January 22, 2009

मॅट्रीक्स सिनेमा आणि टॅरो कार्ड

कालच एक व्हिडिओ पहाण्यात आला. तो इथे देत आहे. आपल्या पैकी बर्‍याच जणांनी हा सिनेमा पाहिला असेल. यातील काही प्रसंग, व्यक्तीरेखा घेऊन टॅरो कार्डातील २२ महत्त्वाची/ मेजर कार्डस समजावून सांगितली आहेत.
अगदी चफखल पणे प्रतेक कार्ड आणि प्रसंग गुंफला आहे. आपल्याला ही हा व्हिडिओ नक्की आवडेल.




January 13, 2009

अंदाज अपना अपना







महाराष्ट्रातील असंख्य लोकांच्या आग्रहास्तव तसेच गायन क्षेत्रातील जाणकार परीक्षक , रसिक यांनी केलेल्या आग्रहास्तव काल अत्यंत नाट्यमय पध्दतीने ५ ही लिटील चॅम्पस 'महाअंतीम फेरीत' जाणार हे पल्लवी जोशी ने जाहीर केले आणि सर्वांना अतीशय आनंद झाला.


प्रत्यक्षत मोबाईल कंपन्यांचे हीत लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे यात शंका नाही. खरं म्हणजे ३ स्पर्धक अंतीम फेरीत असते तर जास्त मजा आली असती . पण आता ३ एवजी ५ स्पर्धक असल्याने या सर्वांचे सगे - सोयरे भरपुर एस एम एस करणार आणि जास्त फायदा मोबाईल कंपनी, प्रायोजक यांना होणार यात सगळे गणित आहे.
यावेळी असंख बक्षीसात विजेत्याला , उपविजेत्याला सेव्हींग सर्टीफीकिट देणार असल्याचे ऐकले। मला वाटते या मुलांच्या दृष्टीने हा खरोखरच एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. पालकाना याचा उपयोग त्यांचे संगीत करीयर घडवण्यास नकीच
होईल


चित्र सौजन्य - झी मराठी वेबसाईट)

यानिमित्याने मी या महाअंतीम फेरीत पोचलेल्या मुग्धा वैशंपायन, अर्या अंबेकर, कार्तीकी गायकवाड, रोहीत राऊत, प्रथमेश लघाटे या सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.
या पंचरत्नातून कोहिनूर कोण ठरतो/ ठरते आहे ही उत्सुकता लागून राहिली आहे. प्रत्तेक जण आपला अंदाज व्यक्त करित असतो. मी माझे मत देणार आहे मुग्धाला.
पाहुया विजयाचे संकेत देणारे ६ ऑफ वॉन्ड हे कार्ड कुणाला विजय मिळवून देतो ते.

January 6, 2009

तारे आणि सितारे

नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे, या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान तृप्ती, कृतज्ञभाव, स्नेह या भावनांना तराजू असते तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्यांचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला, त्याच्यावर इन्कमटॅक्शी बसला असता. मग एकही माणूस साधं हसला नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा 'नक्षत्रांचं देणं' कधीही चुकवता येत नाही यातच त्यांची उंची. तिथं हात पोहोचू नयेतच. कारण आम्ही माणसांनी, जिथं जिथं आमचे हात पोचले तिथं तिथं स्वतःचे शिक्के उमटवले. त्यापेक्षा अशाच काही अलौकिक चांदण्या, तेजस्वी तारे अवतीभवती वावरतात, तिथं माथा झुकवावा. पण आम्हाला सितारे ओळखायला येतात, तारे नाहीत.
( चित्र सौजन्य। - १ डिसेंबर २००८ चंद्र, शुक्र, गुरु युती )

हे दोन्ही ओळखणं खरं तर सोपं आहे. डोळे उघडल्याशिवाय जे दिसत नाहीत ते सितारे. जे मिटल्यावर दिसतात ते तारे.-

- व.पु. काळे

January 1, 2009

नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

काळ आणि वेळ हे कुणासाठी थांबत नाहीत। या सृष्टीची गती अव्याहत पणे सुरु आहे। परत एकदा आपण सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताला सज्ज झालो आहोत .
या वर्षात अनेक बरे वाईट अनुभवांची शिदोरी घेऊन आपण नवीन वर्षात एका नव्या जोमाने पदार्पण करणार आहोत.

हे वर्ष संपता संपता जागतिक मंदी, बेकारी, दह्शदवाद च्या रुपाने नवीन आव्हाने आपल्या समोर उभी राहिली आहेत. लोकसंख्या , जातीयवाद, प्रादेशिक वाद यांचा ही समर्थपणे मुकाबला करावयाचा आहे.

कवी मंगेश पाडगावकर यांच्या या ओळी या प्रसंगी आठवतात-

घावावचुन नसे देवपण
जळल्यावाचुन प्रकाश कोठुन?
अंधार दाटला घोर जरी

हा दीप तमावर मात करी !!





परिस्थिती कधीच कयम रहात नाही. सुखा नंतर दु:ख, दु:खानंतर सुख मिळत असते. व्हील ऑफ फॉर्चून हे कार्ड याचेच प्रतिक आहे. हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा नशीब, परिस्थिती तुम्हाला अनुकुल असेल असे दर्शवते.
येणारे नवीन वर्ष आपणास असेच प्रगती करणारे ठरो। सध्याची निराशवादी परिस्थिती बदलून तुमच्या आयुष्यात एका नवीन आशावादी जिवनाची सुरवात होवो।


आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या