श्री गजानन महाराजांची आरती
मम नयनी पहा तेवती प्रेमभाव ज्योती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
चिलीम हातीची जगा दाविते अग्नीची साधना
नाथ पंथी तू हरिहर येथे एक होती जाणा
गण गण गणात बोते ऐसे शब्द मुखांतून येती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
पत्रावळीची शिते वेचुनी अन्न ब्रह्म कवळिसी
जागचा तू मुली न हालसी डसली जरी माशी
रिद्धी सिद्धी हात जोडुनी पुढे उभ्या राहती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
पंच महाभूते अवघी तुझिया आज्ञेत
फुटल्या होडीमध्ये भक्ता रे बा वाचवित
तुझीया माजी बघे बापुंना श्री विठ्ठल मूर्ती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
तव दारिची पायपुसणी होऊन मज राहू दे
संत जनांच्या पायधुळीने पुनीत कुडी होऊ दे
सेवा माझी इवली इवली अनाम राहू दे जगती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
देहाची त्वा खोळ टाकली ऋषीपंचमीला
चिन्मय दर्शन आजही देसी अनन्य भक्तांना
चिंतनॆ रमता बिंदूमाधवा शब्द सुलभ येती
शेगावीच्या गजानना तुज ओवाळू आरती !!
No comments:
Post a Comment