November 29, 2015

संकष्टी चतुर्थी

श्री  गणेशाय  नम :!


आज संकष्टी चतुर्थी 

 वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची  माहिती संकलीत उद्देशाने चालू केलेल्या   या लेखन मालेच्या दुस-या भागात  
आज आपण माहिती घेऊ  तासगाव ( जिल्हा :सांगली )   येथील  गणपतीचे .


तासगांवचे गणेश मंदिर व गोपूर
प्रिंट
तासगाव या तालुक्याच्या ठिकाणी ( जिल्हा : सांगली )  श्री गजाननाचे जुने मंदिर आहे. पेशव्यांचे प्रसिध्द
सेनानी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुमारे २०० वर्षापूर्वी हे मंदिर आणि दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपूर
गणेश मंदिराच्या पुढे बांधले आहे.
तासगावचे गणपती मंदिर व त्याचा रथोत्सव भाविकांच्या श्रध्देचा विषय आहे.पशुरामभाऊंनी तासगावला
 उजव्या सोंडेच्या गजाननाचे पंचायतन आणि गोपुरयुक्त मंदिर परिसर असे बांधकाम करण्याचे निश्चित केले.
कर्नाटकातील महादेव शेट्टीबा गवंडी आणि राजस्थानचे चित्रकार यांच्या परिश्रमातून हे गणपती मंदीर १७७९
मध्ये पूर्ण झाले.मंदिराची रचना पाहिली तर पूर्वेचे भव्य प्रवेशद्वार, त्यावरील नगार खाना, शेजारील रथ गृह,
 लगतच पश्चिम बाजूचे भव्य पटांगण प्रवेशद्वार व त्यावरील
 सात मजली ९६ फूट उंचीचे गोपुर आहे. मुख्य गाभार्‍यात गणपातीची उजव्या सोंडेंची तांबूस गारेची सुबक मूर्ती आहे.
मंदिरची बांधणी दगडी व हेमाडपंथी आहे. सर्व बाजूनी मजबूत अशी तटबंदी,
सुशोभित उद्याने मंदिराची रचना अधोरेखित करते.

गणेश मंदिराच्या बरोबर समोर अर्धा किलो मीटरवर काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. मंदेरात दररोज काकड आरती,
 पूजा, दुपारी सायंकाळी आरती व शेजारती होते.तसेच संकष्टी, विनायकी चतुर्थी, सर्व प्रमुख सण,
श्री चा वाढ दिवस व भाद्रपद मास या सर्व दिवशी सायंकाळी श्रीं ची पालखीतून मिरवणूक निघते.
गोंद्गळ्याचे पोवाडे गायन हे त्याचे वैशिष्टय आहे.दरवर्षी श्रावण शुध्द चतुर्थी ते भाद्रपद चतुर्थी
 पर्यत एक महिना देवाचा अभिषेक होतो.
भाद्रपद शुध्द प्रतिपदेपासून श्री च्या वार्षीक उत्सवास सुअरवात होते.रथोत्सवाच्या वेळी गणपती
शंकरास भेटण्यासाठी रथातून जातो.भेट झाल्यानतंर गणपती परत मंदिरात येतो.सांयकाळी श्री ची
महापूजा व प्रसाद वाटप होते.


संकलीत माहिती : माय सांगली.कॉम 
गणेश चित्र साभार : सांगली शिक्षण संस्था  शताब्दी विशेषांक भाग २
संकलन : अमोल केळकर 

November 24, 2015

सूर निरागस हो. गणपतीसूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो. शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक. शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक. ॐकार गणपती. ॐकार गणपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. लीन निरंतर हो. लीन निरंतर हो... सूर निरागस हो. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता. गजवदना मोरया. मोरया... सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो. सूरसुमनानी भरली ओंजळ नित्य रिती व्हावी चरणावर. तान्हे बालक सुमधुर हासे भाव तसे वाहो सूरातुन. ॐकार गणपती. ॐकार गणपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती. लीन निरंतर हो. लीन निरंतर हो. गणपती. सूर निरागस हो. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता. गजवदना मोरया. मोरया... सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.

November 23, 2015

तुलसी विवाह

तुलसी विवाह — कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीविवाह केला जातो .काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात. नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू, बाळकृष्ण वर, आणि ऊस हा मामा असे मानले जाते.त्यासाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात. तुळशीच्या चारही बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव तयार करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची ,फुले, चिंचा, आवळे ठेवतात. तुळशीच्यासमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्यकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान या साहित्यासमवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.

 यासंबंधी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही प्रतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यपुण्यामुळे विष्णूला जालंधराला मारणे अवघड होऊन बसले. तेव्हा श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला.हे सर्व वृंदेला समजताच तिने विष्णूला शाप दिला. .व ती स्वत; सती गेली. तिच्या मृत्युच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, तीच तुळस . म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते. अशीही एक कथा सांगण्यात येते. पुढे द्वापार युगात याच वृंदेने रुक्मिणी होऊन कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न लावले. त्यावेळेपासून तुलसीविवाहास प्रारंभ झाला असे मानतात. . तुलसी स्तोत्र ——


 तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी | अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम || सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा | द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: || 


 काही मंगलाष्टके -

स्वस्ति श्री गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिध्दीदम् । 
बल्लाळं मुरूड विनायक मढं चिंतामणी थेवरम् ॥
लेण्याद्री गिरिजात्मक सुवरदम् विघ्नेश्वरं ओझरम् । ग्रामे रांजम संस्थिते गणपती कुर्यात् सदा मंगलम्  ॥ 

 गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा

 कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका 
क्षिप्रा वेत्रवती महा सुरनदी ख्याता ज्या गंडकी 
 पुर्णा पूर्ण जलै : समुद्र सहिता कुर्वंतु वो मंगलम

 रामो राजमणिः सदा विजयते | रामं रमेशं भजे | रामेणाभिहता निशाचरचमू | रामाय तस्मै नमः॥ रामान्नास्ति परायणं परतरं | रामस्य दासोऽस्म्यहम् । रामे चित्तलयः सदा भवतु मे| भो राममामुद्धर ||.\

 कुर्यात सदा मंगलम , शुभ मंगल सावधान

 तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव | विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि || || शुभ मंगल सावधान


सर्व माहिती  संग्रहीत 

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या