November 29, 2015

संकष्टी चतुर्थी

श्री  गणेशाय  नम :!


आज संकष्टी चतुर्थी 

 वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची  माहिती संकलीत उद्देशाने चालू केलेल्या   या लेखन मालेच्या दुस-या भागात  
आज आपण माहिती घेऊ  तासगाव ( जिल्हा :सांगली )   येथील  गणपतीचे .


तासगांवचे गणेश मंदिर व गोपूर
प्रिंट
तासगाव या तालुक्याच्या ठिकाणी ( जिल्हा : सांगली )  श्री गजाननाचे जुने मंदिर आहे. पेशव्यांचे प्रसिध्द
सेनानी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुमारे २०० वर्षापूर्वी हे मंदिर आणि दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपूर
गणेश मंदिराच्या पुढे बांधले आहे.
तासगावचे गणपती मंदिर व त्याचा रथोत्सव भाविकांच्या श्रध्देचा विषय आहे.पशुरामभाऊंनी तासगावला
 उजव्या सोंडेच्या गजाननाचे पंचायतन आणि गोपुरयुक्त मंदिर परिसर असे बांधकाम करण्याचे निश्चित केले.
कर्नाटकातील महादेव शेट्टीबा गवंडी आणि राजस्थानचे चित्रकार यांच्या परिश्रमातून हे गणपती मंदीर १७७९
मध्ये पूर्ण झाले.मंदिराची रचना पाहिली तर पूर्वेचे भव्य प्रवेशद्वार, त्यावरील नगार खाना, शेजारील रथ गृह,
 लगतच पश्चिम बाजूचे भव्य पटांगण प्रवेशद्वार व त्यावरील
 सात मजली ९६ फूट उंचीचे गोपुर आहे. मुख्य गाभार्‍यात गणपातीची उजव्या सोंडेंची तांबूस गारेची सुबक मूर्ती आहे.
मंदिरची बांधणी दगडी व हेमाडपंथी आहे. सर्व बाजूनी मजबूत अशी तटबंदी,
सुशोभित उद्याने मंदिराची रचना अधोरेखित करते.

गणेश मंदिराच्या बरोबर समोर अर्धा किलो मीटरवर काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. मंदेरात दररोज काकड आरती,
 पूजा, दुपारी सायंकाळी आरती व शेजारती होते.तसेच संकष्टी, विनायकी चतुर्थी, सर्व प्रमुख सण,
श्री चा वाढ दिवस व भाद्रपद मास या सर्व दिवशी सायंकाळी श्रीं ची पालखीतून मिरवणूक निघते.
गोंद्गळ्याचे पोवाडे गायन हे त्याचे वैशिष्टय आहे.दरवर्षी श्रावण शुध्द चतुर्थी ते भाद्रपद चतुर्थी
 पर्यत एक महिना देवाचा अभिषेक होतो.
भाद्रपद शुध्द प्रतिपदेपासून श्री च्या वार्षीक उत्सवास सुअरवात होते.रथोत्सवाच्या वेळी गणपती
शंकरास भेटण्यासाठी रथातून जातो.भेट झाल्यानतंर गणपती परत मंदिरात येतो.सांयकाळी श्री ची
महापूजा व प्रसाद वाटप होते.


संकलीत माहिती : माय सांगली.कॉम 
गणेश चित्र साभार : सांगली शिक्षण संस्था  शताब्दी विशेषांक भाग २
संकलन : अमोल केळकर 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या