March 3, 2015

होळी




होळी पेटविण्याची योग्य पद्धत



देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी.
 दिवसा होळी पेटवू नये.
 शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. 
सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर
 ‘।।होलिकायै नम: ।।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी.
 होळीची प्रार्थना करावी.
 होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. 
होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. 
नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत.

 दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत

होळीशी संबंधित विविध कथा पुरातन ग्रंथांमध्ये आढळून येतात. या कथांमागे जीवनाचे सूत्र दडलेले आहेत. होळीशी संबंधित एक कथा पुढीलप्रमाणे आहे.

इंद्रदेवाला महादेवाची तपश्चर्या भंग करावयाची होती. त्यांनी कामदेवाला हे काम करण्यास सांगितेल. कामदेवाने त्यावेळी आपल्या माया शक्तीने वसंत प्रभाव निर्माण केला. या प्रभावाने सृष्टीवरील सर्व जीव काममोहित झाले. कामदेवाचा महादेवाची तपश्चर्या भंग करण्याचा हा प्रयत्न होळीपर्यंत चालू राहिला. होळीच्या दिवशी महादेवाची तपश्चर्या भंग झाली. क्रोधीत झालेल्या महादेवाने कामदेवाला भस्म केले आणि संदेश दिला की होळीच्या दिवशी (मोह, इच्छा, हाव, धन, मद) या गोष्टींना स्वतःवर हावी होऊ देऊ नका.

तेव्हापासून होळीला वसंत व होळी उत्सवाची परंपरा सुरु झाली. या घटनेनंतर महादेवाने पार्वतीसोबत विवाह करण्याची सम्मती दिली. यामुळे सर्व देवी-देवता,शिवगण आनंदित झाले. या सर्वांनी एकमेकांवर गुलाल, रंग टाकून हा उत्सव स्वरुपात हा दिवस साजरा केला. जो आज धुलीवंदन स्वरुपात घराघरात साजरा केला जातो.


 प्रल्हादाची कथा-  प्रल्हाद हा हिरण्यकश्यपु राक्षसाचा मुलगा. अतिशय विष्क्षुभक्त. त्याची परमेश्वराची भक्ती राजाला पाहवत नव्हती. त्याने प्रल्हादाला परावृत्त करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण यश आले नाही. 
भक्त प्रल्हाद त्यात अधिकाधिक तल्लीन होत गेला. हिरण्यकश्यपुची बहिण धुडां राक्षशीण. ही अग्नीत जळणार नाही असा तीला वर होता. धुंडेने राजाला सुचविले की मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही.प्रल्हाद मात्र जळून जाईल. 

हिरण्यकश्यपुला हे मान्य झाले. लाकडे व गोवऱ्यांची होळी रचण्यात आली. त्यात धुंडा राक्षसीणीसह प्रल्हादाला बसवून होळी पेटविण्यात आली. भक्त प्रल्हादाच्या असीम भक्तीमुळे प्रल्हाद जिवंत राहीला व धुंडा राक्षसीण मात्र तिच्या दृष्ट इच्छेमुळे जळून गेली. या प्रसंगाची आठवण म्हणून प्रतीवर्षी होळी साजरी करण्यात येते. 

अग्नीला शांत करण्याच्या उद्देशानेही होळी हा सण साजरा करण्यात येतो. फाल्गुन पौणिमेच्या दिवशी सायंकाळी आपल्या घरासमोर सडा सारवा करून, रांगोळी घालून, लाकडे गोवऱ्या पेटवून होळी साजरी करावी व होळीची पुजा करून नारळ आत टाकावे. जुन्या वाईट चालीरिती, अंधश्रध्दा, अप्रवृत्ती यांचा नाश करून नवीन विचारसरणी, बंधुभाव वाढवला पाहिजे हा या सणाचा उद्देश आहे.

1 comment:

rahul said...

वरील पोस्ट मध्ये 'दृष्ट' शब्द वापरला आहे, तो 'दुष्ट' असायला हवा होता.
ही पोस्ट आणि इतर पोस्ट वाचल्या, तुम्ही टेक्स्ट चा कलर डार्क ठेवला आहे. बॅकग्राउंड पण डार्क असल्यामुळे डोळ्यांना खूप त्रास होतो. शक्य झाल्यास सफेद बॅकग्राउंड ला काळ्या रंगात टेक्स्ट, अशीच रंगसंगती ठेवणे चांगले होईल.
तुमचे ब्लॉग वरील लेख मला आवडले.
तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे, तो तसाच चालू ठेवा. तसेच वरील सूचनांचा अगत्याने विचार करावा.
धन्यवाद!

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या