नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे, या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान तृप्ती, कृतज्ञभाव, स्नेह या भावनांना तराजू असते तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्यांचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला, त्याच्यावर इन्कमटॅक्शी बसला असता. मग एकही माणूस साधं हसला नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा 'नक्षत्रांचं देणं' कधीही चुकवता येत नाही यातच त्यांची उंची. तिथं हात पोहोचू नयेतच. कारण आम्ही माणसांनी, जिथं जिथं आमचे हात पोचले तिथं तिथं स्वतःचे शिक्के उमटवले. त्यापेक्षा अशाच काही अलौकिक चांदण्या, तेजस्वी तारे अवतीभवती वावरतात, तिथं माथा झुकवावा. पण आम्हा
ला सितारे ओळखायला येतात, तारे नाहीत.




( चित्र सौजन्य। - १ डिसेंबर २००८ चंद्र, शुक्र, गुरु युती )
हे दोन्ही ओळखणं खरं तर सोपं आहे. डोळे उघडल्याशिवाय जे दिसत नाहीत ते सितारे. जे मिटल्यावर दिसतात ते तारे.-
- व.पु. काळे
No comments:
Post a Comment