्पमाला

ने दुष्ट बुध्दी आम्हां मानवांची
सद् बुध्दी दे नित्य विद्या धनाचि
आरोग्य आयुष्य दे शक्ति आम्हां
तुला अर्पितो जोगवे पुष्पमाला

प्रतिज्ञा करी माय तू लेकरांची
करी चाचणी, भक्ती भावार्थ साचि
तुझे रुप दावी आम्हा बालकांना
तुला अर्पितो चामुंडे पुष्पमाला

तिर्थास जाई, सदा भक्त भारी
कधि ना दिसे , मूर्त भोळी विचारी
गंधाक्षता वाहूनिया क्षणाला
तुला अर्पितो तुळजाभवानी पुष्पमाला

महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती :
तीन मुख्य अवतार - अवतार नवदुर्गा
तुला अर्पितो नवरात्र पुष्पमाला

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या